Shri Krishna Dwarka Nagari पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात गुजरात दौर्‍यावर असताना देवभूमी द्वारका तीर्थक्षेत्राला भेट दिली. त्यात पंतप्रधानांनी देशातील सर्वांत मोठा केबल ब्रिज ‘सुदर्शन सेतू’सह इतर विकास प्रकल्पांचेही उद्घाटन केले. विशेष म्हणजे त्यांनी पंचकुई समुद्रकिनाऱ्यावर स्कुबा डायव्हिंगदेखील केले. समुद्राच्या तळाशी जाऊन पंतप्रधान मोदी यांनी महाभारतातील श्रीकृष्णाचे पौराणिक राज्य असलेल्या ‘द्वारका नगरी’चे दर्शन घेतले. त्या दर्शनानंतर पंतप्रधान म्हणाले, “इथे जे काही घडते, ते द्वारकाधीशाच्या इच्छेने घडते. मी खोल समुद्रात जाऊन प्राचीन द्वारका नगरीचे दर्शन घेतले. पुरातत्त्व विभागाने बुडालेल्या द्वारिकेबद्दल बरेच काही लिहिले आहे. स्वयं विश्वकर्मा यांनी द्वारिकेची निर्मिती केली. आज प्रत्यक्षात मी द्वारका नगरी पाहिली. आज या अनुभवाने मी भावूक झालो, असे पंतप्रधान आपल्या भाषणात म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी घेतले पौराणिक द्वारका नगरीचे दर्शन (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

पुराणातील द्वारका

महाभारतात श्रीकृष्णाचे राज्य, असा द्वारका नगरीचा उल्लेख आहे. त्यामुळे हिंदू संस्कृतीत या स्थानाला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की, मामा कंसाचा वध केल्यानंतर श्रीकृष्णाने मथुरेहून आपल्या यादव कुळासह द्वारकेला स्थलांतर केले. समुद्रातून १२ योजना जमीन घेऊन येथे त्यांनी आपले राज्य स्थापन केले; ज्याला ‘द्वारका’ असे नाव देण्यात आले. विष्णू पुराणातील संदर्भानुसार द्वारका हे सुंदर बाग, खंदक, तलाव व राजवाडे यांचे शहर होते. परंतु, श्रीकृष्णाच्या मृत्यूनंतर हे शहर समुद्राखाली बुडाले, असे मानले जाते.

Air pollution air quality delhi burning of agricultural waste Uttar Pradesh, Punjab Haryana states
विश्लेषण : दिल्लीतील भीषण प्रदूषणास बाजूच्या राज्यांतील शेती कशी कारणीभूत? कृषी कचरा जाळण्याची गरज तेथील शेतकऱ्यांना भासते?
Hitler Volkswagen Porsche
Volkswagen: अ‍ॅडॉल्फ हिटलरने स्वप्नपूर्तीसाठी ‘फोक्सवॅगन’ गाडीला आकार का…
Kim Yong Bok, the secretive North Korean general leading troops in the Russia-Ukraine war
किम जोंग उनचे सैन्य रशियाच्या मदतीला; याचा काय परिणाम होणार? कोण आहेत सैन्याचे नेतृत्व करणारे जनरल किम योंग बोक?
am cynaide serial killer killed 14 friends
१४ मित्रांना विष देऊन हत्या केल्याप्रकरणी महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे ॲम सायनाइड?
Sukhbir Singh Badal resignation
विश्लेषण: अकाली दलावर संकटाचे ‘बादल’; देशातील सर्वात जुना प्रादेशिक पक्ष अडचणीत का आला?
sugarcane harvester
महाराष्ट्रात ऊसतोडणीचे वेगाने यांत्रिकीकरण… मजुरांऐवजी यंत्रांना प्राधान्य का? मजुरांचा तुटवडा का जाणवतो?
india big fat wedding economy
लग्न सोहळ्यांमुळे होणार सहा लाख कोटींची उलाढाल; भारतीय अर्थव्यवस्थेला कशी मिळणार चालना?
Did NASA accidentally kill living creatures on Mars?
NASA killed Life on Mars?: नासाने मंगळ ग्रहावरील जीवसृष्टीचा नाश केला का? नवीन संशोधन काय सुचवते?
Gautam Adani allegedly offering bribes
विश्लेषण : गौतम अदानींविरोधात अमेरिकेत भ्रष्टाचाराचे आरोप काय आहेत? भारतीय अधिकाऱ्यांचा काय संबंध?

