IPL 2023 Auction : आयपीएलच्या सोळाव्या हंगामाला लवकरच सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी प्रत्येक संघाने काही खेळाडूंना संघात कायम (रिटेन) ठेवले आहे. तर काही खेळाडूंना संघमुक्त केले आहे. सॅम बिलिंग्ज, पॅट कमिन्स यासारख्या खेळाडूंनी आयपीएलच्या १६ व्या हंगामात न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर खेळाडूंना संघमूक्त करण्यामागे नेमकं कारण काय, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> IPL Retention 2023: आयपीएलच्या सोळाव्या हंगामापूर्वी ‘या’ खेळाडूंची झाली हकालपट्टी, वाचा सर्व संघांची संपूर्ण यादी

कोणत्या खेळाडूला संघात ठेवायचे आणि कोणत्या खेळाडूला बाहेरचा रस्ता दाखवायचा, हे ठरवण्यासाठी फ्रँचायझी वेगवेगळे निकष लावतात. यामध्ये कोणत्याही खेळाडूला संघमुक्त करण्याअगोदर त्या खेळाडूला मागील हंगामात किती रुपयांना खरेदी केलेले आहे, याचा विचार केला जातो. खेळाडूला संघात कायम ठेवण्याअगोदर त्याच्यावर आपण किती पैसे खर्च करतोय, हा विचार फ्रँचायझी प्रामुख्याने करतात. उदाहरणार्थ, आयपीएलच्या १६ व्या हंगामात दिल्ली कॅपिट्लस संघाने शार्दुल ठाकूर या खेळाडूाला तब्बल १०.७५ कोटी रुपये देऊन खरेदी केले होते. त्याने या हंगामात १४ सामन्यांत १५ बळी घेत १२० धावा केल्या होत्या. दिल्ली कॅपिटल्स संघाला शार्दुलची ही खेळी समाधानकारक वाटली नाही. याच कारणामुळे दिल्लीने त्याला संघमुक्त केले आहे. शार्दुल आता कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळणार आहे. कमीत कमी रुपये खर्च करून सर्वोत्कृष्ट खेळाडूंना खरेदी करण्याचा प्रयत्न फ्रँचायझी करत असतात.

महत्त्वाकांक्षा आणि वाढती स्पर्धा

हेही वाचा >>> विश्लेषण: ट्विटरवर बनावट खात्यांचा सुळसुळाट, एलॉन मस्कही त्रस्त; कसे ओळखायचे फेक अकाऊंट्स?

फ्रँचायझी आयपीएलकडे पैसे कमवण्याचे साधन म्हणून पाहतात. येथे भावनांना स्थान नाही. एखादा खेळाडू चांगले प्रदर्शन करत नाही, असे दिसून आले किंवा आकडेवारीवरून तसे सिद्ध झाले, की फ्रँचायझी त्या खेळाडूला संघमुक्त करतात. महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली याच्यासारख्या खेळाडूंसाठी हा अपवाद ठरू शकतो. काही खेळाडूंच्या महत्त्वाकांक्षादेखील संघबदलास कारणीभूत ठरतात. शिखर धवन सनरायझर्स हैदराबादकडून एकूण ६ आयपीएल हंगाम खेळला होता. मात्र चांगली संधी मिळतेय म्हणून धवनने हैदराबाद संघ सोडून दिल्ली कॅपिटल्स संघात जाण्याचा निर्णय घेतला होता. २०२२ चा हंगाम तो पंजाब किंग्ज या संघाकडून खेळला. आता २०२३ मध्ये तो पंजाब संघाचे नेतृत्व करणार आहे. केएल राहुलनेदेखील उत्तम संधी मिळत असल्यामुळे पंजाब किंग्ज संघ सोडून लखनऊ सुपर जायंट्स संघात जाण्याचे ठरवले. म्हणजेच खेळाडूंची महत्त्वाकांक्षा, स्पर्धा हेदेखील संघामध्ये बदल होण्यामागचे एक कारण आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : फेसबुक, ट्विटरनंतर आता अ‍ॅमेझॉन; जगप्रसिद्ध कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरून का काढत आहेत?

परिपूर्ण संघ

चांगला खेळ खेळायचा असेल तर एक परिपूर्ण संघ असणे गरजेचे आहे. एका संघात गोलंदाज, फलंदाज उत्तम असावेत असा संघमालक तसेच संघाच्या कर्णधाराचा प्रयत्न असतो. यामुळेदेखील फ्रँचायझी काही खेळाडूंना संघमुक्त करतात तर काही खेळाडूंना संघात कायम ठेवतात. एखादा खेळाडू संघात समतोल राखण्यास उपयुक्त ठरत नसेल तर त्याजागी एखादा परिपूर्ण खेळाडू घेण्यास फ्रँचायझी प्राधान्य देतात. खेळादरम्यान काही खेळाडू जखमी होतात किंवा काही अपरिहार्य कारणामुळे मध्येच स्पर्धेच्या बाहेर पडतात. यामुळेदेखील एक परिपूर्ण संघ असावा म्हणून फ्रँचायझी काही नव्या खेळाडूंचा संघात समावेश करण्याचा प्रयत्न करतात. तर काही खेळाडूंना संघमुक्त करतात.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl auction 2023 know why franchise release or retain players prd