India’s First Female Prime Minister: महिला सत्तेत आल्या की, त्यांच्यावर सतत नजर ठेवली जाते. काहीजण आदराने पाहातात, तर काहीजण फक्त त्या महिला आहेत म्हणून त्यांना दोष देतात. त्यांच्या प्रत्येक कृतीचं विश्लेषण केलं जात. अनेक जण त्यांच्याबद्दल सहानुभूती दर्शवतात. ही सहानुभूती कित्येकदा दयेसारखी भासते. तर काही जण फक्त चुका शोधतात. त्यातही जगात भारतीय (पर्यायाने भारतीय उपखंडातील) स्त्रीचा विषय निघाला की विषयच संपला अशी स्थिती अनुभवास येते. शोषित, अन्याय सहन करणारी हीच ती काय तिची प्रतिमा. पश्चिमेकडील वसाहतवादी कथांमध्ये भारतीय महिलांना नेहमीच अबला मानले गेले. एका बाजूला पश्चिमेने स्वतःला स्त्रियांच्या हक्कांबाबत श्रेष्ठ मानले तर दुसऱ्या बाजूला वसाहतीकरणाचे समर्थन करताना मात्र स्व-संस्कृतीतल्या लिंगाधारित विषमतेवर पडदा टाकला. परंतु, १९६० च्या दशकात भारतीय उपखंडाने हे चित्र बदलले. सिरीमावो रत्नावली बंडारनायके (Sirimavo Bandaranaike) (१९१६-२०००) या श्रीलंकेच्या (सिलोन) आणि जगाच्या इतिहासातील पहिल्या महिला पंतप्रधान ठरल्या. त्यांच्या सत्ताकालाने जागतिक राजकारणात महिलांसाठी एक नवा अध्याय सुरू केला. परंतु, त्यानंतर ६ वर्षांनी भारताच्या पंतप्रधान पदावर विराजमान झालेल्या इंदिरा गांधी (Indira Gandhi) मात्र जागतिक राजकारणात चर्चेचा विषय ठरल्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अडचणीत सापडलेला भारत एका महिलेच्या हाती
टाइम मॅगझिनच्या २८ जानेवारी १९६६ च्या अंकावर इंदिरा गांधींच्या मलून चेहऱ्याचे आणि कोमेजलेल्या गुलाबाचे चित्र होते. त्यावर लिहिले होते, “Troubled India in a woman’s hands”…अडचणीत सापडलेला भारत एका महिलेच्या हाती. त्याच सुमारास बेट्टी फ्रिडन यांनी भारत दौरा केला होता. त्यानंतर लेडीज होम जर्नलसाठी ‘हाऊ मिसेस गांधी शॅटर्ड द फेमिनिन मिस्टिक’ हा लेख लिहिला. या लेखात त्या लिहितात, “मी भारतात काही प्रश्नांसह आले होते. हे प्रश्न आम्हा सर्वांना अमेरिकेत पडले होते. जिथे एक महिला राष्ट्राध्यक्ष होऊ शकते हा विचार अद्याप इतका अकल्पनीय आहे की, त्याचा साधा उल्लेखसुद्धा विनोदी वाटतो. भारतासारख्या देशात जिथे महिलांना पदराखाली ठेवले गेले, बालविवाह आणि सतीसारख्या प्रथा होत्या. ज्याविषयी १०० वर्षांपूर्वी ख्रिश्चन मिशनरींनी लिहिले होते. तिथे एका महिलेला पंतप्रधान म्हणून निवडले जाणे कसे शक्य आहे?” एकूणच इंदिरा गांधी सत्तेवर आल्याने अमेरिकेतील स्त्रियांच्या सत्तेतील मर्यादित स्थानावर प्रकाश पडला होता. टाइम मॅगझिनने लिहिले की, “महिला पंतप्रधानांची कल्पना बाहेरच्यांसाठी जितकी अनोखी आहे. तितकी ती भारतीयांसाठी नाही.”
भारत त्याचे पालन करतो..
१९६६ साली इंदिरा गांधी सत्तेत आल्या तेव्हा अमेरिकन किंवा युरोपियन देशांपैकी कोणत्याही देशाने महिलांना सर्वोच्च पदावर स्थान दिले नव्हते. भारताच्या या निर्णयामुळे पश्चिमी जगत अचंबित झाले. या वृत्तानिशी बोस्टन टाइमने प्रश्न विचारला, “Can it happen: A woman in the Prime Minister’s palace, why not in the White House?”. “For women, East grants them and West talks equal rights…while the West preaches acceptance of women in public life, India practices it.” (“असं होऊ शकतं का; पंतप्रधानपदी एक महिला, व्हाईट हाऊसमध्ये का नाही?”. “पश्चिमेकडे महिलांसाठी समान अधिकारांवर चर्चा केली जाते तर पूर्वेकडे त्यांना अधिकार प्रदान केले जात आहेत… पश्चिम सार्वजनिक जीवनात स्त्रियांना स्वीकारण्याचा उपदेश करते, तर भारत त्याचे पालन करतो.”
मी करून दाखवलं..
इंदिरा गांधींच्या पंतप्रधानपदाने भारतातही अनेक वादांना तोंड फुटले. खुशवंत सिंग यांनी यावर न्यूयॉर्क टाइम्समध्ये लिहिले होते. ते म्हणतात, “त्यांच्या विजयावर घराघरांत चर्चा सुरू झाली. कुटुंबातील कर्ता पुरुष आपला विरोध व्यक्त करत म्हणाला, “महिला हा देश कसा चालवणार? देश उद्ध्वस्त होईल!” किंबहुना प्रत्यक्ष पंडित नेहरूंनाही हे वाटलं नव्हतं. यावर एका मुलाखतीत इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या, “माझ्या वडिलांना वाटत नव्हतं की, मी हे करू शकेन, पण मी करून दाखवलं.”
पंतप्रधान पद कोणाकडे जाणार?
१० जानेवारी १९६६ रोजी भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर आता पंतप्रधान पद कोणाकडे जाणार याची सर्वत्र कुजबुज होती. शास्त्रीजींच्या अकस्मात निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून कोण काढणार याची चिंता अनेकांना होती. त्यातच असणारं एक नाव म्हणजे के. कामराज. मोरारजी देसाई नक्कीच निवडणूक लढवतील याची त्यांना खात्री होती. परंतु, त्यांचा पराभव कोण करू शकेल या विवंचनेत ते होते. याच सगळ्या पार्श्वभूमीवर इंदिरा गांधींचे नाव त्यांच्या डोळ्यासमोर तरळले. हे कितीही खरं असलं तरी अतुल्य घोष, नीलम संजीव रेड्डी, मोरारजी देसाई आणि स.का. पाटील हे काँग्रेस मधील नेते इंदिरा गांधींची उमेदवारी मान्य करणार नाहीत हे कामराजांना कळून चुकलं होतं. लालबहादूर शास्त्री यांचं पार्थिव भारतात येण्यापूर्वीच मोरारजी देसाई आणि यशवंतराव चव्हाण यांच्या नावाची भावी पंतप्रधान म्हणून चर्चा सुरु झाली होती. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पश्चात हंगामी पंतप्रधान झालेल्या गुलझारी लाल नंदा यांनीही पंतप्रधान पदावर दावा सांगितला होता आणि ११ जानेवारीला सकाळीच ते इंदिरा गांधींचा पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांच्या घरी हजर झाले होते.
के. कामराज यांची भूमिका
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कामराज यांनी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांची भेट घेतली. ते दोघे जुने मित्र होते. इंदिरा गांधींची पंतप्रधानपदी निवड होण्याच्या शक्यतेबाबत दोघांनी चर्चा केली. राष्ट्रपतींच्या मते, इंदिरा गांधी यांच्याकडे कौशल्याचा अभाव होता. ते इंदिराजींच्या बुद्धिमतेबाबत साशंक होते. परंतु, पंतप्रधान होण्याकरिताचा बाह्यदेखावा त्यांच्याकडे होता, असे त्यांचे मत होते. त्यावेळचे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डी. पी. मिश्रा हे इंदिरा गांधींचे प्रमुख सल्लागार व समर्थक होते. त्यामुळे यशस्वी होण्यासाठी कशी पावले टाकायला हवीत हे मिश्रा चांगलेच जाणून होते. पुपुल जयकर आपल्या पुस्तकात लिहितात, मी त्या दिवशी इंदिरेला भेटायला गेले, ती प्रचंड आनंदात होती. माझ्या पाठिंब्याशिवाय कोणीही पंतप्रधान होऊ शकत नाही, असं ती म्हणाली.
पुपुल जयकर लिहितात की, कामराज हे दक्षिणेतील मुरब्बी राजकारणी होते. ते आपल्याला पाठिंबा का देत आहेत, हे न समजण्याइतकी ती (इंदिरा) राजकारणात नवखी नव्हती. आपण सर्वात लायक आहोत म्हणून नव्हे, तर स्वतःच्या पंखाखाली पंतप्रधान राहू शकेल, त्याला हवं तसं वळवता येईल हा त्या मागे त्यांचा उद्देश आहे हे ती जाणून होती. तिला कामराज यांच्या पाठिंब्याची गरज होती. म्हणूनच तिने शिष्याची भूमिका पत्करायचं ठरवलं आणि ते ज्या काही सूचना करतील त्यानुसार हालचाली करण्याचं मान्य केलं.
पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत मोरारजी देसाई, यशवंतराव चव्हाण, गुलझारीलाल नंदा आणि इंदिरा गांधी ही चार नावं प्रामुख्याने चर्चेत होती. मुख्यमंत्र्यांच्या हातात बरीच सत्ता असल्याने डी. पी. मिश्रा यांनी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधायला सुरुवात केली. सुचेता कृपलानी वगळता बहुतेक मुख्यमंत्र्यांनी इंदिरा गांधी यांना पाठिंबा दर्शवला.
