International Tea Day, 21 May भारतीय मंडळी चहाची भलतीच ‘चहा’ती आहेत. जगात सर्वात जास्त चहा पिणाऱ्यांमध्ये भारतीयांचा क्रमांक लागतो. इतकेच नव्हे तर जगातील सर्वाधिक चहा उत्पादन करणाऱ्या देशांच्या यादीत भारत हा दुसऱ्या क्रमांकावर असलेला देश आहे. आज आपण जो चहा आवडीने पितो त्याचे खरे श्रेय ब्रिटिशांकडे जाते. चहा पावडर, दूध, साखर यांच्या एकत्रित मिश्रणातून जो चहा तयार केला जातो, त्याची खरी सुरुवात १८ व्या शतकात झाली. त्यापूर्वी चहाच्या पानांचा काढा हा औषध म्हणून ग्रहण करण्याची परंपरा आशिया खंडात वेगवेगळ्या भागात अस्तित्वात होती. चहाच्या वापराचे सर्वात प्राचीन पुरावे हे चीनमध्ये सापडतात. ब्रिटिशांनी आशिया खंडात वसाहतीकरणाला सुरुवात केल्यानंतर चहाचा प्रसार युरोपात झाला. दरवर्षी २१ मे रोजी ‘आंतराष्ट्रीय चहा दिवस’ साजरा करण्यात यावा याचा ठराव २१ डिसेंबर २०१९ रोजी संमत करण्यात आला होता. आज या निमित्ताने चहाचा इतिहास समजून घेणे, तेवढेच रंजक ठरावे!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
जगभरातील वेगेवेगळ्या देशातील चहा उत्पादनाचा इतिहास, त्याच्याशी संबंधित संस्कृती, आर्थिक महत्त्व यांविषयी जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. चहाचे उत्पादन आशिया खंडातील देशांमध्ये घेतले जाते. हे बहुतांश देश विकसनशील आहेत. चहाच्या उत्पादनातून आर्थिक सबलता वाढून भूक व गरिबी यांच्याविरुद्ध लढण्याविषयी जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा उद्देश आहे. भारत, श्रीलंका, नेपाळ, व्हिएतनाम, इंडोनेशिया, बांगलादेश, केनिया, मलावी, मलेशिया, युगांडा आणि टांझानिया यांसारख्या चहा उत्पादक देशांमध्ये २००५ सालापासून १५ डिसेंबर रोजी ‘आंतरराष्ट्रीय चहा दिवस’ साजरा केला जातो. परंतु २१ मे रोजी साजऱ्या होणाऱ्या ‘जागतिक चहा दिवसा’चा संबंध चहाच्या आंतराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या व्यापार व चहा उत्पादनातील कष्टकरी वर्गाशी आहे.
आणखी वाचा : विश्लेषण : IPL गुजरात टायटन्सची ‘लॅव्हेंडर’ जर्सी आणि कर्करोग यांचा संबंध काय ?
चहाचे प्राचीनत्त्व चीनकडे ?
चहाची निर्मिती कधी झाली याविषयी अनेक दंतकथा प्रसिद्ध आहेत. चीनमधील सम्राट ‘शेन नुंग’ याची कथा सर्वात जास्त प्रसिद्ध आहे, या कथेनुसार योगायोगाने चहाचा शोध लागला. सम्राट पाणी गरम करत असताना वाऱ्याच्या झुळुकेने आणलेली काही पाने त्या पाण्यात पडली व चहाचा शोध लागला. काही पौराणिक कथांनुसार चीनमध्ये चहा प्रथम इसवी सनपूर्व १५००-१०४६ या दरम्यान प्यायला गेला. या काळात ‘शांग’ राजवंशाने औषधी पेय म्हणून चहाचा शोध लावला, असे मानले जाते. चीनमधील अभ्यासकांनुसार इसवी सनपूर्व ३० ते २१ या शतकादरम्यान चहाचा शोध लागला.
