काकोरी येथील रेल्वे दरोडा ही १९२५ मधील हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनची (HRA) पहिली मोठी कारवाई होती. या घटनेच्या दोन वर्षांनंतर,राजेंद्रनाथ लाहिरी, अशफाकुल्ला खान, राम प्रसाद बिस्मिल आणि ठाकूर रोशन सिंग यांच्यासह प्रमुख क्रांतिकारक नेत्यांना या घटनेशी संबंधित म्हणून फाशी देण्यात आली. या घटनेचे आता ९९ वे वर्ष असून पुढील वर्ष हे या घटनेचे शतक पूर्ण करणारे असेल.

१९२७ मध्ये,भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील चार क्रांतिकारकांना १७ डिसेंबर (राजेंद्रनाथ लाहिरी) आणि १९ डिसेंबर (अशफाकुल्ला खान, राम प्रसाद बिस्मिल, ठाकूर रोशन सिंग) रोजी फाशी देण्यात आली. काकोरी ट्रेन दरोड्याच्या दोन वर्षांनंतर ही घटना घडली. हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनच्या (HRA) सदस्यांनी ब्रिटिश खजिन्यात पैसे पोहोचवणारी ट्रेन या दरोड्यात लुटली होती. या घटनेनंतर, ब्रिटीश अधिकाऱ्यांनी या घटनेतील सहभागींचा व्यापक शोध सुरू केला, ज्यामुळे HRA च्या अनेक सदस्यांना अटक करण्यात आली. स्वातंत्र्य चळवळीवर चर्चा केली जाते तेव्हा या घटनेचा वारंवार उल्लेख केला जातो. १९२० च्या दशकात HRA च्या क्रांतिकारकांनी ब्रिटिशांना चांगलेच सळो की, पळो करून सोडले होते.

Ashok Uike, Vasant Purke
राळेगावमध्ये भाजपचा अतिआत्मविश्वास काँग्रेसच्या पथ्यावर ! दोन माजी मंत्र्यांमध्ये थेट लढत
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Maharashtra, Delhi Politics, Small State,
लिलीपुटीकरण…
goa cm pramod sawant
Pramod Sawant: महायुती की महाविकास आघाडीच्या काळात उद्योग महाराष्ट्राबाहेर? मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान
Belapur vidhan sabha election
गावी जाणाऱ्या मतदारांना रोखण्याचे मोठे आव्हान; ऐरोली, बेलापूरमध्ये उमेदवारांची कसरत
Rahul Gandhi ashok chavan nanded
नांदेडमध्ये राहुल गांधींकडून चव्हाण कुटुंबिय बेदखल !
Kanguva Box office collection Day 1
Kanguva: ३५० कोटींचे बजेट असलेल्या ‘कंगुवा’ची निराशाजनक सुरुवात, पहिल्या दिवशी कमावले फक्त…

हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना

१९२० मध्ये महात्मा गांधींनी असहकार चळवळ सुरू करण्याची घोषणा केली. या मोहिमेंतर्गत या दरोड्यात ‘भारतातील ब्रिटीश सरकार आणि अर्थव्यवस्था टिकवून ठेवणार्‍या’ गोष्टींना कोणत्याही प्रकारे पाठिंबा न देणे समाविष्ट होते. गांधीजींनी ही चळवळ अहिंसक असण्याची कल्पना केली होती. परंतु , १९२२ मध्ये एका घटनेने चळवळीचा मार्ग बदलला. सध्याच्या उत्तर प्रदेशातील चौरी चौरा शहरात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तीन आंदोलक ठार झाल्यानंतर, जमावाने पोलिस स्टेशनला आग लावली, यात २२ पोलिसांचा मृत्यू झाला. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या आत्मचरित्रात म्हटले आहे की, या घटनेमुळे असहकार चळवळीचा ‘अचानक’ अंत झाला, यासंदर्भात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) मध्ये अंतर्गत मतभेद होत अखेरीस गांधींजीनी ही चळवळ बंद केली. याचीच परिणीती HRA च्या स्थापनेत झाली. गांधीजींचा अहिंसक मार्ग मान्य नसणाऱ्या तरुण वर्गाने HRA ची स्थापना केली.

अधिक वाचा: नेपोलियनला भारत का जिंकायचा होता?

सशस्त्र क्रांतीवर विश्वास

राम प्रसाद बिस्मिल आणि अशफाकुल्ला खान, या दोघांनाही कवितेची आवड होती, ते या संस्थेच्या संस्थापकांपैकी होते. इतरांमध्ये सचिंद्रनाथ बक्षी आणि कामगार संघटनेचे जोगेश चंद्र चटर्जी यांचा समावेश होता. चंद्रशेखर आझाद आणि भगतसिंग यांचाही समावेश एचआरएमध्ये नंतरच्या कालखंडात झाला. १ जानेवारी १९२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या जाहीरनाम्याचे नाव क्रांतिकारी होते. “राजकारणाच्या क्षेत्रात क्रांतिकारक पक्षाचा तात्कालिक उद्देश म्हणजे संघटित आणि सशस्त्र क्रांतीद्वारे युनायटेड स्टेट्स ऑफ इंडियाचे संघराज्य प्रजासत्ताक स्थापन करणे हा होय ” असे त्या जाहीरनाम्यात घोषित करण्यात आले होते. कल्पित प्रजासत्ताक सार्वभौमिक मताधिकार आणि समाजवादी तत्त्वांवर आधारित असेल असे ठरले. महत्त्वाचे म्हणजे, “मनुष्याद्वारे माणसाचे शोषण शक्य करणाऱ्या सर्व व्यवस्थांचे उच्चाटन ” हा त्यांचा उद्देश होता.

