intermittent fasting hair loss : वाढलेलं वजन कमी करण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या गोष्टी फॉलो करत असतात. काहीजण भात खाणे टाळतात, तर काही लोक खूपच व्यायाम करतात. पण तरी देखील वजन कमी होत नसल्याने कंटाळून डाएटिंगकडे वळतात. सध्या भारतात इंटरमिटंट फास्टिंग हा उपवासाचा प्रकार खूपच लोकप्रिय झाला आहे. अगदी सर्वसामान्यांपासून ते बॉलिवूड कलाकारांनी डाएटिंगची ही पद्धत निवडली आहे. पण या उपवासामुळे जसे फायदे आहेत, तसे तोटेही होत असल्याचं समोर आलं आहे. एका अभ्यासानुसार, वजन कमी करण्याची अत्यंत लोकप्रिय असलेली ही पद्धत केसांच्या वाढीला अडथळा देखील आणू शकते.

इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे आहे?

इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे ठराविक वेळेत घेतला जाणारा आहार. डाएटिंगच्या या पद्धतीत दिवसातील २४ तासांपैकी १६ तास उपवास केला जातो. उर्वरित ८ तासांच्या कालावधीत संबंधित व्यक्ती अन्नपदार्थांचे सेवन करतो. साधारणत: तीन महिने ते एका वर्षांपर्यंत इंटरमिटंट फास्टिंग केले जाते. यामुळे वजन कमी होणे, इन्सुलिनची सक्रियता आणि मधुमेहावर चांगले नियंत्रण मिळवणे यासारखे फायदे दिसून आले आहेत. इंटरमिटंट फास्टिंगच्या अहवालातील फायद्यांमुळे जगभरात या उपवासाला लोकप्रियता मिळाली आहे. २०२३ मध्ये अमेरिकेत आंतरराष्ट्रीय अन्न परिषदेद्वारे एक सर्वेक्षण करण्यात आले होते. जवळपास १२ टक्क्यांहून अधिक लोकांनी डाएटिंगची ही पद्धत वापरल्याचे त्यात निष्पन्न झाले.

neck fat be causing breathing problems
तुमच्या मानेच्या चरबीमुळे श्वासोच्छ्वास घेण्यात अडथळे येऊ शकतात? तज्ज्ञ काय सांगतात…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Vloggers Surprise Blinkit Swiggy Delivery Riders With Gifts
एक ही दिल है, कितनी बार जीतोगे! ‘त्यांनी’ डिलिव्हरी बॉयला दिले हटके गिफ्ट; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
SEBI is now also obsessed with AI to speed up the process Claims that work is underway on more than a dozen projects print eco news
प्रक्रियेत गतिमानतेसाठी सेबीचाही आता ‘एआय’ ध्यास! डझनभराहून अधिक प्रकल्पांवर काम सुरू असल्याचा दावा
Number of patients suffering from hair loss and baldness due to unknown disease exceeds one hundred
बुलढाणा : अनामिक आजाराचा कहर! केसगळती, टक्कलग्रस्त रुग्णांची संख्या शंभरपेक्षा जास्त…
Sudden Hair Loss in Buldhana villages
Hair Loss in Buldhana Villages : बुलढाण्यातील केस गळतीमागे दूषित पाणी? टक्कल पडण्याचं नेमकं कारण काय? आरोग्य अधिकार्‍याने दिली महत्त्वाची माहिती
Amla kadha benefits
घनदाट केसांसाठी आणि वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आवळ्याचा काढा आहे अत्यंत फायदेशीर; जाणून घ्या बनवण्याची योग्य पद्धत
Which is the best time to exercise
तुम्हालाही व्यायामाची आवड आहे? मग, थांबा… कधीही व्यायाम केल्याने उदभवू शकतात गंभीर समस्या

हेही वाचा : What is FOMO : ‘फोमो’ म्हणजे नेमकं काय? त्यापासून स्वत:ची सुटका कशी करावी?

इंटरमिटंट फास्टिंगचे तोटे काय?

अनेकजण वजन कमी करण्यासाठी इंटरमिटंट फास्टिंगकडे वळत असल्याने संशोधकांनी या उपवासाचे फायदे आणि तोट शोधून काढण्याचा प्रयत्न केला. विशेष बाब म्हणजे, यातील सर्व परिणाम सकारात्मक आलेले नाहीत. अमेरिकन हार्ट असोसिएशन आयोजित केलेल्या एका परिषदेत अलीकडेच सादर केलेल्या डेटानुसार, जी व्यक्ती ८ तासांपेक्षा कमी वेळात अन्नपदार्थ्यांचे सेवन करते, तिचा हृदयविकारामुळे मृत्यू होण्याचा धोका ९१ टक्के असतो. संशोधकांनी २० हजारांपेक्षा अधिक अमेरिकन व्यक्तींचे परीक्षण केले आणि ८ ते १७ वर्षांच्या माहितीतून हे परिणाम काढले. अभ्यासकांनी इंटरमिटंट फास्टिंगचा संबंध थेट झोपेच्या चक्रासोबत जोडला. उपवासामुळे अपूर्ण झोप होत असल्याने मनावर नकारात्मक परिणाम होतात. याशिवाय अन्नपचनाच्या समस्यादेखील जाणवू लागतात.

केस गळती नेमकी कशामुळे होते?

सेल जर्नलमध्ये शुक्रवारी (13 डिसेंबर) प्रकाशित झालेला ताज्या अभ्यासात, इंटरमिटंट फास्टिंग आणि केस गळणे यांच्यातील संबंधाचा पुरावा देण्यात आला आहे. साधारणत: ही उपवास पद्धती केसांची मुळापासून वाढ करणाऱ्या पेशींचे नुकसान करते, परिणामी केसांची वाढ थांबल्याने अनेक समस्या उद्भवतात. अभ्यासात असंही म्हटलं आहे की, इंटरमिटंट फास्टिंग केसांच्या मुळांचे पुनरुत्पादन थांबवण्यासाठी शरीरातील वेगवेगळ्या भागांना सक्रिय करते.

उंदरांवर करण्यात आलेल्या एका संशोधनात असे आढळून आले की, ज्या उंदरांना इंटरमिटंट फास्टिंगवर ठेवण्यात आले होते, त्यांचे केस सतत अन्न खाणाऱ्या उंदरांपेक्षा कमी वेगाने वाढत होते. संशोधकांना असेच काहीसे परिणाम उपवास करणाऱ्या व्यक्तींमध्येही दिसून आले. मात्र याबाबत संशोधकांचे म्हणणे असे की, उंदरामधील केसांच्या वाढीवर होणाऱ्या परिणामांची तुलना माणसाशी केली जाऊ शकत नाही कारण दोघांच्याही चयापचयक्रियेमध्ये कमालीचे अंतर आहे. त्यामुळे दोहोंमधील निष्कर्ष हे वेगळे असू शकतात.

हेही वाचा : गहू आणि खाद्यतेलाचे दर आणखी वाढणार? कारण काय? सर्वसामान्यांवर काय परिणाम होणार?

इंटरमिटंट फास्टिंग केस गळतीचे कारण ठरू शकते?

संशोधकांना असे आढळून आले की, इंटरमिटंट फास्टिंग केल्याने केसांची वाढ रोखली जाते. कारण, हेअर फॉलिकल स्टेम सेल्स (केसांची मुळापासून वाढ करणाऱ्या पेशी) शरीरातील ऑक्सिडेटिव्ह तणावाचा सामना करू शकत नाहीत. इंटरमिटंट फास्टिंगमध्ये जेव्हा शरीर ऊर्जेसाठी चरबी जाळते, तेव्हा वजन कमी होण्यास मदत होते. हेअर फॉलिकल स्टेम सेल्स सक्रियता आणि निष्क्रियतेच्या टप्प्यांतून जातात. केसांची वाढ होणे हे पेशींच्या सक्रियेतवर अवलंबून असतं. संशोधनातून असं समोर आलं की, ज्या उंदरांना इंटरमिटंट फास्टिंगवर ठेवण्यात आले होते, त्यांच्या केसांची वाढ करणाऱ्या पेशी दीर्घकालीन उपवासामुळे नष्ट झाल्या होत्या. तर नियमित अन्नसेवन करणाऱ्या उंदरांमध्ये हेअर फॉलिकल स्टेम सेल्स सक्रिय होत्या.

“इंटरमिटंट फास्टिंगच्या वेळी शरीरातील चरबी फॅटी अॅसिडस् सोडू लागतात. हळुहळू हे अॅसिड केसांची वाढ करणाऱ्या पेशींमध्ये प्रवेश करते. परंतु, या स्टेम पेशींकडे याचा सामना करण्याची ताकद नसते, असं वरिष्ठ लेखक आणि स्टेम सेल बायोलॉजिस्ट बिंग झांग यांनी सांगितलं. ही प्रक्रिया अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी सखोल अभ्यासाची गरज असल्याचंही झांग यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले, “माणसांमध्येच विविधता मोठ्याप्रमाणावर असल्याने वेगवेगळ्या लोकांवर होणारा परिणाम वेगळा असू शकतो”.

Story img Loader