देशभरात लवकरच इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक-ऑफ अँड लँडिंग एअर ॲम्ब्युलन्स सेवा सुरू होणार आहे. ही सेवा सुरू करून भारताचा समावेश लवकरच जागतिक स्तरावर ही सेवा पुरवणाऱ्या काही निवडक राष्ट्रांमध्ये होणार आहे. त्यासाठी भारताने एक अब्ज डॉलर्सच्या (८६ अब्ज रुपये) करारावर स्वाक्षरी केली आहे. या करारानुसार आयआयटी मद्रास आधारित इलेक्ट्रिक एअरक्राफ्ट स्टार्टअप ‘ई प्लेन कंपनी’ ७८८ एअर ॲम्ब्युलन्स पुरवणार आहे. या ७८८ इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक-ऑफ आणि लँडिंग एअर ॲम्ब्युलन्स भारतातील आघाडीच्या एअर ॲम्ब्युलन्स फर्मला वितरित केल्या जातील. या फर्म ही विमाने भारतातील प्रत्येक जिल्ह्यात तैनात करतील. काय आहे हा करार? एअर ॲम्ब्युलन्स सेवा नक्की काय आहे? त्याचे महत्त्व काय? त्याविषयी जाणून घेऊ…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एअर ॲम्ब्युलन्स सेवेचे महत्त्व

भारतात शहरांचा सातत्याने विस्तार होत आहे. वाहनांच्या रहदारीने लोक त्रस्त आहेत. या गर्दीत ॲम्ब्युलन्सही अडकतात. त्यामुळे एअर ॲम्ब्युलन्स सेवा ही भारतात महत्त्वपूर्ण मानली जात आहे. इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक-ऑफ अँड लँडिंग एअर ॲम्ब्युलन्स वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत फायद्याच्या ठरतील. ही इलेक्ट्रिक वाहने असल्याने पर्यावरणावर विपरीत परिणाम होणार नाही या दृष्टीनेही काळजी घेतली जाईल. भारताच्या इलेक्ट्रिक एअर ॲम्ब्युलन्स बाजारपेठेने अलीकडच्या वर्षांत खूप लक्ष वेधले आहे आणि सरकारदेखील इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक-ऑफ अँड लँडिंग एअर ॲम्ब्युलन्स आणि ड्रोनद्वारे वाहतूक व वितरण सेवा सुलभ करण्यासाठी मर्यादित प्रमाणात हवाई क्षेत्र सुलभ करण्याचा विचार करीत आहे.

भारतातील इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक-ऑफ अँड लँडिंग एअर ॲम्ब्युलन्स तयार करणाऱ्या काही आघाडीच्या स्टार्टअप्समध्ये आर्चर एव्हिएशन, सरला एव्हिएशन व ई प्लेन कंपनी यांचा समावेश आहे. उबरसारख्या ॲप-आधारित टॅक्सी सेवा कंपन्यादेखील एअर टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी प्रोटोटाईप विकसित करीत आणि त्यांच्या चाचणीची तयार करीत आहेत; ज्यामुळे मोठ्या शहरातील लोकांना वाहतूक कोंडी टाळता येईल. एअर ॲम्ब्युलन्ससारख्या अत्यावश्यक सेवांसाठी, ई प्लेन कंपनीचे २०२६ च्या शेवटच्या तिमाहीत काम सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. कंपनीची उत्पादन क्षमता प्रति वर्ष १०० युनिट्स असेल, असे कंपनीचे संस्थापक सत्य चक्रवर्ती यांनी वृत्तसंस्था ‘रॉयटर्स’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

चक्रवर्ती हे आयआयटी मद्रास येथे प्राध्यापक आहेत. एअर ॲम्ब्युलन्ससाठी एक अब्ज डॉलर्सचा करार झाला आहे. मात्र, इतर प्रकारच्या इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक-ऑफ अँड लँडिंग विमानांचे प्रोटोटाइप तयार करण्यासाठी, चाचणी करण्यासाठी आणि त्याचे आवश्यक प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आणखी १०० दशलक्ष डॉलर्सची आवश्यकता आहे. आतापर्यंत फर्मने गुंतवणूकदारांकडून २० दशलक्ष डॉलर्स उभे केले आहेत. ई प्लेन कंपनी वेगवेगळ्या भौगोलिक भागात आणि लोकसंख्येच्या गरजेनुसार एअर ॲम्ब्युलन्सच्या तीन वेगवेगळ्या प्रोटोटाईपवर काम करीत आहे.

या विमानांमध्ये एक पायलट, एक पॅरामेडिक, एक रुग्ण, एक स्ट्रेचर, जीवन वाचवणारी वैद्यकीय उपकरणे व वैद्यकीय किट यांचा समावेश असेल. एअर ॲम्ब्युलन्सचा सर्वाधिक वेग २०० किलोमीटर प्रति तास आणि प्रति बॅटरी चार्ज करताना ११० किलोमीटर ते २०० किलोमीटर दरम्यान असेल. “आम्ही आमचे उत्पादन वाढवू शकतो आणि थेट एअर टॅक्सीमध्ये जाण्यापेक्षा एअर ॲम्ब्युलन्सच्या साह्याने वस्तू अधिक प्रभावीपणे बाजारात आणू शकतो,” असे चक्रवर्ती म्हणाले.

भारतात आरोग्य सेवेत सुधारणा

भारताच्या वाढत्या वाहतूक कोंडीमुळे, पारंपरिक रस्त्यावरील रुग्णवाहिकांना अनेकदा विलंब होतो; ज्यामुळे गंभीर आपत्कालीन स्थितीत मोठी समस्या निर्माण होऊ शकते. इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक-ऑफ आणि लँडिंग एअर ॲम्ब्युलन्सचा परिचय जलद, कार्यक्षम व पर्यावरणास अनुकूल वैद्यकीय वाहतूक प्रदान करणे हा आहे. या इलेक्ट्रिक एअर ॲम्ब्युलन्स शून्य उत्सर्जन निर्माण करतात. परंतु, जीवरक्षक वैद्यकीय सेवा देत असताना त्या शाश्वत वाहतुकीच्या भारताच्या वचनबद्धतेशी सुसंगत आहेत. एअर टॅक्सी, कार्गो ड्रोन व वैद्यकीय वाहतूक विमानांना सामावून घेण्यासाठी सरकार मर्यादित हवाई क्षेत्राच्या विस्ताराचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे भारताच्या इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक-ऑफ अँड लँडिंग मार्केटला गती मिळत आहे.

अत्याधुनिक एअर ॲम्ब्युलन्स तंत्रज्ञान

ई प्लेन कंपनी भारताच्या लोकसंख्येच्या अनुसरून तीन वेगवेगळ्या एअर ॲम्ब्युलन्स प्रोटोटाइप विकसित करीत आहे. या विमानात पुढील बाबींचा समावेश असणार आहे.

  • पायलट
  • एक पॅरामेडिक
  • एक रुग्ण आणि स्ट्रेचर
  • जीव वाचवणारी अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे

एअर ॲम्ब्युलन्सची प्रमुख वैशिष्ट्ये :

टॉप स्पीड : २०० ताशी किलोमीटर

श्रेणी : प्रति बॅटरी चार्ज ११० ते २०० किलोमीटर

एअर ॲम्ब्युलन्सच्या पंखांचा विस्तार आठ मीटर असणार आहे. त्यामुळे ही एअर ॲम्ब्युलन्स घराच्या छतावर किंवा अगदी रस्त्यालगत लँड केली जाऊ शकते. रस्त्यावरील ॲम्ब्युलन्सचा वेग सात पट जास्त असणार आहे.