इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध पेटले असल्याचे पाहायला मिळत आहे. मंगळवारी (१ ऑक्टोबर) रात्री इराणने इस्रायलच्या दिशेने शेकडो क्षेपणास्त्रे डागली. बेंजामिन नेतान्याहूच्या नेतृत्वाखालील इस्रायलने हिजबुल नेतृत्वावर केलेले हल्ले, लेबनॉनमध्ये केलेले हवाई हल्ले आणि येमेनमधील इराणसमर्थित हुथी सैन्याला लक्ष्य केल्यानंतर इराणने इस्रायलवर प्रत्युत्तरादाखल हा हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. इस्रायलने म्हटले आहे की, इराणचे काही क्षेपणास्त्रे मध्य व दक्षिण इस्रायलमध्ये पडली; मात्र इतर सर्व क्षेपणास्त्रे रोखण्यात इस्रायलला यश आले.

इस्रायलच्या राष्ट्रीय बचाव सेवेनुसार, या हल्ल्यात दोन लोक जखमी झाल्याची माहिती आहे. हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू म्हणाले की, इराणने आज खूप मोठी चूक केली आहे आणि त्यांना याचा परिणाम भोगावा लागेल. त्यामुळे आता इस्रायल इराणवर परतून हल्ला करील हे नक्की. या संघर्षामुळे पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला आहे की, सर्वाधिक सैन्यबल आणि ताकद कोणत्या देशाकडे आहे? त्याविषयी आज जाणून घेऊ.

israeli air force launches attacks on houthi
लेबनॉनमधील हेजबोलानंतर इस्रायलचा हुथी बंडखोरांवर हवाई हल्ला; येमेनमधील होदेदाह बंदराला केलं लक्ष्य!
2nd October Rashi Bhavishya & Panchang
२ ऑक्टोबर पंचांग: सर्वपित्री अमावस्या कोणासाठी ठरणार शुभ?…
Israel war attack against Hezbollah continues
इस्रायलचा युद्धविरामास नकार,अमेरिकेसह मित्रदेशांचा प्रस्ताव धुडकावला; हेजबोलाविरोधात संघर्ष सुरूच
Israel-Lebanon conflict,
लेबनॉनशी युद्धविरामाची अमेरिकेची सूचना इस्रायलनं फेटाळली; सर्वशक्तिनिशी हेजबोलाशी लढण्याचे लष्कराला आदेश!
Israel army chief has signaled preparations for a military incursion into Lebanon
लेबनॉनमध्ये सैन्य घुसवण्याची तयारी,इस्रायल लष्करप्रमुखांचे संकेत; हेजबोलाचा क्षेपणास्त्राने हल्ला
Hezbollahs influence hasan nasarullah
“लेबनॉनवर हल्ले म्हणजे युद्धाची घोषणा”; हिजबुलच्या प्रमुख नेत्याचं वक्तव्य, कोण आहेत हसन नसराल्लाह?
hezbullah israel attack
लेबनॉनमधील पेजर स्फोटांमुळे इस्रायल आणि हिजबूल यांच्यातील संघर्ष पेटणार का?
America Britain weapons supply ukraine
विश्लेषण: अमेरिका, ब्रिटनकडून युक्रेनला शस्त्रास्त्रांची संजीवनी… रशियाविरुद्धचे युद्ध निर्णायक टप्प्यावर?
इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध पेटले असल्याचे पाहायला मिळत आहे. (छायाचित्र-एपी)

हेही वाचा : माउंट एव्हरेस्टची उंची का वाढतेय? हे हिमालयातील नवीन संकटाचे संकेत आहेत का?