बंडाची तयारी?
याच धामधुमीत हंगामी पंतप्रधान गुलझारीलाल नंदा यांनी दिल्लीत सीमा सुरक्षा दलाच्या तुकडयांना बोलावलं होतं. त्यामुळे त्यांचा बंड करण्याचा डाव असावा अशी शंका इंदिरा गांधी यांना होती. इंदिरा गांधी यांनी गुलझारीलाल यांनाच याबाबत विचारले. तर त्यांनी लष्करी बंड होऊ शकतं ही शक्यता असल्याने सीमा सुरक्षा दलाच्या फौजा बोलावल्याचे सांगितले. परंतु हे कारण इंदिरा गांधींना पटले नाही.
इंदिरा गांधी आणि मोरारजी देसाई
१५ जानेवारी रोजी स्पर्धेत इंदिरा गांधी आणि मोरारजी देसाईच उरले. लालबहादूर शास्त्रींच्या वेळी सहमतीने निवड झाली, त्या पद्धतीने सहमती दर्शवण्यास आपण तयार नसल्याचे मोरारजी देसाई यांनी कामराज यांना स्पष्टच सांगितले. त्यामुळे निवडणूक होणं अपरिहार्य होतं. नेतानिवडीसाठी काँग्रेस संसदीय पक्षाची बैठक १९ जानेवारी रोजी भरणार होती. त्या पहाटे इंदिरा गांधींनी राजघाटावर जाऊन गांधीजींच्या समाधीचं दर्शन घेतलं. तेथून त्या तीन मूर्ती हाऊसला गेल्या. अखेर निवडणूक पार पडली. मोरारजी देसाई यांना १६९ तर इंदिरा गांधी यांना ३५५ मतं पडली. पंतप्रधानपदी कोण बसणार याची निश्चिती झाली. भारताच्या आजतागतच्या इतिहासात पहिल्यांदाच एक स्त्री पंतप्रधान पदी विराजमान झाली होती.
शपथविधी
राष्ट्रपती भवनाच्या अशोक हॉलमध्ये २४ जानेवारी १९६६ रोजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी इंदिरा गांधींना पंतप्रधानपदाची शपथ दिली. एकोणीस वर्षांपूर्वी याच हॉलमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी शपथ घेतली होती. इंदिरा गांधी यांनी घटनेला साक्षी ठेवून शपथ घेतली. शपथविधीनंतर दिलेल्या मुलाखतीत आपल्या धार्मिक श्रद्धांबाबत त्या म्हणाल्या, “मी अज्ञेयवादी नाही. बहुतेक लोकं धर्माला कुबडी मानतात. मला अशा कुबडीची गरज नाही. परंतु माझी श्रद्धा आहे.” त्यांनी भगवद्गीतेचा दाखला दिला. “प्रत्येक माणसाच्या हृदयात देव आहे, यावर माझा विश्वास आहे.” इंदिरा गांधी यांनी आपल्या मंत्रिमंडळात फारसा बदल केला नाही. के. कामराज यांच्या सल्ल्यानुसार शास्त्रींच्या मंत्रिमंडळातील बहुतेक मंत्र्यांचा आपल्या मंत्रिमंडळात समावेश केला. गुलझारीलाल नंदा यांना वगळण्याची इच्छा होती. पंरतु, त्यांना त्यांनी गृहमंत्री पदी ठेवलं. समाजवादी विचारवंत अशोक मेहता, आसामचे फक्रुद्दीन अली अहमद या दोन चेहऱ्यांचा समावेश केला गेला.
सत्तेचाळीसाव्या वर्षी इंदिरा गांधींनी पंतप्रधानांच्या कार्यालयात प्रवेश केला. त्यावेळी देशात सर्वत्र असंतोष माजला होता. दुष्काळ, अन्नटंचाई, तांदळावरून दंगली, मिझो जमातीचे बंड, पंजाब भाषकांची स्वतंत्र राज्याची मागणी, गोहत्या बंदीची मागणी असे प्रश्न सामोरी होते. इंदिरा गांधींचे पंतप्रधानपद अत्यंत घटनात्मक आणि आव्हानात्मक होते. या प्रवासात सकारात्मक आणि नकारात्मक शिखरे होती. यामुळे त्या नेहमीच चर्चेत होत्या. एका बाजूला बांगलादेशाच्या स्वातंत्र्यासाठीच्या त्यांच्या निर्णायक भूमिकेमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी त्यांना “old witch, b**ch” असे अत्यंत अपमानास्पद संबोधले; तर दुसऱ्या बाजूला माजी सोव्हिएट संघात त्यांचा सन्मान केला गेला, त्यांचे पुतळे उभारले गेले आणि महिलांची नावं त्यांच्या नावावर ठेवली गेली. एकूणात यामुळे इंदिरा गांधी नेहमीच चर्चेत राहिल्या.