राज्यसभेत संविधानावर चर्चा सुरू असताना गृहमंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर एक वक्तव्य केले. त्या व्यक्तव्यानंतर ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याचा विरोधकांचा दावा आणि भाजपाने त्यांचा बचाव करण्याचा केलेला प्रयत्न यांमुळे बुधवारी (१८ डिसेंबर) संसदेत गदारोळ झाला. अमित शाह यांनी एक दिवसापूर्वी राज्यसभेत, “आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर… म्हणण्याची फॅशन झाली आहे. त्यांनी इतक्या वेळा देवाचे नाव घेतले असते, तर त्यांना स्वर्गात स्थान मिळाले असते,” असे वक्तव्य केले होते. शाह म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकरांनी नेहरूंच्या मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. कारण- ते असंतुष्ट होते. त्यानंतर राजकारण चांगलंच तापलं.

त्यावर उत्तर देताना काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्वीट केले, “यावरून हे दिसून येते की, भाजपा आणि स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांना बाबासाहेब आंबेडकरांबद्दल प्रचंड द्वेष आहे. द्वेष इतका आहे की, ते त्यांच्या नावानेही चिडतात. हे तेच लोक आहेत, ज्यांच्या पूर्वसुरींनी बाबासाहेबांचा पुतळा जाळला, ज्यांनी बाबासाहेबांनी दिलेली राज्यघटना बदलण्याची भाषा केली.” खरंच भाजपाच्या पूर्वसुरींनी बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जाळला का? संघ कार्यकर्ते आंबेडकर आणि संविधानाबद्दल काय म्हणाले? त्याविषयी जाणून घेऊ.

Sharad Pawar Reaction on saif ali khan
Sharad Pawar : सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया; गृहमंत्र्यांकडे बोट दाखवत म्हणाले…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : संजय राऊत यांची टीका, “सैफ अली खानवर हल्ला होणं ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी…”
Pankaja Munde
Pankaja Munde : बीड जिल्ह्यातील तणावाच्या परिस्थितीवर पंकजा मुंडेंचं मोठं विधान; म्हणाल्या, “मी गृहमंत्र्यांशी…”
Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : “राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य मुन्नीला बोलायला लावा?”, सुरेश धस यांचं विधान, रोख कुणाकडे? परळी पॅटर्नचा उल्लेख करत म्हणाले…
Sanjay Raut Answer to Eknath Shinde
Sanjay Raut : “बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी कुणी गद्दारी केली हे…”, संजय राऊत यांचं एकनाथ शिंदेंना उत्तर
Anil Deshmukh criticized BJP and amit shah
बोलघेवडेपणा करू नका!अमित शहा यांच्या नेत्यांना कानपिचक्या
Shiv Sena UBT to contest local elections independently
महापालिका निवडणुकांआधी मविआत फूट? ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत स्वबळावर लढणे कितपत शक्य?

हेही वाचा : भारत-चीन संघर्ष मिटणार? कैलास मानसरोवर यात्रा अन् सीमा व्यापार पुन्हा सुरू; ‘या’ सहा मुद्द्यांवर झाले एकमत

बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जाळण्यात आला होता?

१२ डिसेंबर १९४९ रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यकर्त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जाळला होता. आंबेडकरांबरोबरच जवाहरलाल नेहरू यांचा पुतळाही जाळण्यात आला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हिंदू कोड बिलाला कडवा विरोध होता. या बिलाचा उद्देश, विवाह आणि महिलांचे उत्तराधिकार यांसारख्या बाबींमध्ये सुधारणा करणे, स्त्रियांना अधिक अधिकार देणे, असा होता. त्याचाच विरोध म्हणून पुतळे जाळण्यात आले होते. इतिहासकार रामचंद्र गुहा त्यांच्या ‘इंडिया आफ्टर गांधी’ या पुस्तकात लिहितात, “११ डिसेंबर १९४९ रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिल्लीतील रामलीला मैदानावर एक सार्वजनिक सभा आयोजित केली होती, जिथे हिंदू कोड विधेयकाचा निषेध करण्यात आला. सभेतील वक्ते याला ‘हिंदू समाजावर हल्ला’ असे म्हणत होते.

एका वक्त्याने या बिलाची तुलना वसाहतवादी राज्याने आणलेल्या कठोर रौलेट कायद्याशी केली. ते म्हणाले, या विधेयकाविरुद्धचा संघर्ष नेहरूंच्या सरकारच्या पतनाचे संकेत देईल. दुसऱ्या दिवशी संघाच्या कार्यकर्त्यांच्या एका गटाने विधानसभेच्या इमारतीवर मोर्चा काढला. ‘डाऊन विथ हिंदू कोड बिल’ अशा घोषणा दिल्या. आंदोलकांनी पंतप्रधान नेहरू आणि डॉ. आंबेडकर यांचे पुतळे जाळले आणि नंतर शेख अब्दुल्ला यांच्या गाडीचीही तोडफोड केली.

स्वयंसेवक संघ, गोळवलकर, सावरकर संविधानाबद्दल काय म्हणाले?

बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. राजीनामा देण्याच्या कारणांपैकी एक म्हणजे हिंदू कोड बिल ज्या स्वरूपात आंबेडकरांना हवे होते, त्या स्वरूपात लवकरात लवकर मंजूर न झाल्याने नेहरूंबद्दलची त्यांची ही त्यांची निराशा होती. तरीही काँग्रेसमधील गटांसह उजव्या पक्षांनी या विधेयकाला विरोध केला होता. रामचंद्र गुहा यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’च्या एका ओपिनियन पीसमध्ये त्यांनी संघाचे मुखपत्र असणाऱ्या ‘ऑर्गनायझर’ने या विधेयकाला कसा विरोध केला, हे स्पष्ट केले. “२ नोव्हेंबर १९४९ रोजीच्या ‘ऑर्गनायझर’मधील एका लेखात, हिंदू कोड बिल हे ‘हिंदूंच्या श्रद्धेवर थेट आक्रमण’, असे नमूद करण्यात आले आहे.

स्त्रियांना घटस्फोट घेण्यास सक्षम करणाऱ्या त्यातील तरतुदी हिंदू विचारसरणीशी जुळणाऱ्या नाहीत, अशी टीका करण्यात आली आहे. एक महिन्यानंतर प्रकाशित झालेल्या संपादकीयमध्ये (द हिंदू कोड बिल, ऑर्गनायझर, ७ डिसेंबर, १९४९) असे लिहिण्यात आले आहे की, आम्ही हिंदू कोड बिलाला विरोध करतो. आम्ही त्याचा विरोध करतो कारण- हा उपरा आणि अनैतिक तत्त्वांवर आधारित एक अवमानास्पद उपाय आहे. त्यानंतर पुढे असे म्हटले आहे की, ऋषी आंबेडकर आणि महर्षी नेहरू समाजाचा नाश करतील आणि प्रत्येक कुटुंबात संशय आणि दुर्गुण पसरवतील,” असे रामचंद्र गुहा यांनी लेखातून स्पष्ट केले होते.

माजी सरसंघचालक एम. एस. गोळवलकर यांनी त्यांच्या ‘बंच ऑफ थॉट्स’मध्ये लिहिले आहे की, आपली राज्यघटनादेखील पाश्चात्त्य देशांच्या विविध राज्यघटनांतील विविध कलमांचा एकत्रित केलेला एक अवजड आणि विषम भाग आहे. त्यात पूर्णपणे काहीही नाही; ज्याला आपले म्हणता येईल. आपले राष्ट्रीय ध्येय काय आहे आणि आपल्या जीवनातील मुख्य गोष्टी काय आहेत, याच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये संदर्भाचा एक तरी शब्द आहे का? तर तसे नाही. अमेरिकेच्या सनदांतील काही तत्त्वे किंवा आता नष्ट झालेल्या ‘लीग ऑफ नेशन्स’च्या चार्टरमधील काही तत्त्वे आणि अमेरिकन व ब्रिटिश राज्यघटनेतील काही वैशिष्ट्ये एकाच ठिकाणी एकत्र आणली गेली आहेत.

हेही वाचा : आता कॅन्सरवरील उपचार शक्य? रशियाचा दावा काय? नवीन लस कसे कार्य करते?

सावरकरांनीही असेच मत मांडले होते. ‘वूमन इन मनुस्मृती’त त्यांनी लिहिले, “भारताच्या नवीन राज्यघटनेबद्दल सर्वांत वाईट गोष्ट म्हणजे त्यात भारतीय काहीही नाही. मनुस्मृती हा असा धर्मग्रंथ आहे, जो आपल्या हिंदू राष्ट्रासाठी वेदांनंतर सर्वांत जास्त पूज्य आहे आणि जो प्राचीन काळापासून आहे. त्यात आपल्या संस्कृतीचा आधार असणाऱ्या चालीरीती, विचार व व्यवहार आहेत. आजही करोडो हिंदू त्यांच्या जीवनात आणि आचरणात जे नियम पाळतात, ते मनुस्मृतीवर आधारित आहेत.

Story img Loader