खाद्यपदार्थांची भारताची स्वतःची अशी समृद्ध संस्कृती आहे हे जगाने केव्हाच मान्य केलेले आहे. या ओळखीत दरवेळी मानाचे नवे पान जोडले जाते. २०२४-२५ च्या टेस्ट ॲटलासच्या २०२४-२५ या वर्षासाठी जगातील १०० सर्वोत्तम क्विझीन्स अर्थात खाद्यपदार्थांच्या यादीत भारताने १२वे स्थान पटकावले आहे. या जगप्रसिद्ध फूड आणि ट्रॅव्हल गाइडच्या यादीत टॉप दहाच्या आसपास असणे भारतासाठी भूषणावह आहे. हे फूड अणि ट्रॅव्हल गाईड दर वर्षअखेरीस जगातल्या विविध देशांच्या भिन्न आणि समृद्ध खाद्यसंस्कृतींचा वेध घेत असते. टेस्ट ॲटलासच्या विस्तृत डेटाबेसमधील १५ हजारांहून अधिक खाद्यपदार्थांसाठी ४ लाख ७७ हजार २८७ वैध रेटिंगच्या आधारे क्रमवारी निश्चित करण्यात आली.

सर्वोत्तम पाच देश कोणते?

या क्रमवारीत ग्रीसचा क्रमांक अव्वल आहे. त्या खालोखाल इटली, मेक्सिको, स्पेन आणि पोर्तुगाल या देशांनी अनुक्रमे दोन ते पाच क्रमांकांवर आपले नाव कोरले आहे. भारताचे सर्वोत्तम दहा मधील स्थान अवघ्या दोन क्रमांकांनी हुकले.

Announcements of organic natural farming Know how much the use of urea and other fertilizers has increased Mumbai news
सेंद्रीय, नैसर्गिक शेतीच्या फक्त घोषणाच; जाणून घ्या, युरियासह अन्य खतांचा वापर किती वाढला
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
Local fishermen save life of couple stuck in rough sea in ratnagiri
दाम्पत्याला भाट्ये समुद्रात खेळणे पडले महागात; स्थानिक मच्छीमारांनी वाचविले प्राण
price of potatoes increased up to rs 10 per kg due to supply restrictions from west bengal
उत्तरेत ऐन थंडीत बटाटा तापला; पश्चिम बंगालने राज्याबाहेर बटाटा, कांदा विक्री, वाहतुकीस घातली बंदी
Manyachiwadi Gram Panchayat received Nanaji Deshmukh Best Gram Panchayat and Gram Urja Swaraj Award
वैशिष्ठ्यपूर्ण मान्याचीवाडी ठरले देशातील सर्वोत्तम ग्राम, राष्ट्रपतींच्या हस्ते बुधवारी प्रतिष्ठेच्या दोन पुरस्कारांसह अडीच कोटींच्या बक्षिसांचे वितरण
export of organic food products Maharashtra
सेंद्रीय अन्न पदार्थांच्या निर्यातीत वाढ, जाणून घ्या, उत्पादनात महाराष्ट्र कुठे, कोणते राज्य आघाडीवर
Schezwan Dosa Recipe In Marathi Schezwan Dosa chutney quick dosa making tips how to make it crispy without breaking kitchen tips
शेजवान डोसा बनवून जिभेचे चोचले पूरवा! घ्या झटपट मराठी रेसिपी, ट्राय करताय ना?
india rejects food shipments from china sri lanka bangladesh japan and turkey over safety concerns
चीन, जपान, तुर्कीये, श्रीलंका, बांगलादेशी खाद्यवस्तूंना भारतीय मानकांचा दणका! परदेशातील खाद्यवस्तू भारत का नाकारतोय?

हेही वाचा : Black Peter gold discovery: या ‘काळ्या’ मराठी माणसाने न्यूझीलंडमध्ये शोधली होती सोन्याची खाण; काय आहे इतिहास?

भारतातील कोणत्या पदार्थांना जगभर पसंती?

भारताचे जागतिक क्रमवारीतील बारावे स्थान निश्चित करताना टेस्ट ॲटलसने ‘चाखून पाहायलाच हवेत’ असे काही भारतीय पदार्थ सुचवले आहेत. त्यात अमृतसरी कुल्चा, बटर गार्लिक नान, मुर्ग मखनी (बटर चिकन) आणि हैदराबादी बिर्याणी या पदार्थांचा समावेश आहे. पंजाबचे टिक्का, शाही पनीर, साग पनीर; महाराष्ट्राचा मिसळपाव, आमरस, श्रीखंड आणि पावभाजी; पश्चिम बंगालची चिंगारी मलाई करी, शोरशे इलिश, रस मलाई, काठी रोल; दक्षिणेचा मसाला डोसा, मद्रास करी या पदार्थांना खवय्यांनी पसंती दर्शवली आहे.

महाराष्ट्र कितव्या स्थानी?

