Ayodhya Ram Mandir Inauguration राजीव गांधींच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) प्रभावशाली व्यक्तींबरोबरच्या गुप्त भेटी, शाहबानो प्रकरण, पी. व्ही. नरसिंह राव यांची अयोध्येत बाबरी मशिदीच्या ठिकाणी मंदिर बांधण्याची इच्छा; भारताने आण्विक चाचण्या घेण्यास केलेला विरोध असे एक ना अनेक प्रसंगी दुर्मिळ आणि प्रसंगी अनाकलनीय वाटावेत असे अनेक तपशील ‘हावू प्रायमिनिस्टर्स डिसाइड’ या पुस्तकातून समोर आले आहेत. या पुस्तकाच्या लेखिका नीरजा चौधरी या द इंडियन एक्स्प्रेसच्या स्तंभलेखिका तसेच सहयोगी संपादिका देखील आहेत. त्यानिमित्ताने त्यातील महत्त्वपूर्ण तपशील जाणून घेण्याचा हा प्रयत्न.

अल्पेन बुक कंपनीतर्फे या आठवड्यातच प्रस्तुत पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. हे पुस्तक म्हणजे अनेक दशकांच्या सखोल वार्तांकनांचे मिश्रण आहे. नीरजा चौधरी या इंडियन एक्स्प्रेसच्या राजकीय विश्लेषक होत्या. त्यामुळे निश्चितच या पुस्तकात माजी पंतप्रधानांच्या विषयक दिलेले संदर्भ आणि दृष्टीकोन अधिक विश्वसनीय आहेत. इंदिरा व राजीव गांधी, व्हीपी सिंग, पीव्ही नरसिंह राव, अटलबिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग या सहा पंतप्रधानांच्या कार्याचा आढावा यात घेण्यात आलेला आहे. यांनी समकालीन भारताला आकार देणारे काही महत्त्वाचे निर्णय कसे घेतले आणि त्यांचे वैयक्तिक राजकारण कसे अस्पष्ट होते यावर या पुस्तकात नव्याने प्रकाश टाकण्यात आलेला आहे.

Maharashtra assembly election 2024
लालकिल्ला: शेवटच्या आठवड्यातील प्रचाराने लाभ कोणाला?
Amit Shah and Vinod Tawde meeting
Vinod Tawde Meeting with Amit Shah: “मराठा मुख्यमंत्री…
Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
Rahul Gandhi criticized media for focusing on Ambanis wedding Adani and Modi not on farmers
राहुल गांधींची माध्यमांवर आगपाखड; म्हणाले, “शेतकरी व गरिबांचा मुद्दा…”
Rahul Gandhi Amravati
“पंतप्रधान मोदींना स्मृतीभ्रंश झालाय, ते आजकाल…”; अमरावतीतल्या सभेतून राहुल गांधींचा हल्लाबोल!
Rahul Gandhi Amravati
Rahul Gandhi: “अदानींसाठीच भाजपने आमचे सरकार पाडले”, राहुल गांधी यांचा आरोप
Sharad Pawar Eknath shinde Ajit pawar
Sharad Pawar : अजित पवारांचा शिंदेंना दम? शरद पवारांकडून भर सभेत मिमिक्री; म्हणाले, “शिंदेंनी मला विनंती केली, समजून घ्या…”

