ज्ञानेश भुरे

भारतीय कुस्ती क्षेत्रासाठी १८ जानेवारी हा दिवस खूपच धक्कादायक ठरला. साक्षी मलिक, बजरंग पुनिया या ऑलिम्पिक पदक विजेत्यांसह अनेक आंतरराष्ट्रीय पदक विजेते मल्ल भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष आणि कुस्ती महासंघाच्या विरोधात शड्डू ठोकून उभे राहिले. नवी दिल्लीतील जंतरमंतरवर त्यांनी अध्यक्ष हटाव, कुस्ती बचाव अशा घोषणा देत बंडाला सुरुवात केली. महासंघाच्या अध्यक्षांवर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप महिला कुस्तीगिरांनी केला. कुस्तीगिरांचे बंड नेमके कशासाठी आणि कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह नेमके आहेत तरी कोण, यावर दृष्टिक्षेप.

Image Of Devendra Fadnavis.
Devendra Fadnavis : राज्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीचे सर्वाधिकार देवेंद्र फडणवीस यांना; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी मंत्रिमंडळाचा निर्णय
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Suresh Dhas On Santosh Deshmukh
Suresh Dhas : “आका हा सोपा आका नाही, ठराविक लोकांना प्रत्येक महिन्याला…”, आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप
district court granted valmik karad get 7 days police custody
‘खंडणीच्या आड आल्याने देशमुख यांची हत्या’; युक्तिवादात विशेष तपास पथकाचा संशय
cm devendra fadnavis prohibiting appointments of private secretaries in government offices
खासगी व्यक्तींच्या नियुक्तीस मनाई; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाने मंत्र्यांना धक्का
maharashtra election commissioner news in marathi
राज्य निवडणूक आयुक्तपदाचा आज निर्णय; नितीन करीर, राजीव जलोटा, राजगोपाल देवरा स्पर्धेत
Satej Patil On Municipal Elections 2025
Satej Patil : आगामी महापालिकेच्या निवडणुका काँग्रेस स्वतंत्र लढणार की आघाडीत? सतेज पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, “शक्य असेल तिथे…”
Infosys Cognizant controversy
Infosys Vs Cognizant: नामांकित आयटी कंपन्यांनी एकमेकांविरुद्ध खटले का दाखल केले? नेमका वाद काय?

नेमका वाद काय आहे?

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि प्रशिक्षकांकडून महिला कुस्तीगिरांचे लैंगिक शोषण होते, भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष हुकूमशाहप्रमाणे वागतात, महासंघ एकतर्फी नियम करून ते कुस्तीगिरांवर लादतात, खेळाडू सुरक्षित नाहीत असे अनेक मुद्दे कुस्तीगिरांनी उपस्थित केले आहेत. खेळाडूंना जिवे मारण्याची धमकीही देण्यात येते, असेही हे मल्ल बोलले आहेत. विनेश फोगाटने तर आम्ही आज हे सगळे करतोय, उद्या जिवंत असू की नाही हे माहीत नाही, इतकी महासंघाची ताकद आहे असे विधान केले. त्याचबरोबर महिलांचे शिबिर प्रत्येक वेळेस अध्यक्षाच्या घराजवळ म्हणजे लखनऊमध्ये का घेण्यात येते, असे प्रश्नही कुस्तीगिरांनी उपस्थित केले आहेत.

विश्लेषण: क्यूबाचे क्रांतिकारी चे ग्वेरा यांची मुलगी कोण आहे? भारताशी काय आहे नातं?

कोण आहेत ब्रिजभूषण शरण सिंह?

ब्रिजभूषण हे उत्तर प्रदेशातील भाजपचो ताकदवान नेते आहेत. तब्बल सहा वेळा ते खासदार म्हणून निवडून आले आहेत. राजकारणात त्यांना थेट वर्चस्व राखता आले नसले, तरी त्यांचा उत्तरेतील राजकारणावर मोठा प्रभाव आहे. आपल्या या राजकीय ताकदीचा वापर त्यांनी कुस्ती महासंघावर करून घेतला. अध्यक्ष या नात्याने ब्रिजभूषण प्रत्येक राष्ट्रीय स्पर्धांना मग ती कुमार, किशोर किंवा वरिष्ठ गट असो, जातीने उपस्थित असतात. अनेकदा ते पंचांशी बोलून हस्तक्षेप करताना दिसतात. महासंघातील त्यांचा वावर हा एखाद्या हुकूमशहाप्रमाणे असतो. २०२१मध्ये त्यांनी शिबिरादरम्यान एका मल्लाला थेट थोबाडीत मारून हाकलून दिले होते.

भारतीय कुस्तगीर महासंघाची काय भूमिका असेल?

