ज्या ट्विटरबद्दल गेले कित्येक दिवस चर्चा सुरू होती ते सर्वात महत्त्वाचं असं सोशल मीडिया माध्यम आता टेसलाचे सीइओ एलॉन मस्क यांच्या हातात आलं आहे. कालपासून सोशल मीडियावर ट्विटर हे हॅशटॅग चांगलंच ट्रेंड होत आहे. सामान्य माणसापासून मोठ्यातला मोठा उद्योगपती यावर व्यक्त होतोय. अमेरिकेतूनही एलॉन यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. एलॉन यांच्या हाती ट्विटरची सूत्रं आल्या आल्या कित्येक कर्मचाऱ्यांना बडतर्फ करणं ते ट्विटरच्या पॉलिसी बदलणं या सगळ्या गोष्टींवर जोरदार चर्चा सुरू आहे.

ट्विटरच्या पॉलिसीबद्दल नुकतंच एलॉन यांनी ट्वीट करून यूझर्स यांना आश्वासन दिलं आहे की अजूनही त्यांनी ट्विटरच्या पोलिसीज बदलल्या नाहीत. एकूणच सध्या ट्विटरची सूत्रं सगळी एलॉन मस्ककडे असल्याने काही लोकांना अतीव दुख झालं आहे तरी काहींनी त्यांना पाठिंबा दाखवला आहे. जसं फेसबुक हा आपला डेटा विकतं तसं ट्विटरही करणार का अशा चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे. ४४ बिलियन डोलर्सला ट्विटर विकत घेणारे एलॉन मस्क तुमचा डेटा वापरणार की नाही याबद्दल आपण थोडी माहिती जाणून घेऊयात.

Vitamin B12 Deficiency
शरीरात व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता आहे? ‘हे’ पदार्थ ठरतील फायदेशीर; जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात….
22nd October Rashi Bhavishya In Marathi
२२ ऑक्टोबर पंचांग: जन्मराशीनुसार आज कर्तुत्वाला मिळेल चांगला…
WhatsApp Chat Memory feature
WhatsApp Chat Memory Feature : लवकरच व्हॉट्सॲप होणार तुमचा पर्सनल असिस्टंट, तुमच्या आवडीनिवडी ठेवणार लक्षात, पाहा कसं वापरायचं नवं फीचर
slow walking
Weight Loss : वजन कमी करण्यासाठी हळू चालणे फायदेशीर ठरू शकते? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात….
Refined Oil Vs Cold Pressed Oil: Which Is Healthier For Cooking? know everything health tips
रिफाइंड तेल वापरायचे की घाण्याचे? स्वयंपाक आणि तब्येतीसाठी कोणतं तेल योग्य कसं ठरवणार? जाणून घ्या
Google Trend Google introduces UPI Circle in India
Google introduces UPI Circle in India: Googleवर ट्रेंड होत असलेले हे UPI सर्कल आहे तरी काय? कसे वापरावे, जाणून घ्या सर्वकाही
Smart Phone News
Smart Phone : iPhone की अँड्रॉईड सुरक्षेच्या दृष्टीने कुठला फोन आहे खास?
control your blood sugar level
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी हे १० पदार्थ खाल्लेच पाहिजेत! जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात…

तुमचा डेटा सुरक्षित आहे का?

सध्या तरी तुम्ही तुमचा ट्विटरवरील डेटा हा कायमचा डिलिट करू शकता. त्यासाठी तुम्ही ट्विटरकडे विनंती करू शकता पण या प्रक्रियेसाठी ३० दिवस लागतील असं ट्विटरकडून सांगण्यात आलं आहे. काही लोकांमध्ये अशाही चर्चा सुरू आहेत की ट्विटरवर जर तुम्ही कुणाला डायरेक्ट मेसेज (डीएम) केले असतील तर ते ट्विटरच्या सर्वरवर वर्षानुवर्षे तसेच राहतील. त्यामुळे ट्विटरवरील तुमचे मेसेजेस हे End to end encrypted असतील हा गैरसमज दूर करायला हवा. हे मेसेज एखादी योग्य व्यक्ती नक्कीच वाचू शकते ही शक्यता नाकारता येणार नाही.

एलॉन मस्क तुमच्या डेटावर नियंत्रण ठेऊ शकतात का?

हार्वर्ड बिझनेस स्कूलचे प्रोफेसर अँडी वू यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांच्यामते ही गोष्ट होण्याची शक्यता फार कमी आहे. ट्विटरची टीम मस्क यांच्या डेटासाठी येणाऱ्या विनंत्या पूर्ण करण्यास नकार देऊ शकते, त्यासाठी त्यांना संचालक मंडळाकडून परवानगी घ्यावी लागेल. शिवाय एलॉन मस्क लवकरच स्वतःचं स्वतंत्र संचालक मंडळ स्थापन करणार आहेत. त्यामुळे ही शक्यता नाकारता येणार नाही, पण एलॉन मस्क त्यांना वाटेल त्या ट्विटर यूझरच्या डेटावर थेट नियंत्रण ठेवू शकणार नाही.

आणखी वाचा : “जर स्टार १०० कोटी घेत असेल तर…” अभिनेत्यांच्या कोटींच्या मानधनावर सुभाष घाई यांनी केली खरमरीत टीका

लोकांच्या खासगी डेटाबरोबर नेमकं एलॉन काय करणार आहेत यामागील हेतु तूर्तास तरी स्पष्ट झालेला नाही. नुकत्याच केलेल्या एका ट्वीटमध्ये एलॉन यांनी स्पष्ट केलं, “[ट्विटर यूझर्सच्या] गरजेनुसार शक्य तितक्या संबंधित असलेल्या जाहिरातींसह ट्विटरला जगातील सर्वात प्रतिष्ठित जाहिरात प्लॅटफॉर्म बनवायचे आहे.” असं मस्क यांनी या ट्वीटमध्ये स्पष्ट केलं आहे. त्यामुळे तुमचा डेटा नक्कीच विकला जाऊ शकतो आणि जर मस्क यांना तसं करायचं असेल तर ते हे नक्कीच करू शकतील, असं प्रोफेसर वू यांचं म्हणणं आहे.