आज दि. ८ मे. हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस डे’ म्हणून साजरा करण्यात येतो. पहिले महायुद्ध हे या रेड क्रॉस डेच्या निर्मितीचे कारण ठरले होते. त्या अनुषंगाने महायुद्ध आणि ‘रेड क्रॉस डे’ यांचा रंजक इतिहास समजून घेणे उचित ठरेल…

thackeray group criticized pm narendra modi
“पंतप्रधान मोदींना मणिपूरपेक्षा रशिया-युक्रेन युद्धाची काळजी” ठाकरे गटाचं मोदी सरकारवर टीकास्र; म्हणाले…
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
chess olympiad india strongest team in budapest to win gold medal
सुवर्णयशाचे ध्येय! बुद्धिबळ ऑलिम्पियाडमधील भारताच्या मोहिमेस आजपासून प्रारंभ
India generates highest plastic pollution in world
Problem of ‘unmanaged’ waste: लांच्छनास्पद: प्लास्टिकच्या प्रदूषणामध्ये भारत जगात अव्वल, नवीन अभ्यास काय सांगतो?
nsa ajit doval to visit russia for brics meeting
अजित डोभाल यांचा ‘ब्रिक्स’ बैठकीसाठी रशिया दौरा; रशिया-युक्रेन युद्धावर चर्चेची शक्यता
putin mongolia visit
पुतिन विरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे अटक वॉरंट; मंगोलियाच्या कृत्याने वेधलं जगाचं लक्ष; नक्की काय घडलं?
How India response to Vladimir Putin in the Ukraine war
युक्रेन युद्धात पुतिन यांना हवी भारताची मध्यस्थी? भारताकडून प्रतिसादाची शक्यता किती?
Russian President Vladimir Putin, nuclear weapons policy,
विश्लेषण : रशियाचे अण्वस्त्र धोरणच बदलण्याचा पुतिन यांचा निर्णय कशासाठी? या बदलांमुळे अणुयुद्धाची शक्यता बळावणार?

‘रेड क्रॉस डे’ का साजरा करतात?
‘रेड क्रॉस डे’ हा जीन हेन्नी ड्युनंट यांचा जन्मदिन आहे. ते इंटरनॅशनल कमिटी ऑफ रेड क्रॉस (ICRC) चे संस्थापक होते. तसेच शांततेचे पहिले नोबेल त्यांना मिळालेले. आंतरराष्ट्रीय ‘रेड क्रॉस डे’ हा ‘रेड क्रेसेंट डे’ म्हणूनसुद्धा साजरा केला जातो.
दरवर्षी जगामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, अशी संकल्पना पहिल्या महायुद्धानंतर मांडण्यात आली होती. रेड क्रॉस कमिटीच्या १४व्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये ‘रेड क्रॉस दिन’ सुरू करून त्यानिमित्त आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन करावे, असे ठरवण्यात आले. १९३४ मध्ये झालेल्या १५व्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये हा अहवाल मंजूर करण्यात आला. परंतु, दुसऱ्या महायुद्धाच्या सावटाखाली या प्रस्तावाची कार्यवाही झाली नाही. दुसरे महायुद्ध संपल्यावर १९४६ मध्ये लीग ऑफ रेड क्रॉस सोसायटीज (LRCS) द्वारे या अहवालाचा पुन्हा अभ्यास करण्यात आला. दोन वर्षांमध्ये युद्धविरामाची तत्त्वे आणि जागतिक शांततेची गरज लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस दिनाचा प्रस्ताव सहमत करण्यात आला. पहिला ‘रेड क्रॉस डे’ ८ मे, १९४८ रोजी साजरा करण्यात आला. १९८४ मध्ये जागतिक रेड क्रॉस आणि ‘रेड क्रेसेंट डे’ असे या दिवसाचे नामकरण करण्यात आले.

