परदेशात स्थलांतर करू इच्छिणाऱ्या भारतीयांसाठी कॅनडा हा सर्वात लोकप्रिय देश आहे. भारतातून कॅनडामध्ये स्थलांतर करण्यासाठी विविध प्रकारचे पर्याय वापरले जातात. त्यातीलच एक पर्याय म्हणजे विद्यार्थी व्हिसा मिळवणे आणि कॅनडामध्ये शिक्षण घेऊन तिथेच नोकरीची संधी शोधणे. मात्र, जानेवारी २०२३ मध्ये कॅनडा सरकारने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या व्हिसाच्या संख्येमध्ये पुढील दोन वर्षांसाठी कपात करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा मोठा फटका भारतीयांनाही बसला. परदेशात स्थलांतर करण्याचे स्वप्न असणारे भारतीय आता पर्यायी मार्गांचा विचार करताना दिसत आहेत. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या व्हिसाचा मार्ग बंद झाल्यानंतर आता पर्यायी मार्ग म्हणून कॅनडा सरकारच्या लेबर मार्केट इम्पॅक्ट असेसमेंट (LMIA) परवान्याचा विचार प्रामुख्याने केला जातो आहे. LMIA परवाना म्हणजे नेमके काय आणि भारतीय लोक त्याचा विचार का करत आहेत, याची माहिती आता आपण घेणार आहोत.

LMIA म्हणजे काय?

कॅनडामधील कोणत्याही कंपनीला परदेशी कर्मचाऱ्याची भरती करून घ्यायची असेल तर त्या कंपनीला सरकारकडून LMIA परवाना घ्यावा लागतो. विशिष्ट पदासाठी स्थानिक कर्मचाऱ्याऐवजी परदेशातील कर्मचाऱ्याची भरती करताना हा परवाना आवश्यक ठरतो. त्याशिवाय, कंपनीला परदेशातील व्यक्तीची निवड करता येत नाही. त्यासाठी कंपनीला पदभरतीसाठी आवश्यक निकषांची माहिती कॅनडाच्या अधिकृत वेबसाइटवर (https://www.jobbank.gc.ca/findajob/foreign-candidates) उपलब्ध करून द्यावी लागते. त्या माध्यमातून परदेशी कर्मचारी संबंधित नोकरीसाठी अर्ज करू शकतात.

Canada
Indian students in Canada : भारतातून कॅनडात गेलेल्या २० हजार विद्यार्थांची महाविद्यालयांना दांडी, आकडेवारी आली समोर
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
sebi taken various steps to encourage the dematerialization of shares print
‘डिमॅट’ अनिवार्य करण्याचा विचार : सेबी
Transport Minister Pratap Sarnaik said private passenger transport providers like Ola Uber Rapido brought under one regulation
खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना एकाच नियमावलीअंतर्गत आणणार, परिवहन मंत्री
nashik banned nylon manja caused fatalities and power outages
नाशिकमध्ये नायलॉन मांजा तारांमध्ये अडकून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार
When Is Bhogi Celebrated in 2025
भोगीचा सण केव्हा साजरा केला जातो? जाणून घ्या सर्व काही एका क्लिकवर…
CET registration, students, Ticket facility, CET ,
सीईटी नोंदणीदरम्यान विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी ‘तिकीट सुविधा’
Himalayan breed dog now becomes India fourth registered indigenous breed
‘हिमालयन शेफर्ड डॉग’ ठरली चौथी अस्सल भारतीय श्वान प्रजाती… याचे महत्त्व काय?

हेही वाचा : बुरखा परिधान केलेल्या महिलांची मतदान केंद्रांवर ओळख कशी तपासली जाते? भाजपा उमेदवारावर गुन्हा दाखल करण्याचे कारण काय?

LMIA परवाना मिळाल्यास परदेशी व्यक्तीची भरती करून घेण्याचा मार्ग मोकळा होतो. या परवान्यामुळे कोणताही स्थानिक कर्मचारी संबंधित पदावर काम करण्यासाठी उपलब्ध नसून परदेशी कर्मचाऱ्याची गरज असल्याचे अधोरेखित होते, अशी माहिती कॅनडा सरकारच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे.

भरती करून घेणाऱ्या कंपनीला LMIA चा परवाना मिळाला की मग परदेशी कर्मचारी पदासाठी अर्ज करू शकतात. अर्ज केलेल्या उमेदवाराची निवड झाली की मग त्याला कॅनडामध्ये काम करण्यासाठी ‘वर्क परमिट’ आवश्यक ठरते. वर्क परमिटसाठी कॅनडा सरकारकडे अर्ज करताना जॉब ऑफर लेटर, कंपनी आणि उमेदवारामध्ये झालेला करार, LMIA परवाना आणि LMIA क्रमांकाची गरज असते.

भारतीयांमध्ये LMIA चा पर्याय लोकप्रिय का होतो आहे?

भारतीयांमध्ये LMIA चा पर्याय लोकप्रिय होण्यामागे अनेक कारणे आहेत. जानेवारी २०२३ मध्ये कॅनडा सरकारने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या व्हिसाच्या संख्येमध्ये कपात केल्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. व्हिसा मिळवण्यासाठीची स्पर्धा तीव्र झाली असून ती प्रक्रियाही क्लिष्ट आहे. त्यामुळे कॅनडात स्थंलातर करू इच्छिणाऱ्यांसाठी हाच पर्याय अधिक सोपा ठरताना दिसतो आहे.

