Highest Bid Player in IPL History : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) आगामी हंगामासाठी पार पडलेल्या खेळाडू लिलावात ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क (२४.७५ कोटी) व पॅट कमिन्स (२०.५० कोटी) यांच्यावर विक्रमी बोली लागली. त्यांना अनुक्रमे कोलकाता नाइट रायडर्स व सनरायझर्स हैदराबाद संघांनी आपल्या ताफ्यात घेतले. या विक्रमी बोलीनंतर आजवरच्या ‘आयपीएल’ इतिहासात सर्वाधिक बोली लागलेल्या खेळाडूंची कामगिरी कशी राहिली, संघांनी सर्वाधिक रक्कम खर्ची घातलेल्या या खेळाडूंनी चमक दाखवली का, याचा हा आढावा.

सॅम करन (१८.५० कोटी, पंजाब किंग्ज, २०२३)

इंग्लंडच्या या अष्टपैलू खेळाडूने २०१९मध्ये ‘आयपीएल’मध्ये पदार्पण केले. मात्र, गेल्या वर्षी झालेल्या लिलावात पंजाब संघाने त्याला १८.५० कोटीला आपल्या संघात घेतले. तेव्हा ती ‘आयपीएल’मधील सर्वाधिक रक्कम ठरली. त्यामुळे संघाच्या अपेक्षाही त्याच्याकडून वाढल्या होत्या. पण, करनला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. गेल्या हंगामात खेळलेल्या १४ सामन्यांत त्याने २७६ धावा केल्या आणि केवळ १० गडी बाद केले. त्याला इतर खेळाडूंची साथ मिळाली नाही व त्यामुळे पंजाब संघ गेल्या हंगामात आठव्या स्थानी राहिला. या हंगामात संघाने त्याला कायम राखले असून त्याच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष राहील.

Ritika Sajdeh salutes Aaron Finch for defending husband Rohit Sharma after Sunil Gavaskar comment
Ritika Sajdeh : सुनील गावस्करांच्या वक्तव्यावर रोहितच्या बायकोची जबरदस्त प्रतिक्रिया, सोशल मीडियावर चाहत्यांचे वेधलं लक्ष
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
AUS vs PAK Pakistan beat Australia by 8 wickets in the third ODI match
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात फडकावला झेंडा, वर्ल्ड चॅम्पियन संघाला घरच्या मैदानावर पाजलं पाणी
harris rauf celebrating wicket of glen maxwell
Pak vs Aus: भारताविरूद्धची तयारी पडली कांगारुंना भारी; पाकिस्तानने उडवला १४० धावात खुर्दा
India wicketkeeper batsman Sanju Samson expressed his feelings about the comeback sport news
अपयशानंतर स्वत:च्याच क्षमतेवर प्रश्न! कर्णधार, प्रशिक्षकांच्या पाठिंब्यामुळे बळ; विक्रमवीर सॅमसनची भावना
shams mulani
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा: मुंबईकडून ओडिशाचा डावाने धुव्वा
Maharashtra coach Sulakshan Kulkarni regretted the loss of victory sports news
निराशाजनक पराभवामुळे आव्हान खडतर! विजय निसटल्याची महाराष्ट्राचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांना खंत
Sanju Samson Revelas Suryakumar Yadav and Gautam Gambhir Support him
Sanju Samson : ‘कारकीर्दीत बरेच चढ-उतार आले, पण…’, शतकी खेळीनंतर संजू सॅमसनने ‘या’ दोन माणसांचे मानले आभार

हेही वाचा : विश्लेषण : पेंचमधील प्रस्तावित हत्ती कॅम्प वादग्रस्त ठरणार का?

कॅमेरून ग्रीन (१७.५० कोटी, मुंबई इंडियन्स, २०२३)

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू कॅमेरून ग्रीनने गेल्या हंगामात ‘आयपीएल’मध्ये पदार्पण केले. त्याच्यावर मुंबई इंडियन्सने मोठी बोली लावत संघात घेतले. त्याने आपल्या पहिल्याच हंगामात छाप पाडली. सर्व १६ सामने खेळताना ४५२ धावा करीत संघाच्या यशात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. यादरम्यान त्याने शतकही झळकावले व गोलंदाजीत सहा गडी बाद केले. गेल्या हंगामात मुंबईचा संघ चौथ्या स्थानी राहिला. परंतु हंगामानंतर हार्दिक पंड्याला पुन्हा संघात घेता यावे यासाठी मुंबईने ग्रीनला रॉयल चॅलेंजर्सकडे पाठवले.

बेन स्टोक्स (१६.२५ कोटी, चेन्नई सुपर किंग्ज, २०२३)

इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स हा जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक मानला जातो. २०१७ मध्ये त्याने ‘आयपीएल’मध्ये पदार्पण केले. गेल्या हंगामापूर्वी झालेल्या लिलावात चेन्नईने त्याला आपल्या संघात घेतले. १६.२५ कोटी खर्ची केल्यानंतर संघाला त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या. पण, दोन सामने खेळल्यानंतर त्याला दुखापत झाली व त्याने मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. नंतर त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. स्टोक्स नसतानाही गेल्या हंगामात चेन्नईने ‘आयपीएल’ जेतेपद मिळवले. यावेळी संघाने त्याला कायम राखले नाही. त्यामुळे तो लिलावात असणे अपेक्षित होते. मात्र, कार्यभार व्यवस्थापन व तंदुरुस्तीमुळे त्याने लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा : विश्लेषण : गाणी म्हणा, नाचा, आनंद व्यक्त करा…इराणमधील नवे आंदोलन का ठरतेय तेथील सरकारसाठी डोकेदुखी?

ख्रिस मॉरिस (१६.२५ कोटी, राजस्थान रॉयल्स, २०२१)

दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू ख्रिस मॉरिस हा २०२१च्या लिलावात सर्वाधिक रक्कम मिळवणारा खेळाडू होता. राजस्थानकडून खेळताना त्या हंगामात फलंदाजीतून चमक दाखवता आली नसली, तरीही त्याने गोलंदाजीत १५ बळी मिळवले. मात्र, संघाला त्याचा फारसा फायदा झाला नाही व संघ गुणतालिकेत आठ संघांमध्ये सातव्या स्थानी राहिला. यानंतर जानेवारी २०२२मध्ये मॉरिसने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला.

निकोलस पूरन (१६ कोटी, लखनऊ सुपर जायंट्स, २०२३)

वेस्ट इंडिजचा यष्टीरक्षक-फलंदाज निकोलस पूरन हा त्याच्या आक्रमक फटक्यांसाठी ओळखला जातो. २०१९मध्ये ‘आयपीएल’ पदार्पण करणाऱ्या पूरनचा हंगाम लखनऊ सुपर जायंट्स संघासोबत संस्मरणीय राहिला. लखनऊने त्याच्यासाठी १६ कोटी रुपये खर्ची घातले. त्याने या हंगामातील १५ सामन्यांत ३५८ धावा केल्या व त्यात दोन अर्धशतके झळकावली. गेल्या हंगामात लखनऊचा संघ तिसऱ्या स्थानी राहिला होता आणि त्यामध्ये पूरनचे योगदान महत्त्वाचे होते. या हंगामातही लखनऊ संघाने त्याला कायम राखले आहे.

हेही वाचा : विश्लेषण: हूथी बंडखोरांमुळे महागाईचा भडका?

युवराज सिंग (१६ कोटी, दिल्ली डेअरडेविल्स, २०१५)

आक्रमक फलंदाज आणि उपयुक्त फिरकी गोलंदाज म्हणून युवराज सिंगकडे पाहिले जायचे. ‘आयपीएल’च्या पहिल्या हंगामापासून खेळताना युवराजने अनेक स्पर्धा गाजवल्या. २०१५मध्ये तेव्हाच्या दिल्ली डेअरडेविल्स संघाने त्याला संघात घेण्यासाठी १६ कोटी रुपये खर्च केले. मात्र, त्याने निराशा केली. या हंगामात युवराजने १४ सामन्यांत २४८ धावा केल्या. त्यात दोन अर्धशतकांचा समावेश होता. गोलंदाजीतही त्याला एकच गडी बाद करता आला. त्यामुळे हा हंगाम युवराजसाठी साधारणच राहिला. २०१९मध्ये युवराजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

पॅट कमिन्स (१५.५० कोटी, कोलकाता नाइट रायडर्स, २०२०)

आगामी हंगामासाठी दुसरी सर्वाधिक बोली लागलेल्या पॅट कमिन्सवर २०२०मध्ये कोलकाता नाइट रायडर्सने १५.५० कोटींची सर्वाधिक बोली लावली होती. त्या हंगामातील तो सर्वांत महागडा खेळाडू होता. या हंगामात त्याने कोलकाताकडून १४ सामन्यांत १२ बळी मिळवले. ही कमिन्सची ‘आयपीएल’ची दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली. कमिन्सने गेल्या हंगामात सहभाग नोंदवला नव्हता. यावेळी त्याला सनरायझर्स हैदराबादने आपल्या ताफ्यात घेतले. त्यामुळे त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत.

हेही वाचा : करोनाचा नवा जेएन-१ उपप्रकार काय आहे? जाणून घ्या सविस्तर

इशान किशन (१५.२५ कोटी, मुंबई इंडियन्स, २०२२)

यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशनला पुन्हा मिळवण्यासाठी मुंबई इंडियन्सने २०२२च्या हांगमापूर्वी झालेल्या खेळाडू लिलावात त्याच्यावर तब्बल १५.२५ कोटींची बोली लावली होती. त्याने २०२२ हंगामातील १४ सामन्यांत ४१८ धावा केल्या. यामध्ये त्याने तीन अर्धशतके झळकावली. गेल्या हंगामातही त्याने १६ सामन्यांत ४५४ धावा केल्या. तीन अर्धशतके करणाऱ्या किशनची ७५ धावांची खेळी सर्वोत्तम होती. आगामी हंगामासाठीही मुंबई इंडियन्स संघाने त्याला कायम राखले असून त्याच्याकडून या हंगामातही सातत्यपूर्ण कामगिरीची संघाला अपेक्षा असेल.