पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या गांधीनगराच्या गिफ्ट सिटीमध्ये गुजरात प्रतिबंध कायद्यामध्ये मद्यपान करणाऱ्यांसाठी शिथिलता लागू करण्यात आली आहे. या शिथिलतेमुळे अपवाद करण्यात आलेल्या बाबींमध्ये आता आणखी एक भर पडली आहे. एकूणात या अपवादात्मक बाबींमध्ये इतर कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो, हे या निमित्ताने जाणून घेणे महत्त्वाचे ठरावे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मद्यसेवनाची परवानगी कोणासाठी?

या शिथिलतेअंतर्गत ‘२१ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीस इथे मद्यसेवनाचा तात्पुरता परवाना मिळेल’. याशिवाय ‘वय वर्षे ४० किंवा निवृत्त सैनिकांसोबत असणाऱ्या व्यक्तीस ‘हेल्थ परमिट’ मिळणार आहे. गुजरातमध्ये दारूचे उत्पादन, विक्री आणि सेवन हे राज्य सरकारतर्फे जारी परवाने आणि अनुज्ञेय प्रणालीद्वारे (परमिट) नियंत्रित केले जाते. या अंतर्गत ग्राहकने परमिट आणि विक्रेता व उत्पादकांनी त्यासाठी परवाने घेणे आवश्यक आहे. ग्राहक म्हणून, एखाद्या व्यक्तीला लागणारे परमिट, किंवा उत्पादक किंवा विक्रेत्याला आवश्यक परवाने गुजरात राज्य सरकारच्या प्रणालीकडून मिळवावे लागतात. राज्याने ग्राहकांसाठी सात वेगवेगळ्या प्रकारच्या परवान्यांची तरतूद केली आहे, त्यात त्यांना कोणत्या विशिष्ट परिस्थितीत मद्यपानाची परवानगी आहे याचे वर्गीकरण करण्यात आले आहे.

विविध प्रकारच्या मद्य सेवनाच्या परवानग्या कोणत्या आहेत?

गुजरात सरकारकडून देण्यात येणाऱ्या सात परमिटपैकी पाच प्रकार हे हेल्थ आणि नॉन हेल्थ परमिट म्हणून वर्गीकृत केले आहेत. इतर दोन प्रकार ‘ग्रुप परमिट’ आणि ‘तत्काळ परमिट’ म्हणून ओळखले जातात.‘तत्काळ परमिट’हे तातडीच्या गरजांसाठी असते. सर्व परमिटधारक राज्यभरातील ७७ परवानाधारक मद्य विक्रेते/दुकानांमधूनच विदेशी मद्य खरेदी करू शकतात.

अधिक वाचा: स्त्रियांचे अश्रू पुरुषांमधील आक्रमकता खरंच कमी करतात? काय सांगते नवीन वैज्ञानिक संशोधन…

‘हेल्थ परमिट’ची किंमत

‘हेल्थ परमिट’ची किंमत ४,००० रुपयांपर्यंत असू शकते आणि त्यासाठी वार्षिक २,००० रुपये नूतनीकरण शुल्क आवश्यक आहे, तर ‘नॉन हेल्थ परमिट’ची किंमत १०० ते ५०० रुपयांपर्यंत असते आणि त्याची वैधता एका आठवड्यापासून एक महिन्यापर्यंत असू शकते.

‘हेल्थ परमिट’मध्ये काय समाविष्ट आहे?

गुजरातमधील परवान्यांच्या सर्वात जुन्या प्रकारामध्ये अर्जदाराचे वय ४० वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे, त्याचे मासिक उत्पन्न रु. २५,००० पेक्षा अधिक आणि अर्ज करण्यासाठी वैद्यकीय कारण असणे आवश्यक आहे. एरिया मेडिकल बोर्डाने (AMB) ठरवल्याप्रमाणे हे परमिट साधारणपणे पाच वर्षे किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी वैध असते. याशिवाय कलम ६४, ६४बी, ६४सी यानुसार हेल्थ परमीटचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. कलम ६४ नुसार आरोग्य राखण्यासाठी मद्य आवश्यक आहे असा गुजरातच्या रहिवाशांना परवाना मिळू शकतो, ६४बी नुसार सध्या गुजरातमध्ये राहणाऱ्या , परंतु गेल्या १० वर्षांपासून मद्य बंदी नसलेल्या राज्यात राहणाऱ्या गुजरातच्या रहिवाशांना आरोग्य राखण्यासाठी मद्य आवश्यक आहे या कारणाने परवाना मिळू शकतो आणि ६४सी बॉम्बे फॉरेन लीकर नियमांतर्गत निवृत्त संरक्षण दल कर्मचाऱ्यांना आरोग्य राखण्यासाठी मद्य आवश्यक आहे या कारणास्तव हे परमिट जारी केले जाते. परंतु, गुजरात राज्याने २०२२ सालच्या ऑगस्ट महिन्यापासून हे परमिट संरक्षण प्राधिकरणांच्या कक्षेत येत असल्याने ६४सी अंतर्गत परवाने देणे थांबवले आहे.

