Indian Students in Germany भारतातील अनेक विद्यार्थी आजकाल परदेशांत जाऊन शिक्षण घेण्याला प्राधान्य देतात. इतर देशांत शिक्षण घेतल्यास भारतीय विद्यार्थ्यांना अनेक फायदे होतात. श्रीमंतांमध्ये तर हा जणू एक ट्रेंडच झाला आहे. मध्यमवर्गीय विद्यार्थीदेखील उच्च शिक्षणासाठी विदेशांत जाणे पसंत करीत आहेत. कॅनडा, अमेरिका हे विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे लोकप्रिय ठिकाण आहे, हे तर आपल्याला ठाऊक आहेच. मात्र, आता भारतीय विद्यार्थी जर्मनीलादेखील तितकीच पसंती देत आहेत. जर्मनीत शिकणार्‍या चिनी विद्यार्थ्यांना मागे टाकत, जर्मनीत शिक्षण घेणारी भारतीय विद्यार्थ्यांची संख्या पहिल्या क्रमांकावर गेली आहे. म्हणजेच जर्मनीमध्ये शिक्षण घेणार्‍या इतर देशांतील विद्यार्थ्यांच्या तुलनेत भारतीय विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. यामागचे नेमके कारण काय? याबद्दल जाणून घेऊ या.

सध्या ४३ हजार भारतीय विद्यार्थी विविध जर्मन महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये शिकत आहेत. गेल्या पाच वर्षांत या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. नवी दिल्लीतील जर्मन दूतावासातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, २०२४ च्या अखेरीस ४५ ते ५० हजार भारतीय विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याने या संख्येत आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे. अलीकडच्या काही वर्षांत उच्च शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थ्यांमध्ये जर्मनी हा देश लोकप्रिय होत आहे.

Loksatta lokrang Birth centenary year of Dr Wankhade pioneer of Dalit literary movement
दलित साहित्य चळवळीचे प्रवर्तक
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
BJP leader Navneet Rana launched open campaign against mahayuti in Daryapur heating up atmosphere
कमळ म्हणजेच पाना…नवनीत राणाच्या नवीन डावाने महायुतीत ठिणगी…,
state govt form committee to study implementation sub classification in sc reservation sparks controversy
दलित मतदारांत दुभंग? आरक्षण उपवर्गीकरणाच्या हालचालींचे पडसाद निवडणुकीत उमटण्याची शक्यता
expert answer on career advice questions career advice tips
कराअर मंत्र
german chancellor olaf scholz fires finance minister christian lindner
अन्वयार्थ : सुस्तीतून अस्थैर्याचे जर्मन प्रारूप!
Child Marriage, Supreme Court, Child Marriage Prevention Act,
बालविवाहाचा फेरा : भारत मुक्त कधी होईल?
visa sponsored job in britain
भारतीय तरुणी यूकेमध्ये अडचणीत; “मी फुकटात काम करेन, पण मला नोकरी द्या”, सोशल पोस्ट व्हायरल!

हेही वाचा : अमेरिकेतील भारतीय विद्यार्थी भीतीच्या छायेत?

विद्यार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ

दूतावास अधिकाऱ्यांनी दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, २०१८-१९ मध्ये जर्मन विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये २०,८१० भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत होते. ही संख्या २०१९-२० मध्ये २५,१४९ वर गेली. त्यानंतर कोविड-१९ चे संकट असूनही भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होत गेली. २०२०-२१ मध्ये जर्मनीमध्ये २८,९०५ भारतीय विद्यार्थी होते. २०२१-२२ मध्ये ही संख्या ३४,१३४ वर गेली. तर, अगदी अलीकडे या संख्येत लक्षणीय वाढ पाहायला मिळाली. २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात जर्मनीत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या ४२,९९७ वर गेली.

भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत झालेल्या या वाढीमुळे चिनी विद्यार्थीदेखील मागे पडले आहेत. सध्या जर्मनीत शिकत असलेल्या चिनी विद्यार्थ्यांची संख्या ३९,१३७ आहे. चिनी विद्यार्थी फार पूर्वीपासून जर्मनीला प्राधान्य देत आले आहेत. त्यामुळे त्यांची संख्यादेखील इतर देशांच्या तुलनेत जास्त असायची. मात्र, पहिल्यांदाच चिनी विद्यार्थ्यांच्या तुलनेत ही लक्षणीय वाढ दिसून आली आहे. भारत आणि चीननंतर सीरिया (१५,५६३), ऑस्ट्रिया (१४,६६३) व तुर्की (१४,७३२) विद्यार्थी जर्मनीमध्ये शिक्षण घेत आहेत. २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षातील नोंदीनुसार जर्मनीमध्ये ४,५८,२१० आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आहेत. विशेष म्हणजे हा आकडा जर्मनीच्या एकूण विद्यार्थी लोकसंख्येच्या अंदाजे २० टक्के आहे.

