भारतीय बनावटीच्या रणगाड्यांमधील इंजिन तयार करण्यासाठी भारताने अमेरिकन कंपनीची निवड केली आहे. हे रणगाडे हिमालयाच्या उंचीवरील युद्धात चीनविरुद्ध मोहिमांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. मूलतः हा प्रकल्प भारत सरकारच्या संशोधन आण विकास संस्था (डीआरडीओ) आणि लार्सन अँड टुब्रो आणि यांच्या संयुक्त विद्यमाने आकारास येत असून २०२२ सालीच त्यास मंजुरी मिळाली. देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने अतिमहत्त्वाचा ठरणाऱ्या या प्रकल्पाचा घेतलेला वेध!

प्रकल्प झोरावर

पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (LAC) भारतीय आणि चिनी सैन्यांमधील संघर्ष सुरू असताना, संरक्षण मंत्रालयाने गेल्या वर्षी प्रकल्प ‘झोरावर’ला मंजुरी दिली. संरक्षण अधिग्रहण परिषदेने (DAC) २४ प्रकल्पांना मान्यता दिली होती. त्यापैकी २१ प्रकल्प देशांतर्गत स्त्रोतांकडून खरेदी केले जाणार आहेत. यातील सहा प्रकल्प भारतीय लष्करासाठी मंजूर करण्यात आले आहेत. संरक्षण मंत्रालयाच्या अहवालानुसार, हाय-पॉवर-टू-वेट या गुणोत्तरामुळे इंजिन पुरवठ्यासाठी निवडलेली जर्मन कंपनी ठरलेल्या करारापर्यंत पोहोचण्यात अयशस्वी झाल्यामुळे या प्रकल्पाच्या पूर्णत्त्वास अडथळे आले. याशिवाय अनेक महिन्यांच्या वाटाघाटींनंतरही जर्मन कंपनी वेळेत इंजिन पुरवठा करू शकली नाही. त्यामुळे हा प्रकल्प लांबणीवर पडला असून या प्रकल्पासाठी आता अमेरिकन ‘कमिन्स’ या कंपनीची ऑफर स्वीकारण्यात आली आहे. भारतीय लष्कराला ३५४ हलक्या वजनाच्या रणगाड्यांची गरज आहे. ३५४ पैकी ५९ रणगाडे डीआरडीओ आणि लार्सन अँड टुब्रो तयार करणार आहेत, तर त्यानंतरचे रणगाडे इतर भारतीय कंपन्या तयार करणार आहेत.

Local fishermen save life of couple stuck in rough sea in ratnagiri
दाम्पत्याला भाट्ये समुद्रात खेळणे पडले महागात; स्थानिक मच्छीमारांनी वाचविले प्राण
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Cyclone Feingal cleared entire state and once again state is heading towards winter
विदर्भ गारठला… गोंदिया ९.४, तर नागपूर, वर्धा १० अंश सेल्सिअस
gadhimai festival in nepal animal slaughtered
‘या’ उत्सवात दिला जातो हजारो जनावरांचा बळी; काय आहे गढीमाई उत्सव? याला जगातील सर्वांत रक्तरंजित उत्सव का म्हटले जाते?
celebrations at durgadi fort in kalyan
कल्याणमधील दुर्गाडी किल्ला येथे जल्लोष
snake entered tiger cage in British era Maharajbagh Zoo staff noticed it immediately and pulled snake out
वाघिणीच्या पिंजऱ्यात शिरला साप आणि आता मोराच्याही…
Shiv Pratap Din celebrated at Pratapgad Flowers showered from helicopter on Chhatrapati equestrian statue satara news
अलोट उत्साहात प्रतापगड येथे शिवप्रताप दिन साजरा; छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवर्षाव
Migratory birds started arriving in Gondia district due to increasing cold in European countries
नवेगावबांध जलाशयांवर परदेशी पाहुण्यांचा स्वच्छंद विहार,पक्षी प्रेमींना पर्वणी

अधिक वाचा: चीन आणि तालिबान यांच्या मधुर संबंधांमागे आहे तरी काय? चीनची नजर अफगाणिस्तानवर कशासाठी? 

हलक्या वजनाच्या रणगाड्याची गरज

दोन वर्षांपूर्वी चीनने पूर्व लडाखमधील भारतीय भागात मोठ्या प्रमाणात सैन्य आणि अवजड उपकरणे तैनात केली होती, त्या वेळेस भारतीय लष्कराला रणगाड्यांची गरज निर्माण झाली होती. चीनने २०२० सालच्या एप्रिल महिन्यामध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ नवीन प्रकारचे ‘१५ लाइट रणगाडे’ (टँक टाइप-१५\वजनाने हलके रणगाडे) उभे केल्याने त्यांना तात्पुरता फायदा झाला होता. यावरचे प्रत्युत्तर म्हणून, भारतीय सैन्याने T-72 (टी -७२) आणि T-90 (टी ९०) रणगाडे तैनात केले, हे रणगाडे जास्त वजनदार होते. तसेच मैदानी भागात आणि वाळवंटात ऑपरेशनसाठी डिझाइन केलेले होते. या तैनातीत या रणगाड्यांना उंचीच्या भागात मर्यादांचा सामना करावा लागला होता. त्याचमुळे या भागात हलक्या आणि आधुनिक सेवा- सामग्रीने परिपूर्ण रणगाड्यांची गरज निर्माण झाली होती.
‘झोरावर’ नावाचा प्रकल्प हा वास्तविक स्वदेशी डिझाइन आणि देशांतर्गत विकसित केलेल्या हलक्या वजनाच्या (२५ टन वजनाचे) रणगाड्यांचा आहे. या रणगाड्यांना ‘झोरावर’ हे नाव देण्यात आलेले आहे. या रणगाड्यांमुळे आधुनिक युद्धातील आव्हानांना सामोरे जाण्यास तसेच भारतीय सैन्याच्या शस्त्रास्त्र विभागाचे आधुनिकीकरण करण्यास मदत होणार आहे.

‘झोरावर’ कोण होता?

झोरावर हे एक लष्करी जनरल होते, झोरावर सिंग कहलुरिया हे त्यांचे पूर्ण नाव, चिनी सैन्याविरुद्धच्या लढाईत त्यांनी गाजवलेल्या कर्तृत्त्वासाठी ते ओळखले जातात. जोरावर सिंग हे जम्मूचा डोगरा राजपूत शासक गुलाबसिंग यांचे लष्करी सेनापती होते. त्यांनी किश्तवाडचे राज्यपाल म्हणून काम पाहिले तसेच लडाख आणि बाल्टिस्तान जिंकून राज्याचा विस्तार केला. म्हणुनच या रणगाड्याला ‘झोरावर’ हे नाव देण्यात आले. हा रणगाडा वेगवेगळ्या भूप्रदेशांमध्ये, हाय अल्टिट्यूड एरिया (HAA) ते सागरी बेटाचा प्रदेश तसेच सीमांत भूभागात काम करण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे.

अधिक वाचा: विश्लेषण: म्यानमारच्या कोको बेटांवरून चीनची भारतावर नजर! नेमके काय घडते आहे?

‘झोरावर’ची गरज का भासली?

भारत आणि चीन यांच्यातली परिस्थिती बिघडल्यास, भारतीय कमांडच्या अपेक्षेप्रमाणे चिनी युनिट्स लडाखच्या नदीपात्रातून पुढे जाऊन भारतीय भूभाग मिळवण्याचा प्रयत्न करतील. सिंधू नदी चीनच्या ताब्यात असलेल्या तिबेटमधून लडाखमार्गे पाकिस्तानात वाहते. या प्रदेशातील भारतीय तुकड्यांनी अलीकडेच नदी ओलांडण्याच्या कौशल्याचा सराव केला. Il-76 (Il-७६)आणि C-17 (सी-१७) सारख्या लष्करी सामग्री विमानांनी T-90S (टी- ९० एस) भीष्म, T-72M1 (टी- ७२ एम १) अजेय आणि BMP हे रणगाडे ५,००० मीटर उंचीवर असलेल्या प्रदेशात पोहचवले. असे असले तरी या परिसरात रणगाडे चालवण्यासाठी अनेक आव्हाने आहेत. रणगाड्यांच्या संदर्भातील कारवाया त्यांच्या वजन आणि तेथील हवामानामुळे क्लिष्ट ठरतात. उंचावरील हवेच्या कमी दाबामुळे रणगाड्यांच्या पॉवर प्लांटची कार्यक्षमता कमी होते आणि कर्मचाऱ्यांना इंजिन गोठण्यापासून रोखण्यासाठी दर दोन ते तीन तासांनी ३० मिनिटांसाठी इंजिन सक्रिय करणे आवश्यक ठरते. लाइट टँक टाइप-१५ त्याच्या शक्तिशाली इंजिन आणि ऑक्सिजन जनरेटरमुळे उच्च उंचीवर कार्य करू शकतो. याउलट, MBTs T-72 (मेन बॅटल टँक टी- ७०) आणि T-90 (टी- ९०) सारख्या जड हत्यार बंद वाहनांना ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. तर लाइट टँक टाइप-१५ चे हलके आणि उच्च पॉवर-टू-वेट गुणोत्तर हे अधिक वजनाच्या रणगाड्यापेक्षा त्यांना अधिक सक्रिय आहे.

टाइप-१५ चे वैशिष्ट्य

टँक टाइप-१५ रणगाडे हे लेसर रेंजफाइंडर, नाईट व्हिजन आणि इन्फ्रारेड ऑप्टिक्स, सेन्सर आधारित इशारा प्रणाली, उपग्रह संप्रेषण तसेच नेटवर्क वॉरवेअर सिस्टिम्स सारख्या अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक्स यंत्रणांनी सुसज्ज आहेत. या रणगाड्यांमधील हायड्रो-न्यूमॅटिक सस्पेंशनमुळे यावर असलेली तोफ पारंपारिक रणगाड्यांपेक्षा उभ्या कोनात उंचावण्यास सक्षम असते (काटकोनात), ज्यामुळे उंचीवरील लढाऊ परिस्थितीत लक्ष्यांना गुंतवून ठेवण्यास ते फायदेशीर ठरते. संरक्षण दलांच्या अहवालानुसार चीनच्या शस्त्रागारात सुमारे ५०० टाइप-१५ रणगाडे आहेत. हिमालयात त्यांच्या तैनातीमुळे भारताच्या बख्तरबंद शस्त्रागारातील कमतरता दिसून आल्या आहेत, भारतीय सैन्य मोठ्या प्रमाणावर हाय अल्टिट्यूड एरियावरील ऑपरेशन्ससाठी कमी अनुकूल असलेल्या MBT रणगाड्यांवर अवलंबून आहे, ही भारतासाठी इशाऱ्याची घंटाच आहे.

प्रकल्प झोरावर

१९८९ सालापासून, सोव्हिएत PT-76 (पीटी-७६) रणगाडे टप्प्याटप्प्याने सेवेतून बाहेर पडले, तेव्हापासून भारतीय सैन्याकडे हलक्या वजनाच्या रणगाड्यांचा अभाव आहे. भारतीय सैन्य ५८ ते ६८ टन वजनाच्या MBT चा वापर करते, यात T-90S (टी-९०एस) भीष्म, T-72M1 (टी-७२ एम १) अजय आणि अर्जुन इत्यादींचा समावेश होतो. हे रणगाडे पाकिस्तानने दिलेल्या धोक्याला प्रत्युत्तर म्हणून विकत घेतले होते, मोकळ्या मैदानात आणि वाळवंटासाठी ते अधिक चांगल्या प्रकारे अनुकूल आहेत. १९८३ साला पासून, DRDO ने नवीन हलक्या वजनाचे रणगाडे विकसित करण्यासाठी अधूनमधून प्रयत्न केले, परंतु त्यांना यश आले नाही. २०२० च्या लडाखमधील परिस्थितीने पुन्हा एकदा या प्रयत्नांना वेग आला आहे.

