मागील वर्षांच्या तुलनेत यंदा देशातील अन्नधान्याचं एकंदरित उत्पादन वाढलं असलं तरी तांदळाचं उत्पादन मात्र कमी झालं आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील पावसाचं प्रमाण कमी होणं हे यामागील मुख्य कारण आहे. मात्र मोठ्या क्षेत्रावर करण्यात आलेली तांदळाची लागवड पाहता तांदळाच्या टंचाईची चिंता करण्याची गरज नाहीय. तांदळाच्या उत्पादनासंदर्भातील आकडेवारी आणि सध्याची स्थिती काय आहे यावर आपण या लेखामधून नजर टाकणार आहोत.
नैऋत्य मान्सून वाऱ्यांमुळे पडणाऱ्या पावसामुळे यंदा खरीपाच्या हंगामामध्ये अधिक क्षेत्र ओलिताखाली आलं. ओलिताखालील क्षेत्राचं प्रमाण हे मागील वर्षी याच जून ते जुलै मध्यापर्यंतच्या कालावधीतील ओलिताच्या क्षेत्रापेक्षा अधिक आहे. मात्र तांदळाची शेती असणारं क्षेत्र या वर्षी १२८.५० लाख हेक्टर इतकं आहे. १५ जुलैपर्यंतची ही आकडेवारी आहे. मागील वर्षीच्या १५५.५३ लाख हेक्टरपेक्षा ही आकडेवारी १७.४ टक्क्यांनी कमी आहे.
चिंता करण्याचं कारण काय?
१ जुलैच्या आकडेवारीनुसार सरकारी गोदामांमध्ये ४७.२ मिलियन टन तांदूळ आहे. हा साठा किमान मर्यादेपेक्षा ताडेतीन पट आहे. या साठ्यामधून “ऑपरेशनल” (सार्वजनिक वितरण प्रणाली) आणि “स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह” (आवश्यकतेनुसार वापर) दोन्ही गरजा या तिमाहीसाठी पूर्ण करता येतील. देशातील तांदळाचा साठा अजूनही गेल्या वर्षीच्या सर्वोच्च स्तावरील साठ्याच्या जवळपास आहे.
मात्र हा दिलासा गव्हाच्या बाबतीत आहे असं म्हणता येणार नाही. गव्हाचा सार्वजनिक साठा एका वर्षाच्या कालावधीमध्ये सर्वोच्च स्थरावरुन थेट १४ वर्षांच्या नीचांकी पातळीवर गेला आहे. महागाईने पछाडलेलं असतानाच आता धोरणकर्त्यांना तांदळाच्या बाबतीतही गव्हाच्या प्रकरणात झाली तरी पुनरावृत्ती होण्याची चिंता सतावत आहे. मार्च-एप्रिल २०२२ च्या उष्णतेच्या लाटेतील कालावधीमध्ये घेण्यात आलेल्या गव्हाच्या पिकाला फार मोठं नुकसान झालं. यामुळे मोठ्याप्रमाणात गव्हाचा साठा कमी झाला आणि तो किमान पातळीवर आला.
तांदळाच्या बाबतीत साठा हा जास्त आहे. देशातील सर्वात मोठ्या प्रमाणात घेतलं जाणारं पीक म्हणून तांदळाकडे पाहिलं जाते. देशातील एकूण धान्य उत्पादनापैकी ४० टक्के उत्पादन हे तांदळाचं असतं. भारत हा तांदळाचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. मार्च २०२२ ला संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये भारताने २१.२१ मेट्रीक टन तांदूळ निर्यात केलाय. ज्याची किंमत ९.६६ बिलियन अमेरिकन डॉलर्स इतकी आहे. गव्हाच्या बाबतीत उलट स्थिती आहे. गव्हाच्या विपरीत, तृणधान्याच्या जागतिक व्यापारात भारताचा स्वत:चा वाटा ४०% पेक्षा जास्त असताना – कोणत्याही उत्पादनातील कमतरतामुळे तांदूळ आयात करण्याचे पर्याय मर्यादित आहेत.
तांदळाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे का?
सध्या तरी तांदळाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता नाहीय. पहिली गोष्ट म्हणजे हवामान खात्याने समाधानकारक पाऊस यंदा पडेल असं म्हटलं आहे. मान्सून सध्या तांदळाचं उत्पादन घेतल्या जाणाऱ्या गंगा नदीच्या प्रदेशामध्ये सक्रीय आहे. त्यामुळे ही तांदळाच्या उत्पादनाच्या दृष्टीने दिलासादायक गोष्ट आहे.
गहू आणि तांदळाची तुलना केल्यास गव्हाचं उत्पादन मोजक्या राज्यांमध्ये घेतलं जातं तर तांदळाचं उत्पादन अनेक ठिकाणी घेतलं जातं. तसेच तांदूळ हा खरीप आणि रब्बी दोन्ही काळात घेतलं जाणार पीक आहे. त्यामुळे एखाद्या मौसमामध्ये उत्पादन कमी झालं तर दुसऱ्या मौसमात ते भरुन काढता येतं. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर तांदळाचा तुटवडा भारतामध्ये येणार नाही. सध्या आपल्याकडे जेवढा तांदळाचा साठा आहे तो पुरेसा आहे.