इंग्रजीमध्ये शिकविले जाणारे अभ्यासक्रम आणि शुल्कही नगण्य

इतर पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत जर्मनीमध्ये शिक्षण शुल्क फार कमी आहे. विशेष तांत्रिक अभ्यासक्रम आणि एमबीएसारखे कोर्सेस सोडल्यास जर्मनीमध्ये शिक्षण शुल्क भरावे लागत नाही. विद्यार्थ्यांना फक्त त्यांचे राहणीमान, प्रवास आणि प्रशासनिक किरकोळ बाबी यासाठी खर्चाची तरतूद करावी लागते. जर्मन दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, भाडे, स्थानिक वाहतूक, भोजन व इतर करमणुकीसाठी जवळ जवळ ९५० युरो (८५ हजार रुपये) पुरेसे असतात.

इंग्रजी भाषेतील शिक्षणामुळे बहुतांश विद्यार्थी अमेरिका, ब्रिटन, कॅनडा व ऑस्ट्रेलियाला प्राधान्य देतात. जर्मनी हा इंग्रजी भाषिक देश नाही. परंतु, जर्मन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, अधिकाधिक विद्यार्थी शिक्षणासाठी आता जर्मनी देशाची निवड करीत आहेत. कारण- आता जर्मनीत इंग्रजीमध्येही अभ्यासक्रम आहेत. जर्मनीमध्ये सध्या २००० हून अधिक पदवी अभ्यासक्रम इंग्रजीमधून शिकविले जातात. भारतीय विद्यार्थ्यांसाठी इथे अनेक शिष्यवृत्त्यादेखील आहेत. २०२३ मध्ये जर्मनी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी तिसरा सर्वांत लोकप्रिय देश ठरला आहे; तर बिगर-इंग्रजी भाषिक देशांमध्ये पहिला देश ठरला आहे. भारतीय दूतावासाने ‘द इंडियन एक्स्प्रेस’बरोबर शेअर केलेल्या माहितीनुसार, २०२३ मध्ये जर्मनीने भारतीय विद्यार्थ्यांना तब्बल १६,८५० नवीन व्हिसा जारी केले आहेत.

दूतावासाच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, जर्मनीमध्ये अभियांत्रिकी कार्यक्रमांना सर्वाधिक मागणी आहे. जर्मनीतील एकूण भारतीय विद्यार्थ्यांपैकी ६० टक्के विद्यार्थी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहेत. २० टक्के विद्यार्थ्यांना कायदा, व्यवस्थापनात रस आहे; तर १५ टक्के विद्यार्थ्यांना गणितासारख्या विषयातही रस आहे.

भारतीय विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाची आवड

जर्मनीव्यतिरिक्त अमेरिकेतदेखील भारतीय विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. २०२२-२३ मध्ये जवळपास २,६७,००० भारतीयांनी अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतला आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांची संख्या अमेरिकन विद्यार्थ्यांपेक्षाही जास्त आहे. नवी दिल्लीतील अमेरिकन दूतावासाच्या अंदाजानुसार, अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांची संख्या २०३० पर्यंत दशलक्षांपर्यंत पोहोचेल. अमेरिकेने जून-ऑगस्ट २०२३ दरम्यान उच्च संख्येने विद्यार्थी व्हिसा जारी केले.

ऑगस्ट २०२३ पर्यंत कॅनडादेखील भारतीय विद्यार्थ्यांसाठी लोकप्रिय देश होता. परंतु, कॅनडा सरकारने ऑक्टोबर ते डिसेंबर २०२३ दरम्यान स्टडी व्हिसा जारी करताना ८६ टक्क्यांनी घट केली. कॅनडाच्या इमिग्रेशन डेटावरून असे दिसून आले आहे की, २०२२ मध्ये १,०८,९४० विद्यार्थ्यांच्या (जारी केलेल्या परवानग्यांनुसार) केवळ १४,९१० भारतीय विद्यार्थ्यांनी कॅनेडियन संस्थांची निवड केली. भारत आणि कॅनडा यांच्यातील राजनैतिक समस्यांमुळेदेखील व्हिसा प्रक्रियेवर परिणाम झाला आहे; ज्यामुळे कॅनेडियन विद्यापीठांमध्ये जाण्यासाठी विद्यार्थी व्हिसा मिळविणाऱ्या भारतीयांची संख्या कमी होईल.

हेही वाचा : कॅनडाच्या ‘त्या’ निर्णयाने भारतीय विद्यार्थी अडचणीत, स्टडी व्हिसाऐवजी व्हिजिटर व्हिसावर कॅनडाला जाण्याच्या प्रयत्नात; कारण काय?

दरम्यान, जर्मनीचा नवा स्किल्ड इमिग्रेशन कायदा भारतीय विद्यार्थ्यांना जर्मन श्रमिक बाजारपेठेत जाण्याचा मार्ग सुकर करील. जर्मन सरकार आता युरोपियन युनियनबाहेरील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना १० तासांची पूर्वीची मर्यादा ओलांडून दर आठवड्याला २० तास काम करण्याची परवानगी देते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. विद्यार्थ्यांना अर्धवेळ नोकरी करून पैसे कमावता येतात. सेमिस्टर्सदरम्यान विश्रांतीही घेता येते. त्याबरोबरच विद्यार्थ्यांना मॉल आणि सार्वजनिक वाहतुकीत सूट दिली जाते; ज्यामुळे बचत होते. विद्यार्थी घरच्यांवर अवलंबून राहत नाहीत. यांसारख्या अनेक सोईस्कर बाबींमुळे विद्यार्थी जर्मनीची निवड करीत आहेत.