संजय गांधींचा अपघात आणि इंदिरा गांधी

इंदिराजींना २२ जून १९८० रोजी हिमाचल प्रदेशातील पालमपूर येथील चामुंडा देवी मंदिरात जायचे होते, मात्र शेवटच्या क्षणी त्यांचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. मोहन मीकीन गटातील कपिल मोहन यांचा पुतण्या अनिल बाली हा इंदिराजींच्या विश्वासू आणि अनौपचारिक सहाय्यकांपैकी एक तसेच इंदिरांजींकडे थेट प्रवेश असणारा होता, त्यानेच मंदिरात जाण्याची व्यवस्था केली होती. “मुख्यमंत्री राम लाल यांच्यासह हिमाचल प्रदेशचे संपूर्ण सरकार तळ ठोकून होते… त्या येत नसल्याचे पुजाऱ्याने ऐकले तेव्हा त्याने तीव्र प्रतिक्रिया दिली. ‘तुम्ही इंदिरा गांधींना सांगा, ही चामुंडा आहे. जर एखादा सामान्य माणूस येऊ शकला नाही तर आई क्षमा करेल. परंतु राज्यकर्त्याने अनादर केल्यास देवी (देवी) माफ करणार नाही. देवी की अवमानना ​​नही कर सकते (शासक देवीचा अपमान करू शकत नाही.)” असे पुस्तकात म्हटले आहे. दुसऱ्याच दिवशी संजय गांधी यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. बाली दिल्लीला रवाना झाले आणि पहाटे २.३० वाजता इंदिराजींच्या घरी पोहोचले तेव्हा त्या संजयच्या मृतदेहाशेजारी बसल्या होत्या. “माझ्या चामुंडाला न जाण्याशी याचा काही संबंध आहे का?” असे त्यांनी बालींना विचारले, असा संदर्भ या पुस्तकात देण्यात आला आहे.

आणखी वाचा : गांधीजी, गुजरात विद्यापीठ आणि ग्रामशिल्पी ! २१ व्या शतकातील ग्रामविकासाची नवी गुंफण

त्याच वर्षी १३ डिसेंबरला इंदिराजी चामुंडा येथे गेल्या. त्यांनी कालीची पूजा केली. ती पूजा पाहून पंडिताचे हात थरथरले. “त्या म्हणाल्या, मी कट्टर हिंदू आहे… त्यांनी पूर्णाहूतीसाठी मंत्रांचे पठण केले, आणि गर्भगृहात डोके टेकवले आणि कालीच्या पूजेसाठी मुद्रा केली, जेव्हा पूजा पूर्ण झाली. तेव्हा त्या रडल्या… फक्त रडल्या!” त्यावेळी इंदिराजींनी संजय गांधींच्या नावाने चामुंडा येथे घाट बांधला जाईल याची खातरजमा केली. “त्यासाठी ८० लाख रुपये खर्च आला जो काँग्रेस नेते सुखराम यांनी केला, नंतर हेच सुखराम केंद्रीय मंत्री झाले,” असे बाली यांनी नमूद केले आहे.

राजीव गांधी आणि रा. स्व. संघ

रा. स्व. संघाने स्वतःहून इंदिराजींशी संपर्क साधलेला असला तरी, आणीबाणीच्या किंवा त्यानंतरच्या काळात इंदिराजींनी संघाच्या नेत्यांना भेटण्यास नकार दिला होता. पण १९८२ मध्ये, इंदिरा गांधी यांच्या अर्ध्या झालेल्या कार्यकाळात त्यांनी राजीव यांना सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचे बंधू भाऊराव देवरस यांना भेटण्यास सांगितले. पुढे राजीवजी आणि भाऊराव देवरस यांच्यात संवाद सुरू झाला. कपिल मोहन यांनी या दोघांमधल्या बैठका निश्चित केल्या होत्या. भाऊराव तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राजकीय विभागाचा कारभार पाहत होते. “भाऊरावांना राजीव गांधी १९८२-८४ या दरम्यान तीन वेळा भेटले, तेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या, त्यानंतर एकदा १९९१ च्या सुरुवातीसही त्यांची भेट झाली , जेव्हा ते सत्तेत नव्हते. पहिली बैठक सप्टेंबर १९८२ मध्ये कपिल मोहन यांच्या ४६, पुसा रोड येथील निवासस्थानी झाली होती. मोहनची भाऊरावांशी अनेक वर्षांची मैत्री होती. दुसरी बैठक पुसा रोड येथे झाली, तिसरी बैठक अनिल बाली यांच्या फ्रेंड्स कॉलनी येथील निवासस्थानी झाली. चौथी बैठक १०, जनपथ येथे झाली,” असे पुस्तकात म्हटले आहे.

