इस्रायल आणि हमासदरम्यान युद्ध सुरू होऊन एका महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला आहे. या काळात सर्वसामान्यांना दिलासा मिळावा यासाठी काही काळ तरी युद्ध थांबवले जावे, असे आवाहन जगभरातून केले जात आहे. यासाठी मानवतावादी विराम (ह्युमनिटेरियन पॉज) आणि युद्धविराम (सीजफायर) असे दोन शब्दप्रयोग केले जात आहेत. या दोन्हीमध्ये नेमका काय फरक आहे, याची गरज नेमकी का आहे, याचा हा आढावा.

युद्ध काही काळ थांबवण्याचे आवाहन का?

इस्रायल आणि हमासदरम्यान सुरू असलेल्या युद्धामध्ये गाझामधील १० हजारांपेक्षा जास्त पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये ४,२०० पेक्षा जास्त लहान मुलांचा समावेश आहे. गेल्या महिन्याभरापासून पॅलेस्टिनी नागरिक अन्न, पिण्याचे पाणी, औषधे, इंधनाचा तुटवडा सहन करत आहेत. त्यातच आता इस्रायलची जमिनीवरील लष्करी कारवाई सुरू झाल्यामुळे उत्तर गाझामध्ये आणि हवाई हल्ल्यांमुळे दक्षिण गाझामध्ये नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय शोधणे कठीण झाले आहे. त्यामुळे युद्ध काही काळ तरी थांबवले जावे असे आवाहन केले जात आहे. अमेरिका, संयुक्त राष्ट्रे, ब्रिटन इत्यादींनी मानवतावादी विरामाचे आवाहन केले आहे तर इजिप्त, जॉर्डन यांसारख्या देशांनी युद्धविरामाचे आवाहन केले आहे.

Tribals migrate find work, limitations of 'Employment Guarantee Scheme' tribal areas
विश्लेषण: आदिवासी स्थलांतर का करतात? रोजगार हमीसारख्या योजना परिणामकारक नाहीत?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
ayushman bharat scheme for 70 above (1)
आयुष्मान योजनेसाठी तुमच्या आई-वडिलांची नोंदणी कशी करायची? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
US Presidential Election Results 2024 Live Updates in Marathi| Donald Trump vs Kamala Harris Live
US Election Results 2024 Updates : अमेरिकेच्या निवडणुकीत सहा भारतीयांची एन्ट्री; श्री ठाणेदार मिशिगनमधून विजयी!
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर एबी डिव्हिलियर्सने उपस्थित केले प्रश्न; म्हणाला, ‘सत्य हे आहे की…’
Loksatta explained What makes Cop 28 likely to be controversial
विश्लेषण: ‘कॉप २८’ वादग्रस्त ठरण्याची शक्यता कशामुळे?
reasons Pakistan's failure in the World Cup
विश्लेषण: विश्वचषकात ‘बाबर बॉइज’ कुठे चुकले? पाकिस्तानच्या अपयशाची कारणे कोणती?
Bhoot Chaturdashi
Diwali 2024: दिवाळीला ‘भूत चतुर्दशी’ का म्हणतात?

मानवतावादी विराम आणि युद्धविराम यात फरक काय?

विराम आणि युद्धविराम हे दोन्ही शब्द समान वाटू शकतात, पण त्यामध्ये लक्षणीय फरक आहे. युद्धाच्या परिस्थितीमध्ये शब्दांच्या अर्थाच्या लहान छटांनाही मोठा अर्थ प्राप्त होतो. त्यामुळे विराम आणि युद्धविराम हे शब्दप्रयोग आता चर्चेत आले आहेत. आंतरराष्ट्रीय कायद्याअंतर्गत दोन्ही शब्दांची कोणतीही ठोस परिभाषा नाही. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन किर्बी यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे, युद्धादरम्यान घेतलेला कोणत्याही विरामाचा ‘कालावधी, व्याप्ती आणि विस्तार’ यावर त्यामधील फरक अवलंबून असतो. मानवतावादी विराम हा अल्प कालावधीचा असतो. एखाद्या विशिष्ट भागामध्ये मदत पोहोचवणे हा हेतू त्यामागे असतो. तर युद्धविराम हा त्रयस्थ पक्षाने घडवून आणलेल्या वाटाघाटींचा परिणाम असतो. युद्धविरामाचा कालावधी पुरेसा दीर्घ असतो, युद्धातील दोन्ही पक्षांनी पालन करेपर्यंत युद्धविराम लागू असतो.

मानवतावादी विराम म्हणजे काय?

मानवतावादी विराम म्हणजे युद्धादरम्यान लढाई तात्पुरती बंद करणे. युद्धातील प्राणहानी थांबवणे किंवा कमी करणे, लोकांचा त्रास कमी करणे, मानवी प्रतिष्ठा कायम राखणे हे उद्देश असतात. केवळ मानवतावादी उद्देशाने काही काळ दोन्ही बाजूंची शस्त्रे थांबतात. हा मानवतावादी विराम अगदी कमी कालावधीसाठी, मात्र निश्चितपणे घेतला जातो. याचा काळ काही तासांपर्यंत असू शकतो. शिवाय हा विराम संपूर्ण युद्धभूमीवर लागू नसतो, तर एखाद्या निर्धारित भागापुरता असतो. त्या विशिष्ट भागाला मदत मिळावी हा विरामाचा मुख्य उद्देश असतो. याला युद्ध करणाऱ्या सर्व देश किंवा गटांची मान्यता आवश्यक असते. अचूक वेळा आणि स्थान, मार्ग आणि विरामाचा लाभ कोणाला मिळेल याबद्दलच्या तपशिलांचा करारामध्ये समावेश असतो.

युद्धविराम (सीजफायर) म्हणजे काय?

युद्धविराम म्हणजे युद्धात सहभागी असलेल्या पक्षांच्या सहमतीने तात्पुरता काळ युद्ध थांबवणे. या कालावधीदरम्यान युद्ध जास्तीत जास्त काळ लांबवण्यासाठी किंवा शक्य झाल्यास ते संपुष्टात आणण्यासाठी वाटाघाटी करण्यासाठी वेळ मिळतो. साधारणपणे त्रयस्थ पक्ष यासाठी प्रयत्न करतात. एकमेकांचा घेतलेला भूभाग परत करणे, एकमेकांच्या ताब्यातील नागरिकांची सुखरूप सुटका करणे, त्यासाठी अटी आणि शर्तींवर चर्चा करणे, अटी व शर्ती मान्य झाल्यानंतर त्याचे पालन करणे या सर्व गोष्टींचा यामध्ये समावेश असतो. जीवितहानी कमी करणे आणि इतर देशांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे युद्धाची झळ बसू न देणे हाही यामागील उद्देश असतो.

कोणत्या विरामासाठी कुणाचा आग्रह?

इस्रायलचा जवळचा मित्र आणि या युद्धामध्ये साधनसामग्रीनिशी त्यांच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या अमेरिकेने मानवतावादी विरामासाठी आग्रह धरला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांच्यासह इतर वरिष्ठ नेते आणि अधिकाऱ्यांशी या मुद्द्यावर चर्चा केली आहे. श्रीमंत राष्ट्रांचा गट असलेल्या जी-७नेही अमेरिकेच्या भूमिकेची री ओढली आहे. संयुक्त राष्ट्रांनी युद्ध सुरू झाल्यापासून वारंवार मानवतावादी विरामाचे आवाहन केले आहे. तर पश्चिम आशियातील इस्रायल आणि गाझाच्या शेजारील देशांनी प्रामुख्याने युद्धविरामाचे (सिजफायर) आवाहन केले आहे. त्यामध्ये इजिप्त आणि जॉर्डन या अरब राष्ट्रांचा प्रामुख्याने समावेश आहे. या दोन्ही देशांनी फार पूर्वीच इस्रायलबरोबरचे संबंध सुरळीत केले आहेत.

हेही वाचा… विश्लेषण: विश्वचषकात ‘बाबर बॉइज’ कुठे चुकले? पाकिस्तानच्या अपयशाची कारणे कोणती?

मात्र, युद्धाची व्याप्ती वाढू नये यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी त्यांनी युद्धविरामाचे आवाहन केले आहे. मात्र, खुद्द इस्रायल आणि अनेक पाश्चात्त्य देशांनी युद्धविरामाला विरोध केला आहे. युद्धविरामाचा सर्वाधिक फायदा हमासला होईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. तर मानतावादी विरामासाठी इस्रायलचे काही नेते अनुकूलता दाखवित असताना सर्व ओलिसांची सुटका झाल्याशिवाय हा अल्पकालीन विराम घेण्याचीही नेतान्याहू यांची तयारी नाही.

Story img Loader