रविवारी (२१ जुलै) भारतीय नौदलाच्या INS ब्रह्मपुत्रा या जहाजाला अचानक आग लागली. या आगीत युद्धनौकेचे प्रचंड नुकसान झाले आणि एका खलाशाला प्राणही गमवावे लागले. नौदलाचे प्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांनी मंगळवारी (२३ जुलै) मुंबईतील नौदल डॉकयार्डला भेट देऊन आगीमुळे युद्धनौकेच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. गोदीतील अग्निशमन दलाच्या मदतीने युद्धनौकेच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी सकाळपर्यंत आग आटोक्यात आणली होती. ही आग नेमकी कशी लागली? INS ब्रह्मपुत्रा भारतासाठी किती महत्त्वाची? युद्धनौकेचे असे अपघात पूर्वीही झाले आहेत का? त्यामागील कारणं काय? याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ.

ब्रह्मपुत्रा ही कोणत्या प्रकारची युद्धनौका आहे?

INS ब्रह्मपुत्रा ही भारतातील स्वदेशी बनावटीची युद्धनौका असून, ब्रह्मपुत्रा श्रेणीच्या मार्गदर्शित क्षेपणास्त्र युद्धनौकांपैकी पहिली युद्धनौका आहे. ही नौका कोलकाता येथील राज्य संचालित गार्डन रीच शिपबिल्डर्स अॅण्ड इंजिनियर्स लिमिटेड यांनी बांधली होती. या युद्धनौकेला २००० मध्ये नौदलात दाखल करण्यात आले होते. या वर्गातील INS बियास व INS बेतवा या आणखी दोन युद्धनौका आहेत. INS ब्रह्मपुत्रेची लांबी १२५ मीटर, बीम (रुंदी) १४.४ मीटर व त्याचे विस्थापन ५,३०० टन आहे आणि या युद्धनौकेचा वेग २७ नॉट्स म्हणजेच ५० किलोमीटर प्रतितासापेक्षा जास्त आहे.

thane body found hanged week ago in Kalwa has finally been identified
कर्जाला कंटाळून मनपा अधिकाऱ्याची आत्महत्या 
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Fire At BKC Station
Mumbai Metro : मुंबईतल्या बीकेसी मेट्रो स्टेशनला आग, प्रवाशांना काढण्यात आलं बाहेर, अग्निशमन दलाचे १० ते १२ बंब घटनास्थळी
USS Edsall, World War II
Dancing Mouse: ८१ वर्षांनंतर सापडले ‘डान्सिंग माऊस’ या दुसऱ्या महायुद्धातील युद्धनौकेचे अवशेष; इतिहास नेमकं काय सांगतो?
Gas leak causes fire in house in Chembur old person injured
चेंबूरमध्ये गॅस गळतीमुळे घराला आग, वृद्ध व्यक्ती जखमी
One died in an accident, accident Ovala Naka,
ठाणे : अपघातात एकाचा मृत्यू, ओवळा नाका येथील घटना
midc conversion land in thane belapur belt for residential complexes
नवी मुंबईच्या औद्योगिक पट्ट्यातीलही भूखंड खासगी विकासकाकडे!

हेही वाचा : समुद्राखाली १३ हजार फुटांवर सापडलेल्या ‘डार्क ऑक्सिजन’ने शास्त्रज्ञही हैराण; काय आहे त्यामागचे रहस्य?

४० अधिकारी आणि ३३० खलाशी क्षमता असलेल्या या युद्धनौकेवर तोफा, जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि टॉर्पेडो लाँचर्स आहेत. या जहाजामध्ये सेन्सर्सची विस्तृत श्रेणी आहे. ही युद्धनौका चेतक हेलिकॉप्टर चालविण्यास सक्षम आहे. त्यामुळे किनारपट्टी आणि ऑफशोअर गस्त, दळणवळणाच्या सागरी सीमांवर देखरेख, सागरी मुत्सद्देगिरी, दहशतवादविरोधी ऑपरेशन्स पार पाडण्यास ती सक्षम आहे.

मुंबईतील नेव्हल डॉकयार्डमध्ये INS ब्रह्मपुत्रा का होती?

युद्धनौकेच्या दुरुस्तीचे काम मुंबईत सुरू होते. नौदलाच्या सर्व युद्धनौकांमध्ये नियमितपणे सुधारणा किंवा दुरुस्त्या केल्या जातात. त्यात जहाजाचे सेन्सर्स, शस्त्रास्त्र प्रणाली आणि बोर्डवरील इतर प्रणाली व उपकरणांसह विविध सुधारणा केल्या जातात. जेव्हा ही आग लागली तेव्हा INS ब्रह्मपुत्रेच्याही दुरुस्तीचे काम सुरू होते.

आग नेमकी कशी लागली?

