A 7-year-old boy was expelled from school for bringing meat in a tiffin: एखाद्याने शाकाहारी पदार्थांच्या यादीमध्ये दूध आणि दुग्धजन्य पदार्थ समाविष्ट केले तरीही भारतात १० पैकी ३ पेक्षाही कमी भारतीय शाकाहारी आहेत.

सात वर्षांच्या एका मुलाला उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील खाजगी शाळेतून त्याच्या जेवणाच्या डब्यात मांसाहारी बिर्याणी आणल्याबद्दल आणि त्याच्या वर्गमित्रांना दिल्याबद्दल काढून टाकण्यात आले. मुलाची संतप्त आई आणि शाळेचे मुख्याध्यापक यांच्यातील संवाद आता व्हायरल झाला आहे, त्यामुळे अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यास सांगितले आहे. ज्या देशात अनेकजण शाकाहारी अन्नाला शुद्ध (आणि मांस घाणेरडे) मानतात आणि जिथे अनेक लोकांच्या धार्मिक श्रद्धा त्यांच्या ताटात काय आहे यावरून ठरतात, त्या देशात अशा प्रकारचा वाद नवीन नाही. या प्रकरणात, शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले की, मुलाने “त्याच्या वर्गमित्रांना बिर्याणी ऑफर करणे” हे आक्षेपार्ह आहे. परंतु, भारतातील लोकसंख्येचे किती प्रमाण शाकाहारी आहे? भारत खरंच शाकाहारी लोकांचे राष्ट्र आहे का? की, हे केवळ एक प्रचलित मिथक आहे? उपलब्ध आकडेवारी यावर काय सांगते, हेही पाहणे गरजेचे आहे.

hindus atacked in canada
हिंदू भाविकांवरील हल्ला कॅनडा प्रशासनाचं कारस्थान? व्हायरल Video मध्ये महिलेचा टाहो; म्हणाली, “हाच तो”!
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Testy bhindi fry khatti mitthi bhindi lady fingars recipe for lunch or diner
भेंडीची खट्टी -मीठी भाजी; ती पण चिकट न होता! पाहा सोपी मराठी रेसिपी
FDA seized suspected edible oil and spices worth around Rs two lakh from Ambad and Panchvati
लाखोंचा खाद्यतेल, मसाला साठा जप्त
Cotton production reduced due to rains Mumbai news
अति पावसामुळे कापूस उत्पादनात घट; सात टक्क्यांनी घट होण्याचा सीएआयचा अंदाज
Lakshmi Pujan recipe motichoor ladoo recipe in marathi
Lakshmi Pujan 2024: लक्ष्मी पूजेला घरीच बनवा मोतीचूर लाडू; ही घ्या सोपी मराठी रेसिपी
Ajit Pawar on Sharad Pawar Mimicry
Sharad Pawar Mimicry : शरद पवारांनी नक्कल केल्यानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मुलाप्रमाणे असलेल्या…”
tiger upset with tourists in tadoba andhari tiger project
Video : ताडोबातील वाघ म्हणतो, ‘बस आता..! मला तुमचा कंटाळा आलाय’

अधिक वाचा: IC814 Hijacking Case: पाकिस्तानला कॉल आणि ठाकरेंच्या ‘मातोश्री’ला लक्ष्य करण्याची योजना: मुंबई पोलिसांनी IC814 अपहरण प्रकरणाचा शोध नेमका घेतला कसा?

भारत हे शाकाहारी राष्ट्र नाही

बहुतेक भारतीय कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अंडी, मांस किंवा मासे खातात. त्यापैकी निम्मे लोक आठवड्यातून किमान एकदा असे करतात. राष्ट्रीय कुटुंब आणि आरोग्य सर्वेक्षण-V (२०१९ २१) च्या आकडेवारीनुसार हे सिद्ध होते,
राष्ट्रीय कुटुंब आणि आरोग्य सर्वेक्षण-V (२०१९ २१) च्या आकडेवारीनुसार, २९.४% महिला आणि १६.६% पुरुषांनी सांगितले की ते कधीही मासे, चिकन किंवा मांस खात नाहीत. ४५.१% महिला आणि ५७.३% पुरुषांनी सांगितले की, ते आठवड्यातून एकदा तरी मासे, चिकन किंवा मांस खातात.

मांसाहारींची संख्या वाढते आहे

किंबहुना, NFHS IV नुसार (२०१५-१६), भारतात मांसाचा वापर वाढत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. २९.९% महिला आणि (विशेषतः) २१.६% पुरुषांनी सांगितले की, ते कधीही मासे, चिकन किंवा मांस खात नाहीत.
४२.८% महिला आणि ४८.९% पुरुषांनी सांगितले की, ते आठवड्यातून एकदा तरी मासे, चिकन किंवा मांस खातात.
NFHS IV आणि NFHS V यातील आकडेवारीची तुलना करता, ही माहिती पाच वर्षांच्या अंतराने गोळा कऱण्यात आली होती. मासे, चिकन किंवा मांस कधीच खात नसल्याचा अहवाल देणाऱ्या महिलांच्या संख्येत १.६७% घट झाली आहे आणि त्यांनी कधीही मासे, चिकन किंवा मांस खात नाही अशा पुरुषांच्या संख्येत तब्बल २३% घट झाली आहे. त्याच वेळी, आठवड्यातून किमान एकदा मासे, चिकन किंवा मांस खाल्याचे सांगणाऱ्या किंवा महिलांच्या संख्येत ५.३७% वाढ झाली आहे आणि मासे, चिकन खाल्याचे सांगणाऱ्या पुरुषांच्या संख्येत किंवा आठवड्यातून किमान एकदा मांस खाल्याचे सांगणाऱ्या पुरुषांच्या संख्येत १७.१८% वाढ झाली आहे.

लॅक्टो-शाकाहार आणि प्रादेशिक भिन्नता

NFHS V मधील आकडेवारीनुसार किंबहुना, जे स्वत:ला शाकाहारी म्हणवतात तेही बहुतांश लॅक्टो-शाकाहारी असतात, म्हणजेच ते गायी आणि म्हशींपासून मिळणारे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ खातात. केवळ ५.८% महिला आणि ३.७% पुरुषांनी नोंदवले की, त्यांनी कधीही दूध पितात किंवा दही सेवन खाल्लेले नाही. ४८.८% पुरुष आणि महिलांनी सांगितले की, ते दररोज दूध पितात किंवा दही खातात. ७२.2% महिला आणि ७९.८% पुरुषांनी सांगितले की, ते आठवड्यातून एकदा तरी दूध पितात किंवा दही खातात.

अधिक वाचा: Pew Research Center Survey: पाच पैकी चार भारतीयांना त्यांच्या राष्ट्रीय नेत्याने धार्मिक परंपरांचे पालन करणे महत्त्वाचे वाटते; प्यू अभ्यासात नेमके काय आढळले?

दूधावर अधिक खर्च

घरगुती वापर खर्च सर्वेक्षण २०२२-२३ मधील आकडेवारीनुसार, दुधाचा वापर थेट शाकाहाराच्या घटकांशी संबंधित आहे असे दिसते – जे भरपूर दूध आणि दुग्धजन्य पदार्थ खातात ते कमी / कोणतेही मांस खात नाहीत. प्रत्यक्षात, दूध हा भारतामध्ये मांसाला पोषक पर्याय आहे. एकूण, १४ राज्ये अशी आहेत जिथे दुधावर दरडोई मासिक खर्च (MPCE) हा मासे, मांस किंवा अंडी यांच्यावरील खर्चापेक्षा जास्त आहे आणि १६ राज्ये आहेत जिथे परिस्थिती अगदी उलट आहे.

अपवाद महाराष्ट्र, सिक्कीम व कर्नाटकचा

NFHS-V च्या डेटानुसार, मोठ्या प्रमाणात, दूध सेवन करणाऱ्या राज्यांमध्ये राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत कमी प्रमाणात मासे, चिकन किंवा मांस खाल्ले जाते. या प्रकरणातील अपवाद म्हणजे सिक्कीम, कर्नाटक आणि महाराष्ट्र जिथे आठवड्यातून किमान एकदा तरी मासे, चिकन किंवा मांस खाल्ल्याचा अहवाल राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त असला तरीही (स्त्रिया आणि पुरुष दोघांसाठी) दूधावरील खर्च मांसापेक्षा जास्त होता