निखिल अहिरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे ठाणे जिल्हा राज्यातील राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी असला तरी तो केंद्र सरकारच्या विकास आखणीच्या दृष्टीनेही तितकाच महत्त्वाचा ठरू लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी अतिशय महत्त्वाकांक्षी मानल्या गेलेल्या राष्ट्रीय प्रकल्पांचा मार्गदेखील ठाणे जिल्ह्यातून विकसित होताना पाहायला मिळत आहे. कल्याण, भिवंडी, अंबरनाथ आणि ठाणे या तालुक्यांमधून मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबई – बडोदे राष्ट्रीय महामार्ग आणि समर्पित मालवाहतूक मार्गिका (डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर) यांसारखे महत्त्वाचे प्रकल्प आकार घेत आहेत. कोविडनंतरच्या काळात या सर्व प्रकल्पांचे काम थंडावल्यासारखे चित्र होते. गेल्या काही महिन्यांपासून मात्र या प्रकल्पांच्या कामांना पुन्हा एकदा वेग मिळू लागला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात केंद्र सरकारशी निगडित असलेले प्रकल्प गतिमान व्हावेत यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे.

बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात लवकरच?

मोदी यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेला बुलेट ट्रेन प्रकल्प कायम चर्चेत राहिला आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि विकसनशील व्यापार नगरी म्हणून ओळख असलेले अहमदाबाद या दोन शहरांमधील प्रवास अंतर अगदी काही तासांवर आणण्यासाठी होऊ घातलेल्या या प्रकल्पाला सुरुवातीपासून राजकीय विरोधाचा सामना करावा लागला होता. राजकीय विरोध मावळल्यानंतर ज्यांच्या शेतजमिनी यात बाधित होणार होत्या, त्यांच्याकडून विरोध झाला. यातून मार्ग काढत स्थानिक यंत्रणांच्या मदतीने केंद्र सरकारने हा प्रकल्प शीघ्रगतीने मार्गी लावण्याचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी ठाणे जिल्ह्यातून ८.४२ हेक्टर शासकीय आणि ७९.३७ हेक्टर खासगी जागा संपादित करण्यात आली आहे. प्रत्यक्ष उभारणीचे काम करणाऱ्या नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनला जमीन हस्तांतरित करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी नव्याने आढळून आलेले किरकोळ क्षेत्र संपादित करण्याचे काम जिल्हा प्रशासन करत आहे. बुलेट ट्रेनच्या मार्गावर मुंबई येथील बीकेसी, ठाणे येथील माथर्डी, त्यानंतर विरार, बोईसर या ठिकाणी स्थानक उभारणी करण्यात येणार आहे. यामध्ये बीकेसी ते शिळफाटा हा भुयारी मार्ग असणार आहे. याची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे. शिळफाटा ते वापी या दरम्यान उन्नत मार्गाची उभारणी करण्यात येणार असून हे काम एल अँड टी या कंपनीमार्फत करण्यात येणार आहे. या मार्गादरम्यानची बांधकामे हटविण्यात आली आहेत. यामुळे येत्या काही दिवसांत लवकरच ठाणे जिल्ह्यातही या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे.

पाच वर्षे रखडलेल्या मुंबई – बडोदे महामार्गाची सद्यःस्थिती काय?

