पावलस मुगुटमल

राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाची सुरुवात होऊन चार वर्षे पूर्ण झाल्याच्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार देशातील विविध शहरांमध्ये हवेतीत प्रदूषित कणांच्या प्रमाणात मर्यादेपेक्षा वाढ असल्याचे दिसून येत आहे. त्यात दिल्ली शहरामध्ये या कणांचे प्रमाण सुरक्षित पातळीच्या दुप्पट आहे. परिणामी २०२२मध्ये दिल्ली हे भारतातील सर्वांत प्रदूषित शहर ठरले आहे. हवेच्या प्रदूषणाचे प्रमाण सर्वाधिक असलेल्या शहरांनी प्रदूषणाच्या पातळीत (पीएम २.५, पीएम १०) किरकोळ सुधारणा केली असली, तरी ती अद्यापही मर्यादेपेक्षा अधिकच असल्याचे दिसून येत आहे.

pune ranked 4th globally for traffic congestion as tomtom traffic index report
विश्लेषण : वाहतूक कोंडीचे परिणाम काय?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Government initiatives like PMAY aim to address housing issues by offering financial aid for self-built homes or group housing.
IE THINC, आपली शहरे: ‘दिल्लीला कमी उंचीच्या, उच्च घनतेच्या घरांची गरज आहे’
shivaji nagar mumbai pollution
मुंबई : शिवाजी नगरमधील वायू प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ
mumbai High Court air pollution mumbai city
मुंबईकरांनी आणखी किती काळ धुक्याचे वातावरण पाहायचे ? वायू प्रदुषणाची समस्या कायम असल्यावरून उच्च न्यायालयाची विचारणा
Mumbai dust latest news in marathi
दोन महिन्यांमध्ये मुंबईतील पीएम २.५ धूलीकणांमध्ये वाढ
health issues due to pollution in sangli news in marathi
सांगलीत ‘दत्त इंडिया’कडून जल, वायू प्रदूषण; आरोग्यास धोका निर्माण झाल्याची तक्रार
Union Carbide waste disposal issue
‘युनियन कार्बाईड’च्या कचऱ्याचा प्रश्न उग्र का झाला? हा कचरा मूळ वायूइतकाच अतिधोकादायक? दुर्घटनेची शक्यता किती?

राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमात काय?

राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (एनसीएपी) हा केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने २०१९मध्ये सुरू केलेला सरकारी कार्यक्रम आहे. २०२४ सालापर्यंत प्रदूषित सूक्ष्म कणांचे प्रमाण किमान २० टक्क्यांनी कमी करण्याचे प्रमुख उद्दिष्ट असलेला हा कार्यक्रम प्रदूषण नियंत्रण उपक्रम आहे. राष्ट्रीय वायू गुणवत्ता निरीक्षणाचे जाळे विस्तारित करणे, वायू प्रदूषण व्यवस्थापनासाठी क्षमता निर्माण करणे, वायू प्रदूषणाच्या धोक्यांबाबत जनजागृती करणे, वायू प्रदूषण प्रतिबंध, व्यवस्थापन आणि नियंत्रण आदी उद्दिष्टांचा या कार्यक्रमात सहभाग आहे. देशातील १०२ शहरांमध्ये प्रदूषण कमी करण्याबाबत उपाययोजना केल्या जात आहेत.

स्वच्छ हवेसाठी सहभाग कुणाचा?

कार्यक्रमाची अंमलबजावणी पर्यावरण मंत्रालय स्तरावरील सर्वोच्च समितीद्वारे केली जाईल. राज्य स्तरावर मुख्य सचिव स्तरावरील समित्या या योजनेच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवत आहेत. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय, अवजड उद्योग मंत्रालय, आरोग्य मंत्रालय, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, कृषी मंत्रालय, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, नीती आयोग आदींसह या राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये शैक्षणिक संस्था आणि स्वयंसेवी संस्थांचा सहभाग घेण्यात येत आहे.

हवेची गुणवत्ता कशी तपासतात?

