अॅपल या माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील जगविख्यात कंपनीने नुकतेच iPhone १५ ही मोबाईल सिरीज लाँच केली आहे. या नव्या मोबाईल सिरीजमध्ये या कंपनीने अनेक नवे फीचर्स दिले आहेत. फ्रान्स देशात मात्र या कंपनीला चांगलाच धक्का बसला आहे. या देशात अॅपलच्या आयफोन १२ या फोनच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. हा फोन प्रमाणापेक्षा जास्त किरणोत्सार करतो असे सांगण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर फ्रान्स देशाने आयफोन १२ या फोनच्या विक्रीवर बंदी का घातली? एखाद्या फोनमधून निघणाऱ्या किरणोत्साराचे प्रमाण किती असावे? अॅपल या कंपनीने यावर काय भूमिका घेतली आहे? हे जाणून घेऊ या…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सॉफ्टवेअर अपडेट केल्यास आयफोन १२ च्या समस्या दूर होणार
फ्रान्स रेडिओ स्पेक्ट्रम असाईन्मेंट अथॉरिटीज (एएनएफआर) या संस्थने आयफोन १२ या मोबाईल फोनबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. आयफोन १२ या फोनमधून निघणारा किरणोत्सर्ग मानवी शरीरात प्रमाणापेक्षा अधिक शोषला जातो. या फोनचा स्टॅण्डर्ड अबसॉर्प्शन रेट ( एसएआर) हा निर्धारित प्रमाणापेक्षा अधिक आहे, असे एएनएफआरने म्हटले आहे. फ्रान्सचे डिजिटल अर्थव्यवस्थेचे कनिष्ठ मंत्री जीन-नोएल बॅरोट यांनी ले पॅरिसियन या वृत्तपत्राला याबाबत अधिक माहिती दिली आहे. आयफोन १२ या फोनमध्ये निर्माण होणारी ही समस्या सॉफ्टवेअर अपडेट केल्यास नाहीशी होईल, असे त्यांनी सांगितले आहे. तर अॅपल कंपनीने आयफोन १२ मधील त्रुटी दूर न केल्यास सर्व आयफोन परत पाठवण्याचा आदेश दिला जाईल, असे एएनएफआरने स्पष्ट केले आहे. याला उत्तर म्हणून ‘आयफोन १२ या फोनवर वेगवेगळ्या चाचण्या करण्यात आलेल्या आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी या चाचण्या केलेल्या असून जागतिक किरणोत्सर्ग मानकानुसार त्याला प्रमाणपत्रही देण्यात आलेले आहे,ट अशी भूमिका अॅपल कंपनीने घेतली आहे.
एसएआर म्हणजे काय?
एसएआर म्हणजे स्टॅण्डर्ड अबसॉर्प्शन रेट. या संज्ञेच्या मदतीने किरणोत्सार करणाऱ्या कोणत्याही उपकरणातून मानवी शरर किती उर्जा शोषून घेते हे मोजले जाते. मोबाईल फोन जेव्हा वापरला जातो, तेव्हा तो रेडिओफ्रिक्वेंसी लहरी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड प्रक्षेपित कतो. मात्र मोबाईलमधून निघणारा किरणोत्सर्ग शरीरातील पेशींचे विघटन करू शकत नाही किंवा पेशींमध्ये बदलही करू शकत नाही. असे असले तरी मोबाईल फोनमधून निघाणारा किरणोत्सर्ग शरीरासाठी घातक ठरू शकतो.
एएनएफआरला नेमके काय आढळले?
एएनएफआरने मुकतेच १४१ मोबाईल फोन्सवर वेगवेगळ्या चाचण्या केल्या होत्या. यामध्ये आयफोन १२ या फोनचादेखील समावेश होता. या चाचणीमध्ये युरोपीयन संघाने किरणोत्सर्गासाठी जे मानक ठरवून दिलेले आहेत. या मानकांचे आयफोन १२ पालन करत नाही, असे एएनएफआरला आढळले. त्यामुळेच फ्रान्सने आयफोन १२ च्या विक्रीवर सध्यातरी बंदी घातली आहे. एएनएफआरच्या म्हणण्यानुसार आयफोन १२ या फोनमध्ये किरणोत्सर्गाचे प्रमाण हे ५.७४ वॅट्स प्रति किलोग्रॅम आढळले. कोणत्याही फोनचे किरणोत्सर्गाचे प्रमाण हे युरोपीयन युनियनच्या मानकांनुसार ४.० वॅट्स प्रति किलोग्रॅम पाहिजे. मात्र आयफोन १२ या फोनचे किरणोत्सर्गाचे प्रमाण हे प्रमाणापेक्षा अधिक आढळले. असे असले तरी मानवाला यापासून धोका नाही, असे ICNIRP चे प्राध्यापक रॉडनी क्रोफ्ट यांनी सांगितले.
