अमेरिकेतल्या टेक्सासच्या प्रीमियम आऊटलेट मॉलवर हल्लेखोराने गोळीबार केला. टेक्सास येथील शॉपिंग मॉलमध्ये ही घटना घडली आहे. या गोळीबारात आठ जण ठार झाले आहेत, तर सात जण जखमी झाले आहेत. दिवसेंदिवस अमेरिकेमध्ये हल्ल्यांचे प्रमाण वाढत आहे. काही हल्ले बाह्यशक्तींकडून, तर काही हल्ले अंतर्गत संस्थांकडून होत आहेत. अमेरिकेमध्ये वाढणाऱ्या हल्ल्यांचे प्रमाणाची कारणमीमांसा करणे उचित ठरेल…

अमेरिकेमध्ये गोळीबार करणे सामान्य आहे का ?

shivshardul percussion indian band in usa
अमेरिकेतील शिवशार्दूल पर्कशन्सच्या ढोल-ताशा गर्जनेची दशकपूर्ती
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
thackeray group criticized pm narendra modi
“पंतप्रधान मोदींना मणिपूरपेक्षा रशिया-युक्रेन युद्धाची काळजी” ठाकरे गटाचं मोदी सरकारवर टीकास्र; म्हणाले…
Super Typhoon Yagi Videos
Super Typhoon Yagi: खिडक्या आणि गाड्या उडाल्या, झाडं-घरं कोलमडली; चक्रीवादळाच्या तडाख्यात व्हिएतनाममध्ये हाहाकार
car market india
हवामान बदलामुळे गाड्यांची विक्री मंदावली?
How India response to Vladimir Putin in the Ukraine war
युक्रेन युद्धात पुतिन यांना हवी भारताची मध्यस्थी? भारताकडून प्रतिसादाची शक्यता किती?
tanishq and de beers collaboration to boost India s natural diamond jewellery market
डी बीयर्सशी भागीदारीतून हिऱ्यांच्या ग्राहकांमध्ये दुपटीने वाढीचे तनिष्कचे लक्ष्य
Maruti Jimny Car Sales Maruti Jimny Got Record Growth Of 5700 Percent In Exports Check Details
Maruti Jimny Car Sales: या कारने विक्रीच्या बाबतीत मोडला रिकॉर्ड; जाणून घ्या किती झाली विक्री

अमेरिकेमध्येबंदुकीची मिळणारी मालकी ही जगातील सर्वात जलद आणि सर्वात अधिक प्रमाणात मिळणारी आहे. अमेरिकेमध्ये बंदुकीचा वापर हा स्व-संरक्षण, शिकार आणि मनोरंजनासाठी सर्वात अधिक होतो. २०१९ मध्ये एल. पासो येथील वॉलमार्टमध्ये एका बंदूकधाऱ्याने केलेल्या हल्ल्यात २३ लोकांचा बळी घेतला होता, तसेच मे २०२२ मध्ये टेक्सासमध्ये एका १८ वर्षीय मुलाने ‘एके ४७’ने अंदाधुंद गोळीबार केला होता. त्यात जवळजवळ १९ लोकांचा मृत्यू झाला होता. याच्या एक आठवडा आधीच न्यूयॉर्क शहरामधील सुपरमार्केटमध्ये कृष्णवर्णीय लोकांवर गोळीबार करण्यात आला. त्यात १० कृष्णवर्णीय लोकांचा मृत्यू झाला. त्याच दरम्यान कॅलिफोर्निया येथील एका व्यक्तीने तैवानच्या लोकांवर हल्ला केला. त्यात एक ठार आणि पाच जखमी झाले. हॅरिसमधील फ्ली मार्केटमध्ये एका व्यक्तीने दोन लोकांना काही कारणांवरून गोळ्या मारून ठार मारले. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) च्या मे २०२२च्या अहवालानुसार, अमेरिकेमध्ये गोळीबारामुळे होणारा हिंसाचार ही सामान्य गोष्ट आहे. अमेरिकेमध्ये १९९४ पासून बंदुकीद्वारे होणाऱ्या हत्यांचा सर्वाधिक दर २०२१ मध्ये दिसून आला. २०२१ पर्यंत गोळीबाराच्या हल्ल्यांमध्ये २०,९१५ लोकांचे मृत्यू झाले. २०२१ ते १७ मे २०२२ पर्यंत २०३ सामूहिक गोळीबार झाले, तर ७,१६१ लोकांचा मृत्यू वैयक्तिक गोळीबारांच्या हल्ल्यांमध्ये झाला आहे.
वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन (IHME) च्या डेटाचा वापर करून आलेल्या अहवालानुसार २०२१ पर्यंत, युनायटेड स्टेट्समध्ये बंदुकीच्या हिंसाचारामुळे मृत्यूचे प्रमाण जगातील ३२वे होते. प्रति एक लाख लोकांमागे ३.९६ बंदूक-संबंधित मृत्यू झाले. युनायटेड किंगडमच्या तुलनेत १०० पट अधिक बंदूक आधारित मृत्यू आहेत.