परवान्यासाठी शुल्क किती भरावे लागेल?

कलम ६४ अंतर्गत हेल्थ परमिटसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीला प्रक्रिया शुल्क म्हणून २,००० रुपये आणि वैद्यकीय तपासणी शुल्क म्हणून २,००० रुपये भरावे लागतील. या परवान्यासाठी लागणाऱ्या वैद्यकीय कारणांमध्ये ‘तणाव’ ते हृदविकारापर्यंतचा समावेश असू शकतो, असे सरकारी रुग्णालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

मद्याचे प्रमाण

राज्याने कलम ६४ अंतर्गत हेल्थ परमिट धारकाला मिळू शकणारे मद्याचे मासिक प्रमाण देखील निश्चित केले आहे. याप्रमाणा नुसार ४०- ५० वर्षे वयोगटासाठी तीन युनिट्स, ५० वर्षांपेक्षा जास्त आणि ६५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांसाठी चार युनिट्स आणि ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी पाच युनिट्स हे प्रमाण निश्चित केले आहे. कलम ६४ बी अंतर्गत मिळणाऱ्या हेल्थ परमिट धारकासाठी, जास्तीत जास्त दोन वर्षांसाठी, महिन्यातून जास्तीत जास्त दोन युनिट्सची परवानगी देण्यात आलेली आहे.

अधिक वाचा: Skyquakes: स्कायक्वेक्स म्हणजे काय? भूकंप खरोखरच अवकाशात होतात का?

नॉन हेल्थ परमिट कुणासाठी?

राज्यात ठराविक कालखंडासाठी स्थलांतरित झालेल्या विदेशी नागरिकांना अशा स्वरूपाचे नॉन हेल्थ परमिट दिले जाऊ शकते. हे परवाने त्यांना दरमहा जास्तीत जास्त चार युनिट्स खरेदी करण्याची परवानगी देतात आणि हा परवाना विनामूल्य आहे. याशिवाय राज्यात पर्यटनासाठी येणाऱ्या परदेशी नागरिकांना पर्यटन परवाने दिले जाऊ शकतात. अशी परवानगी जास्तीत जास्त एका महिन्यासाठी वैध असते आणि या अंतर्गत जास्तीत जास्त सहा युनिट्स खरेदी करण्याची परवानगी असते. गुजरातला भेट देणाऱ्या इतर राज्यांतील रहिवाशांना अभ्यागतांचे (visitors) परवाने दिले जाऊ शकतात. हे परवाने ग्रीन कार्डधारक गुजरातच्या रहिवाशांना देखील जारी केले जाऊ शकतात. दारूच्या दुकानात जाताना ग्रीन कार्डशी संबंधित पुराव्याची पडताळणी करणे आवश्यक आहे. ही परवानगी जास्तीत जास्त सात दिवसांसाठी मिळू शकते आणि गरज पडल्यास जास्तीत जास्त तीन वेळा वाढवता येऊ शकते. अभ्यागत परमिट धारक आठवड्यातून जास्तीत जास्त एक युनिटचा लाभ घेऊ शकतात. ऑनलाइन पोर्टलवर पर्यटक आणि अभ्यागत परवानग्यांसाठी अर्ज करण्याची सोय गुजरात सरकारकडून करण्यात आलेली आहे.

मद्य सेवनाची परवानगी देणारे इतर परवाने?

गट परवाने:

या तरतुदीनुसार समूह मद्य सेवनाची परवानगी देण्यात येते, कोणत्याही राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय अधिवेशनात, परिषदेत सहभागी व्यावसायिक, शैक्षणिक, आणि गुजरातचे नागरिक नसलेले, विदेशी मद्य खरेदी करू शकतात, बाळगू शकतात, वापरू शकतात आणि सेवन करू शकतात. त्यासाठी अशा परिषद/ अधिवेशनाच्या आयोजकाकडून परवानगी घ्यावी लागते, ज्यामध्ये सरकारी संस्थांचाही समावेश असू शकतो. ही परवानगी अशा परिषद/ अधिवेशनाच्या कालावधीपर्यंत वैध असेल. म्हणजे अशा अधिवेशनाच्या समाप्तीपर्यंत आयोजकांच्या परवानगीने स्वदेशी-विदेशी पाहुण्यांना मद्य सेवन करणे शक्य आहे.