औद्योगिक क्षेत्रातील रस्तेमार्गे होणारी वाहतूक जलदगतीने व्हावी यासाठी उभारण्यात येणाऱ्या मुंबई – बडोदे राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या पाच ते सहा वर्षांपासून सुरू आहे. सुरुवातीच्या टप्प्यात बाधितांना देण्यात आलेल्या मोबदल्याबाबत निर्माण झालेल्या अडचणी, स्थानिकांचा विरोध या गोष्टींमुळे महामार्गाचे प्रत्यक्ष उभारणीचे काम रखडले होते. यानंतर आलेली करोना महासाथही या मार्ग उभारणीच्या रखडपट्टीला कारणीभूत ठरली. राज्यातील सत्ताबदल होताच या मार्गाच्या उभारणीनेही वेग धरला आहे. राज्य शासनाच्या वतीने महामार्ग उभारणीच्या कामाचा सविस्तर अहवाल काही महिन्यांपूर्वी मागवून घेण्यात आला होता. ज्या ठिकाणी काम धीम्या गतीने सुरू आहे तेथील काम जलदगतीने सुरू करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले. यानंतर जिल्हा प्रशासनाबरोबरच स्थानिक यंत्रणाही जोमाने कामाला लागली आहे. या प्रकल्पासाठी जिल्ह्यातून सुमारे ६४३.८३ खासगी तर ३७ हेक्टर शासकीय जागा बाधित झाली आहे. या जागेचे भूसंपादन जवळपास पूर्ण झाले असून यातील बहुतांश बाधितांना त्यांचा मोबदला देण्यात आला आहे. सध्या भिवंडी, कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यांत या मार्गाच्या प्रत्यक्ष उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. भिवंडी तालुक्यातील कुक्से – वसूर्ली आणि भोईर गाव या गावातील काही बांधकामे हटविण्याचे काम वेगाने सुरू आहे. यामुळे नॅशनल हायवे अथॉरिटीला एक मोठा पट्टा काम करण्यासाठी उपलब्ध होणार आहे. याच महामार्गादरम्यान असणाऱ्या बदलापूर आणि पनवेल बोगद्यांचे काम वेगाने सुरू आहे. भविष्यात समृद्धी महामार्ग, मुंबई – पुणे द्रुतगती मार्ग यांनाही याची जोडणी होणार आहे. याचबरोबर देशभरातून जेएनपीटी बंदराकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या अवजड वाहनांची थेट वाहतूक होऊन महामुंबईतील ठाणे, नवी मुंबई, डोंबिवली, कल्याण शहरांदरम्यान भेडसावणारी वाहतूक कोंडीची समस्या महामार्गामुळे मिटणार असल्याचे बोलले जात आहे. येत्या दीड ते दोन वर्षांच्या कालावधीत कोणत्याही परिस्थितीत हा मार्ग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट केंद्र आणि राज्य शासनाकडून ठेवण्यात आले आहे.

समर्पित मालवाहतूक प्रकल्प का रखडतोय?

देशांतर्गत मालवाहतूक जलद गतीने व्हावी यासाठी केंद्र प्रशासनाकडून डेडिकेटेड फ्रेट कॉरीडॉर ( डीएफसी) हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. हा मार्ग मुंबईजवळील जवाहरलाल नेहरू बंदर येथे सुरू होऊन ठाणेमार्गे पुढे उत्तरेकडे दादरीपर्यंत जातो. भविष्यात या मार्गामुळे उत्तरेकडील राज्ये आणि मुंबईदरम्यानची औद्योगिक वाहतूक सुरळीत होणार आहे. या एकूण प्रकल्पासाठी ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांतील १०२ गावांतील २५० हेक्टर खासगी आणि १७८ हेक्टर शासकीय जमीन बाधित झाली आहे. यातील बहुतांश जमिनीचे भूसंपादन पूर्ण झाले आहे.राज्यातून जाणाऱ्या या मार्गिकेपैकी सुमारे ४० किलोमीटरचा मार्ग हा ठाणे जिल्ह्यातून जात आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण, भिवंडी या तालुक्यांत येणारी सुमारे ७८३ बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली असून या सर्वांना मोबदला देण्यात आला आहे. कल्याण तालुक्यात काही बांधकामे अद्याप पाडण्यात आलेली नाही. यातील बाधितांनी मोबदला आणि जागेच्या वादावरून काही महिन्यांपूर्वी न्यायालयात धाव घेतली होती. यामुळे सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. या प्रकल्पांतर्गत सर्वांत महत्त्वाचे काम आहे १८ रेल्वे उड्डाणपुलांच्या उभारणीचे. यातील ९ उड्डाणपूल हे पालघर जिल्ह्यात, ६ ठाणे जिल्ह्यात आणि ३ रायगड जिल्ह्यात आहे. या पुलांच्या उभारणीचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू होते. सद्यःस्थितीत पालघर जिल्ह्यातील केवळ ३ पुलांचे काम पूर्ण झाले तर बाकी सर्व पुलांचे काम स्लो – ट्रॅकवर गेले आहे. ठाणे जिल्ह्यातील सहा पुलांपैकी तीन पूल हे रेल्वे प्रशासनाच्या वतीने उभारण्यात येणार आहेत. एक पूल कल्याण-डोंबिवली महापालिका, एक पूल महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) आणि एका पुलाची उभारणी सिडकोच्या माध्यमातून केली जाणार आहे. यातील दोन पुलांचे काम सुरू आहे. तर कल्याण-डोंबिवली महापालिकेने निधीची कमतरता असल्याने पुलाची उभारणी करण्याचे काम अद्याप हाती घेतलेले नाही. याच पार्श्वभूमीवर जानेवारी महिन्यात राज्य शासनाच्या वतीने हा प्रकल्प त्वरित मार्गी लावण्यासाठी कृती दलाची स्थापना करण्यात आली होती. या कृती दलाकडून सध्या या कामाची गती वाढवण्यात येत आहे. पुढील वर्षअखेर ही सर्व कामे पूर्ण होणार असल्याचे सबंधित विभागाकडून सांगण्यात आले आहे.