Iran-Israel War इस्रायल आणि इराणमधील संघर्षाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. इराणने त्यांच्या हद्दीतून इस्रायलवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ला चढवला आहे. इराणने जवळ जवळ ३०० ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मोठा हल्ला केल्याने पश्चिम आशिया क्षेत्रातील तणाव आणखी वाढला आहे. सीरियामध्ये असलेल्या इराणच्या दूतावासावर हल्ला झाल्यानंतर त्याला उत्तर देण्यासाठी इराणने हा हल्ला केला असल्याचे सांगितले जात आहे. इस्रायलच्या काही भागांमध्ये इराणने डागलेली ड्रोन आणि क्षेपणास्त्रे कोसळली, तर अनेक क्षेपणास्त्रे इस्रायलच्या हद्दीत प्रवेश करण्याच्या आधीच उद्ध्वस्त करण्यात आल्याचा दावा इस्रायलने केला आहे. अनेक काळापासून दोन्ही देशांतील संघर्ष सुरू आहे. मुख्य म्हणजे पूर्वी दोन देश एकमेकांचे शत्रू नसून मित्र होते. असे नेमके काय घडले की, या दोन देशांतील शत्रुता इतक्या टोकाला गेली? याबद्दल जाणून घेऊ या.

मित्रराष्ट्र

१९४८ मध्ये पॅलेस्टाईनच्या जागी इस्रायल नावाचा ज्यू देश निर्माण झाला. मध्यपूर्वेतील अनेक मुस्लीम देशांनी इस्रायलला मान्यता देण्यास नकार दिला. त्यावेळी इराण हे तुर्कीनंतरचे दुसरे सर्वात मोठे मुस्लीम राष्ट्र होते. देशाच्या निर्मितीनंतर इस्रायलचे इराणशी घनिष्ठ संबंध होते. ते शाह, मोहम्मद रझा पहलवी यांच्या नेतृत्वाखाली मित्रराष्ट्र झाले. नवीन ज्यू राष्ट्राने शस्त्रे, तंत्रज्ञान आणि कृषी उत्पादनांच्या बदल्यात ४० टक्के तेल इराणमधून आयात केले. इस्रायलच्या मोसाद या गुप्तहेर संस्थेने शाह यांच्या गुप्त पोलिसांना प्रशिक्षण देण्यात सहाय्य केले.

syria civil war marathi news
सीरियातील अचानक सत्ताबदलाने कुणाला काय मिळणार? रशिया-इराणचे नुकसान कसे? तुर्कीये-इस्रायलचा फायदा कसा?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
challenges in front of Syria
सीरियातील आव्हाने संपणार कशी?
Syria Civil War
Syria Crisis: “सीरीया शुद्ध होत आहे”; असद यांची राजवट उलथवल्यानंतर बंडखोरांचा नेता अबू जोलानीची मोठं वक्तव्य
Syria, Abu Mohammad Al Jolani, dictatorship Syria,
विश्लेषण : जिहादीचा बनला प्रशासक… कोण आहे सीरियाचा नवा शासक अबू मोहम्मद अल जोलानी?
Bashar al-Assad And Vladimir Putin.
Syrian Civil War : सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचं विमान खरंच क्रॅश झालं का? असद कुटुंबीयांसाठी पुतीन यांचे मोठे पाऊल
President Bashar al Assad forces defeated in parts of Syria
सीरियावर बंडखोरांचा ताबा… अध्यक्ष बशर अल असद परागंदा… नेमके काय घडले? अमेरिका, रशिया, इराण, तुर्कीयेचा काय संबंध?
Syria
Syria Civil War 2024 : कोणी उलथवली अल-असाद कुटुंबांची कित्येक दशकांची राजवट? सीरियातील गृहयुद्धात नेमकं काय घडलं?

हेही वाचा : इराणी हल्ल्यांना रोखून धरले इस्रायलच्या ‘आयर्न डोम’ने… काय आहे ही बचाव यंत्रणा?

