काहीच दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३३३ भारतीय निर्वासितांना तीन लष्करी विमानांनी भारतात पाठवले. देशातील बेकायदा स्थलांतर रोखण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचललं. यामध्ये मुख्यत्वे हरियाणा, पंजाब, गुजरात या राज्यांतील भारतीयांची संख्या जास्त होती. अनेक निर्वासितांनी स्पष्ट केले की, त्यांनी नेहमीच्या ‘डंकी’ मार्गाचा वापर केला नव्हता. तो मार्ग म्हणजे जो लोकांना लॅटिन अमेरिकेतून मध्य अमेरिकेत आणि नंतर अमेरिकेत घेऊन जायचा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवीन ‘डंकी’ मार्ग कोणता?
वैध कागदपत्र नसलेले भारतीय मध्य अमेरिकेत प्रवेश करण्यासाठी ब्राझील, इक्वेडोर किंवा कोलंबियासारख्या दक्षिण अमेरिकन देशांमधून प्रवास करत अमेरिकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात. याचं महत्त्वाचं कारण असं आहे की, मेक्सिकोसाठी थेट व्हिसा मिळवणं कठीण होऊ शकतं आणि तिथे स्थानिक पोलिसांकडून अटक होण्याची भीती सर्वात जास्त आहे. त्यामुळे मध्य अमेरिकेतून हे लोकं मेक्सिकोला पोहोचतात आणि सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करतात. मात्र, अनेक जण आता आधी यूके, इटली, जर्मनी, स्पेन आणि तुर्कीसारख्या देशांमध्ये जात आहेत आणि त्यानंतर ट्रान्झिट किंवा व्हिजिटर व्हिसा मिळवून मध्य अमेरिकेला पोहोचतात.
आधीच्या डंकी मार्गापेक्षा युरोपियन डंकी मार्ग पनामा जंगलातून घेऊन जाणाऱ्या मार्गापेक्षा अधिक जलद आहे, शिवाय सोपा आहे. या मार्गादरम्यान प्रवासी त्यांचा बराचसा प्रवास हा हवाई मार्गाने करतात. त्यानंतरचा भाग निकाराग्वा आणि एल साल्वाडोर हा प्रवास पायी किंवा चारचाकीने बऱ्यापैकी सुरक्षित आणि सोपा आहे. त्यामुळे अमेरिकेत पोहोचण्यासाठी सुरक्षित आणि जलद मार्ग शोधणाऱ्यांसाठी हा नवा डंकी युरोपियन मार्ग आकर्षित करणारा आहे.

युरोपमध्ये प्रवेश कसा होतो?
स्थलांतरित लोकं शेंजेन व्हिजिटर व्हिसा घेतात, ज्यामुळे त्यांना अनेक युरोपिय देशांमध्ये प्रवास करणे सोपे जाते. शेंजेन देशासाठी व्हिजिटर व्हिसा मिळवणे सोपे आहे, मात्र तो भाग ओलांडल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी केली जाऊ शकते.
युरोपमध्ये प्रवेश केल्यानंतर पुढच्या प्रवासाचं नियोजन करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. यूकेमध्ये प्रवेश करण्यासाठी स्टुडंट व्हिसादेखील वापरला जातो.

युरोपमध्ये पोहोचल्यानंतर युरोप ते मध्य अमेरिका विमान प्रवास करावा लागतो. युरोपमधून कनेक्टिंग फ्लाईट बुक करण्यासाठी अनेकदा एजंट्सचा आधार घेतला जातो. मध्य पूर्वमार्गे मग दुबई, कतार किंवा तुर्कीमार्गे थेट मेक्सिकोला पोहोचण्यासाठीदेखील त्यांची मदत घेतली जाते. एकूणच या प्रवासादरम्यान ज्या ज्या देशांमधून प्रवास केला जातो, तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांना हा सर्व प्रकार माहीत असतोच. ते काही रक्कम घेऊन स्थलांतरितांना त्यांचा प्रवास करू देतात. दरम्यान, हा प्रवास करताना सर्व काही सेट केलेले असते असं एजंट्स सांगतात.

हा युरोपियन मार्ग स्वस्त का आहे?
युरोपियन आणि पनामा या दोन्ही मार्गांचा खर्च जवळपास सारखाच आहे. एजंट नक्की कोणता मार्ग निवडतात, त्यावर तसंच त्यांचं युरोप किंवा पनामामधील स्थानिक एजंटशी असलेलं नेटवर्क यावर सर्व गोष्टी अवलंबून आहेत.
युरोपियन व्हिसा मिळवणं आणि अनेक देशांमध्ये विमान प्रवास बुक करणं खर्चिक आहे, त्यामुळे स्थलांतरितांना या प्रवासासाठी मोठी रक्कम मोजावी लागते. संपूर्ण प्रवासासाठी एका माणसागणिक सरासरी ४० ते ६० लाख रुपये खर्च येतो. हा खर्च एका हॉलिडे ट्रिपसारखा राहण्याचं ठिकाण, व्हिसा, तिकिटं यासह कितीतरी पटीने जास्त आहे.

या सगळ्याचा विचार करता असे मार्ग आणि धोका पत्करून जाण्यामागचा या स्थलांतरितांचा उद्देश नेमका काय असू शकतो? तर अमेरिकेत स्थलांतर केल्याने अनेक फसव्या एजंट्सच्या भूलथापांना ही मंडळी फसतात. कुटुंबातील आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी किंवा जास्त पैसा कमावण्यासाठी हे प्रवासी अगदी हताश होऊन या सगळ्याला बळी पडतात. एजंट्सवर विश्वास ठेवून शक्यतो सुरक्षित आणि जलद मार्गाने स्थलांतर करून देण्याच्या आश्वासनावर ते बक्कळ पैसा भरण्यासाठी तयार होतात.