हवेमध्ये असणाऱ्या विविध घटकांमध्ये मानवी आरोग्यासाठी घातक ठरणाऱ्या प्रदूक्षित अतिसूक्ष्म कणांचे प्रमाण महत्त्वाचे असते. हवेतील या कणांचे प्रमाण किती, यावर त्या परिसरातील हवेची गुणवत्ता ठरविली जाते. पार्टिक्युलेट मॅटर, पीएम १० आणि पीएम २.५ हा घटक प्रामुख्याने तपासला जातो. हवेतील अतिसूक्ष्म प्रदूषित कणांचे प्रमाण त्यावरून ठरते. हे कण प्रति घनमीटर मायक्रोग्राममध्ये मोजतात. हवेतील अतिसूक्ष्म कणांच्या ० ते ५०० या प्रमाणानुसार हवेची गुणवत्ता ठरविली जाते. त्यानुसार हवेला श्रेणी दिली जाते. अतिसूक्ष्म प्रदूषित कणांचे हवेतील प्रमाण प्रति घनमीटर मायक्रोग्राममध्ये ० ते ५० असल्यास हवेची गुणवत्ता उत्तम असते. ५१ ते १०० मध्ये ती समाधानकारक, तर १०१ ते २०० मध्ये हवेची गुणवत्ता सामान्य समजली जाते. मात्र, त्यानंतरच्या आकडेवारीची प्रत्येक श्रेणी मानवी आरोग्यासाठी धोकादायक समजली जाते.

दिल्लीतील प्रदूषणाची स्थिती काय?

संपूर्ण देशामध्ये राजधानी दिल्लीमध्ये सर्वाधिक प्रदूषण असल्याचे वेळोवेळी दिसून येते. २०२२ या संपूर्ण वर्षातही दिल्ली शहर सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून कायम राहिले. दिल्ली शहरामध्ये प्रति घनमीटर प्रदूषित अतिसूक्ष्म कणांचे प्रमाण वर्षाला सरासरी ९९.७ इतके राहिले आहे. केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या मानकांपेक्षा ते दुपटीहून अधिक आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून देशातील सध्याची प्रदूषित कणांची वार्षिक सरासरी आणि सुरक्षित मर्यादा प्रतिघनमीटर ४० प्रतिघटनमीटर आहे. दिल्लीतील पीएम २.४ या सूक्ष्म कणांची हवेतील पातळी गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत ७ टक्क्यांनी वाढली आहे.

देशातील दहा सर्वात प्रदूषित शहरे कोणती?

राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत उपाययोजना करण्यात येत असलेल्या विविध शहरांमध्ये हवेतील प्रदूषित अतिसूक्ष्म कणांच्या पातळीत २०२६ पर्यंत ४० टक्के कपात करण्याचे नवे लक्ष्य ठेवले आहे. कार्यक्रमाच्या गेल्या चार वर्षांमध्ये शहरांना याबाबतच्या उपाययोजनांसाठी ६,८९७ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. मात्र, सद्य:स्थितीत देशातील सर्वांत प्रदूषित पहिल्या दहा शहरांमध्ये दिल्लीसह गंगेच्या मैदानी प्रदेशातील आहेत. बिहारमधील पाटणा, मुझफ्फरपूर आणि गया ही शहरे पीएम २.५ च्या पातळीच्या आधारावर सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये आहेत. त्यानुसार दिल्लीनंतर फरिदाबाद, गाझियाबाद, पाटणा, मुझफ्फरपूर, नोएडा, मेरठ, गोबिंदगड आणि जोधपूर ही शहरे २०२२ मध्ये सर्वाधिक प्रदूषित पहिली दहा शहरे ठरली.

मुंबई शहर प्रदूषणात कितवे?

हवेच्या प्रदूषणाबाबत देशातील काही शहरांची स्थिती सुधारली असली, तरी काही शहरांची स्थिती आणि गुणवत्ता खालावली असल्याचे दिसून आले आहे. त्यात देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराचाही समावेश आहे. २०१९मध्ये मुंबई हे प्रदूषित शहरांमध्ये किमान प्रदूषण असणारे सातव्या क्रमांकाचे शहर होते. मुंबईतील पीएम २.५ या प्रदूषित कणांची हवेतील सरासरी वार्षिक पातळी ३४ होती. ती २०२२ मध्ये ४९ पर्यंत वाढली. त्यामुळे आता मुंबई शहर कमी प्रदूषण असणाऱ्या शहरांच्या यादीत २३व्या स्थानावर गेले आहे. देशातील सर्वात स्वच्छ शहराचे स्थान काश्मीरमधील श्रीनगर आणि नागालँडमधील कोहिमा शहरांनी मिळविले आहे. या शहरांत प्रदूषित कणांची वार्षिक सरासरी प्रतिघनफूट २६.३३ होती. उत्तर प्रदेशातील गोरखपूर शहरात ठोस उपाययोजनांमुळे हे शहर स्वच्छ शहरांच्या यादीत आल्याचेही अहवालात म्हटले आहे.

Story img Loader