दुसरीकडे कॅनडामध्ये कौशल्य असलेल्या कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. शेती, पशुपालन, स्वयंपाकी, वेल्डर, प्लंबर, सुतार आणि मदतनीस अशा कौशल्याधारित कामांसाठी भरपूर मागणी आहे. आरोग्य आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातली अनेक जागा रिक्त आहेत, त्यामुळे कॅनडामध्ये चांगल्या कर्मचाऱ्यांना नोकरीची संधी मुबलक प्रमाणात आहे.

परदेशात जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी कपूरथलामध्ये कन्सल्टन्सी सुविधा देणारे गुरप्रीत सिंग यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना म्हटले की, “विद्यार्थी व्हिसा मिळवू न शकणाऱ्या आणि परदेशात स्थलांतरित होऊ इच्छिणाऱ्या भारतीयांसाठी हा एक चांगला पर्याय आहे. LMIA मुळे थेट चांगल्या पगाराच्या नोकरीची संधी सहज उपलब्ध होऊ शकते. कॅनडामध्ये काम करण्याचा अनुभव मिळण्याची शक्यता असल्याने अनेक भारतीय या माध्यमातून परदेशात जाण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत. दुसरीकडे कॅनडामध्येही कौशल्य असलेल्या कर्मचाऱ्यांना भरपूर मागणी आहे. त्यामुळे LMIA पर्यायाचा वापर करून कॅनडामध्ये स्थलांतर करणाऱ्या भारतीयांची संख्या येणाऱ्या काळात आणखी वाढेल.”

विद्यार्थी व्हिसाच्या तुलनेत LMIA चा पर्याय का वापरला जातो आहे?

विद्यार्थी व्हिसा मिळवण्यासाठी येणारा खर्च अधिक आहे. यामध्ये कॅनडामध्ये जाऊन राहण्याचा आणि शिक्षणाचा खर्च अवाढव्य आहे. अशावेळी स्थलांतर करू इच्छिणारे भारतीय या पर्यायापेक्षा LMIA चा तुलनेने सोपा पर्याय वापरताना दिसत आहेत. LMIA अर्जासाठीचे अधिकृत शुल्क एक हजार कॅनेडियन डॉलर (६१ हजार रुपये) आहे. नोकरी देणाऱ्या कंपनीलाच ही रक्कम भरावी लागते. मात्र, बऱ्याच वेळेला नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडून हे शुल्क घेतले जाते. त्याबरोबरच त्या उमेदवाराला एजंट्स आणि वकिलांनाही प्रत्येकी पाच हजार कॅनेडियन डॉलर द्यावे लागतात. बरेच उमेदवार नोकरी मिळण्याच्या आशेने LMIA परमिट मिळविण्यासाठी १५ ते २० लाख रुपये खर्च करण्याची तयारी दर्शवतात.

त्या तुलनेत विद्यार्थी व्हिसासाठी किमान ३८ हजार डॉलर (सुमारे २३ लाख रुपये) आवश्यक ठरतात. यातील २०,६३५ डॉलर हे GIC सर्टीफिकेटसाठी लागतात. अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याची कॅनडामध्ये वर्षभर राहण्यासाठी आर्थिक क्षमता असल्याचे सिद्ध करणारे हे प्रमाणपत्र असते. याशिवाय शिक्षणाचा आणि राहण्याचा खर्च असतो तो वेगळाच!

कॅनडामध्ये शिक्षण अथवा नोकरीकरिता जाण्यासाठी इंग्रजी भाषेतही प्राविण्य असावे लागते. इंग्रजी भाषा येणे हा विद्यार्थी व्हिसा मिळवण्यासाठीदेखील एक महत्त्वाचा मुद्दा ठरतो. इंग्रजी भाषेचे कौशल्य तपासण्यासाठी इंटरनॅशनल इंग्लिश लँग्वेज टेस्टिंग सिस्टीम (IELTS) कडून एक चाचणी घेण्यात येते. या चाचणीमध्ये बोलणे, वाचणे, लिहिणे आणि ऐकणे अशा चारही गोष्टींमध्ये दहापैकी किमान गुण मिळवावे लागतात. विद्यार्थी व्हिसासाठी दहापैकी किमान सहा गुण आवश्यक ठरतात. LMIA द्वारे मिळणाऱ्या काही नोकऱ्यांसाठी हा निकष कमी आहे. काही ठिकाणी दहापैकी किमान ४.४ अथवा ५.५ गुणही चालू शकतात.

हेही वाचा : मतदान केंद्रांचं काम कसं चालतं? कोणाकडे असतात सर्वोच्च अधिकार? काय असतात नियम?

LMIA चा मार्ग वापरून कायमचे स्थलांतर शक्य आहे का?

LMIA परवाना वापरून नोकरी मिळवता येते. मात्र, कायमस्वरूपी स्थलांतरणाची हमी त्यातून मिळत नाही. आवश्यक असलेल्या सरकारी प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय कायमस्वरूपी स्थलांतर करणे शक्य नाही. या सरकारी प्रक्रियेमध्ये प्रत्येक व्यवसायानुसार, शैक्षणिक पात्रता, वय, कामाचा अनुभव, इंग्रजी भाषेमधील प्राविण्य इत्यादी गोष्टींचे निकष पूर्ण करावे लागतात.

Story img Loader