काय होती काकोरी ट्रेन दरोड्याची घटना?

ऑगस्ट १९२५ मध्ये काकोरी येथे ट्रेनवर घातलेला दरोडा ही HRA ची पहिली मोठी कारवाई होती. शहाजहानपूर आणि लखनौ दरम्यान ८ क्रमांकाची डाउन ट्रेन धावली, या गाडीत ब्रिटिश खजिन्यात जमा होणारा माल होता. क्रांतिकारकांनी हा पैसा लुटण्याची योजना आखली, त्यांच्या मते ही संपत्ती भारतीयांचीच आहे आणि ती घेणे कायदेशीर आहे. त्यांचे उद्दिष्ट HRA ला निधी देणे आणि त्यांच्या कामासाठी आणि ध्येयासाठी लोकांचे लक्ष वेधणे हे होते. ९ ऑगस्ट १९२५ रोजी लखनौपासून १५ किमी अंतरावर असलेल्या काकोरी स्टेशनवरून ट्रेन जात असताना आत बसलेले HRA चे सदस्य राजेंद्रनाथ लाहिरी यांनी चेन ओढून ट्रेन थांबवली. त्यानंतर, राम प्रसाद बिस्मिल आणि अशफाकुल्ला खान यांच्यासह सुमारे दहा क्रांतिकारकांनी ट्रेनमध्ये प्रवेश केला आणि गार्डला वेठीस धरले. त्यांनी तिजोरीतील पिशव्या (अंदाजे ४,६०० रुपये) लुटल्या आणि लखनौला पळून गेले.

माऊसर बंदुकीने धरलेल्या चुकीच्या निशाण्यामुळे, एक प्रवासी (अहमद अली नावाचा वकील) दरोड्याच्या वेळी ठार झाला, यामुळे सकारात्मक सार्वजनिक प्रतिक्रिया मिळविण्याच्या क्रांतिकारकांच्या हेतूंना हानी पोहोचवली. या घटनेमुळे ब्रिटिश अधिकारी संतप्त झाले, त्यांनी हिंसक कारवाई केली आणि लवकरच HRA च्या अनेक सदस्यांना अटक केली. एचआरएच्या दोन सदस्यांनी विश्वासघात केल्यामुळे बिस्मिल यांना ऑक्टोबरमध्ये अटक करण्यात आली होती. अशफाकुल्ला नेपाळ आणि नंतर डाल्टनगंज (सध्याच्या झारखंडमध्ये) पळून गेले. परंतु वर्षभरानंतर त्यांना अटक झाली. ब्रिटिशांनी अटक केलेल्या चाळीस जणांपैकी चार जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, तर इतरांना दीर्घकाळ तुरुंगवासाची शिक्षा झाली. यावेळी HRA चे एकमेव प्रमुख नेते चंद्रशेखर आझाद मात्र ब्रिटिशांच्या तावडीत सापडले नाहीत.

अधिक वाचा: पांडव-कौरव नाही तर ‘हे’ होते महाभारताच्या युद्धाला कारणीभूत?

त्यानंतर HRA चे काय झाले?

१९२८ मध्ये काकोरी कटाच्या आरोपींना फाशी दिल्यानंतर एका वर्षाने HRA हे पंजाब, बिहार आणि बंगालमध्ये उदयास आलेल्या इतर क्रांतिकारी गटांमध्ये विलीन झाले आणि हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (HSRA) झाले. नंतरच्या कालखंडात त्यांनी कम्युनिस्ट इंटरनॅशनल सोबत काम केले, ‘सर्वहारा वर्गाची हुकूमशाही’ प्रस्थापित करण्यासाठी जनतेच्या संघर्षाचा समावेश असलेल्या क्रांतीबद्दल बोलून, हळूहळू त्यांचा मार्क्सवादी झुकता दृष्टिकोन अधिक स्पष्ट केला . १९३० च्या दशकापर्यंत, HSRA चे अनेक प्रमुख नेते मरण पावले किंवा तुरुंगात होते. परंतु,१९२० च्या दशकाच्या उत्तरार्धात, ब्रिटीश राजवटीविरूद्ध प्रतिकार करण्याच्या विविध कृत्यांमध्ये, सायमन कमिशनच्या विरोधात निदर्शने, त्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त जे. पी. सॉन्डर्स याची हत्या आणि व्हाइसरॉय आयर्विनच्या ट्रेनमध् येबॉम्बस्फोट घडविण्यात या गटाचा सहभाग होता. त्यानंतर १९३० मध्ये ते विविध प्रादेशिक गटांमध्ये विभागले गेले.

काकोरी घटनेवर इतक्या तीव्र प्रतिक्रिया का उमटल्या?

या घटनेनंतर ब्रिटीशांच्या प्रतिसादाची तीव्रता काहीशी आश्चर्यकारक होती, दिलेल्या शिक्षेत ब्रिटिश सत्तेबद्दल भीती निर्माण करणे हा उद्देश होता. काकोरी दरोड्यातील रक्कम तुटपुंजी होती. या घटनेद्वारे ब्रिटिशांनी भारतीयांना इशाराच दिला की, चोरीची रक्कम तुटपुंजी असली तरी, अशा प्रकारचे कृत्य विशेषतः ब्रिटिश खजिन्यातील पैसा लुटणे हे सर्वाधिक गुन्हेगारी स्वरूपाचे मानले जाते. भारतीयांसाठी काकोरीची घटना अनेक क्रांतिकारी उपक्रमांपैकी एक म्हणून लक्षात ठेवली जाते, जी निःसंशयपणे धाडसी होती परंतु त्याचा अंत शोकांतिकेत झाला. पुढील वर्षी या घटनेला शंभर वर्षे पूर्ण होतील.