बाली यांच्या म्हणण्यानुसार, या बैठकींसाठी समन्वयक व्यक्ती इंदिराजींचे राजकीय सचिव एम. एल. फोतेदार होते. “१९८५-८७ या कालखंडादरम्यान (इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर आणि राजीव पंतप्रधान असताना) राजीव गांधींवर हिंदुत्त्वाचा प्रभाव टाकणारी व्यक्ती म्हणजे फोतेदारजी होते… फोतेदार यांनी एका संवादादरम्यान खुलासा केला की, इंदिरा गांधी यांनी राजीव यांना संघासोबतची त्यांची चर्चा जेवणाच्या टेबलवर करू नकोस असे सांगितले होते. (इंदिराजींना) माहीत होते की सोनिया या ह्या रास्वसंघाच्या विरुद्ध आहेत.”

आणखी वाचा : राम मंदिराच्या निर्मितीला कारणीभूत ठरलेल्या भारतीय पुरातत्त्व खात्याच्या (ASI) जन्माची कूळकथा !

पंतप्रधान झाल्यानंतर राजीवजी भाऊरावांना भेटले नाहीत, पण ते संपर्कात राहिले. त्यांच्या कार्यकाळाच्या अर्ध्या अवधी नंतर, संघाने राजीव यांना रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेच्या दूरदर्शनवरील प्रसारणाबाबत विनंती केली होती – कारण या मालिकेच्या प्रसारणात अनेक अडथळे येते होते. राजीव यांनी संघाच्या विनंतीचा उल्लेख केल्यावर काँग्रेस नेते एचके एल भगत घाबरले. (हेच भगत नंतरच्या काळात माहिती आणि प्रसारण मंत्री झाले) त्यांनी राजीव गांधी यांना इशारा दिला की, हे प्रसारण एक पॅन्डोरा बॉक्सप्रमाणे आहे आणि तो बॉक्स उघडला गेला तर भाजपा, विहिंप आणि रास्वसंघाच्या नेतृत्वाखालील रामजन्मभूमी आंदोलनाच्या बाजूने वातावरणनिर्मिती होईल. राजीव गांधींनी भगत यांच्या त्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले.

सोनियांचा शाहबानो प्रकरणा संदर्भात राजीव गांधी यांना प्रश्न

शाहबानो प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला नकार देण्यासाठी राजीव गांधी सरकारने विधेयक आणण्याच्या निर्णयाला कारणीभूत ठरलेल्या घटनेमागे काय घडले याविषयी पूर्वीचे अनेक अज्ञात तपशील या पुस्तकात उघड करण्यात आले आहेत. त्यासंबंधित एक किस्साही या पुस्तकात असून तो राजीव आणि सोनिया गांधी यांच्यामधील आहे. या प्रसंगातून सोनिया गांधी यांचा राजकारणातील प्राथमिक प्रभाव दिसून येतो.

शाहबानो प्रकरणाबद्दल सोनियांनी राजीव गांधी यांच्याकडे विचारणा केली ‘राजीव, जर तुम्ही मला या मुस्लिम महिला विधेयकाबाबत पटवून देऊ शकत नसाल, तर तुम्ही देशाला कसे पटवून देणार आहात?’. राजीव गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक महत्त्वाचे काँग्रेस सदस्य डी. पी. त्रिपाठी यांनी सांगितल्याप्रमाणे सोनिया गांधी राजीव यांना म्हणाल्या “तुम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर ठाम राहिले पाहिजे,” हे सारे आपल्या उपस्थितीतच झाले, असे त्रिपाठी यांनी नमूद केले होते.

बोफोर्स घोटाळ्यात त्यांचा चुलत भाऊ अरुण नेहरू यांचादेखील सहभाग होता. यामुळे दोन्ही भावांमध्ये वितुष्ट आले. १९८६ मध्ये राजीव यांनी मंत्रिमंडळात फेरबदल करताना त्यांना मंत्रीपदावरून दूर केले. “शपथग्रहणानंतर, अस्वस्थ झालेल्या राजीव गांधी यांनी पुन्हा फोतेदार यांना रेसकोर्स रोडवर सोबत येण्यास सांगितले. त्यावेळी राजीवजी तणावात होते, त्यांची कार रेसकोर्स रोडवर पोहोचली तेव्हा त्यांना सोनिया गांधी आणि गांधी कुटुंबाचे निष्ठावंत कॅप्टन सतीश शर्मा पोर्टिकोमध्ये थांबलेले दिसले. सोनियांच्या चेहऱ्यावर हास्य होते. तेंव्हाच मला समजले की अरुण नेहरूंना का वगळण्यात आले होते,’ असे फोतेदारांनी नमूद केल्याचा उल्लेख या पुस्तकात आहे.
याचीच परिणीती म्हणून अरुण नेहरू यांनी १९८७ साली सालच्या स्वीडिश रेडिओने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोफोर्स प्रकरणासंदर्भात बोफोर्सने भारतीय राजकारण्यांना लाच दिली होती असा गौप्य स्फोट केला.