इस्लामिक क्रांती

१९७९ साली या दोन्ही राष्ट्रांतील मैत्री संपली आणि शत्रुत्वाची सुरुवात झाली. इराणमधील १९७९ च्या इस्लामिक क्रांतीने इस्रायल आणि तेहरानमधील परिस्थिती बदलली. इराणला इस्लामिक देश घोषित करण्यात आले. इस्रायलने मात्र नवीन इस्लामिक रिपब्लिकला मान्यता दिली नाही. इराणमध्ये इस्लामिक राज्य स्थापन झाल्यानंतर शरिया कायदा लागू करण्यात आला. अयातुल्ला खोमेनी यांच्या नेतृत्वाखालील इराणच्या नव्या सरकारने इस्रायलशी असलेले सर्व संबंध तोडले. अयातुल्ला आपल्या भाषणात म्हणाले, इराणला अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांविरुद्ध लढण्याची आवश्यकता आहे. अयातुल्ला यांच्या भाषणानंतर, अमेरिका ‘मोठा सैतान’ आणि इस्रायल ‘छोटा सैतान’ म्हणून ओळखले जाऊ लागले. १९७९ साली इराणमध्ये इस्लामिक राज्य स्थापन झाल्यापासून, इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणने पॅलेस्टिनी गटांना इस्रायली सैन्याविरुद्धच्या लढ्यात पाठिंबा दिला आहे.

१९७९ साली या दोन्ही राष्ट्रांतील मैत्री संपली आणि शत्रुत्वाची सुरुवात झाली. (छायाचित्र-रॉयटर्स)

इराणच्या नव्या सरकारने इस्रायलशी असलेले सर्व संबंध तोडल्यानंतर दोन्ही राष्ट्रांमध्ये अनौपचारिक व्यावसायिक संबंध कायम राहिले. त्यानंतर इराणने सीरिया, इराक, लेबनॉन आणि येमेनमध्ये प्रॉक्सी मिलिशिया आणि इतर गट उभारले आणि त्यांना निधी पुरवला; ज्यामुळे दोन्ही राष्ट्रांच्या शत्रुत्वात वाढ झाली. १९८० मध्ये, इस्लामिक जिहाद ही पहिली इस्लामी पॅलेस्टिनी संघटना स्थापन करण्यात आली. या संघटनेने इराणचा मुख्य पाठीराखा म्हणून इस्रायलविरुद्ध शस्त्रे हाती घेतली. असे असले तरी, १९८० ते १९८८ च्या काळात इराण-इराकमध्ये झालेल्या युद्धादरम्यान सद्दाम हुसेनच्या सैन्याशी लढण्यासाठी इस्रायलने तेहरानला सुमारे १५०० क्षेपणास्त्रे पाठवली.

‘हिजबुल्ला’ – दहशतवादी संघटनेची निर्मिती

१९८२ मध्ये इस्रायलने लेबनॉनवर आक्रमण केले. इस्रायलने तेथील पॅलेस्टिनी गटांशी मुकाबला केला आणि राजधानी बेरूतवर कब्जा केला. इराणच्या उच्चभ्रू इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने नंतर ‘हिजबुल्ला’ या दहशतवादी संघटनेला आपला पाठिंबा दिला. ‘हिजबुल्ला’ ही शिया मुस्लिमांची दहशतवादी संघटना आणि राजकीय पक्ष आहे. या गटाने इस्रायली सैन्याविरुद्ध मोहीम चालवली. इस्रायलने अर्जेंटिनासह देशात इतर ठिकाणी झालेल्या हल्ल्यांसाठी हिजबुल्लाह या गटाला जबाबदार धरले. १९९२ मध्ये इस्रायली दूतावासावर झालेल्या बॉम्बस्फोटात २९ लोक मारले गेले, तर १९९४ मध्ये ज्यू समुदाय केंद्रावर झालेल्या हल्ल्यात ८५ लोक मारले गेले होते.

‘हिजबुल्ला’ ही शिया मुस्लिमांची दहशतवादी संघटना आणि राजकीय पक्ष आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

आण्विक करार

२००५ मधील निवडणुकीनंतर राष्ट्रपती महमूद अहमदीनेजाद यांच्यामुळे दोन राष्ट्रांमधील तणाव आणखी वाढला. कारण त्यांनी अनेकदा इस्रायलचा अंत करायचा आहे, असा उल्लेख आपल्या कार्यक्रमांमध्ये केला होता. २०१५ मध्ये जेव्हा इराणने सहा जागतिक महाशक्तींबरोबर आण्विक करार केला, तेव्हा इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष बेंजामिन नेतान्याहू यांनी या कराराला इतिहासातील सर्वात मोठी चूक असल्याचे सांगितले. बराक ओबामा यांनी या कराराचे स्वागत केले, मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २०१८ मध्ये या करारातून माघार घेतली. नेतान्याहू यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे अभिनंदनही केले.