आणीबाणी/ तत्काळ परमिट:

गुजरातमध्ये राहणाऱ्या व्यक्ती ब्रँडी, रम किंवा शॅम्पेन ठेवण्यासाठी आणि वापरण्यासाठी, “त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी” या परवान्याचा वापर करू शकतात. कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला अशी परवानगी दिली जाऊ शकते आणि या परमिटमध्ये १८० मिली ब्रँडी किंवा रम किंवा ३७५ मिली शॅम्पेनची परवानगी मिळते.

मद्य सेवनाचे परमिट जारी करण्यासाठी कोण अधिकृत आहे?

नवीनतम GIFT सिटी मध्ये अभ्यागतांना मानव संसाधन प्रमुख किंवा नियुक्त अधिकार्‍यांच्या शिफारशींनुसार परवाने दिले जाऊ शकतात. तसेच कर्मचार्‍यांना GIFT सिटी कंपनीने अधिकार दिलेल्या अधिकार्‍यांकडून परवाने जारी केले जाऊ शकतात.अभ्यागत आणि पर्यटकांसाठी जिल्हा पी अँड इ अधिकाऱ्यांव्यतिरिक्त दारूबंदी आणि उत्पादन शुल्क विभागाकडून दुकानात तैनात असलेला प्रभारी उपसंचालक परवाना जारी करू शकतो. परवानाधारक दारू दुकाने असलेल्या हॉटेल्सच्या व्यवस्थापकांना परदेशी पाहुणे आणि अनिवासी भारतीयांना परवाने देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

एक ‘युनिट’ म्हणजे किती?

विदेशी मद्य युनिटची व्याख्या ७५० ml च्या स्पिरीटची एक बाटली किंवा ७५० ml च्या वाईनच्या तीन बाटल्या अशी केली जाते. २% इथाइल अल्कोहोल पेक्षा जास्त आंबलेल्या मद्यासाठी, एक युनिट ६५० मिलीच्या १० बाटल्या किंवा ५०० मिलीच्या १३ बाटल्या किंवा ३३० मिलीच्या २० बाटल्या असतात.
गुजरात मध्ये इथाइल अल्कोहोलचे प्रमाण २ % पेक्षा जास्त नसल्यास, ६५० मिलीच्या ३० बाटल्या आणि ७५० मिलीच्या २७ बाटल्यांमध्ये एक युनिट असते.

अधिक वाचा: नुकत्याच जन्माला आलेल्या ‘इस्रायल’चे महत्त्व सुएझ कालव्याने कसे सिद्ध केले?

गुजरातमध्ये कोणत्या प्रकारचे परमिट अधिक लोकप्रिय आहे?

गुजरातमधील ४० वर्षांवरील अधिकाधिक रहिवाशांनी गेल्या पाच वर्षांत हेल्थ परमिटसाठी अर्ज केले आहेत, तर व्यवसाय आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी तात्पुरत्या परवान्यांसाठीच्या अर्जांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. गुजरात हे १९६० साली मुंबई प्रांतापासून वेगळे झाल्यापासून या राज्यात मद्य बंदी लागू आहे.

२०१८ ते २०२२ दरम्यान ‘कोरड्या राज्या’त जारी करण्यात आलेल्या परवानग्यांमध्ये वार्षिक सरासरी ६ टक्के दराने वाढ झाली होती. गुजरात दारूबंदी आणि उत्पादन शुल्क विभागाने प्रकाशित केलेल्या आकडेवारीनुसार, २०१८ मध्ये एकूण ४७,८३६ परवाने सहा श्रेणींमध्ये (तीन) देण्यात आले आहेत. यात हेल्थ परमिटचे प्रकार, पर्यटन परमिटचे तीन प्रकार समाविष्ट आहेत.

यापैकी जवळपास ५१ टक्के हेल्थ आणि ४८ टक्के नॉन-हेल्थ परमिटचा समावेश होता. २०१८ आणि २०२२ ची तुलना केल्यास, २०२२ मध्ये एकूण ७६,१३५ परवाने (हेल्थ आणि नॉन-हेल्थ) जारी करण्यात आले. यापैकी, हेल्थ परमिटचा सिंहाचा वाटा ७८ टक्के होता, तर नॉन-हेल्थ परमिटचा  २२ टक्के होता.