इराण विरुद्ध इस्रायलची ताकद

इराण आणि इस्रायलच्या सैन्याची तुलना केल्यास इराण मनुष्यबळाच्या बाबतीत इस्रायलच्या पुढे आहे. इराणची लोकसंख्या इस्रायलच्या तुलनेत १० पट जास्त आहे, त्यामुळे सैन्याची संख्याही जास्त आहे. ‘ग्लोबल फायरपॉवरच्या २०२४’ निर्देशांकानुसार, इराणची लोकसंख्या ८,७५,९०,८७३ आहे; तर इस्रायलची लोकसंख्या ९०,४३,३८७ आहे. याचा अर्थ असा की, इराणमध्ये सैन्य निवडण्यासाठी लोक आहेत. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तात असे म्हटले आहे की, इराणी सशस्त्र दल हे पश्चिम आशिया प्रदेशातील सर्वांत मोठे सैन्यदल आहेत. त्यात किमान ५,८०,००० सक्रिय सैनिक, सुमारे २,००,००० प्रशिक्षित सैनिक आहेत. इस्रायलकडे सैन्य, नौदल आणि निमलष्करी दलात एकूण १,६९,५०० सक्रिय लष्करी कर्मचारी आहेत. आणखी ४,६५,००० सैनिक राखीव दलात आहेत, तर आठ हजार सैनिक निमलष्करी दलाचा भाग आहेत.

असे असले तरी जेव्हा संरक्षण खर्चाचा विचार केला जातो तेव्हा इस्रायल इराणला मागे टाकते. ग्लोबल फायरपॉवर इंडेक्समध्ये असे दिसून आले आहे की, इस्रायलचे संरक्षण बजेट २४ अब्ज डॉलर्स आहे; तर इराणचे ९.९५ अब्ज डॉलर्स आहे. वॉशिंग्टनमधील ‘फाउंडेशन फॉर डिफेन्स ऑफ डेमोक्रॅसीज’ (एफडीडी) नुसार, इराणची लष्करी आस्थापना, विशेषत: इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्स (आयआरजीसी) त्याच्या निधीसाठी राज्याच्या बजेटवर अवलंबून नाही. “तेहरान स्टॉक एक्स्चेंजमधील कंपन्यांचे बाजार मूल्य लष्करी यंत्रणांना नियंत्रित करते आणि इतर हजारो कंपन्यांचे मालक या सर्व सशस्त्र दलांसाठी महसूल निर्माण करतात. त्याव्यतिरिक्त आयआरजीसी इराणच्या भूमिगत अर्थव्यवस्थेचा महत्त्वपूर्ण भाग नियंत्रित करते.”

इस्रायलकडे इराणपेक्षा जास्त हवाई ताकद आहे. ग्लोबल फायरपॉवर इंडेक्समध्ये असे दिसून आले आहे की, इस्रायलकडे एकूण ६२१ विमाने आहेत; तर इराणकडे ५५१ विमाने आहेत. एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इस्रायलच्या हवाई दलात F-15s, F-16s व F-35s सारखी अत्याधुनिक लढाऊ विमाने आहेत. पण, इराणच्या बाबतीत तसे नाही. इस्रायलकडे त्यांची प्रसिद्ध बहुस्तरीय हवाई संरक्षण प्रणालीदेखील आहे; ज्यामध्ये आयर्न डोम, डेव्हिडचा स्लिंग, अॅरो, तसेच द पॅट्रियट यांचा समावेश आहे.

इस्रायलकडे इराणपेक्षा जास्त हवाई ताकद आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

इराणचे क्षेपणास्त्र शस्त्रागार अतुलनीय आहे. ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीज’ने दिलेल्या अहवालानुसार, इराणकडे पश्चिम आशियातील बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचे सर्वांत मोठे शस्त्रागार आहे; ज्यात क्रूझ क्षेपणास्त्रे, जहाजविरोधी क्षेपणास्त्रे, तसेच दोन हजार किलोमीटरपर्यंत जाणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. त्यांच्याकडे इस्रायलसह कोणत्याही लक्ष्यावर मारा करण्याची क्षमता आणि श्रेणी आहे. खरे तर, इराणने आपल्या शस्त्रागाराबाबत कोणतीही गोपनीयता ठेवलेली नाही. त्यांनी लष्करी कवायतीदरम्यान ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा खजिना प्रदर्शित केला आहे. इराणचे ड्रोन रशिया – युक्रेन युद्धामध्ये वापरले गेले आहेत आणि सुदानमधील संघर्षातही हे ड्रोन दिसून आले आहेत.

