भूगर्भशास्त्रानुसार, संपूर्ण पृथ्वी १२ टेक्टोनिक प्लेट्सवर वसलेली आहे. या प्लेट्सची टक्कर झाल्यानंतर बाहेर पडणाऱ्या ऊर्जेला भूकंप म्हणतात. पृथ्वीच्या खाली असलेल्या या प्लेट्स अतिशय संथ गतीने फिरत असतात. यादरम्यान एकमेकांच्या खालून प्लेट घसरल्या जाते, तर काही प्लेट्स वेगळ्या होत जातात. प्लेट्स सरकताना एकमेकांवर आपटल्यावर भूकंप होतो. शतकानुशतके एकमेकांपासून दूर जाणाऱ्या, खंडित होऊन नवीन भूमीचे वस्तुमान तयार करणाऱ्या आणि अवाढव्य पर्वत तयार करण्यासाठी एकत्र येणाऱ्या या टेक्टोनिक प्लेट्स भूवैज्ञानिकांसाठी नेहमीच सखोल शोधाचा विषय राहिला आहे.
अभ्यास आणि अंदाज मॉडेल्स अनेक शतकांपासून भूभागाच्या हालचाली मोजण्याचा प्रयत्न करत आहेत. अलीकडील भूवैज्ञानिक अभ्यास एक आश्चर्यकारक शक्यता सूचित करतात, त्यात भारतीय उपखंडाचा भूभाग तिबेटच्या खाली दुभंगू शकतो, असे सांगण्यात आले आहे. युरेशीयन प्लेट्सशी टक्कर झाल्यामुळे हिमालयाची निर्मिती झाली, या अभ्यासालाही नुकतंच झालेल्या संशोधनाने विरोध केला आहे. भूवैज्ञानिकांनी काय भीती व्यक्त केली? खरंच भारतीय टेक्टोनिक प्लेट दुभंगत आहेत का? त्यामुळे निर्माण होणारे संकट किती घातक? त्याविषयी जाणून घेऊ.
हेही वाचा : भारत-बांगलादेश संबंध आणखी ताणले; सीमेवर कुंपण बांधण्यावरून सुरू झालेला वाद काय?
आत्तापर्यंतच्या अभ्यासातून काय समोर आले?
भारतीय उपखंडाविषयी केलेल्या आतापर्यंतच्या अभ्यासानुसार असे दिसून आले, भारतीय उपखंड गेल्या ६० दशलक्ष वर्षांपासून आकार घेत आहे. सुरुवातीला भारतीय उपखंड हा एक वेगळा खंड होता, त्यामध्ये टेथिस महासागर आणि युरेशियन भूभागाचा समावेश होता. त्यानंतर दोन प्लेट एकमेकांच्या दिशेने सरकू लागल्या. भारतीय आणि युरेशियन टेक्टोनिक प्लेट्स एकत्रित येत असल्यामुळे भूगर्भीयदृष्ट्या दोन्ही प्लेट्सची सौम्य टक्कर होईल हे नक्की होते. या टक्करने दोन संभाव्य परिणाम दिसण्याची शक्यता होती. पहिला परिणाम म्हणजे एक प्लेट दुसऱ्यावर चढणे किंवा दोन्ही प्लेट्सची टक्कर झाल्यास एकतर खाली जाणे किंवा वर येणे. परंतु, असे काहीही घडले नाही.
हिमालयाची निर्मिती
या टक्करचा वेगळाच परिणाम झाला. दोन्ही प्लेट्स आदळल्यानंतर आज आपण पाहत असलेल्या हिमालयाची निर्मिती झाली. परंतु, पृष्ठभागाखालील ही संपूर्ण प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची आहे; ज्यामध्ये विविध भूवैज्ञानिक घटनांचा समावेश आहे. याच गुंतगुंतीमुळे भूवैज्ञानिकांनी अभ्यास हाती घेतला आहे. या अभ्यासाचे आश्चर्यकारक परिणाम दिसून आले आहेत. हे निष्कर्ष समजून घेण्यासाठी आपण प्रथम पृथ्वीच्या प्लेट्स आणि त्यांचे वर्तन समजून घेणे महत्त्वाचे आहे.
प्लेट्सच्या हालचालीत बदल
पृथ्वीचे कवच ठोस नसून पृथ्वीच्या खाली मॅग्मावर तरंगणाऱ्या असंख्य प्लेट्सचा समावेश आहे. महासागरी प्लेट्स खूप दाट असतात, तर महाद्वीपीय प्लेट्स जाड आणि तरंगत्या असतात. जेव्हा या प्लेट्स आदळतात तेव्हा त्यांचे वर्तन विचित्र असते. महाद्वीपीय टेक्टोनिक प्लेट्सच्या वर्तनानेच शास्त्रज्ञांमध्ये वादविवादाला सुरुवात केली आहे, ज्यामुळे युरेशियन प्लेटशी टक्कर होत असताना भारतीय प्लेटच्या वर्तनाबद्दल भिन्न मते निर्माण झाली आहेत. जेव्हा प्लेट्स एकमेकांवर आदळतात तेव्हा ते एकमेकांवर चढण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे प्लेट बुडू लागते. ही एक प्रक्रिया आहे, ज्याला सबडक्शन किंवा लोअरिंग म्हटले जाते. एक सिद्धांत सूचित करतो की, जेव्हा प्लेट्स एकमेकांवर आदळतात तेव्हा त्या बुडण्यास म्हणजेच सबडक्शनला प्रतिकार करतात; ज्यामुळे त्या सहजासहजी बुडू शकत नाही. त्यामुळेच भारतीय प्लेट तिबेटच्या खाली जात असल्याचे मानले जाते. याउलट दुसरा सिद्धांत सांगतो की, भारतीय प्लेटचा वरचा आणि तरंगणारा भाग टक्करच्या सीमेकडे वळतो आणि आकुंचन पावतो, ज्यामुळे खालचा भाग बुडतो आणि आवरणाशी जोडला जातो.
हेही वाचा : शत्रूचा थरकाप उडवणाऱ्या ‘नाग’ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी; पाकिस्तान-चीनच्या कारवायांना चाप बसणार?
भारतीय प्लेटचा भाग दुभंगत आहे का?
तिबेटच्या खाली भारतीय प्लेट दुभंगत आहे. खाली भूकंपाच्या लाटा आणि भूपृष्ठाखालील वायूंच्या अलीकडील विश्लेषणाने एक नवीन शक्यता उघड केली आहे. हा सिद्धांत सूचित करतो की, भारतीय प्लेटचा काही भाग युरेशियन प्लेटच्या खाली सरकत आहे आणि तुटत आहे. त्यात खालचा दाट भाग वरच्या भागापासून वेगळा होत आहे. पुरावा असेही सूचित करतो की, विभक्त होणारा भाग वरच्या दिशेने तुटत आहे आणि प्लेटचे दोन तुकडे करत आहे. युट्रेक्ट युनिव्हर्सिटीचे शास्त्रज्ञ डुवे व्हॅन हिन्सबर्गन म्हणाले, “महाद्वीप असे वागू शकतात हे आम्हाला माहीत नव्हते.” अमेरिकन जिओफिजिकल युनियन कॉन्फरन्समध्ये सादर केलेल्या या अभ्यासाचा उद्देश हिमालयाच्या निर्मितीची समज वाढवणे आणि या प्रदेशातील भूकंपांचे मूल्यांकन करण्यात मदत करणे हा आहे.