सुरुवातीला, चहा त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी वापरला जात होता परंतु त्याचे पेय तयार केले जात नव्हते. चहाचे पान चघळण्यात येत होते. नंतरच्या काळात त्या पानांपासून पेय तयार करण्याची परंपरा सुरू झाली. इसवी सनपूर्व ७२२ ते २२१ या कालखंडाच्या दरम्यान चीनमध्ये जेवणात चहाच्या पानांचा उपयोग केला जात होता. इसवी सन ६१८ ते ९०७ या दरम्यान तांग राजवंशाने चहाची अनेक झुडपे लावली होती. या काळात, जपानी भिक्खू जपानला परत जाताना त्यांच्यासोबत चहाच्या बिया घेऊन गेले असे संदर्भ सापडतात. इसवी सनाच्या पहिल्या शतकापर्यंत चहा हा चिनी संस्कृतीचा अविभाज्य भाग झाला होता. १६ व्या शतकापासून किंग राजवंशाचे चीनवर राज्य होते. या काळात चहाच्या विविध प्रकारांची रेलचेल चीनच्या संस्कृतीत दिसते. किंबहुना चीनमध्ये परकीय व्यापार आणण्यात चहाचा महत्त्वाचा वाटा होता.
प्राचीन व्यापारी संदर्भ
चहा हा चीनच्या संस्कृतीचा भाग होता हे उघडच आहे. ब्रिटिश आशियात येण्यापूर्वी चिनी चहाचा व्यापार इतर देशांशी असल्याचे संदर्भ मिळतात. इसवी सनाच्या आठव्या शतकात चीनचे भारत, तिबेट, अरब, तुर्क या देशांशी चहाच्या निमित्ताने व्यापारी संबंध आले होते.
चीनमधील ‘ग्रीन टी’ ‘ब्लॅक’ कसा झाला?
प्रारंभिक काळात चीन मधून निर्यात करण्यात येणारा चहा हिरव्या पानांच्या स्वरूपात असायचा. परंतु लांब पश्चिमेकडे पोहचेपर्यंत बऱ्याचदा पाने खराब होत असत. पानांचा ताजेपणा टिकवून ठेवण्याकरता वाळवण्याच्या प्रक्रियेपूर्वी चहाच्या पानाचे नैसर्गिकरित्या ऑक्सिडायझेशन करण्यात येत असे. परिणामी ‘ब्रू’च्या गडद रंगामुळे चहाला काळा रंग प्राप्त होत तो ‘ब्लॅक’ झाला.
आणखी वाचा : विश्लेषण: पछाडलेल्या वास्तू, भीती, आणि हेरिटेज वॉक! का? कशासाठी?
भारतातील चहा
चीनमधून भारतात चहा ब्रिटिशांच्या माध्यमातून आला असे मानले जाते. चहाच्या वनस्पतीचे नाव ‘कॅमेलिया सिनेन्सिस’ ही मूळची भारतीय वनस्पती आहे. परंतु ब्रिटिशांनी चीनमधून वनस्पती आणून लागवड करण्याचा प्रयत्न का केला? ब्रिटिशांच्या आधी, भारतीयांच्या आहारात चहाचा समावेश होत होता, प्रामुख्याने चहाच्या औषधी फायद्यासाठी चहा ग्रहण केला जात असे. किंबहुना प्राचीन चीन प्रमाणेच भारतीय खाद्य संस्कृतीमध्येही चहाच्या पानांचा उपयोग प्राचीन काळापासून करण्यात येत होता याचे पुरावे उपलब्ध आहेत. भारतीय चहाच्या काढ्यात स्थानिक गरम मसाल्यांचा वापर करण्याची परंपरा प्राचीन आहे. चीनची चहाच्या लागवडीवरील मक्तेदारी संपुष्टात आणण्यासाठी ब्रिटीशांनी भारतात मोठ्या प्रमाणात चहाची लागवड करण्यास सुरुवात केली होती.
आसाम, दार्जिलिंगमधील लागवड
भारतीय माती चहाच्या लागवडीसाठी योग्य होती म्हणूनच आसाम आणि दार्जिलिंगच्या टेकड्या मोठ्या प्रमाणात उत्पादनासाठी वापरल्या गेल्या, इतकेच नव्हे तर स्थानिक भारतीय चहाच्या झुडपांचा शोध याच भागात लागला होता. बिटिशांना भारतात चीन इतकी मोठी लागवड करण्यासाठी तब्बल १४ वर्षे लागली होती. याचीच परिणीती भारत आज जगातील सर्वात मोठा चहा उत्पादक देश आहे. रॉबर्ट फॉर्च्यून हा एक स्कॉटिश वनस्पतिशास्त्रज्ञ आणि प्रवासी होता. याने २५० पेक्षा अधिक शोभेच्या वनस्पती चीन व जपान मधून ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेत नेल्या. भारतात चहाच्या लागवडीच्या विकासातील तंत्र त्यानेच चीन मधून भारतात आणले, असे मानले जाते. चीनकडून याने हेरगिरीच्या माध्यमातून तंत्रज्ञानाची चोरी केली, असा आरोपही त्याच्यावर केला जातो.