या संदर्भात सहाय्यक सचिव विनोद तोमर यांनी सावध भूमिका घेतली आहे. कुस्तीगिरांकडून याबाबत महासंघाला काहीही कळवलेले नाही. त्यांनी फक्त अध्यक्षांना पत्राद्वारे ही माहिती दिली आहे. अध्यक्षांनी सांगितल्यावर आम्हाला कुस्तीगिरांनी बंड पुकारल्याची माहिती मिळाली, असे तोमर म्हणाले. त्याच वेळी कुस्तीगिरांनी त्यांचे मुद्दे, अडचणी घेऊन आमच्याशी संपर्क साधावा त्यांच्या अडचणी सोडविण्याचे निराकरण केले जाईल, असेही तोमर म्हणाले. अर्थात, अजून तरी महासंघाने कुठलीही पावले उचललेली नाहीत. रविवारी (ता. २२) महासंघाची बैठक आहे, या बैठकीनंतर महासंघाची अधिकृत भूमिका समोर येऊ शकते. क्रीडा मंत्रालयानेही महासंघाला ७२ तास दिले आहेत. सरकारच्या नोटिशीला महासंघ काय उत्तर देते यावरही बरेच काही अवलंबून असेल.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाहंनी बृजभूषण सिंह यांच्यावर कारवाई करावी’; पुण्यातील कुस्तीगीराची मागणी

राजकीय हस्तक्षेपाची किती शक्यता?

ब्रिजभूषण शरण सिंह यांना वाद नवीन नाहीत किंवा वादासाठी ते नवे नाहीत. एक स्पष्टवक्ता म्हणून त्यांची राजकीय प्रतिमा असली, तरी यापूर्वी अनेकदा ते वादात अडकले आहेत. सकृद्दर्शनी दिसत नसले किंवा वाटत नसले तरी, सध्याचे कुस्तिगिरांचे बंड हे त्याचाच एक भाग असू शकते. काही महिन्यांपूर्वी ब्रिजभूषण योगगुरू बाबा रामदेव यांच्यामागे हात धुवून लागले होते. रामदेव हे भेसळीचे बादशहा आहेत असे वक्तव्य त्यांनी केले होते. यावरून रामदेव यांनी ब्रिजभूषण यांना माफी मागण्यास सांगितले. मात्र, त्यांनी तसे केले नाही. हा वाद असाच विरला. भाजपाच्या उत्तरेतील अंतर्गत राजकारणाचा हा फटका असू शकतो असेही बोलले जात आहे. तसेच कुस्ती क्षेत्रात मध्यंतरी ब्रिजभूषण यांनी कर्नाटक, हरयाना, महाराष्ट्र अशा तीन राज्य संघटना कुठलीही चर्चा न करता बरखास्त केल्या होत्या. या सगळ्याची ही एकत्रित परिणती म्हणजे हे बंड असू शकते.

उद्योगविश्वातून कुस्ती महासंघाला असलेला विरोध या बंडात डोकावतो का?

ब्रिजभूषण यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कालावधीत भारतीय कुस्तीगिरांसाठी करारपद्धत अवलंबून मानधन देण्यास सुरुवात केली होती. मात्र, त्याच्या अंमलबजावणीविषयी काहीच चर्चा नाही. त्यातच उद्योगजकांचा थेट हस्तक्षेप टाळण्यासाठी त्यांनी ऑलिम्पिकनंतर भारतीय कुस्तीगिरांना वैयक्तिक पुरस्कर्ते घेण्यास निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला होता. वैयक्तिक पुरस्कर्ते घ्यायचे असले, तरी ते कुस्ती महासंघाच्या माध्यमातूनच घ्यायचे अशी अट कुस्तीपटूंवर लादली होती. यामुळे उद्योजकही कुस्तीपासून दूर जावू लागले. उद्योजक महासंघाच्या विरोधात प्रचार करू लागल्याची टीका मध्यंतरी कुस्ती महासंघाने केली होती. या वैयक्तिक पुरस्कर्त्याच्या अटीचा उल्लेख बंड करणाऱ्या मल्लांनी केला आहे.

विश्लेषण: ‘आयएनएस विक्रमादित्य’च्या दुरुस्तीची देशात चर्चा का? युद्धनौकेमुळे नौदलाची ताकद किती वाढणार?

या बंडाचा नेमका परिणाम होईल का?

या प्रकरणात क्रीडा मंत्रालयाने आता हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी कुस्ती महासंघाला ७२ तासांची नोटीस दिली आहे. अर्थात, सरकारही भाजपचे असल्यामुळे कितपत कारवाई होईल हा प्रश्न खासगीत विचारला जात आहे. पण, हे बंड असेच शमून चालणार नाही. हे बंड जेवढे दिवस ताणले जाईल, तेवढे प्रत्येक दिवशी वादाचे नवे पदर उलगडले जातील. कुस्तीपटूंनी केलेले आरोप गंभीर आहेत. त्यामुळे बंड असेच मोडून काढले किंवा कुस्तीपटूंनी राजकीय आश्वासनानंतर माघार घेतल्यास महासंघ आणि अध्यक्षांवर केलेले गंभीर आरोप निष्फळ ठरणार आहेत. यामध्ये आणखीही काही नावे पुढे येऊ शकतात.

Story img Loader