राव यांची अयोध्या मंदिराची इच्छा

६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडण्यास कारणीभूत असलेल्या घटनांचा क्रम या पुस्तकात तपशीलवार वर्णन करण्यात आला आहे. पत्रकार निखिल चक्रवर्ती यांची राव यांच्याशी झालेल्या भेटीचा उल्लेख आहे. त्यांच्यातील संवादही सविस्तर देण्यात आला आहे. ‘मी ऐकले की तुम्ही ६ डिसेंबरला रात्री बारा वाजल्यानंतर पूजा करणार आहात,’ चक्रवर्ती यांनी राव यांना चिडवले. त्यावर राव म्हणाले, ‘दादा, मला राजकारण कळत नाही, असे तुम्हाला वाटते. माझा जन्म राजनीतिमध्ये झाला आणि आजपर्यंत मी फक्त राजकारणच करत आहे. जो हुआ वो, ठीक हुआ…. (जे झाले ते चांगल्यासाठीच झाले.) मैने इस लिए होने दिया… की भारतीय जनता पार्टी की मंदिर की राजनीती हमेशा के लिए खतम हो जाये (मी ते होऊ दिले कारण मला भाजपचे मंदिराचे राजकारण कायमचे संपवायचे होते).

आणखी वाचा : विश्लेषण: चीनमध्ये इस्लामची तुलना संसर्गजन्य रोगाशी ; इस्लामी देश गप्प का?

पुस्तकात सीआयएसएफचे माजी डीआयजी आणि आयपीएस अधिकारी किशोर कुणाल यांचा उल्लेख आहे, ज्यांनी अयोध्या सेलचे प्रमुख नरेश चंद्रांसोबत काम केले होते, कारण राव यांना राम लल्लाची मूर्ती असलेले मंदिर बांधायचे होते.
पोलिस अधिकारी किशोर कुणाल यांनी नमूद केल्याप्रमाणे, ‘नरसिंह रावजी जहाँ राम लल्लाजी विराजमान है, वहीं मंदिर बनाना चाहते हैं (खरं म्हणजे नरसिंह राव यांना स्वतः मंदिर बांधायचे होते जिथे मूर्ती होत्या त्याच ठिकाणी)’. राव यांनी त्यांचे माध्यम सल्लागार पी.व्ही.आर.के. प्रसाद यांना एक ट्रस्ट तयार करण्याची सूचना केली, या ट्रस्टमार्फत जिथे मशीद होती, त्याच ठिकाणी मंदिराचे बांधकाम केले जाणार होते.”

“विध्वंसानंतर रविवारी (१३ डिसेंबर १९९२) प्रसाद हे राव यांना भेटायला गेले होते. त्यांनी पंतप्रधानांना एकटे आणि चिंतनशील मूडमध्ये पाहिले. ‘आम्ही भाजपशी लढू शकतो, पण भगवान रामाशी कसे लढणार?’ त्यांनी प्रसादला विचारपूर्वक विचारले. ‘काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे, असे आपण म्हणतो, याचा अर्थ आपण नास्तिक आहोत, असा होत नाही,’ ते पुढे म्हणाले. ‘अयोध्येत मंदिर बांधण्याच्या बहाण्याने प्रभू रामाच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणे कितपत न्याय्य आहेत?’

