प्रशांत केणी
महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने नुकतेच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमधील ३,००० मीटर स्टीपलचेसमध्ये रौप्यपदक जिंकले. राष्ट्रकुल स्पर्धेत अशी कामगिरी करणारा तो पहिला बिगरकेनियन धावपटू ठरला. केनियाच्या वर्चस्वाला आव्हान देत मिळवलेल्या या यशामुळे अविनाशचे सर्वत्र कौतुक होत आहे. भारतीय लष्करात कार्यरत असलेला हा चतुरस्र लांब पल्ल्याचा धावपटू ३,००० मीटर आणि ५,००० मीटर स्पर्धा प्रकारांशिवाय अर्धमॅरेथॉनमध्येही देशाचे प्रतिनिधित्व करतो. ३,००० मीटर स्टीपलचेस म्हणजे काय, राष्ट्रकुलमधील ताजे यश आणि राष्ट्रीय विक्रमाची वेळ नोंदवताना अविनाशने कशा प्रकारे केनियाच्या धावपटूंना आव्हान दिले, आगामी पॅरिस ऑलिम्पिकसाठीही अविनाश कशी पदकाची दावेदारी करू शकतो, आदी मुद्द्यांचा घेतलेला वेध.

अविनाशचा सहभाग असलेली ३,००० मीटर स्टीपलचेस स्पर्धा काय आहे?

३,००० मीटर स्टीपलचेस स्पर्धा म्हणजे एक प्रकारची अडथळ्याची शर्यत असते. या स्पर्धेत वेग, क्षमता, सामर्थ्य, सातत्यपूर्ण धावणे याचा कस लागतो. यात २८ निश्चित अडथळे आणि सात पाण्यातील उड्या (वॉटर जम्प्स) असतात. यातील विजेता हा सर्वांत कमी वेळेनिशी ३,००० मीटर अंतर पूर्ण करतो. पुरुषांच्या स्पर्धेसाठीचे अडथळे हे ३६ इंच (९१.४ सेंटीमीटर) आणि महिलांचे ३० इंच (७६.२ सेंटीमीटर) उंचीचे असतात. याचप्रमाणे पाण्यातील उडीत १२ फूट (३.६६ मीटर) लांब आणि ७० सेंटीमीटर खोल असते. यापैकी लाकडी अडथळे हे अडथळ्यांच्या शर्यतीपेक्षा आकाराने मोठे, धोकादायक आणि उंचावर असतात. त्यामुळे खेळाडूला त्यावर एक पाय ठेवूनसुद्धा उडी मारता येते. कारण त्याला स्पर्श न करता वेगाने मारलेली उडी फसली, तर गंभीर दुखापत होऊ शकते. महाराष्ट्राच्या ललिता बाबरने याच क्रीडा प्रकारात २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरी गाठली होती.

Harbhajan Singh believes India has a 50-50 chance of retaining the Border-Gavaskar Trophy in Australia
Harbhajan Singh : ‘जर सुरुवात चांगली झाली नाही तर…’, हरभजन सिंगचे पर्थ कसोटीपूर्वी मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘पहिलाच सामना खूप…’
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
maharashtra vidhan sabha election 2024 sudhir mungantiwar vs santosh singh Rawat Ballarpur Assembly constituency
लक्षवेधी लढत : मुनगंटीवार यांच्यासमोर कडवे आव्हान
लक्षवेधी लढत : यशोमती ठाकूर यांच्यासमोर भाजपचे आव्हान
Sanskruti More, a visually challenged chess player, satara district
अंधत्वावर मात करून यशशिखर गाठणारी बुद्धीबळपटू संस्कृती मोरे
India vs South Africa 3rd T20 Highlights in Marathi
IND vs SA 3rd T20 Highlights : रोमहर्षक सामन्यात भारताने मारली बाजी! तिलक वर्माचा शतकी तडाखा, मालिकेत २-१ घेतली आघाडी
Pankaja Munde At Rally In Parali Beed.
“डोळ्यांसमोर कमळ येईल, पण तुम्ही घड्याळाचेच बटन दाबा…” धनंजय मुंडेंच्या समोरच काय म्हणाल्या पंकजा? पाहा व्हिडिओ
Maharashtra coach Sulakshan Kulkarni regretted the loss of victory sports news
निराशाजनक पराभवामुळे आव्हान खडतर! विजय निसटल्याची महाराष्ट्राचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांना खंत

अविनाशने केनियाच्या धावपटूंच्या वर्चस्वाला कशा प्रकारे आव्हान दिले?

गेल्या १० राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधील स्टीपलचेस प्रकारात केनियाचे वर्चस्व दिसून आले आहे. १९९४नंतर या प्रकारात पदक जिंकणारा अविनाश हा पहिला बिगरकेनियन धावपटू आहे, हे त्याच्या यशाचे वैशिष्ट्य ठरेल. अविनाशला अंतिम फेरीत रिओ ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या आणि दोनदा विश्वविजेत्या कॉन्सेस्लस किप्रुटो तसेच २०१८च्या राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्या अब्राहक किबीवोट या केनियाच्या धावपटूंचे कडवे आव्हान होते. अखेरच्या टप्प्यात किबीवोट आणि अविनाश यांनी विजयरेषा गाठताना प्रयत्नांची पराकाष्ठा केली. परंतु अविनाशचे सुवर्णपदक ०.०५ सेकंदांनी हुकले. अविनाशने ८:११.२० सेकंद अशी, तर किबीवोटने ८:११.१५ सेकंद अशी वेळ नोंदवली. २०२१मधील २० वर्षांखालील जागतिक स्पर्धेच्या विजेत्या केनियाच्या अमोस सेरेमने (८:१६.८३ सेकंद) कांस्यपदक पटकावले. अविनाश या शर्यतीमधील पहिल्या १,००० मीटर आणि २,००० मीटर अंतरापर्यंत चौथ्या स्थानावर होता. परंतु नंतर त्याने वेग वाढवला. त्याने शेवटचे १,००० मीटर अंतर हे फक्त २:४३.४ सेकंदांत पूर्ण केले. जे किबीवोटपेक्षा वेगवान होते. किप्रूटोला सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्यामुळे अविनाशची कामगिरी केनियाच्या धावपटूंसाठी आगामी स्पर्धांमध्ये इशारा ठरू शकते.

विश्लेषण: प्रीमियर लीग फुटबॉलच्या कोणत्या नियमांमध्ये बदल झाले आहेत? या बदलांचा सामन्यांवर प्रभाव कसा पडेल?

नवव्यांदा राष्ट्रीय विक्रम मोडला…

राष्ट्रकुलमधील रौप्यपदक जिंकताना अविनाशने ८:११.२० सेकंदांची वेळ देत नवव्यांदा स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम मोडित काढला. २०१८मध्ये भुवनेश्वरला झालेल्या राष्ट्रीय खुल्या ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत अविनाशने ८:२९.८० सेकंद अशी वेळ नोंदवत गोपाळ सैनी यांच्या नावावर असलेला ३७ वर्षे जुना ८:३०.८० सेकंद वेळेचा राष्ट्रीय विक्रम मोडित काढला होता. त्यानंतर एकंदर आठ वेळा त्याने आपल्या वेळेत सुधारणा केली. गतवर्षी झालेल्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये त्याला प्राथमिक शर्यतीत सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. परंतु त्याने ८:१८.१२ सेकंद वेळेचा नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. याचप्रमाणे २०२२मध्ये राष्ट्रकुलआधी त्याने दोनदा आपल्या वेळेत सुधारणा केली. इंडियन ग्रां. प्रि. शर्यतीत सुवर्णपदक कमावताना ८:१६.२१ सेकंद अशी, तर राबत येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ८:१२.८ सेकंद वेळेसह पाचवा क्रमांक मिळवला होता.

विश्लेषण : राष्ट्रीय क्रीडा उत्तेजक प्रतिबंधक विधेयक काय आहे? त्याची गरज काय?

अविनाशकडून २०२४च्या पॅरिस ऑलिम्पकमध्ये पदकाची अपेक्षा धरता येऊ शकते का?

गेल्या चार ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचा आढावा घेतल्यास सुवर्णपदक विजेत्यांनी बीजिंग २००८मध्ये ८:१०.३४ सेकंद, लंडन २०१२मध्ये ८:१८.५६ सेकंद, रिओ २०१६मध्ये ८:०३.२८ सेकंद आणि टोक्यो २०२०मध्ये ८:०८.९० सेकंद अशी वेळ नोंदवली होती. यापैकी लंडन ऑलिम्पिकची वेळ सर्वांत धिमी म्हणता येईल. परंतु टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेत्या केनियाच्या किगेन बेंजामिनने नोंदवलेली ८:११.५० सेकंद ही वेळ अविनाशच्या सर्वोत्तम वेळेपासून ०.३० सेकंद फरकाची आहे. अविनाशची गेल्या चार वर्षांतील वेळेतील प्रगती पाहता आगामी पॅरिस ऑलिम्पिकसाठी अविनाशकडून पदकाची अपेक्षा धरता येऊ शकते.

विश्लेषण: केनिया अध्यक्षपदाची निवडणूक महत्त्वाची का आहे?

अविनाशची कारकीर्द कशी विकसित झाली?

अविनाश हा महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील मांडवा गावचा. शेतकरी कुटुंबातील अविनाशला वयाच्या सहाव्या वर्षीपासून शाळा गाठण्यासाठी सहा किलोमीटर अंतर पायपीट करावी लागायची. कारण या अंतरावर कोणतीही वाहतूक व्यवस्था तेव्हा नव्हती. बारावीपर्यंतचे शिक्षा पूर्ण झाल्यावर अविनाश लष्करात रुजू झाला. २०१५मध्ये त्याने प्रथमच आंतर-सेनादलाच्या स्पर्धेत भाग घेतला. त्याच्यातील ॲथलेटिक्समधील गुणांची प्रचीती आल्यानंतर अमरिश कुमार यांनी त्याला स्टीपलचेसचे मार्गदर्शन सुरू केले. यासाठी त्याला तीन महिन्यांत २० किलो वजन कमी करावे लागले. मग विविध स्पर्धांमधील यशस्वी कामगिरीमुळे राष्ट्रीय प्रशिक्षक निकोलाय स्नेसारेव्ह यांचेही त्याला मार्गदर्शन लाभले. टोक्यो ऑलिम्पिकमधून परतल्यानंतर अविनाशला करोनाची लागण झाली होती. परंतु त्यातून सावरत त्याने जिद्दीने पुनरागमन केले.