Sindhu-Saraswati Civilization आजपासून बरोबर १०० वर्षांपूर्वी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या सर जॉन मार्शल यांनी हडप्पा संस्कृतीचा शोध लागल्याचे जाहीर केले. या शोधामागे दया राम साहनी, आर. डी. बॅनर्जी, के. एन. दीक्षित, एम. एस. वाट्स, अर्नेस्ट मॅकी, एच. हर्ग्रीव्ह्ज, के. एन. शास्त्री, एन. जी. मजूमदार आणि इतर अनेक पुरातत्त्व शास्त्रज्ञांचा हातभार लागला. या सर्व पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी प्राचीन भारतीय संस्कृतीच्या गतवैभवाला पुन्हा जगासमोर आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आक्रमकांचाच इतिहास राहिला…

भारताला समृद्ध प्राचीन इतिहास असला तरी या इतिहासातील अनेक घटना परकीय आक्रमण आणि त्यातून वाट्याला आलेलं पारतंत्र्य यांच्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या आहेत. किंबहुना याच परकीयांच्या आक्रमणात भारतातील ग्रंथ खजिना किंवा इतिहासाची साक्ष देणारे पुरावे नष्ट झाले. बख्तियार खिलजीच्या आक्रमणात नालंदा विद्यापीठाचे ग्रंथालय जवळपास तीन महिने जळत होते. त्यामुळे केवळ आक्रमणकर्त्यांचाच इतिहास मागे शिल्लक राहिला. त्याचाच परिणाम म्हणून युरोपियन इतिहासकारांनी भारताच्या इतिहासाची सुरुवात अलेक्झांडरच्या आक्रमणापासून झाली अशी केली. भारतासारख्या गरीब देशाला जी काही समृद्धी लाभली आहे, ती या आक्रमकांमुळेच अशीच काहीशी धारणा होती. परंतु या धारणेला छेद दिला तो हडप्पा संस्कृतीच्या शोधाने.

अधिक वाचा: सिंधू लिपी नवीन संशोधनावरून पुन्हा खळबळ का? खरंच आहे का ही लिपी भारतीयांच्या लेखनकलेचा आद्यपुरावा?

हडप्पा संस्कृतीचा शोध

खरंतर हडप्पा संस्कृतीच्या अस्तित्त्वाचे पुरावे हे १८ व्या शतकापासून दृष्टिपथास येण्यास सुरुवात झाली होती. हडप्पा या पुरातत्त्वीय स्थळावर प्राचीन संस्कृतीच्या सापडणाऱ्या अवशेषांची नोंद करण्यात आली होती. १९०२ साली सर जॉन मार्शल यांची भारतीय पुरातत्त्व खात्याच्या महासंचालक पदावर नेमणूक झाली आणि इतिहासाला नवे वळण लागले. याच दरम्यान सिंधू नदीच्या मुख्य प्रवाहाजवळील मोहेंजोदारो नावाच्या स्थळाने लक्ष वेधून घेतले. मार्शल यांनी पुरातत्त्वीय अधिकाऱ्यांची एक टीम या स्थळाच्या सर्वेक्षणासाठी नियुक्त केली. यामध्ये डी. आर. भंडारकर (१९११), आर. डी. बॅनर्जी (१९१९, १९२२-१९२३), आणि एम. एस. वाट्स (१९२४) यांचा समावेश होता. १९२३ साली मोहेंजोदारोला दुसऱ्यांदा भेट दिल्यावर बॅनर्जी यांनी मार्शल यांना या स्थळाच्या प्राचीनत्त्वाबद्दल तसेच या स्थळावरील आणि हडप्पा येथील पुरावशेषांमध्ये साम्य असल्याचे कळवले. त्यानंतर वाट्स यांनीही हडप्पा आणि मोहेंजोदारो येथे सापडलेल्या मुद्रा आणि लिपी यांच्यात साम्य असल्याचे मार्शल यांना कळवले. यामुळे मार्शल यांनी हडप्पा आणि मोहेंजोदारो या दोन्ही स्थळांवरील माहिती एकत्र करण्याचे आदेश दिले. मार्शल यांनी बॅनर्जी आणि साहनी (राय बहादूर दया राम साहनी हे भारतीय पुरातत्वशास्त्रज्ञ होते, त्यांनी १९२० ते १९२१ मध्ये हडप्पा येथील उत्खननाचे पर्यवेक्षण केले होते) यांना एकत्र चर्चेला बोलावले. १९२४ सालच्या मध्यात ते एका निष्कर्षापर्यंत येऊन पोहोचले. या निष्कर्षाची तात्पुरती घोषणा त्यांनी २० सप्टेंबर १९२४ रोजी Illustrated London News मध्ये केली.