ब्रह्मपुत्रेला लागलेल्या आगीचे नेमके कारण भारतीय नौदलाने नेमलेल्या चौकशीतूनच स्पष्ट होईल. परंतु, सर्वसाधारणपणे ही आग विद्युत किंवा तेलगळतीमुळे लागल्याचे सांगितले जात आहे. हे जहाज मोठ्या रेट्रोफिटिंगसाठी डॉकमध्ये उभे होते. त्यामुळे चालू असलेले वेल्डिंग काम किंवा इलेक्ट्रिकल शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज वर्तविला जात आहे. उच्च तापमानामुळे जहाजावरील तेलाने पेट घेतल्यामुळे ही लागली असल्याचा अंदाजदेखील वर्तविला जात आहे.

INS ब्रह्मपुत्राची दुरुस्ती शक्य आहे का?

अधिकाऱ्यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, जहाजाची दुरुस्ती करून तिला लवकरात लवकर सेवेत आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. अधिकारी म्हणाले की, या आगीमुळे नक्की किती नुकसान झाले, हे निश्चित करणे अद्याप बाकी आहे. परंतु, हे नुकसान एखाद्या मोठ्या अपघातापेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांनी माहिती देताना हेदेखील सांगितले की, जहाजावरील आग विझविण्याच्या प्रयत्नांत जहाजाच्या वरच्या भागात पाणी साचले आणि त्यामुळे जहाज अस्थिर होऊन एका बाजूला झुकले.

अपघातग्रस्त भारतीय युद्धनौकेला यापूर्वी वाचवण्यात यश आलेय?

२०१६ साली INS बेतवाला मोठा अपघात झाला होता. हे ब्रह्मपुत्रा श्रेणीचे दुसरे जहाज आहे. मुंबईत गोदीमधून बाहेर काढताना हे जहाज एका बाजूला उलटले आणि त्यामुळे जहाजाचे मोठे नुकसान झाले होते. परंतु, तज्ज्ञांनी या जहाजाला यशस्वीरीत्या वाचवले होते. रिझॉल्व्ह मरीन नावाच्या अमेरिकन फर्मबरोबर युद्धनौका वाचविण्यासाठी करार करण्यात आला होता. रिझॉल्व्ह मरीनने आपल्या संकेतस्थळावर ‘बेतवा’बाबत असे म्हटले आहे की, ३,८०० टन वजनाची बेतवा अस्थिर झाली आणि बंदराच्या बाजूला उलटली.”

त्यात म्हटले आहे की, तत्काळ सर्वेक्षणासाठी, सुक्या गोदीला पूर्णपणे रिकामे करण्यास परवानगी देण्यासाठी, जहाज स्थिर करण्यासाठी रिझॉल्व्ह मरीनबरोबर करार करण्यात आला होता.” कंपनीच्या तज्ज्ञांनी, “भारतीय नौदलाबरोबर काम करीत जहाजाच्या सर्व अंतर्गत भाग व केबिन्सची तपासणी केली. त्यानंतर सर्व नुकसानग्रस्त भाग दुरुस्तीसाठी नेण्यात आले”, असे रिझॉल्व्ह मरीनने आपल्या संकेतस्थळावर म्हटले आहे. हायड्रोडायनामिक कॅल्क्युलेशन आणि हायटेक प्रणालींचा वापर करून, जहाजाचे बचावकार्य दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत पूर्ण करण्यात आले, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा : बांगलादेशच्या मोंगला बंदर टर्मिनलवर आता भारताचा अधिकार, चीनच्या प्रयत्नांना अपयश; हा करार भारतासाठी किती महत्त्वाचा?

युद्धनौकांचे असे अपघात यापूर्वीही झालेत का?

-२०२२ मध्ये भारतीय नौदलाच्या INS रणवीर जहाजावर झालेल्या स्फोटामुळे तीन नौसैनिकांचा मृत्यू झाला होता. या अपघातात अन्य ११ कर्मचारी जखमी झाले होते.

-२०१६ मध्ये INS बेतवाच्या अपघातात दोन खलाशांचा मृत्यू झाला होता आणि अन्य १५ जण जखमी झाले होते.

-२०१४ मध्ये मुंबईपासून ५० सागरी मैल अंतरावर दूर असलेल्या पाणबुडी INS सिंधुरत्नला आग लागल्याने दोन खलाशांचा मृत्यू झाला. माजी नौदलप्रमुख ॲडमिरल डी. के. जोशी यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला होता.

-२०१३ मध्ये शस्त्रास्त्रांनी भरलेल्या जहाजाच्या पुढील भागात स्फोट झाल्यानंतर पाणबुडी INS सिंधुरक्षक नौदल डॉकयार्ड येथे बुडाली. या दुर्घटनेत १८ क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला होता.

-२०११ मध्ये निलगिरी श्रेणीचे फ्रीगेट INS विंध्यगिरी मुंबई बंदराच्या प्रवेशद्वारावर एका जर्मन व्यापारी जहाजाला धडकले; ज्यामुळे जहाजाला आग लागली. त्यानंतर विंध्यगिरी जहाज बुडाले.