संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विरोधकांकडून मणिपूरच्या प्रश्नावर चर्चेची मागणी केली जात असल्यामुळे दोन्ही सभागृहांत गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र दिसत असले तरी सरकारकडून दोन्ही सभागृहांत महत्त्वाची विधेयके मंजूर करून घेण्याचा सपाटा सुरू आहे. मागच्या आठवड्यात लोकसभेत ‘केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल’ खात्याचे मंत्री भूपेंद्र यादव यांनी ‘वन (संवर्धन) दुरुस्ती कायदा’ [Forest (Conservation) Amendment Act] हे विधेयक मांडले. विरोधकांच्या गोंधळात फारशी चर्चा न होता, हे विधेयक मंजूर झाले. १९८० साली पहिल्यांदा वनसंवर्धन कायदा आणण्यात आला होता. वनांच्या जमिनीवर बांधकाम होऊ नये, तसेच खाणीसाठी खोदकाम होऊ नये यासाठी हा कायदा आणण्यात आला होता. चार दशकांनंतर केंद्र सरकारने या कायद्याची क्षितिजे आणखी विस्तृत करण्याचा प्रयत्न केला आहे. देशाची बदललेली पर्यावरणीय व्यवस्था, आर्थिक आकांक्षामध्ये झालेले धोरणात्मक बदल लक्षात घेऊन कायद्यात दुरुस्ती सुचविण्यात आल्या आहेत. मूळ कायदा चार पानांचा असून, दुरुस्तीनंतर आता हा कायदा पाच पानांचा झाला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा