भारताचे नौदल सामर्थ्य आजपासून अनेक पटींनी वाढले आहे. आज (२९ ऑगस्ट) विशाखापट्टणम येथील एका कार्यक्रमात देशाची दुसरी अणुशक्तीवर चालणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी (एसएसबीएन) ‘आयएनएस अरिघात’ नौदलाच्या ताफ्यात सामील झाली आहे. आयएनएस अरिघात कार्यान्वित झाल्यामुळे, भारताकडे आता दोन कार्यरत बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडया आहेत. नौदलाच्या शस्त्रागारात आधीच आयएनएस अरिहंत आहे, जी ऑगस्ट २०१६ पासून कार्यान्वित आहे. आयएनएस अरिघातचे वैशिष्ट्य काय? भारतीय नौदलासाठी ही पाणडुबी किमयागार कशी ठरेल? याविषयी जाणून घेऊ.

आयएनएस अरिघात

नवीन पाणबुडीला प्राचीन संस्कृत शब्द ‘अरिघात’ असे नाव देण्यात आले आहे; ज्याचा अर्थ ‘शत्रूंचा नाश करणारा’ असा होतो. पाणबुडी आपल्या सागरी हितसंबंधांचे रक्षण करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. ही अरिहंतनंतरची दुसरी आण्विक पाणबुडी आहे. ‘मनीकंट्रोल’च्या वृत्तानुसार, विशाखापट्टणममधील शिप बिल्डिंग सेंटर (एसबीसी) येथे २०१७ पासून या पाणबुडीचे बांधकाम सुरू होते.

one terrorist killed in jammu
जम्मूत एक दहशतवादी ठार, लष्कराच्या ताफ्यावर गोळीबार; सुरक्षा दलाचे जोरदार प्रत्युत्तर
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
Jewellery worth more than three lakh rupees seized from suspected vehicles in Bhiwandi
भिवंडीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई, संशयित वाहनांतून तीन लाखाहून अधिक रुपयांचे दागिने जप्त
Thane Municipal Employees, Diwali, Thane Municipal Employees Salary, Thane,
ठाणे पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सानुग्रह अनुदानापाठोपाठ वेतन दिवळीआधी जमा होणार
Kalyan East candidates, Kalyan West candidates,
कल्याण पूर्व, पश्चिमेतील ठाकरे गटाचे उमेदवार ठरले, शिंदे शिवसेनेचे ठरेना
Rajendra Deshmukh karjat
आमदार राम शिंदे व भाजपाला रोहित पवार यांनी दिला मोठा धक्का! भाजपाचा बडा नेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये
Eknath Shinde Criticized Uddhav Thackeray
Eknath Shinde : “मुख्यमंत्री करा म्हणत ते दारोदारी भटकत आहेत, त्यांचा चेहरा मित्रपक्षांनाही..”, एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका
Eknath Shinde
CM Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा पुन्हा गुवाहाटी दौरा! निवडणूक अर्ज दाखल करण्यापूर्वी सहकुटूंब घेतलं कामाख्य देवीचं दर्शन
विशाखापट्टणममधील शिप बिल्डिंग सेंटर (एसबीसी) येथे २०१७ पासून या पाणबुडीचे बांधकाम सुरू होते. (छायाचित्र-पीटीआय)

हेही वाचा : Netflix’s IC 814: The Kandahar Hijack : भारताला हादरवून टाकणाऱ्या विमान अपहरणाची कहाणी

आयएनएस अरिघात या पाणबुडीचे विस्थापन सहा हजार टन आहे आणि लांबी ११२ मीटर आहे. आयएनएस अरिघातच्या आत अणुभट्टी बसविण्यात आली आहे, ज्यामुळे या पाणबुडीला वेग मिळतो. ही पाणबुडी पृष्ठभागावर जास्तीत जास्त १२-१५ नॉट्स (२२-२८ किमी/तास) आणि पाण्याखाली गेल्यावर २४ नॉट्स (४४ किमी/तास) वेग देऊ शकते. अरिघातमध्ये दुहेरी हुल, बॅलास्ट टँक, दोन सहाय्यक इंजिन आणि आणीबाणीच्या परिस्थितीसाठी शक्ती आणि गतिशीलता नियंत्रणात आणण्यासाठी थ्रस्टरदेखील बसवण्यात आले आहे.

आयएनएस अरिहंतप्रमाणे यातदेखील ३,५०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरापर्यंतची रेंज असलेले चार अणु-सक्षम एसएलबीएम (पाणबुडीने प्रक्षेपित बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे) किंवा ७५० किलोमीटर अंतरापर्यंतची रेंज असणारे १२ के-१५ एसएलबीएम वाहून नेण्याची क्षमता आहे. याव्यतिरिक्त, आयएनएस अरिघात टॉर्पेडोनेदेखील (पाण्याखालील सिगारच्या आकाराचे रॉकेट) सज्ज असेल. एका स्रोताने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला सांगितल्याप्रमाणे, “आयएनएस अरिघात ही आयएनएस अरिहंतच्याच आकाराची, लांबीची आणि विस्थापनाची आहे. या पाणबुडीत अधिक के-१५ क्षेपणास्त्रे वाहून नेली जाऊ शकतात. नवीन पाणबुडी अधिक सक्षम आहे.” बऱ्याच तज्ज्ञांनी नोंदवले आहे की, आयएनएस अरिघातला गेम चेंजर ठरवणारी गोष्ट म्हणजे त्याची गुप्त क्षमता. प्रगत सोनार प्रणाली आणि अत्याधुनिक स्टेल्थ तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली आयएनएस अरिघात समुद्राच्या पृष्ठभागाखाली लपून, कोणत्याही धोक्याला जलद आणि निर्णायकपणे प्रतिसाद देण्यास सक्षम आहे.

आयएनएस अरिघात या पाणबुडीचे विस्थापन सहा हजार टन आहे आणि लांबी ११२ मीटर आहे. (छायाचित्र-इंडो पाक इन्फो/एक्स)

भारताची पाणबुडी योजना

आयएनएस अरिघात ही भारताच्या अरिहंत पाणबुडी योजनेचा एक भाग आहे. या योजनेवर तब्बल ९०० अब्ज रुपये खर्च केले जात आहे. आयएनएस अरिहंत आणि आयएनएस अरिघात व्यतिरिक्त, भारत आणखी दोन एसएसबीएन पाणबुडी नौदलात सामील करण्याची योजना आखत आहे. या पाणबुडींचे विस्थापन सात हजार टन असेल. सूत्रांनी ‘हिंदुस्तान टाईम्स’ला सांगितले की, तिसरी पाणबुडी आयएनएस अरिदमन पुढील वर्षी कार्यान्वित होणार आहे, त्यानंतर लवकरच चौथ्या पाणबुडीलाही कार्यान्वित केले जाईल. ‘द प्रिंट’मधील वृत्तानुसार, या दोन मोठ्या पाणबुड्यांमध्ये चारऐवजी आठ क्षेपणास्त्र ट्यूब असतील. उल्लेखनीय म्हणजे, अरिहंत-श्रेणीच्या पाणबुड्यांच्या विकासासह, अणुशक्तीवर चालणाऱ्या पाणबुड्या असलेल्या देशांच्या लहान गटाचाही भारत एक भाग आहे. आत्तापर्यंत, अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, चीन आणि भारत हे सहा देश या गटाचा भाग आहेत. भारत अशा काही देशांपैकी एक आहे, ज्यांनी आपले अण्वस्त्र ट्रायड (मिसाईल चाचण्या) पूर्ण केले आहे. त्यात अमेरिका, रशिया, चीन आणि फ्रान्स या देशांचाही समावेश आहे.

भारताच्या नौदलाची ताकद वाढणार

आयएनएस अरिघात कार्यान्वित झाल्यामुळे भारताकडे इंडो-पॅसिफिक प्रदेशात दोन अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्या असतील. तज्ज्ञांनी नोंदवले आहे की, आयएनएस अरिघात चीनवर वरचढ ठरेल. हे महत्त्वाचे आहे, कारण चीन लष्करी तळ उभारून, अरेरावी करून सागरी सीमांवर दावे करत आहे आणि असुरक्षित राज्यांना कर्जांमध्ये अडकवून धोरणात्मक सवलतींची सक्ती करत आहे आणि या प्रदेशात आपला ठसा वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. आयएनएस अरिघातदेखील त्याच्या प्रतिबंधक भूमिकेच्या पलीकडे काम करते.

हेही वाचा : अ‍ॅपलचे नवे ‘सीएफओ’ भारतीय वंशाचे; कोण आहेत केवन पारेख?

पाणबुडीविरोधी युद्धापासून ते गुप्तचर माहिती गोळा करणे आणि विशेष ऑपरेशन्सपर्यंत विविध मोहिमा राबविण्याची क्षमता आयएनएस अरिघातमध्ये आहे; ज्यामुळे प्रादेशिक स्थिरता आणि सुरक्षिततेला हातभार लागतो. “जो समुद्रावर नियंत्रण ठेवतो तो राष्ट्राचे भवितव्य नियंत्रित करतो,” अशी एक म्हण आहे आणि आयएनएस अरिघातमुळे देशात पुढील पिढ्यांसाठी शांतता, सुरक्षा आणि समृद्धी सुनिश्चित होईल.