नव्या वर्षाचा संकल्प म्हणून अनेक जण तब्येत कमावण्याचा निर्णय घेतात. त्यासाठी व्यायाम, योगासने, आहारातील बदल अशा उपाययोजना केल्या जातात. मात्र झटपट तब्येत कमावण्याच्या नादात पूरक प्रथिने म्हणजेच प्रोटीन पावडर घेतली जाते. मात्र प्रोटीन पावडरचा हा खुराक तब्येतीसाठी खरोखरच उपयुक्त आहे का, त्याचे आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतात, पुरेशी प्रथिने मिळविण्यासाठी काय करणे आवश्यक, यांचा ऊहापोह एका लेखात नुकताच ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ने मांडला. त्याविषयी…

प्रोटिन पावडर आवश्यक आहे का?

समाजमाध्यमांद्वारे प्रसार, जाहिरातील आणि योग्य मार्केटिंग यांमुळे सध्या बाजारात विविध पूरक प्रथिने म्हणजे प्रोटिन सप्लिमेंटचे पेव फुटले आहे. स्नायू व हाडे मजबूत करण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी, पचनशक्ती सुधारण्यासाठी आणि संप्रेरकांची पातळी राखण्यासाठी प्रथिने आवश्यक आहे यात शंकाच नाही. मात्र बहुतेक प्रोटीन पावडरी आहारासाठी पूरक मानल्या जातात. त्यामुळे प्रश्न निर्माण होतो की, पुरेसे प्रथिने मिळविण्यासाठी खरोखरच सप्लिमेंटची आवश्यकता आहे का? पेनस्लिव्हेनिया विद्यापीठातील पोषण विज्ञानाचे सहायक प्राध्यापक कॉलीन टेक्सबरी यांनी सांगितले की, बहुसंख्य लोकांना त्यांच्या रोजच्या आहारातून पुरेशा प्रमाणात प्रथिने मिळू शकतात. त्यामुळे त्यांना ते पूरक स्वरूपात घेण्याची गरज नाही. जागतिक आरोग्य संस्थेच्या अहवालानुसार १८ वर्षे किंवा त्याहून अधिक प्रौढ व्यक्तींसाठी १ ग्रॅम प्रतिकिलो प्रथिने घेणे आवश्यक आहे. म्हणजे ७० किलोच्या वजनाच्या व्यक्तीला साधारण ७० ग्रॅम प्रथिने पुरेसे आहे. वृद्ध व्यक्ती किंवा गर्भवतींसाठी हे प्रमाण अधिक असते. रोजच्या आहारात प्रथिनेयुक्त अन्नपदार्थांचा समावेश असेल, तर पुरेसे प्रथिने शरीराला मिळू शकतात. चिकन, मासे, दही, पनीर, दुग्धजन्य पदार्थ, अंडी, सुकामेवा, डाळी, मसूर, शेंगदाणे, तेलबिया हे प्रथिनांचे सर्वोत्तम स्रोत आहेत. या पदार्थांमधून प्रथिनांशिवाय जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आदी मौल्यवान पोषक तत्त्वे मिळू शकतात. मात्र पूरक प्रथिने घेतल्याने अन्य पोषक तत्त्वे मिळू शकत नाही. त्यामुळे अन्नातून प्रथिने मिळविणेच योग्य असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

India GDP growth rate
भारताचा जीडीपी विकासदर मंदावण्याचा अंदाज चिंताजनक, पण धक्कादायक नाही! असे का?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Tirupati Stampede Latest Updates| Stampede at Tirupati bairagipatteda token counter
Tirupati Stampede: तिरुपती बालाजी मंदिरात चेंगराचेंगरी का झाली? त्यावेळी नेमकं काय घडलं? कारण आलं समोर!
Ration Card
Ration Card : रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ‘ही’ सेवा झाली बंद; काय होणार परिणाम? वाचा!
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Rabindranath Tagore
History of Jana Gana Mana: जन गण मन खरंच जॉर्ज पंचमच्या स्वागतासाठी लिहिले का? ऐतिहासिक पुरावे काय सांगतात?
Dhanashree Verma break silence on Divorce Rumours
Dhanashree Verma : युजवेंद्र चहलबरोबर घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान धनश्री वर्माचे ट्रोल्सना चोख उत्तर; म्हणाली, “माझे मौन हे…”
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”

हेही वाचा >>>आता गुन्हे करून परदेशात पळून जाणे अशक्य; ‘भारतपोल’ काय आहे? ते कसं काम करणार?

मग प्रोटिन पावडरचा फायदा कोणाला?