महाराष्ट्राला कोकणापासून विदर्भापर्यंत खाद्यपदार्थांची रेलचेल आहे. म्हणूनच टेस्ट ॲटलासच्या उत्तम चवीच्या सर्वोत्तम १०० प्रदेशांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक ४१ वा आहे. महाराष्ट्राच्या मिसळ पाव, आमरस, श्रीखंड आणि पाव भाजीने लोकांच्या आवडत्या पदार्थांमध्ये बाजी मारली आहे. काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक हॉटेलात जाऊन बसलेल्या पंजाबी पदार्थांच्या लोकांच्या आवडीमुळे पंजाबने तर सातव्या क्रमांकापर्यत मजल मारली आहे. पश्चिम बंगाल ५४ व्या तर संपूर्ण दक्षिण भारत मिळून ५९ व्या स्थानी आहे.

हेही वाचा :मंदिर-मशीद वादावरील नवीन आदेशाचा काय परिणाम होणार? सर्वोच्च न्यायालयाने नक्की काय म्हटले?

मुंबईला मानाचे स्थान

टेस्ट ॲटलासने भारतीय खाद्यसंस्कृती जपणाऱ्या काही भारतीय रेस्टॉरंट्सचादेखील नामोल्लेख केला आहे. यात मुंबईच्या चक्क दोन हॉटेलांनी स्थान मिळवले आहे. राम आश्रय आणि श्री ठाकर भोजनालय या दोन रेस्टॉरंटमधील पदार्थांची चव अप्रतिम तर असतेच शिवाय यांनी भारतीय खाद्यसंस्कृतीची परंपरा जोपासली असल्याचा उल्लेख टेस्ट ॲटलासने केला आहे. याच नावांमध्ये दिल्लीतील दम पुख्त आणि दार्जिलिंगच्या ग्लेनरीज या रेस्टॉरंट्सचेही नाव आहे.

कोणते भारतीय पदार्थ पहिल्या शंभरात?

टेस्ट ॲटलासने जगातील टॉप १०० पदार्थांची क्रमवारीही जाहीर केली आहे. त्यात अनेक भारतीय पदार्थांनी मानाचे स्थान मिळवले आहे. मूर्ग मखनीने २९ वे स्थान पटकावले आहे. हैदराबादी बिर्याणी ३१ व्या स्थानी आहे. चिकन ६५ हा पदार्थ ९७ व्या स्थानी आहे तर खिमा १०० व्या स्थानी आहे.

चवीच्या शहरांमध्येही मुंबईला स्थान

खाद्यसंस्कृतीसाठी प्रसिद्ध असणारी जगातील टॉप १०० शहरे या विभागातली भारतातील अनेक शहरांनी बाजी मारली. पण ‘आमची मुंबई’ त्यातही आघाडीवर आहे. या यादीत मुंबईने पहिल्या पाचात जागा पटकावली आहे. जगातल्या १०० ‘बेस्ट फूड सिटीज्’मध्ये मुंबईचा क्रमांक पाचवा आहे. ‘इथे कोणीही उपाशी झोपत नाही’ अशी मुंबई शहराची ख्याती आहे. त्याचसोबत चवीचे देणारी अशीही ओळख आता सांगता येईल. अमृतसरने या यादीत ४३वे स्थान पटकावले आहे तर राजधानी दिल्ली ४५व्या स्थानी आहे. हैदराबाद ५०व्या, कोलकाता ७१व्या तर चेन्नई ७५व्या स्थानी आहे.

हेही वाचा :काशी, मथुरा ते अजमेर; ‘या’ १० जागांवर सुरू आहे मंदिर-मशीद वाद; या वादांचा इतिहास काय?

भारतीय पदार्थांचा गौरव

मसाल्याचा झणझणीत ठसका लागून डोळ्यांत पाणी आणणाऱ्या भारतीय पदार्थांना कधीकाळी पाश्चात्यांकडून नाकं मुरडली जायची, पण हेच भारतीय पदार्थ आपल्या त्याच मसालेदार तडक्यासह जगभरातल्या थाळ्यांमध्ये जाऊन बसले आणि त्यांनी जगाची जिव्हा आणि मनेही जिंकली. कारण जगातल्या बहुतांश देशांमध्ये भारतीय आपल्या अस्सल चविष्ट पदार्थांसह पोहोचले. रेस्टॉरंट्स उभारली आणि आपल्या खाद्यसंस्कृतीची दखल घेण्यास जगाला भाग पाडले. आपण जितक्या चवीने इटालियन, मेक्सिकन पदार्थ चाखतो, तितक्याच चवीने भारतीय पद्धतीच्या चिकन, गार्लिक नान आणि बिर्याणीवर जगात ताव मारला जातोय यापेक्षा मोठे सुख ते काय…

शेवटी आणखी एका सुखाचा उल्लेख करूच… टेस्ट ॲटलासच्या क्रमवारीत अमेरिकेचा क्रमांक आपल्या मागे, १३ वा आहे. खाण्याच्या बाबतीत का असेना आपण अमेरिकेला मागे टाकले आहे.

Story img Loader