हेही वाचा : आत्महत्यांचा इतिहास आणि आजचे गंभीर स्वरूप

अमेरिकेमधील बंदूक वापर अधिनियमन कायदा काय सांगतो ?
अमेरिकेमध्ये बंदूक वापरण्यास मुभा देण्यात आली आहे, हे सर्वपरिचित आहे. परंतु, वाढणाऱ्या गोळीबारांच्या हल्ल्यांमुळे बंदूक वापर अधिनियमन कायद्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. काही राज्ये आणि परिसरांमध्ये बंदूक खरेदी करण्यासाठी किंवा ताब्यात घेण्यासाठी एखाद्या व्यक्तीने परवानगी घेणे आवश्यक करण्यात आले आहे, तसेच वैयक्तिक बंदुकांची पोलिसांकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. परंतु, बहुतांश राज्यांमध्ये बंदूक उघडपणे सार्वजनिक ठिकाणी आपण बाळगू शकतो. अपवाद म्हणजे जी शस्त्रे स्वयंचलित आहेत, उदा. मशीनगन, तसेच ज्या शस्त्रांना प्राणघातक शस्त्रे म्हणून घोषित करण्यात आले आहे, त्यांच्या वापरावर काही अंशी निर्बंध घालण्यात आले आहेत. ‘एनएफए’ प्रमाणित शस्त्रे १९३४ च्या राष्ट्रीय बंदूक कायदा आणि १९८६ च्या फायरआर्म ओनर्स प्रोटेक्शन अॅक्टद्वारे प्रतिबंधित करण्यात आली आहेत. स्वसंरक्षणासाठी बंदूक वापरणे हा गुन्हा नाही. प्रवास करतानाही त्याचा वापर करता येऊ शकतो. गन कंट्रोल अॅक्ट १९६८ (GCA) नुसार येथे रायफल किंवा कोणतीही छोटी शस्त्रे खरेदी करण्यासाठी किमान १८ वर्षांचे असणे अनिवार्य आहे, तर हँडगनसारख्या इतर बंदुका खरेदी करण्यासाठी २१ वर्षांचे असणे आवश्यक आहे. कोणतेही राज्य हवे असल्यास ही वयोमर्यादा वाढवू शकते, पण ती कमी करू शकत नाही. फरारी असणारे गुन्हेगार, एक वर्षापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यासाठी दोषी ठरलेले, मानसिक रोगग्रस्त लोकांना बंदूक खरेदी करण्यास मनाई आहे. परंतु, अमेरिकेमध्ये विविध राज्य न्यायालयांनी स्वतः बंदूक वापरण्याच्या नियमांबद्दल वेगवेगळ्या तरतुदी केलेल्या आहेत.