जमिनीवरील शक्तीचा विचार केला, तर इस्रायलकडे १,३७० रणगाडे आहेत; तर इराणकडे १,९९६ आहेत. त्याशिवाय इस्रायलच्या शस्त्रागारात मर्कावा रणगाड्यांसारखे अधिक प्रगत रणगाडे आहेत; ज्यांना जगातील सर्वोत्कृष्ट डिझाईन केलेली आणि जड शस्त्रसामग्री मानले जाते. इराण किंवा इस्रायल या दोघांमध्येही नौदलाची उपस्थिती नाही. परंतु, इराण लहान बोटींवर हल्ले करण्याच्या क्षमतेसाठी ओळखला जातो. ‘ग्लोबल फायरपॉवर’च्या मते, इस्रायलकडे पाच पाणबुड्या आहेत; तर इराणकडे १९ पाणबुड्या आहेत. अणुऊर्जेच्या बाबतीत इस्रायल पुढे आहे. ‘स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट’च्या मागील अहवालानुसार इस्रायलकडे अंदाजे ८० अण्वस्त्रे आहेत. त्यापैकी अंदाजे ३० ग्रॅव्हिटी बॉम्ब आहेत.

इराणकडे मजबूत लष्करी यंत्रणा

इराणची लष्करीदृष्ट्या सर्वांत मोठी ताकद म्हणजे त्यांची लष्करी यंत्रणा. खरे तर, ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या वृत्तात असे म्हटले आहे की, इराणचे प्रमुख शत्रू असलेल्या अमेरिका आणि इस्रायल यांनी अनेक दशकांपासून इराणवर थेट लष्करी हल्ले टाळले आहेत. नेव्हल पोस्ट ग्रॅज्युएट स्कूलमधील राष्ट्रीय सुरक्षा प्रकरणांचे सहयोगी प्राध्यापक व इराणच्या सैन्यातील तज्ज्ञ अफशोन ओस्टोवर अमेरिकन न्यूज आउटलेटला सांगतात, “इराणवर थेट हल्ले न करण्याचे एक कारण आहे. असे नाही की, इराणचे शत्रू इराणला घाबरतात. इराणविरुद्ध कोणतेही युद्ध हे अत्यंत गंभीर युद्ध आहे याची त्यांना जाणीव आहे.”

हेही वाचा : सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक आदेशानं दलित विद्यार्थ्यासाठी ‘IIT’चे दार खुले; नेमकं प्रकरण काय? कोण आहे अतुल कुमार?

इराण संपूर्ण पश्चिम आशियातील प्रॉक्सी मिलिशियाच्या नेटवर्कला शस्त्रे पुरवतो, प्रशिक्षित करतो आणि समर्थन देतो. त्यामध्ये मिलिशियामध्ये लेबनॉनमधील हिजबुल, येमेनमधील हुथी, सीरिया व इराकमधील मिलिशिया गट आणि गाझामधील हमास व पॅलेस्टिनी इस्लामिक जिहाद यांचा समावेश आहे. त्यांना इराणच्या सशस्त्र दलाचा भाग म्हणून गणले जात नसले तरी ते युद्धासाठी सज्ज आहेत, शस्त्रसज्ज आहेत आणि इराणशी अत्यंत निष्ठावान आहेत. इराणवर हल्ला झाल्यास ते इराणच्या मदतीलाही येऊ शकतील. ‘बुकिंग फॉरेन पॉलिसी’चे उपाध्यक्ष व संचालक सुझान मॅलोनी म्हणाल्या, “इराणी शस्त्रागारातील सर्वांत मौल्यवान साधनांपैकी एक म्हणजे मिलिशियाचे जाळे; जे त्यांच्या नेतृत्वाने विकसित केले आहे. त्यांना प्रशिक्षित करून, प्रगत शस्त्रेही पुरवण्यात आली आहेत. त्यांचे नेटवर्क लेबनॉनपासून ते पाकिस्तानपर्यंत पसरलेले आहे. पुढे नक्की काय घडेल, हे सध्या अस्पष्ट आहे. परंतु, युद्धाची परिस्थिती निर्माण झाल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे.