पश्चिम जर्मनीतील सोलिन्गेन शहरात एका व्यक्तीने एका उत्सवादरम्यान अनेकांवर चाकूहल्ला केला. हा हल्ला माथेफिरूने केलेला नसून दहशतवादी कारवाई असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. धक्कादायक म्हणजे, या हल्ल्याची जबाबदारी ‘इस्लामिक स्टेट’ (आयएस) या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेने स्वीकारली असून हल्लेखोर या संघटनेच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे इराक आणि सीरियातून अमेरिकेने हद्दपार केलेली ही संघटना युरोपमध्ये आपला जम बसवतेय का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडे युरोपिय राष्ट्रांनी आपल्या निर्वासितविषयक धोरणाचा फेरविचार करावा, अशी मागणी आता उजवे पक्ष करू लागले आहेत.

सोलिन्गेनमध्ये काय घडले?

सोलिन्गेन हे जर्मनीच्या उत्तर ऱ्हाईन प्रांतातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे आणि ऐतिहासिक शहर आहे. शहराचा ६५०वा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी ‘फेस्टिव्हल ऑफ डायव्हर्सिटी’ या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान एका व्यक्तीने गर्दीत घुसून अनेकांवर चाकूचे वार केले. या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला आणि आठ जण जखमी झाली. जखमींमधील चौघांची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे. विशेष म्हणजे हल्लेखोराने सर्वांच्या मानेवर वार केले होते. हल्लेखोराने घटनास्थळावरून पळ काढल्यानंतर जर्मनीच्या केंद्रीय तपास यंत्रणांनी हा दहशवादी हल्ला असल्याचा संशय व्यक्त करत प्रकरण हाती घेतले. सोलिन्गेनसह आसपासच्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात शोधमोहीम हाती घेण्यात आली. पोलिसांनी एका १५ वर्षांच्या मुलाला संशयावरून ताब्यात घेतल्यानंतर हल्लेखोराने शरणागती पत्करली. आरोपीने गुन्हा मान्य केल्याची माहिती तपास यंत्रणांनी दिली आहे. त्याच्या कबुलीजबाबानंतर हा दहशतवादी हल्लाच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

syria civil war marathi news
सीरियातील अचानक सत्ताबदलाने कुणाला काय मिळणार? रशिया-इराणचे नुकसान कसे? तुर्कीये-इस्रायलचा फायदा कसा?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
challenges in front of Syria
सीरियातील आव्हाने संपणार कशी?
Satish wagh murder case, Pune police,
सतीश वाघ हत्या प्रकरण : आरोपींच्या शोधासाठी पुणे पोलिसांची १६ पथके रवाना
Russia Discovers Ancient Gold Treasure in Crimea — Ukraine Considers It Looting
“ते आमचा वारसा लुटत आहेत,” युक्रेनचा आरोप; रशियाने क्रिमियामध्ये शोधला प्राचीन सोन्याचा खजिना !
Image of Zelensky
Russia Vs Ukraine War : “जोपर्यंत नाटोचे सदस्यत्व…”, झेलेन्स्की यांनी का केली युक्रेनमध्ये परदेशी सैन्य तैनात करण्याची मागणी?
Navri Mile Hitlarla
“आता भूतासारखीच…”, लीला नेमकं काय करणार? पाहा ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय होणार
Bashar al-Assad And Vladimir Putin.
Syrian Civil War : सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचं विमान खरंच क्रॅश झालं का? असद कुटुंबीयांसाठी पुतीन यांचे मोठे पाऊल

हेही वाचा : विश्लेषण: शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केव्हा होणार? शेतकऱ्यांच्या उत्पन्नाची स्थिती काय?

हल्लेखोर कोण आहे?

जर्मन अधिकाऱ्यांनी हल्लेखोराची ओळख इसा अल एच. अशी सांगितली आहे. (जर्मनीतील कायद्यानुसार आरोपीची संपूर्ण ओळख जाहीर करता येत नाही. त्यामुळे त्याचे आडनाव देण्यात आलेले नाही.) अवघ्या २६ वर्षांचा हा तरुण सीरियन निर्वासित आहे. अन्य हजारो नागरिकांप्रमाणे सीरियातून खुष्कीच्या मार्गाने डिसेंबर २०२२मध्ये युरोपात आलेला इसा हा ‘आयएस’शी संबंधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. शनिवारी ‘आयएस’ने सोलिन्गेन हल्ल्याची जबाबदारी स्वीकारून या दाव्याला बळकटी दिली. त्यानंतर लगोलग पोलिसांनी इसा राहात असलेल्या निर्वासित छावणीवर छापा टाकला आणि आणखी एका संशयिताला ताब्यात घेतल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे. ही निर्वासित छावणी घटनास्थळापासून अवघ्या ३०० मीटर अंतरावर आहे. या घटनेमुळे ‘आयएस’ संपली नसून अन्यत्र (विशेषत: युरोपमध्ये) आपले पाय रोवत असल्याचे संकेत मिळाले आहेत.

युरोप ‘आयएस’चा नवा तळ?

एकेकाळी इराकच्या मोसूल आणि सीरियाच्या राक्का या शहरांमधून या दोन देशांच्या बऱ्याचशा भागाचा कारभार हाकणारी कडवी मुस्लिम संघटना ‘आयएस’ अमेरिकेने कमकुवत केली. त्यामुळे या भागातील संघटनेचा एकछत्री अंमल संपुष्टात आला आणि ती गटातटांमध्ये विभागली. आता इराक आणि सीरियाच्या अंतर्गत भागांमध्ये ‘आयएस’च्या कथित कमांडरचे आपापले सुभे आहेत. मात्र सीरियातील युद्धामुळे विस्थापित होऊन युरोपमध्ये शरण घेतलेल्या अनेक तरुणांच्या संपर्कात ही संघटना असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सोलिन्गेनपूर्वीही ‘आयएस’शी संबंधित असलेल्यांनी युरोपमध्ये दहशतवादी कारवाया केल्या आहेत. मार्च महिन्यात रशियातील एका सभागृहात झालेल्या स्फोटात १४३ जण ठार झाले. तत्पूर्वी जानेवारीत इराणच्या कर्मन शहरात दोन स्फोटांनी १०० जणांचा बळी घेतला. जुलैतील ओमानच्या मशिदीतील आत्मघातकी हल्ला असो की ऑगस्टमध्ये ऑस्ट्रियाच्या व्हिएन्नामधील टेलर स्विफ्ट हिच्या कार्यक्रमादरम्यान एका ऑस्ट्रेलियन तरुणाने केलेला हल्ल्याचा कट असो… या सर्वांचा ‘आयएस’शी संबंध असल्याचे समोर आले आहे. युरोपमध्ये, विशेषत: जर्मनीत इराक आणि सीरियातील असंख्य निर्वासित राहत असल्याने आता तेथील विरोधी पक्षांनी आपल्या सरकारला धोरणांमध्ये बदल करण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा : बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसक संघर्ष; सत्तांतरानंतरही बांगलादेशी निषेध का करत आहेत?

निर्वासित धोरणाचा फेरविचार होणार?

शुक्रवारच्या हल्ल्यानंतर जर्मनीतील प्रमुख विरोधी पक्षाने निर्वासित धोरणाचा फेरविचार करण्याचे आवाहन चान्सेलर ओलाफ श्लोत्झ यांना केले आहे. उजव्या विचारसरणीच्या ‘ख्रिश्चन डेमोक्रॅट्स’ या पक्षाचे नेते फ्रिड्रिख मर्झ यांनी या हल्ल्याचा निषेध करतानाच श्लोत्झ यांनी आपले धोरण अमुलाग्र बदलावे आणि नव्या धोरणाबाबत विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन चर्चा करावी, असा सल्ला दिला आहे. जर्मनीच्या ‘आयर्न लेडी’ अँगेला मर्केल यांनी निर्वासितांना जर्मनीचे दरवाजे उघडण्याचे धोरण अंगिकारले आणि श्लोत्झ यांनी हेच धोरण पुढे सुरू ठेवले आहे. मात्र संपूर्ण युरोपमध्ये उजव्या विचारसरणीचा प्रभाव वाढत असताना जर्मन राज्यकर्त्यांनाही या दबावाचा सामना करावा लागत आहे. सोलिन्गेनसारख्या घटना या हा दबाव आणखी वाढवित आहेत.

amol.paranjpe@expressindia.com

Story img Loader