१९७९ मध्ये वाजपेयींनी अणुचाचण्यांना विरोध केला होता

मे १९९८ मध्ये, अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असताना पोखरणमध्ये अणुचाचण्या यशस्वीपण पार पडल्या. पण १९७९ मध्ये मोरारजी देसाई मंत्रिमंडळात परराष्ट्रमंत्री असताना वाजपेयींनी याच चाचणीला विरोध केला होता.
एप्रिल १९७९ मध्ये देसाई यांनी त्यांचे प्रमुख चार मंत्री संरक्षण मंत्री जगजीवन राम, अर्थमंत्री चरणसिंग, गृहमंत्री एच एम पटेल आणि अटलबिहारी वाजपेयी यांची भेट घेतली. देसाई यांनी त्यांना सांगितले की पाकिस्तान अण्वस्त्रे मिळवण्याच्या मार्गावर आहे. सरकारने त्यांच्या अण्वस्त्र कार्यक्रमाबाबत नेमके काय करावे याबाबत म्हणून त्यांना चर्चा करायची होती. संयुक्त गुप्तचर समितीचे अध्यक्ष के. सुब्रह्मण्यम यांनी देसाईंना सादर केलेल्या गुप्त अहवालाने देसाई घाबरले होते. सुब्रह्मण्यम यांनी म्हटले होते की, पाकिस्तान ‘बॉम्बपासून फक्त एका स्क्रू ड्रायव्हरच्या अंतराएवढेच दूर आहे’. अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष होमी सेठना आणि कॅबिनेट सचिव निर्मल मुखर्जी सीसीपीए या मंत्र्यांव्यतिरिक्त बैठकीला फक्त दोन अधिकारी उपस्थित होते.

भारताने अण्वस्त्रप्रयत्न सुरू ठेवावेत, असा ठराव सर्वोच्च मंत्र्यांनी केलेला असला तरी हा निर्णय एकमताने झालेला नव्हता. “सुब्रह्मण्यम यांनी मला नंतर पुष्टी दिली की ‘मोरारजी आणि वाजपेयी पुढे जाण्यास विरोध करत होते. तर एच. एम. पटेल, जगजीवन राम आणि चरणसिंग यासाठी सहमत होते. “सीसीपीए बैठकीच्या एका दिवसानंतर सुब्रह्मण्यम यांनी वाजपेयींचा प्रश्न केला. ‘तुम्ही याला विरोध कसा करू शकता?’. ‘तुम्ही या सगळ्यासाठी आधीपासून तयार होता . त्यावेळी वाजपेयी म्हणाले ’ “आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाकिस्तानला बॉम्ब बनवण्यापासून रोखणे आणि आपल्याकडून कुठल्याही प्रकारे चिथावणी देऊ नये.” असे बचावातत्मक उत्तर वाजपेयी यांनी दिले.

पीएम नाही: राहुलने सोनियांसाठी लक्ष्मण रेषा ओढली

१७ मे २००४ रोजी दुपारी १०, जनपथ येथे झालेल्या बैठकीचा तपशील या पुस्तकात देण्यात आला आहे. के. नटवर सिंग यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा ते तिथे पोहोचले तेव्हा सोनिया, प्रियंका गांधी आणि मनमोहन सिंग तिथे खोलीत उपस्थित होते. “सोनिया गांधी तिथे सोफ्यावर बसल्या होत्या…. मनमोहन सिंग आणि प्रियांकाही होत्या… सोनिया गांधी अस्वस्थ दिसत होत्या… मग राहुल आत आले आणि सर्वांसमोर म्हणाले , ‘मी तुला (सोनिया) पंतप्रधान होऊ देणार नाही. माझ्या वडिलांची हत्या झाली, माझ्या दादीची हत्या झाली. सहा महिन्यांत, तुला ही मारतील. “सोनियांनी ऐकले नाही तर टोकाचे पाऊल उचलण्याची धमकीही राहुलने दिली. ‘हा सामान्य धोका नव्हता,’ नटवर सिंग यांना आठवले , ‘राहुल एक प्रबळ इच्छाशक्तीचा माणूस आहे. त्यांनी सोनियांना निर्णय घेण्यासाठी २४ तासांचा अवधी दिला होता…
राहुल यांनी “आपल्या आईला पंतप्रधानपद स्वीकारण्यापासून रोखण्यासाठी कोणतेही संभाव्य पाऊल उचलण्यास” तयार असल्याचे सांगितल्यानंतर सोनियाला अश्रू अनावर झाले.