‘जननायक’ जयप्रकाश नारायण (जे.पी.) यांनी ‘संपूर्ण क्रांती’चा नारा देत बिहारमधील पटणा येथे विद्यार्थी व युवकांच्या सभेत सुरू केलेल्या आंदोलनाला ५ जून २०२४ ला ५० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त-

संपूर्ण क्रांती आंदोलनाच्या घोषणेवेळी देशातील  परिस्थिती काय होती?

संपूर्ण क्रांती आंदोलन ही जयप्रकाश नारायण यांच्या समाजवादी विचारावर आधारित संकल्पना आहे. १९७० च्या दशकात बेरोजगारी, महागाई, शैक्षणिक धोरणात सुधारणा, आर्थिक समानता, जातीमुक्त समाज यासह इतरही मुद्यांवर गुजरातमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन पेटले होते. या आंदोलनाचे नेतृत्व जे.पी. यांनी करावे, अशी विनंती करण्यात आली होती. छात्र युवा संघर्ष वाहिनीच्या माध्यमातून बिहारसह इतरही राज्यात मोठय़ा संख्येने युवक व विद्यार्थी सहभागी होऊ लागले होते. जयप्रकाश नारायण यांनी ५ जून १९७४ रोजी पाटण्याच्या गांधी मैदानावर विद्यार्थी-युवकांची सभा घेतली. यात लाखोंच्या संख्येत युवक विद्यार्थी सहभागी झाले होते. याच सभेत जयप्रकाश नारायण यांनी व्यवस्था परिवर्तनासाठी युवकांना आवाहन करीत ‘संपूर्ण क्रांती’ आंदोलनाची घोषणा केली. आंदोलन केवळ सत्तांतरासाठी नसून सामाजिक परिवर्तनासाठी आहे, असे त्यांनी सांगितले होते. याला विद्यार्थी व युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. जातीमुक्त समाजनिर्मितीच्या जे.पीं.च्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून युवकांनी आपल्या नावापुढे आडनाव लावणे बंद केले होते. इतका प्रभाव त्या काळात या आंदोलनाचा होता. भ्रष्टाचार, महागाई, राजकीय व्यवस्थेत बदल आणि समानतेच्या मुद्यावर देशभरातील युवक पेटून उठला होता.

Kangana Ranaut criticism that Priyanka Gandhi has no respect for democracy
प्रियंका गांधीना लोकशाहीचा आदर नाही,कंगना रानौतची टीका..
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Maharashtra, Delhi Politics, Small State,
लिलीपुटीकरण…
dcm devendra fadnavis in loksatta loksamvad
लोकसभेतील अपयशानंतर ‘भारत जोडो’सारख्या शक्तींवर मात; विधानसभेत प्रभाव नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
jharkhand assembly election 2024 amit shah attack at rahul gandhi
झारखंडमध्ये ‘राहुल विमान’ कोसळणार! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका
vip political leaders checking during the election campaign
बॅग तपासणीवरून नवे वादंग; नाहक त्रास देण्याचा प्रयत्न, महाविकास आघाडीचा आरोप, विरोधकांकडून केवळ राजकारण : महायुतीचे प्रत्युत्तर
Maharashtra kunbi vidhan sabha
कुणबी समाजाला डावलल्याची खंत, यवतमाळात तिसरा पर्याय देण्याचा प्रयत्न
पुन्हा ‘३७० कलम’ राहुल गांधींना आता कायमचे अशक्य- अमित शहा यांचे काँग्रेसवर टीकास्र

हेही वाचा >>>मुघलांच्या नाकावर टिच्चून झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे इतिहासातील महत्त्व काय?

चळवळीत सहभागी कार्यकर्त्यांना  आता चळवळीबाबत काय वाटते?

जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांती आंदोलनात विदर्भातील मोहन हिराबाई हिरालाल हे सहभागी झाले होते. ते विद्यार्थी आंदोलनाचे अंग असलेल्या छात्र युवा संघर्ष वाहिनीत सहभागी झाले होते. ते म्हणाले, जयप्रकाश नारायण यांची विद्यार्थी चळवळच मुळात गैरराजकीय विद्यार्थी व युवकांसाठी होती. संपूर्ण क्रांती याचा अर्थ विद्यमान सत्ता उलथवून सत्ता काबीज करणे नव्हता तर संपूर्ण क्रांतीचा विचार हा क्रांती या शब्दालाच छेद देणारा होता. समाजपरिवर्तनासाठी सत्ता असणे आवश्यक असले तरी केवळ सत्तेमुळे समाजपरिवर्तन घडवून आणणे शक्य नाही, ही संकल्पना त्यामागे होती. नागपुरातील संघर्ष वाहिनी या वंचितांसाठी काम करणारे दीनानाथ वाघमारे म्हणाले, समाजपरिवर्तनासाठी जयप्रकाश नारायण यांचे आंदोलन होते. समाजात आर्थिक समानता यावी हा त्यांचा प्रमुख उद्देश होता. समाजवाद म्हणजे समानता हा उद्देश या चळवळीचा होता. माथाडी कामगारांसाठी सध्या काम करीत असलेले हरिश धुरट म्हणाले, त्यावेळी आम्ही जयप्रकाश नारायण यांच्या विचारांनी प्रभावित झालो होतो. जातीमुक्त समाजनिर्मिती हा त्यांचा नारा होता. आडनावातून जात अधोरेखित होत असल्याने त्याकाळी अनेकांनी आडनाव लावणे बंद केले होते.

पुन्हा अशा आंदोलनाची गरज आहे का?

बेरोजगारी, आर्थिक असमानता, जातमुक्त समाज, महागाई हे त्यावेळचे मुद्दे आताही कायम आहेत. त्यामुळे संपूर्ण क्रांती आंदोलन आताही गरजेचे आहे का, या प्रश्नावर आत्ताच्या काळात त्यावेळचे प्रश्न कायम असले तरी पुन्हा ही चळवळ उभी राहणे अवघड आहे, असे मत व्यक्त झाले.  या चळवळीची आताच्या परिस्थितीनुसार पुनर्माडणी शक्य आहे, पण लोकांना त्याचे महत्त्व कळायला हवे, लोक जोपर्यंत ही बाब समजणार नाही तोपर्यंत कुठलीही चळवळ लोकचळवळ होणार नाही, असे मत सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांनी व्यक्त केले. या चळवळीमागे समता हा उद्देश होता. पण कालांतराने वैचारिक पातळीवर ही चळवळ भरकटली. परिवर्तन हा चळवळीचा गाभा संपुष्टात आला. अर्थतज्ज्ञ व समाजवादी नेते डॉ. श्रीनिवास खांदेवाले म्हणाले, जयप्रकाश नारायण यांची चळवळ ही समाजपरिवर्तनाचे विशिष्ट ध्येय डोळय़ांपुढे ठेवून सुरू करण्यात आली होती. ग्रामविकास हा त्यांच्या उद्देशांपैकी एक उद्देश होता. हे उद्देश पूर्ण करण्यासाठी जसे लोक हवे आहेत ते आता मिळत नाहीत. त्यामुळे आता चळवळीची गरज असली तरी त्यासाठी आवश्यक असणारे जयप्रकाश नारायण यांच्यासारखे उत्तुंग नेतृत्व नाही, अशी खंत आहे.

हेही वाचा >>>पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीनामा का दिला? देशात सरकार कसे स्थापन होते?

चळवळीची उदिष्टपूर्ती झाली का?

महागाई, भ्रष्टाचार, सामाजिक असमानता, शैक्षणिक धोरणात सुधारणा, जातमुक्त समाज या उद्देशाने सुरू केलेली संपूर्ण क्रांती चळवळ नंतरच्या काळात त्यात विविध राजकीय प्रवाहांच्या नेतृत्वाने संपुष्टात आली. जे.पींच्या आंदोलनाचा गाभा समाजवाद होता. समाजवाद म्हणजे समानता पण आजही गरीब अधिक गरीब व श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहे. महागाईमुळे सर्वसामान्य जनता वैतागली आहे. जे.पीं.च्या चळवळीत त्या काळात काम करणारे अनेक समाजवादी कार्यकर्ते चळवळीपासून दूर झाल्यावर जे.पीं.नीच ठरवून दिलेल्या उद्देशाप्रमाणे समाजपरिवर्तनासाठी विविध सामाजिक क्षेत्रांमध्ये काम करीत आहेत. काही जण नंतर राजकारणात सक्रिय झाले. बिहारमधील अनेक नेते जे.पीं.च्या चळवळीतून पुढे आले आहेत. महाराष्ट्रात अनेक सर्वोदयी कार्यकर्त्यांनी जे.पीं.चा ग्रामविकासाचा प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न केला आहे.