पहिले महायुद्ध आणि अमेरिकन रेड क्रॉस
‘अमेरिकन रेड क्रॉस’ संस्थेची स्थापना १८८१ मध्ये झाली. पहिल्या महायुद्धाच्या काळात ‘अमेरिकन रेड क्रॉस’ संस्था ही पहिली साहाय्यकारी संस्था बनली. ‘अमेरिकन रेड क्रॉस’ने पहिल्या महायुद्धात जखमींना मदत करण्यासाठी मोठे योगदान दिले होते. युद्ध सुरू झाल्याच्या काही आठवड्यांतच त्यांनी ‘द मर्सी शिप’ पाठवली. या शिपमधून युरोपमध्ये शल्यविशारद, परिचारिका आणि आवश्यक वैद्यकीय साहित्य आणले गेले. अमेरिकेने १९१७ मध्ये या युद्धात सहभाग घेतला. परंतु, अमेरिकन रेड क्रॉस संस्थेने कोणताही भेदभाव न करता सर्व सैनिकांना, जखमींना मोठ्या प्रमाणात मदत केली.

हेही वाचा : विश्लेषण : अमेरिकेत बंदूक वापरणे सर्वसामान्य आहे का ? काय सांगतो बंदूक वापर अधिनियम कायदा

ब्रिटिश रेड क्रॉस आणि युद्धे

१८६४ च्या जिनिव्हा कन्व्हेन्शनने घालून दिलेल्या नियमानुसार ब्रिटिश नॅशनल सोसायटीची स्थापना करण्यात आली. युद्धातील आजारी व्यक्ती, जखमींना मदत करणे हा यामागचा हेतू होता. फ्रँको-प्रुशियन युद्धादरम्यान आणि १९ व्या शतकात झालेल्या दोन महायुद्धांमध्ये, तसेच संरक्षण मोहिमांमध्ये या सोसायटीकडून वैद्यकीय सेवा पुरवण्यात आली. १९०५ मध्ये ब्रिटिश ‘नॅशनल सोसायटी फॉर एड टू द सिक ॲण्ड ड वाउंडेड इन वॉर’चे नाव बदलून ‘ब्रिटिश रेड क्रॉस’ असे करण्यात आले. राणी अलेक्झांड्रा या संस्थेची अध्यक्ष बनली.