स्मार्ट अत्याधुनिक रणगाडा

२०२१ मध्ये, भारतीय संरक्षण मंत्रालयाने ३५० हलक्या वजनाचे रणगाडे घेण्याचा निर्णय घेतला. या वाहनांचे वजन २५ टनांपेक्षा जास्त नसावे, त्यावर १०५ मिमीची तोफ असावी तसेच दोन ते तीन लोकांचा ताफा असण्याची सोय असावी. अतिरिक्त आवश्यकतांमध्ये स्वयंचलित-लोडिंग, रिमोट-नियंत्रित मशीन गन, “स्मार्ट” दारुगोळा सोडण्याची क्षमता आणि अँटी-टँक मार्गदर्शित क्षेपणास्त्रे (ATGM) आणि स्फोटक प्रतिक्रियात्मक चिलखत (ERA) ब्लॉक्स माउंट करण्याची क्षमता समाविष्ट आहे. या रणगाड्यांनी HAA आणि रण सारख्या सीमांत भूभागात काम करणे अपेक्षित होते. त्याचप्रमाणे एकूणच उभयचर ऑपरेशन्ससाठी या रणगाड्यांचा उपयोग होणे अपेक्षित आहे.
सुरुवातीस असा अंदाज होता की भारत रशियाकडून 2S25 स्प्रुट-एसडीएम १ विकत घेईल, ज्याने आवश्यक उत्पादन तंत्रज्ञान हस्तांतरित करण्याची ऑफर दिली होती. तिची १२५ मिमी तोफ टी-७२च्या तॊडीसतोड होती. भारतीय सैन्याने मोठ्या संख्येने तैनात केलेल्या T-90S (टी-९०एस) भीष्म रणगाड्यांसारखेच असलेले हलके वजनाचे T-90 (टी-९०) रणगाडेदेखील रशियाने देऊ केले होते. हानव्हा डिफेन्स ही दक्षिण कोरियाची कंपनी देखील लष्कराला K21-105 (के२१-१०५) हा हलक्या वजनाचा रणगाडा देण्यास तयार होती. या रणगाड्याची १०५ मिमी मुख्य तोफ ४२ अंशांच्या उंचीपासून ते १० अंशांच्या पर्यंत लक्ष्य करू शकते, हे वैशिष्ट्य पर्वतीय भूभागात या रणगाड्याचे अष्टपैलुत्व दर्शवते. भारत सरकारने मात्र देशांतर्गत तयार करण्यात येणाऱ्या प्रकल्प झोरावरला प्राधान्य दिले आहे.

अधिक वाचा: विश्लेषण: चीनमध्ये इस्लामची तुलना संसर्गजन्य रोगाशी ; इस्लामी देश गप्प का?

२०२२ साली, संरक्षण खात्याने ३१५ रणगाडे खरेदी करण्याचे अधिकृतरित्या जाहीर केले. भारतीय लष्कराच्या सात रेजिमेंटमध्ये हे रणगाडे विभागले जातील. भविष्यात ही संख्या ७०० पर्यंत वाढण्याचा पर्याय आहे. भारत सरकारने २०२३ च्या एप्रिल महिन्यात L&T ला या रणगाड्यांचा नमुना तयार करण्याचे काम दिले. हे रणगाडे तयार करण्यासाठी सरकारने L&T ला भागीदार म्हणून निवडले होते. ही नवीन मशीन MTU ८०० हॉर्सपॉवर इंजिन, रेंक ट्रान्समिशन आणि बेल्जियन कंपनी जॉन कॉकरिलने निर्मित १०५ मिमी तोफेसह सज्ज असणार आहे. भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, पहिला रणगाडा वर्षअखेरीस चाचणीसाठी उपलब्ध असेल.

Story img Loader