प्रोटिन पावडर विशिष्ट लोकांसाठी उपयुक्त ठरू शकते, असे डॉ. टेक्सबरी यांनी सांगितले. ज्यांना कमी प्रमाणात अन्नासह पुरेसे प्रथिने मिळणे आवश्यक आहे. म्हणजेच मर्यादित भूक असलेले कर्करोगाचे रुग्ण किंवा मोठ्या गॅस्ट्रोइंटेस्टाइनल शस्त्रक्रियांमधून बरे झालेले रुग्ण, जे द्रव पदार्थ किंवा कमी अन्नपदार्थ घेतात. त्यांना प्रोटिन पावडर आवश्यक आहे. अशा वृद्ध व्यक्ती, ज्यांची भूक कमी झालेली असते. त्यांना प्रथिनांची आवश्यकता असल्याने त्यांना दही किंवा इतर काही पदार्थांमध्ये प्रोटिन पावडर दिले जातात. बहुतेक स्त्रिया, वयस्कर व्यक्ती अन्नपदार्थांतून प्रथिनांचा स्रोत पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या स्नायूंच्या नुकसानीचा धोका असतो. त्यामुळे त्यांनी प्रोटिन पावडर घेण्यास हरकत नाही, मात्र त्याचा अतिरेक नको, असे वैद्यकीयतज्ज्ञ सुचवतात.

हेही वाचा >>>टोरेस ज्वेलरी हाऊस घोटाळा… परदेशी कंपनीकडून फसवणुकीचा नवा पॅटर्न! सव्वा लाख गुंतवणूकदारांवर पस्तावण्याची वेळ का आली?

प्रथिने पावडरमध्ये कोणते तोटे?

बहुतेक प्रोटिन पावडर आहारातील पूरक म्हणून वर्गीकृत आहेत. त्यांना सरकारी पातळीवर कठोरपणे नियंत्रित केली जात नाहीत. ज्या प्रमाणात दावा केला असतो, त्या प्रमाणात प्रथिने असू शकत नाहीत. त्यामुळे प्रोटिन पावडरच्या नावाखाली फसवणूक होण्याची शक्यता असते. संशोधकांना काही प्रोटिन पावडरमध्ये पुरेशा प्रमाणात प्रथिने आढळली नाही. काही प्रोटिन पावडरमध्ये कमी प्रमाणात जड धातू आणि ॲनाबॉलिक स्टिरॉइड आढळले. चांगली चरबी शरीरासाठी प्रथिनांइतकीच महत्त्वाची आहे. प्रथिनेयुक्त अन्नपदार्थांमधून मिळणारी चांगली चरबी प्रोटिन पावडरमधून मिळत नाही. प्रोटिन पावडरमध्ये प्रथिनांचे प्रमाण जितके जास्त, तितके कमी पोषकतत्त्वे असतात. प्रोटिन पावडरमुळे शरीराला आवश्यक असलेली खनिजे मिळत नाहीत. प्रोटिन पावडर हा ‘अल्ट्राप्रोसेस्ड खाद्यपदार्थ’च आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या काही घटकांमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. प्रोटिन पावडरची चव कृत्रिम स्वीटनरपासून प्राप्त होते. त्यामध्ये उच्च फ्रक्टोज कॉर्न सिरपसारखी शर्करा असू शकते. ते हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या, टाइप-टू मधुमेह आणि मायक्रोबायोम बदलांशी संबंधित आहे. प्रोटिन पावडरमध्ये इमल्सीफायर्सही असू शकते ज्यांनी आतड्यांचा दाह वाढू शकतो, असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.

प्रोटिन पावडरमध्ये काय पाहणे आवश्यक?

प्रोटिन पावडर वापरण्याचे वैद्यकीय कारण असेल तरच ती वापरणे गरजेचे आहे, अन्यथा ती टाळणेच आवश्यक असल्याचे डॉ. कॉलीन टेक्सबरी सांगतात. उपलब्ध असलेल्या अनेक प्रकारच्या प्रोटीन पावडरपैकी पनीरजल प्रथिन किंवा दुग्धनीर प्रथिन अर्थात व्हे प्रोटिनला सर्वाधिक संशोधनाचा आधार आहे, असे अमेरिकेच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ’च्या पूरक अन्न विभागाचे संचालक स्टीफन पासियाकोस यांनी सांगितले. दुधापासून बनवलेले हे एक ‘पूर्ण’ प्रथिने आहे – म्हणजे त्यामध्ये तुमच्या शरीरात नवीन प्रथिने तयार करण्यासाठी आवश्यक नऊ अमीनो आम्ल किंवा बिल्डिंग ब्लॉक्स आहेत, असे ते सांगतात. बहुतेक वनस्पतींमध्ये किमान एक अत्यावश्यक अमीनो आम्ल कमी असते, त्यामुळे अनेक पावडरमध्ये अमीनो आम्लांचे संतुलन राखण्यासाठी अनेक वनस्पती स्रोतांचे मिश्रण असते, असे डॉ. पासियाकोस म्हणाले. शिफारस केलेल्या प्रोटीन पावडरमध्ये दैनंदिन मूल्यापेक्षा जास्त प्रमाणात साखर, मिश्रित पदार्थ किंवा जीवनसत्त्वे आणि खनिजे यांसारखे अतिरिक्त घटक नसल्याचे पाहणे आवश्यक आहे, असे तज्ज्ञ सांगतात.

sandeep.nalawade@expressindia.com

Story img Loader