द्वारकेचे स्थान

सध्याचे द्वारका शहर कच्छजवळ अरबी समुद्रासमोर वसलेले किनारपट्टीचे शहर आहे. हे शहर देशातील प्रमुख तीर्थस्थळांपैकी एक आहे. द्वारका हे वृंदावन, मथुरा, गोवर्धन, कुरुक्षेत्र व पुरी या कृष्ण तीर्थक्षेत्रांचाच एक भाग आहे. या शहरात श्रीकृष्णाला समर्पित १३ व्या शतकातील द्वारकाधीश मंदिर आहे. सौराष्ट्र किनारपट्टीवर असलेल्या इतर अनेक ठिकाणांचा उल्लेख श्रीकृष्णाशी संबंधित दंतकथांमध्ये आढळतो. त्यात बेट द्वारका आणि मूल द्वारका यांचा समावेश आहे. २० व्या शतकाच्या सुरुवातीपासून महाभारतात नमूद केलेल्या ‘द्वारका नगरी’चे अचूक स्थान शोधण्यासाठी विद्वानांनी अनेक प्रयत्न केले आहेत. समुद्राखाली खरेच असे शहर आहे का की हे शहर दंतकथांचा भाग आहे? जाणून घेऊ.

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (एएसआय)चे अतिरिक्त महासंचालक डॉ. आलोक त्रिपाठी यांनी त्यांच्या ‘एक्सकेव्हेशन ऑफ द्वारका-२००७’ (२०१३), या अहवालात नमूद केल्याप्रमाणे १९०४ मध्ये कलकत्ता उच्च न्यायालयातील न्यायाधीश एफ. ई. पारगीटर यांनी मार्कंडेय पुराणाच्या अनुवादानुसार असे सांगितले होते की, द्वारका ही महाभारतातील ‘रायवतक’ येथील पर्वतरांगांमध्ये वसली आहे. मूळ द्वारका ही सध्याच्या द्वारका नगरीपासून २०० किमी दूर असलेल्या जुनागढमधील गिरनार टेकडीवर असल्याचे मानले जाते. त्रिपाठी यांनी आपल्या अहवालात इतिहासकार ए. एस. अल्तेकर यांचाही हवाला दिला. अल्तेकर यांनी १९२० च्या दशकात, “आधुनिक द्वारका १२०० इसवी सनपूर्व जुनी नसावी, अशी चर्चा केली. परंतु, काही प्राचीन ग्रंथांमध्ये नमूद केल्याप्रमाणे द्वारका बुडाली असल्याचे त्यांनी मान्य केले.”

विद्वान ए. डी. पुलसाकर यांनी त्यांच्या १९४३ च्या ‘हिस्टोरिसिटी ऑफ कृष्णा’ या निबंधात असे लिहिले की, सध्याची द्वारका ही महाभारतात नमूद केल्याप्रमाणेच आहे. १९६० च्या दशकात पुरातत्त्व शास्त्रज्ञ एच. डी. सांकलिया यांनीदेखील महाभारतातील द्वारका ही सध्याची द्वारका असल्याचे सांगितले.

द्वारकेच्या अस्तित्वाचा शोध

१९६० च्या दशकापासून श्रीकृष्णाच्या द्वारकेचे भौतिक पुरावे शोधण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. सुरुवातीला केलेल्या उत्खननात सध्याच्या द्वारका नगरीच्या अवतीभवती शोध सुरू करण्यात आला. गुजरात सरकारच्या पुरातत्त्व विभागाच्या सहकार्याने पुण्यातील डेक्कन कॉलेजने १९६३ मध्ये द्वारकाधीश मंदिराजवळ पहिले उत्खनन केले होते. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर जास्त लोकवस्तीचा असल्याने हे उत्खनन अत्यंत मर्यादित जागेत करावे लागले. या ठिकाणी दोन हजार वर्षांपासून लोकवस्ती असल्याचे उत्खननात आढळून आले. “या निष्कर्षांमुळे पौराणिक शहराची ओळख तर सिद्ध झाली नाही; मात्र इतरांना शोध सुरू ठेवण्यासाठी आणि पुढील अभ्यास करण्यासाठी प्रेरणा मिळाली,” असे त्रिपाठी यांनी लिहिले.

१९७९ मध्ये भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने परिसराच्या विकासादरम्यान पुरातत्त्व शास्त्रज्ञ एस. आर. राव यांच्या नेतृत्वाखाली द्वारकाधीश मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात दुसरे उत्खनन केले. त्रिपाठी यांनी सांगितले, की या उत्खननाचा कोणताही अधिकृत अहवाल प्रकाशित झाला नाही. परंतु, राव यांनी केलेल्या सर्वेक्षणात तीन मंदिरांचे अवशेष आणि लॅस्ट्रस रेड वेअर मातीची भांडी सापडल्याचा उल्लेख आहे.

पाण्याखालील द्वारकेचा शोध

दोन उत्खननांतील निष्कर्षांमुळे संशोधकांमध्ये द्वारकेच्या आसपास आणखी पुरावे असण्याबाबत उत्सुकता निर्माण झाली; ज्यामुळे पुरातन शहर बुडाल्याचा अंदाज वर्तवला गेला. पुढील दोन दशके, सागरी पुरातत्त्व शास्त्रज्ञ, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी (एनआयओ), तसेच वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) शास्त्रज्ञांनी दीर्घकाळ शोध प्रक्रिया सुरू ठेवून, अरबी समुद्रात बुडालेले शहर शोधले. १९८८ पासून एनआयओ टीमचा एक भाग असलेल्या सागरी पुरातत्त्व शास्त्रज्ञ डॉ. सिला त्रिपती यांनी सांगितले, “पाण्याखाली केलेल्या उत्खननादरम्यान त्यांना सुमारे २०० दगडी नांगर, दगडी बांधकामे, दगडी शिल्पे, लहान-लहान मातीची भांडी, मूर्तींचे काही तुकडे, मोठ्या दगडी बांधकामाच्या रचना आणि इतर धातूच्या वस्तू सापडल्या.”

‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना डॉ. सिला त्रिपती यांनी स्पष्ट केले, “जेव्हा द्वारकेतील पुरातत्त्व उत्खननाचा विचार केला जातो, तेव्हा, बेट द्वारका, नागेश्वर, पिंडारा, गोपी तालाब यांसह संपूर्ण प्रदेश विचारात घेणे आवश्यक आहे. हे सर्व प्रदेश द्वारका शहरापासून ३० किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर आहेत,” असे त्यांनी सांगितले.

“बेट द्वारका येथे आम्ही केलेल्या उत्खननादरम्यान, बेटाच्या एका बाजूला आम्हाला ऐतिहासिक कालखंडातील (इसवी सनपूर्व सहाव्या शतकापासून ते इसवी सन सहाव्या शतकापर्यंत) पुरावे सापडले. द्वारका बेटाच्या दुसऱ्या बाजूला आम्हाला हडप्पाच्या कालखंडातील (अंदाजे १९०० ते १३०० इसवी सनपूर्व) पुरावे सापडले. द्वारका येथे पाण्याखाली सापडलेले दगडी नांगर हे द्वारका बेट येथील हडप्पा कालखंडातील वस्तूंसारखे असल्याने, ते त्याच कालखंडातील असल्याचा निष्कर्ष आम्ही काढला.”

हेही वाचा : चिनी पुरुष श्रीमंत पत्नीच्या शोधात, घरजावई होण्यास इच्छुक; नेमके कारण काय?

परंतु, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे डॉ. आलोक त्रिपाठी यांनी आपल्या अहवालात सांगितले की, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीच्या निष्कर्षांमध्ये स्पष्टतेचा अभाव आहे. परिणामी २००५ ते २००७ दरम्यान, डॉ. आलोक त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या अंडरवॉटर आर्किओलॉजी विंग (यूएडब्ल्यू)द्वारे, पाण्याखाली दुसर्‍यांदा उत्खनन करण्यात आले. आलोक त्रिपाठी यांच्या सांगण्यानुसार, या उत्खननात समुद्राच्या तळावर आढळलेले अवशेष हजारो वर्षांपासून खोल समुद्रात असल्यामुळे त्यांना विशिष्ट तारीख देणे शक्य नव्हते.

अद्यापही हा शोध सुरूच आहे.