मोहेंजोदारो (फोटो सौजन्य: विकिपीडिया)

Illustrated London News मध्ये नक्की काय छापून आले?

“Not often has it been given to archaeologists, as it was given to Schliemann at Tiryns and Mycenae, or to Stein in the deserts of Turkestan, to light upon the remains of a long forgotten civilisation. It looks, however, at this moment, as if we were on the threshold of such a discovery in the plains of the Indus.”

भावार्थ: हे पुरातत्त्व अभ्यासकांच्या वाटेला नेहमीच येत नाही, जे श्लीमनच्या वाटेला टायरीन्स आणि मायसीनीच्या स्वरूपात आले, स्टीन याच्या नशिबात वाळवंटातील तुर्कस्तानच्या स्वरूपात आलं, आणि प्राचीन नामशेष झालेल्या संस्कृती समोर आल्या. असच काहीसं या क्षणाला दिसत आहे. आम्ही सिंधूच्या खोऱ्यात अशाच प्रकारच्या शोधाच्या उंबरठ्यावर होतो.

अधिक वाचा: Harappa ‘या’ उत्खननात सापडले, ४००० वर्षे प्राचीन भारतीय मल्टिग्रेन हाय प्रोटिन डाएट लाडू! संशोधन काय सांगते?

आर. डी. बॅनर्जी. (फोटो सौजन्य: विकिपीडिया)

आर. डी. बॅनर्जी.

या शोधात अनेक भारतीय अभ्यासकांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यातील एक नाव म्हणजे आर. डी. बॅनर्जी. आर. डी. बॅनर्जी यांची मुख्य ओळख ‘मोहेंजोदारो मॅन’ अशी होती. आज जगात सिंधू संस्कृती किंवा हडप्पा संस्कृती किंवा सिंधू-सरस्वती संस्कृती म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या संस्कृतीच्या शोधात आर. डी. बॅनर्जी यांनी मुख्य भूमिका बजावली होती. १९२२-२३ साली मोहेंजोदारोत झालेल्या उत्खननाचे श्रेय त्यांच्याकडे जाते. आर. डी. बॅनर्जी यांनी १९१० साली कोलकात्यातील इंडियन म्युझियममध्ये पुरातत्त्व विभागात सहाय्यक म्हणून काम सुरू केले. १९११ साली ते भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (Archaeological Survey of India) विभागात सहाय्यक अधीक्षक म्हणून दाखल झाले आणि १९१७ साली त्यांना वेस्टर्न सर्कलचे अधीक्षक पुरातत्त्वशास्त्रज्ञ म्हणून पदोन्नती देण्यात आली. त्यांची बदली १९२३ साली वायव्येच्या सिंधू खोऱ्यात झाली. विशेष म्हणजे ही बदली त्यांनी स्वतः मागून घेतली होती. बॅनर्जी यांनी मोहेंजोदडोच्या अवशेषांमध्ये बौद्धपूर्व काळातील कलाकृती शोधून काढल्या तसेच मोहेंजोदरो आणि हडप्पा या स्थळांमधील साम्य लक्षात आणून दिले. या शोधांमुळे या दोन ठिकाणी उत्खनन झाले. त्यामुळे त्या काळी अज्ञात असलेल्या ताम्रपाषाणयुगीन सिंधू संस्कृतीचे अस्तित्त्व सिद्ध झाले. या संस्कृतीविषयी बॅनर्जी यांनी त्यांच्या विविध लेखांमध्ये आणि पुस्तकांमध्ये वर्णन केले आहे. अ‍ॅन इंडियन सिटी थाउजंड इयर्स अगो, मोहेंजोदारो, प्रीहिस्टोरिक, एंशीएन्ट अँड हिंदू इंडिया, मोहेंजोदारो- ए फॉरगॉटन रिपोर्ट ही काही त्यांची महत्त्वाची पुस्तक आहेत.