हेही वाचा : आत्महत्यांचा इतिहास आणि आजचे गंभीर स्वरूप

जीन हेन्नी ड्युनंट आणि रेड क्रॉस
एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत, रणांगणावर जखमी झालेल्यांना सामावून घेण्यासाठी आणि त्यांच्यावर उपचार करण्यासाठी कोणतीही संघटित किंवा सुस्थापित लष्करी शुश्रूषा व्यवस्था नव्हती किंवा सुरक्षित किंवा संरक्षित संस्थाही नव्हती. स्विस व्यापारी जीन-हेन्री ड्युनंट हे जून १८५९ मध्ये तत्कालीन फ्रेंच सम्राट नेपोलियन तिसरा याला भेटण्यासाठी इटलीला गेले. व्यापारासंदर्भात त्यांना चर्चा करायची होती. ऑस्ट्रो-सार्डिनियन युद्धातील साॅल्फेरिनोच्या लढाईनंतर २४ जूनला ते सॉल्फेरिनो या छोट्या गावात पोहोचले. एकाच दिवसात, दोन्ही बाजूंचे सुमारे ४० हजार सैनिक मैदानात जखमी आणि मृत्यमुखी झालेले होते. युद्धानंतरचे भयंकर परिणाम, जखमी सैनिकांचे दु:ख आणि वैद्यकीय उपस्थिती आणि मूलभूत काळजी यांचा जवळजवळ संपूर्ण अभाव हे पाहून ड्युनंटला धक्का बसला. त्याने आपल्या सहलीचा मूळ हेतू पूर्णपणे सोडून त्यांनी बरेच दिवस जखमींवर उपचार केले, त्यांची काळजी घेतली. कोणताही भेदभाव न करता स्थानिक गावकऱ्यांसह सैनिकांना मोठ्या प्रमाणात मदत केली.
जिनेव्हा येथील त्यांच्या घरी परत आल्यावर त्यांनी ‘अ मेमरी ऑफ सॉल्फेरिनो’ नावाचे पुस्तक लिहिण्याचे ठरवले. १८६२ मध्ये ते स्वतः प्रकाशित करून ते युरोपमधील लष्करी आणि राजकीय व्यक्तींना पाठवले. या पुस्तकात त्यांनी १८५९ मध्ये सॉल्फेरिनोमध्ये त्यांना आलेले अनुभव, सैनिकांना आवश्यक असणारी वैद्यकीय मदत, युद्धस्थळी आवश्यक असणारे दवाखाने या संदर्भात माहिती दिली. १८६३ मध्ये, जिनिव्हाचे वकील आणि ‘जिनिव्हा सोसायटी फॉर पब्लिक वेल्फेअर’चे अध्यक्ष गुस्ताव्ह मोयनियर यांना ड्युनंटच्या पुस्तकाची एक प्रत मिळाली आणि त्या सोसायटीच्या बैठकीत चर्चेसाठी सादर केली. अनेक चर्चासत्रांनंतर ‘जखमींना मदत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समिती (International Committee for Relief to the Wounded) स्थापन करण्यात आली.
१८६२ ते १८७५ मध्ये झालेल्या अनेक राजकीय आणि सामाजिक चळवळींचा परिणाम म्हणून युरोपमधील जवळजवळ प्रत्येक देशात सैनिकांसाठी आणि समाजासाठी वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या संस्थांची स्थापना करण्यात आली. १८७६ मध्ये सर्व वैद्यकीय संस्था ‘इंटरनॅशनल कमिटी ऑफ द रेड क्रॉस’ (ICRC) या छत्राखाली आल्या. पाच वर्षांनंतर, क्लारा बार्टनच्या प्रयत्नातून ‘अमेरिकन रेड क्रॉस’ची स्थापना झाली.अधिकाधिक देशांनी जिनिव्हा करारावर स्वाक्षरी केली आणि मोहिमा, युद्ध या काळात सैनिकांना, जखमींना मदत करण्यास सुरुवात केली. अल्पावधीतच ‘रेड क्रॉस’ने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठित चळवळ म्हणून मोठी गती प्राप्त केली.
१९०१ मध्ये जेव्हा पहिले शांततेचे नोबेल देण्याचे निश्चित करण्यात आले. या वेळी नॉर्वेजियन नोबेल समितीने जीन-हेन्री ड्युनंट आणि फ्रेडरिक पासी यांना संयुक्तपणे देण्याचे ठरवले. सैनिकांप्रति प्रथम दयाभाव दाखवून, त्यांना वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी जो संघर्ष केला तो अतुलनीय होता. नोबेल पुरस्कार मिळाल्यानंतर ९ महिन्यांत त्यांचा दीर्घ आजाराने मृत्यू झाला.

आज जगभरात सुमारे ९७ दशलक्ष लोक रेड क्रॉसशी संबंधित आहेत. मानवतावादी संघटना म्हणून ‘रेड क्रॉस’ ऑर्गनायझेशन ओळखली जाते. दरवर्षी मानवतेशी संबंधित काही थीम घेऊन जगभर आंतरराष्ट्रीय ‘रेड क्रॉस डे’ साजरा करण्यात येतो. या वर्षी ‘हार्ट टू हार्ट’ ही त्यांची थीम आहे. आरोग्यविषयक जागृती घरोघरी जाऊन करण्याचा त्यांचा उद्देश आहे. परंतु, संहारक युद्ध एका मानवतावादी संघटनेच्या निर्मितीला कारण ठरले.