मोबाईल फोनमधून निघणारा किरणोत्सर्गाचा शरीरावर परिणाम होतो का?
मोबाईल फोनमधून निघणाऱ्या किरणोत्सर्गावर जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील अभ्यास केला आहे. या संघटनेच्या अभ्यासानुसार मोबाईल फोनमधून निघणारा किरणोत्सर्ग मानवी शरीरावर प्रतिकूल परिणाम करतो, याचे ठोस पुरावे आढळलेले नाहीत. मात्र यावर अधिक संशोधन होण्याची गरज आहे, असे या संघटनेने म्हटलेले आहे. २०११ साली इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर (आयएआरसी) या संस्थेनेही मोबाईल फोनमधून निघणाऱ्या किरणोत्सर्गावर अभ्यास केला होता. या संस्थेने मोबाईलमधून निघणाऱ्या किरणोत्सर्गाला ‘कदाचित कार्सिनोजेनिक’ असे म्हटले होते. म्हणजेच या किरणोत्सर्गामुळे कदाचित कॅन्सर होण्याची शक्यता आहे, असे म्हटले होते. तसेच अशा प्रकारच्या किरणोत्सर्गाचे या संस्थेने ‘२ बी’ असे वर्गीकरण केले होते. आम्ही केलेल्या संशोधनामध्ये काही नमुन्यांत ब्रेन ट्युमर होण्याची शक्यता असल्याचे पुरावे आढळले होते, असे सांगत आमच्याकडच्या डेटामध्ये असलेल्या संभाव्य त्रुटीमुळेही असे झाले असावे, असेही आयएआरसी या संस्थेने सांगितले होते.
अॅपल कंपनीने काय स्पष्टीकरण दिले?
आयफोन १२ या फोनमध्ये असलेली अडचण सॉफ्टवेअर अपडेट केल्यानंतर दूर होईल असे एएनएफआरने म्हटले आहे. म्हणजेच सॉफ्टवेअमुळे ही अडचण निर्माण झाली आहे. असे असले ती अॅपल या कंपनीने एएएफआरचा अहवाल फेटाळला आहे. आमच्या कंपनीने एएनएफआरला अनेक स्वतंत्र कंपन्यांनी या फोनसंदर्भात केलेल्या चाचण्याचे निष्कर्ष पाठवलेले आहेत. या सर्व चाचण्यांत आमच्या फोनने एसएआरचे सर्व नियम तसेच मानकाचे पालन केलेले आहे, असे कंपनीने म्हटले आहे. आम्ही एएनएफआरने काढलेल्या निरीक्षणांचा पुन्हा अभ्यास करू. तसेच हा फोन तयार करताना सर्व मानकांचे पालन करण्यात आलेले आहे, हे दाखवून देऊ, असेही कंपनीने म्हटले आहे.
अन्य देशांतही आयफोन १२ वर बंदी?
दरम्यान, फ्रान्समध्ये आयफोन १२ च्या विक्रीवर बंदी घालण्यात आल्यानंतर अन्य देशांतही अशीच कारवाई केली जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आयफोन १२ हा युरोपीयन संघाच्या मानकांचे पालन करत नाही, असे एएनएफआरने म्हटलेले आहे. तसेच आमच्या चाचण्यांमधून जे निष्कर्ष आले आहेत, ते आम्ही युरोपीयन युनियनमधील अन्य देशांना पाठवू असेही एएनएफआरने सांगितले आहे. त्यामुळे भविष्यात आयफोन १२ च्या विक्रीवर अन्य देशांतही बंदी येणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.