युद्धभूमी सीरिया

२०११ साली गृहयद्ध सुरू झाल्यापासून इस्रायलने सीरियावर अनेक हवाई हल्ले केले आहेत. इस्रायलने सीरियातील इराण समर्थित गटावर हल्ले केल्याचे सांगितले आहे. ज्या भागात हे हल्ले करण्यात आले, त्या भागात सीरियाची सुरक्षा संस्था, अधिकार्‍यांची घरे, गुप्तचर मुख्यालये आहेत. इराण समर्थक गटांची शस्त्रे मोठ्या प्रमाणात ठेवलेल्या ठिकाणी हल्ले करत असल्याचे इस्रायलच्या संरक्षण दलाने सांगितले आहे.

२०११ साली गृहयद्ध सुरू झाल्यापासून इस्रायलने सीरियावर अनेक हवाई हल्ले केले आहेत. (छायाचित्र-रॉयटर्स)

इराणविरुद्ध युती

सौदी अरेबिया आणि इराणमधला संघर्ष फार जुना आहे. वर्षानुवर्ष हे देश एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. त्याचाच फायदा घेत, इस्रायलने इराणचा प्रमुख धार्मिक आणि प्रादेशिक प्रतिस्पर्धी असलेल्या सौदी अरेबियाशी संबंध जोपासण्यास सुरुवात केली. सप्टेंबर २०२० मध्ये संयुक्त अरब अमिराती आणि बहरीन यांनी इस्रायलशी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. अलीकडच्या काही महिन्यांत, इस्रायलने इराणच्या जहाजांवर हल्ले केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, इराणने इस्त्रायलवर नतान्झ येथील युरेनियम संवर्धन प्रकल्प उद्ध्वस्त करण्याचाही आरोप केला आहे. २०२२ आणि २०२३ मध्ये इस्रायलने सीरियातील इराणी लष्करी सल्लागार आणि इराणी लष्कराचे सीरियासाठीचे मुख्य गुप्तचर यांच्यावर हल्ला केला आहे. १ एप्रिल २०१४ ला दमास्कसमधील इराणच्या कॉन्सुलर ॲनेक्स इमारतीवर इस्त्रायली हवाई हल्ल्यात डझनाहून अधिक लोक मारले गेले; ज्यात रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या दोन वरिष्ठ सदस्यांचाही समावेश होता.

इराणने त्यांच्या हद्दीतून इस्रायलवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ला चढवला आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी सांगितले की, हल्ल्यातील सर्वच ड्रोन आणि क्षेपणास्त्र पाडण्यात आम्ही इस्रायलची मदत केली आहे. त्यांनी इराणने केलेल्या हल्ल्याचाही निषेध केला. या हल्ल्यानंतर जो बायडन आणि पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यात चर्चाही झाली असल्याचे सांगण्यात आले आहे. इस्रायलने अमेरिकेच्या मदतीने गेल्या काही वर्षांत बहुस्तरीय हवाई संरक्षण यंत्रणा तयार केली आहे, ज्यात लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे, ड्रोन, रॉकेट अशा विविध प्रणालींचा समावेश आहे; ज्या हल्ले रोखण्यास सक्षम आहेत. इराणने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायल इराणवर प्रतिहल्ला करण्याचा तयारीत आहेत.

हेही वाचा : इराणच्या नेतृत्वात हिजबुल्ला, हुथी अन् पॅलेस्टिनी दहशतवादी गट एकत्र; इस्रायल हल्ले कसे रोखणार?

इराणी सैन्याची शाखा आयआरसीजीने म्हटले आहे की, त्यांनी हा हल्ला इस्रायलकडून वारंवार करण्यात येणार्‍या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी केला आहे. अलीकडेच इस्रायलने सीरियाची राजधानी दमास्कसमधील इराणी दूतावासावर हल्ला केला होता, असे या शाखेतील अधिकार्‍यांनी सांगितले आहे.

Story img Loader