Nitish Kumar Narendra Modi NDA : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये संयुक्त जनता दल पक्षाचे प्रमुख व बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पक्षाला १२ जागा प्राप्त झाल्या आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर नितीश कुमार यांनी ‘इंडिया’ आघाडीची साथ सोडून एनडीए आघाडीमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांच्यावर भरपूर टीका झाली आणि ‘पलटूराम’ हे त्यांच्याबाबत वापरण्यात येणारे संबोधन अधिक ठळकपणे वापरण्यात येऊ लागले. मात्र, आता याच नितीश कुमारांकडे असलेल्या १२ जागांच्या आधारावर भाजपाप्रणीत एनडीए आघाडीला सत्तेसाठी अवलंबून राहावे लागणार आहे. नितीश कुमार यांनी या प्रकारे पहिल्यांदाच बाजू बदलली आहे, असे नाही. याआधी अनेकदा त्यांनी कधी सत्ताधाऱ्यांबरोबर, तर कधी विरोधकांबरोबर जाणे पसंत केले आहे. बुधवारी (५ जून) सकाळी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख तेजस्वी यादव यांच्याबरोबर ते दिसले. ते दोघेही एकाच फ्लाईटमधून दिल्लीला गेले. हा फक्त योगायोग होता, असे दोन्हीही पक्षांच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले. तेजस्वी यांनी दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले, “थोडा संयम ठेवा आणि काय घडते आहे ते पाहा. आम्ही एकमेकांना सदिच्छा दिल्या. बाकी पुढे काय होते, ते पाहत राहा.”
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा