पॅलेस्टाईनमधील हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागल्यानंतर आता हमास आणि इस्रायल यांच्यात अधिकृतपणे युद्ध सुरू झाले आहे. या युद्धात आतापर्यंत हजारो इस्रायली आणि पॅलेस्टिनी नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. हमास या संघटनेला जोपर्यंत संपवणार नाही, तोपर्यंत आम्ही हल्ले चालूच ठेवू अशी भूमिका इस्त्रायलने घेतली असून पॅलेस्टाईनच्या अनेक ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले जात आहेत. याच कारणामुळे सध्या पॅलेस्टाईनची स्थिती बिकट झाली असून लहान मुले, महिला वेगवेगेळ्या ठिकाणी आश्रय घेत आहेत. असे असतानाच आज इस्रायलच्या हल्ल्यात गाझा शहरातील सर्वांत जुन्या चर्चचे नुकसान झाल्याचे वृत्त येत आहे. या हल्ल्यामुळे चर्चमध्ये आश्रय घेतलेल्या एकूण १६ जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. याच पार्श्वभूमीवर गाझा शहरातील या सर्वांत जुन्या चर्चचे महत्त्व काय? या हल्ल्यामुळे नेमके काय नुकसान झाले? हे जाणून घेऊ या…

इस्रायलच्या हल्ल्यात चर्चचे नुकसान

गाझा शहरातील ‘चर्च ऑफ सेंट पोर्फेरियस’ हे ऐतिहासिक चर्च असून त्याला गाझातील सर्वांत जुने चर्च म्हणून ओळखले जाते. मात्र, इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात या चर्चची नासधूस झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार चर्चला लागून असलेली एक भिंत इस्रायलच्या हल्ल्यात पडली, त्यामुळे या चर्चचेही नुकसान झाले. या चर्चमध्ये साधारण ५०० लोकांनी आसरा घेतला होता. हवाई हल्ल्यात यातील अनेक जण जखमी झाले असून १६ जणांचा मृत्यू झाला आहे. हे चर्च जेरुसलेमच्या ग्रीक ऑर्थोडॉक्स पॅट्रिआर्केटच्या अखत्यारित येते. त्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.

central government decision on classical languages in october 2024
संविधानभान : अभिजात भाषा म्हणजे काय?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Peshwa Maratha sacking of the Sringeri math
Tipu Sultan History: पेशव्यांच्या नेतृत्त्वाखाली मराठ्यांनी लुटला होता ‘शृंगेरी मठ’; या ऐतिहासिक घटनेत किती तथ्य?
Rabi onion cultivation will increase by lakh hectares Mumbai
रब्बी कांदा लागवड लाख हेक्टरने वाढणार; जाणून घ्या, देशभरातील रब्बी लागवडीचा अंदाज
13th November Daily Rashibhavishya In Marathi
तुळशी विवाह, १३ नोव्हेंबर पंचांग: रेवती नक्षत्रात लागेल सुखाची चाहूल; प्रेम, व्यवसायासाठी पाहिलेलं स्वप्न होईल पूर्ण; वाचा तुमचे राशिभविष्य
Roads Kharghar, Narendra Modi meeting,
पंतप्रधानांच्या सभेमुळे खारघरचे रस्ते चकाचक
Archaeologists discover a 4000-year-old coffin inside another coffin of Egyptian priestess
Lady of the House: मृत्यूनंतर ४,००० वर्षांनी लागला तिचा शोध; कोण होती इजिप्तची ‘lady of the house’?

“चर्चचे नुकसान म्हणजे युद्धगुन्हा”

“गेल्या १३ दिवसांत इस्रायलकडून हल्ले करण्यात येत आहेत. या हल्ल्यांत ज्यांनी आपले घर गमावले आहे त्यांना चर्च तसेच चर्चशी संबंधित संस्थांकडून आश्रय देण्यात येत आहे. मात्र चर्च, चर्चशी संबंधित संस्था तसेच लोकांना आश्रयासाठी दिलेल्या ठिकाणांना लक्ष केले जात आहे. हा एक युद्धगुन्हा असून त्याच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही”, असे ग्रीक ऑर्थोडॉक्स पॅट्रिआर्केटने म्हटले आहे.

गाझामध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रसार कसा झाला?

जुन्या गाझातील झायतू क्वार्टर परिसरात हे चर्च आहे. साधारण इसवी सन ४२५ मध्ये इमारतीला चर्च म्हणून मान्यता देण्यात आली. ख्रिस्ती धर्मगुरू सेंट पोर्फेरियस यांच्या नावावरून या चर्चला ‘चर्च ऑफ सेंट पोर्फेरियस’ असे नाव देण्यात आले. पोर्फेरियस यांची समाधी आजही या चर्चच्या परिसरात पाहायला मिळते. सेंट पोर्फेरियस यांचा जन्म ग्रीसमध्ये इसवी सन ३४७ मध्ये थेस्सालोनिकी येथे झाला होता. सेंट पोर्फेरियस हे इसवी सन ३९५ ते इसवी सन ४२० म्हणजेच आपल्या मृत्यूपर्यंत गाझाचे बिशप होते. मार्क द डीकॉन यांनी लिहिलेल्या व्हिटा पोर्फीरी पुस्तकात सेंट पोर्फेरियस यांच्याविषयी माहिती देण्यात आलेली आहे. सेंट पोर्फेरियस यांनी गाझा या भागात ख्रिश्चन धर्माचा प्रचार-प्रसार केला.

सेंट पोर्फेरियस बिशप झाल्यापासून गाझामध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रचार

चौथ्या शतकापर्यंत गाझा हे शहर ख्रिश्चन धर्मीयांसाठी प्रतिकूल समजले जायचे. या शहरात तेव्हा ख्रिश्चन धर्माला स्थान नव्हते. म्हणूनच त्या काळी चर्च हे शहराच्या बाहेर उभारले जात. सेंट पोर्फेरियस हे बिशप झाल्यापासून मात्र गाझा शहरात ख्रिश्चन धर्माचा प्रचार-प्रसार झाला. त्यासाठी पोर्फेरियस यांनी रोमनचा सम्राट आर्केडियसची मदत घेतली. सेंट पोर्फेरियस यांनी या काळात गाझातील एकूण आठ पुरातन मंदिरं पाडली. त्याच मंदिरांच्या दगडांचा पुढे रस्ते बांधण्यासाठी उपयोग करण्यात आला. अशा प्रकारे सेंट पोर्फेरियस यांच्या काळात ख्रिश्चन धर्माने गाझामध्ये आपली पाळंमुळं घट्ट केली.

चर्चचे शेवटचे नूतनीकरण १८५६ साली

पुढे सेंट पोर्फेरियस यांच्या मृत्यूच्या पाच वर्षांनंतर त्यांच्यावर ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले, त्याच ठिकाणी ‘चर्च ऑफ सेंट पोर्फेरियस’ या चर्चच्या उभारणीस सुरुवात करण्यात आली. मात्र, सातव्या शतकाच्या उत्तरार्धात या चर्चचे रुपांतर मशिदीत करण्यात आले. पुढच्या पाचशे वर्षांपर्यंत ही वास्तू मशीदच होती. मात्र, १२ व्या शतकात ख्रिस्ती धर्मीयांनी या वास्तूवर आपला हक्क सांगितला. त्या वास्तूची पुन्हा चर्चमध्ये पुनर्बांधणी करण्यात आली. या चर्चचे शेवटचे नूतनीकरण १८५६ साली करण्यात आले होते. या चर्चची रचना गाझामधील ‘द ग्रेट मॉस्क ऑफ गाझा’ या मशिदीप्रमाणेच आहे. सध्या गाझामध्ये तीन महत्त्वाचे चर्च आहेत. त्यातील एक चर्च ‘चर्च ऑफ सेंट पोर्फेरियस’ हे आहे, तर झीटोन रस्त्यावरील ‘होली फॅमिली कॅथोलिक चर्च’ आणि ‘गाझा बॅप्टिस्ट चर्च’ अशी उर्वरित दोन चर्चची नावे आहेत.

चर्चमध्ये गाझातील मुस्लीम, ख्रिश्चनांना आश्रय

गाझाच्या एकूण २.३ दशलक्ष लोकसंख्येपैकी साधारण एक हजार लोक ख्रिश्चन धर्मीय आहेत. चर्च ऑफ सेंट पोर्फेरियस हे चर्च पॅलेस्टिनी ख्रिश्चनांसाठी एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. मात्र, हे चर्च गेल्या अनेक वर्षांपासून मुस्लीम धर्मीयांसाठीदेखील एक आश्रयस्थान राहिलेले आहे. याआधी ख्रिश्चन आणि मुस्लीम धर्मीय या चर्चमध्ये आश्रय घेत होते. जुलै २०१४ मध्ये इस्रायलच्या सैन्याने गाझा पट्टीवर बॉम्बहल्ले केले होते. रमजानच्या पवित्र महिन्यात हा हल्ला करण्यात आला होता. या काळात या चर्चच्या परिसरात मुस्लीम धर्मीय आपली रोजची प्रार्थना करायचे.