शस्त्र खरेदीदारांप्रमाणेच अमेरिकेत शस्त्र विक्रेत्यांसाठीही वयोमर्यादा आहे. फेडरल फायरआर्म्स लायसन्स (FFL) नुसार, शस्त्र विक्रेता २१ वर्षांपेक्षा जास्त वयाचा असावा. व्यवसाय चालवण्यासाठी त्याच्याकडे स्वतंत्र जागा असावी, जी स्थानिक कायद्याची अंमलबजावणी करणार्‍यांना, जसे की पोलिसांना माहिती असावी. विक्रेत्याने मानसिक स्थिती संतुलित असल्याचे प्रमाणपत्र दिले तरच त्याला शस्त्रविक्रीचा परवाना मिळतो. तसेच, विक्रेते कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारी कृत्यांमध्ये गुंतलेले असतील किंवा नशेत राहत असल्याची नोंद रेकॉर्डवर असेल, तरीही त्यांना परवाना मिळत नाही.
बंदूक खरेदी करण्यापूर्वी, खरेदीदाराची पार्श्वभूमी तपासली जाते. १९९३च्या ब्रॅडी हँडगन हिंसा प्रतिबंध कायद्यानुसार ही तपासणी करणे आवश्यक आहे. एनआयसीएस ही गुप्तचर संस्था एफबीआयची शाखा या तपासासाठी सक्रिय आहे. यासोबतच राज्य पोलीसही स्वतंत्रपणे तपास करू शकतात.

हेही वाचा : विश्लेषण : कार्ल मार्क्स जयंती २०२३ : आजही मार्क्सवाद सर्वांना पुरून का उरतोय ?

अमेरिकेत किराणा मालाच्या दुकानात बंदूक मिळते ?
अमेरिकेत किराणा मालाच्या दुकानातही बंदूक सहज उपलब्ध होत होती. परंतु, अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या जवळ आलेल्या निवडणुका आणि सुपरमार्केटमध्ये झालेल्या गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर यावर २०२१ मध्ये बंधने घालण्यात आली.
स्मॉल आर्म्स सर्व्हेच्या २०११ च्या अहवालानुसार अमेरिकेतील प्रत्येक १०० लोकांपैकी सरासरी ८८ लोकांकडे बंदूक आहे. त्यानंतरच्या २०१७ च्या अभ्यासात या संस्थेला आढळून आलेली वस्तुस्थिती आणखी धक्कादायक होती. माणशी २ ते ३ बंदुका असे प्रमाण होते. आता अमेरिकेत माणसे कमी आणि बंदुका जास्त अशी स्थिती झाली आहे. देशातील प्रत्येक १०० नागरिकांमागे बंदुकांचे प्रमाण १२०.०५ वर पोहोचले आहे. (जनगणनेनुसार, २०१७ मध्ये देशाची लोकसंख्या ३२६ दशलक्ष होती. देशातल्या लोकांकडे असलेल्या बंदुकांचा आकडा ३९३ दशलक्षांवर पोहोचला होता.) यासह अमेरिका हा नागरिकांकडे सर्वाधिक शस्त्रास्त्रे असलेला जगातला देश बनला आहे. यानंतर येमेनचा क्रमांक लागतो. येमेनमध्ये प्रत्येक १०० माणसांमागे बंदुकांचे प्रमाण ५२.८ एवढे आहे. पहिल्या क्रमांकावर असलेला अमेरिका आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेला येमेन यांच्यात कमालीची तफावत आहे.
तसेच २०१७ मधील Pew Research survey च्या सर्वेक्षणानुसार, अमेरिकेत माणसांपेक्षा शस्त्रांची संख्या जास्त असली तरी, देशातील केवळ ३० टक्के प्रौढांकडेच स्वतःची बंदूक आहे. म्हणजेच, देशातल्या केवळ ३० टक्के लोकांकडे संपूर्ण देशाच्या लोकसंख्येहून अधिक शस्त्रास्त्रे आहेत. काही व्यक्तींकडे १० ते २० बंदुकाही असल्याचे या सर्वेक्षणात समोर आले होते. म्हणजेच, इथल्या प्रत्येक व्यक्तीकडे बंदुका नाहीत.

अमेरिकेमध्ये बंदूक वापरावर बंधन आणावे यासाठी चळवळ चालू आहे. परंतु, याला मोठ्या प्रमाणावर विरोध करण्यात येत आहे. स्वसंरक्षणासाठी बंदूक वापरणे आणि त्याचा उपयोग करणे हा गुन्हा ठरत नाही, असे येथील लोकांचे म्हणणे आहे. अमेरिकेवर बाहेरील देशांकडून कधीकधी हल्ले होतातच, परंतु, देशांतर्गत असणारे वाद, शस्त्रे वापरण्यासाठी असणारी मुभा आणि त्याचा होणारा गैरवापर यावरही अमेरिकेने लक्ष देणे आवश्यक आहे.