जागतिक महिला दिन २०२३ (IWD) आज ८ मार्च रोजी साजरा होत आहे. या वर्षी महिला दिन साजरा करण्यासाठी “DigitAll: Innovation and Technology for Gender Equality” अशी संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. या निमित्ताने संयुक्त राष्ट्रांनी सर्वसमावेशक तंत्रज्ञान आणि डिजिटल शिक्षणाची आवश्यकता अधोरेखित केली आहे. डिजिटल साधनांवर सर्वांना हक्क मिळावा यासाठी सर्व देशांच्या भूमिकेबद्दल चर्चा घडवून आणावी, अशी संयुक्त राष्ट्रांची योजना आहे. जागतिक महिला दिनाची उत्पत्ती महिला कामगारांच्या चळवळीशी निगडित आहे. इथे एक गोष्ट लक्षात घेणे जरुरीचे आहे की, तंत्रज्ञान आणि डिजिटल साधनांची महिलांकडे असलेली कमतरता, त्यांना स्टेम (STEM) क्षेत्रात कमी प्रतिनिधित्व देत आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणिताच्या क्षेत्राला एकत्रितरीत्या स्टेम (Science, Technology, Engineering and Mathematics – STEM) असे म्हणतात.

हे वाचा >> International Women’s Day 2023: महिला दिन ‘८ मार्च’ रोजी साजरा करण्यामागे खरं कारण काय? जाणून घ्या सविस्तर..

'Gir Mat Jaana': Viral MP Woman's Dance Fails To Impress Netizens funny video goes viral
गावच्या महिलेचा ट्रेंडिंग गाण्यावर तुफान डान्स; मारल्या अशा स्टेप की VIDEO पाहून पोट दुखेपर्यंत हसाल
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Two girls fighting at collage over a guy shocking video viral on social media
प्रेमासाठी काय पण! एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा; VIDEO पाहून व्हाल हैराण
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?

स्टेम (STEM) क्षेत्रात महिलांचे प्रतिनिधित्व कमी, या विषयाची नोंद का घ्यावी?

जगभरात स्टेम विषयांच्या व्यावसायिक क्षेत्रात महिलांचा सहभाग कमी आहे. यामध्ये आयटी क्षेत्र, पर्यावरण आणि हवामान, वैद्यकीय विज्ञान ही क्षेत्रेही येतात. स्टेम क्षेत्राची प्रगती आज उत्तरोत्तर वाढत आहे. बदलते तंत्रज्ञान हे आधुनिक जीवनातील सर्व पैलूंचा ताबा घेत आहे, अशा वेळी या क्षेत्रातील महिलांच्या कमी प्रतिनिधित्वाची नोंद घेणे आवश्यक आहे. आज चॅटजीपीटी सारखे चॅटबॉट हे विविध क्षेत्रांतील कामगारांची जागा घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

करिअरच्या दृष्टिकोनातून अधिक सांगायचे झाल्यास, स्टेम क्षेत्र कामगारांसाठी लाभदायक ठरत असतात. इतर क्षेत्रातील कामगारांपेक्षा स्टेम क्षेत्रातील कामगार दोनतृतीयांश अधिक पैसे कमवातात, अशी माहिती पेव रिसर्च सेंटरने (Pew Research Center) दिली आहे. त्याशिवाय स्टेम क्षेत्रात असलेली महिलांची कमी उपस्थिती ही महिलांना पुरुषांच्या तुलनेत कमी वेतन मिळण्याचे कारण बनते. कमी वेतनाच्या क्षेत्रात महिलांना अधिक गृहीत धरले जाते आणि उच्च वेतन श्रेणीतील नोकऱ्यांमध्ये, जसे की स्टेम क्षेत्रात, महिलांचे प्रतिनिधित्व नगण्य आहे.

हे वाचा >> जगातील ‘आद्यमहिला’; ‘ती’चे वय तब्बल ३१ लाख ८० हजार वर्षे!

स्टेम क्षेत्रातील स्त्री-पुरुष गुणोत्तर (Gender Gap) काय आहे?

जागतिक स्तरावर स्टेम क्षेत्रातील उच्चस्तरीय शिक्षण घेण्यामध्ये मुलींचे प्रमाण हे १८ टक्के आहे तर त्या तुलनेत मुलांचे प्रमाण हे ३५ टक्के आहे. स्टेम फिल्डमध्येही लिंगविभाजन आहे. नैसर्गिक विज्ञान क्षेत्रात मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या अधिक असते. तर त्याचवेळी बरीच मुले अभियांत्रिकी, उत्पादन आणि बांधकाम क्षेत्राकडे वळतात.

भारतामध्ये अभियांत्रिकी शिक्षणाच्या अभ्यासक्रमात मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या लक्षणीय प्रमाणात कमी आहे. एकूणच अभियांत्रिकी अभ्यासक्रमात पदवी संपादन करू इच्छिणाऱ्या, पदव्युत्तर, एम.फिल. आणि पीएच.डी. करणाऱ्या ३६ लाख ८६ हजार २९१ अर्जांपैकी ७१ टक्के विद्यार्थी मुले आहेत. तर फक्त २९ टक्के मुली आहेत. ही आकडेवारी अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षण २०२०-२१ मधून समोर आलेली आहे.

विज्ञान शाखेत पदवी संपादन करण्यासाठी, पदव्युत्तर पदवी मिळवणे किंवा एम.फिल., पीएच.डी. करण्यासाठी प्रवेश घेणाऱ्यांमध्ये मुलींची संख्या ५३ टक्के एवढी आहे. यामध्ये मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण अधिक असले तरी ही वाढ उशिराच झालेली आहे. याचा अर्थ असा नाही की, मुलींना या क्षेत्रात अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्यासाठी इतर अनेक अडचणी कारणीभूत ठरतात.

आणखी वाचा >> Women’s Day 2023: प्रत्येक भारतीय महिलेला माहीत असायला हवेत संविधानाने दिलेले ‘हे’ महत्त्वपूर्ण अधिकार

लिंग गुणोत्तरातील भेदभाव का अस्तित्त्वात आहे?

महिला कोणते काम निवडतात आणि त्यांच्याकडे कोणते पर्याय उपलब्ध आहेत, या अशा अनेक घटकांवर लिंग गुणोत्तर आधारित आहे. सद्य:स्थितीत उपलब्ध असलेली संसाधने जशी की, मार्गदर्शन आणि अभ्यासक्रमासाठी असलेली शिष्यवृत्ती. तसेच महिलांच्या शिक्षणाप्रति असलेला सामाजिक दृष्टिकोन. मुलांच्या शिक्षणावर जेवढी गुंतवणूक होते, तितकी मुलींच्याबाबत होण्यास प्रोत्साहन दिले जात नाही.

युनिसेफने या लिंग गुणोत्तराच्या पक्षपातीपणाकडे अंगुलीनिर्देश केलेला आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास, भारतातील गणित आणि विज्ञान पुस्तकातील ५० टक्के चित्रांमध्ये मुलांना अधिक दाखवले जाते. त्यात मुलींचे प्रमाण केवळ सहा टक्के एवढे आहे. यूकेमध्ये केवळ एकचतुर्थांश मुलींचे म्हणणे आहे की, तंत्रज्ञान क्षेत्रात पुरुषांची मक्तेदारी असल्यामुळे त्यांना हे क्षेत्र सोडून द्यावे लागले. या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रसिद्ध महिलांचे नावे फक्त २२ टक्क्यांनाच घेता आले.

अमेरिकेत, २६ टक्के स्टार्टअपच्या मागे किमान एक महिला संस्थापक आहे. युरोपमध्ये तंत्रज्ञान संस्थापकांमध्ये महिलांची संख्या केवळ २१ टक्के आहे. चांगली बाब म्हणजे ही संख्या वाढत आहे. मुली आणि महिलांमधून अधिक रोल मॉडेल समोर येत आहेत.