नवी दिल्लीतील इस्रायली दूतावासाजवळ मंगळवारी (२६ डिसेंबर) कमी तीव्रतेचा स्फोट झाला. यानंतर जिल्हा कर्मचारी, स्पेशल सेल आणि दिल्ली अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेने काही वर्षांपूर्वी दूतावासाच्या परिसरात झालेल्या अशाच स्फोटाच्या आठवण ताजी केली आहे. २९ जानेवारी २०२१ रोजी भारत आणि इस्रायलच्या राजनैतिक संबंधांच्या २९ व्या वर्धापन दिनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम रोडवर इस्रायलच्या दूतावासापासून १०० मीटर अंतरावर क्रूड बॉम्बचा स्फोट झाला होता.

या स्फोटात कोणीही जखमी झाले नव्हते. मात्र, राजपथवर ‘बीटिंग द रिट्रीट’ सोहळा सुरू असताना झालेल्या स्फोटाची चौकशी दिल्ली पोलिसांनी घटनेच्या काही दिवसांमध्येच राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपवली. एनआयएने तपास केला, पण त्यांना या स्फोटातील दोन संशयितांची ओळख पटविण्यात आणि त्यांचा शोध घेण्यात यश आलं नाही.

Hamas-Israel armistice in Gaza after 15 months of intense war
हमास-इस्रायल दरम्यान गाझात युद्धविराम… पश्चिम आशियात आता तरी शांतता नांदेल?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Redevelopment , Developers Committee, Old Thane ,
जुन्या ठाण्यातील पुनर्विकासासाठी विकासकांची समिती
israel hamas agree to ceasefire conflict in gaza to end after 15 months
इस्रायल-हमास युद्धविरामास सहमती; १५ महिन्यांनंतर गाझामधील संघर्ष थांबणार
Israel Hamas War reuters
इस्रायल-हमासमधील युद्ध आज थांबणार? कतारचे मध्यस्थीचे प्रयत्न; युद्धबंदीसाठी प्रस्ताव
Nashik Rural Local Crime Branch arrested burglary and loot gang
हरसूल, त्र्यंबकेश्वर भागात घरफोडी करणारी टोळी ताब्यात
Naxal Attack In Chhattisgarh
नक्षलवाद संपवण्याचा अगम्य आशावाद…
Naxals Blow Up Security Vehicle In Chhattisgarh's Bijapur, 9 Feared Dead
छत्तीसगडमध्ये पोलिसांच्या वाहनावर नक्षलवाद्यांकडून स्फोटक हल्ला; नऊ पोलीस जागीच ठार!

२०२१ बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएला काय सापडले?

२०२१ मधील इस्रायली दुतावासाजवळील बॉम्बस्फोटाचं प्रकरण दिल्ली पोलिसांकडून एनआयएकडे आलं. यानंतर एनआयएने नवी दिल्ली आणि जिल्ह्यातील आजूबाजूच्या भागातील जवळपास ५०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एनआयएला दोन मास्क घातलेले संशयित दिसले. हे जॅकेट घातलेले संशयित स्फोटाच्या काही मिनिटे आधी फुटपाथवरून बॅग घेऊन फिरताना आढळले.

संशयितांनी तेथून ऑटोरिक्षा घेतली. त्या रिक्षाच्या चालकाचा शोध घेतल्यानंतर त्याने संशयितांना जामिया नगर येथे सोडल्याचं सांगितलं. मात्र, संशयित ज्या ठिकाणी ऑटोमधून खाली उतरले तेथे कोणतेही सीसीटीव्ही कॅमेरे सापडले नाहीत. यानंतर एनआयएने आरोपींचे पोस्टर जारी करत त्यांची माहिती देणाऱ्यांना प्रत्येकी १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

बॉम्बस्फोटाचा हेतू काय होता?

एनआयएने केलेल्या प्राथमिक तपासात बॉम्बस्फोटामागे ‘इराण कनेक्शन’ असल्याचे संकेत मिळाले. विशेष म्हणजे पॅरिसमधील इस्रायली दूतावासाजवळही बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती नंतर समोर आली. २०२१ च्या बॉम्बस्फोटानंतर दिल्ली पोलिसांना घटनास्थळावर इस्रायल दूतावासाच्या राजदूताला उद्देशून लिहिलेलं पत्र सापडलं. त्या पत्रात धमकी देण्यात आली होती की, हा स्फोट केवळ ट्रेलर आहे. इराणी कासेम सुलेमानी आणि डॉ मोहसेन फखरीजादेह यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हा हल्ला केला होता.

सुलेमानी हे इराणच्या सशस्त्र दलाची शाखा असलेल्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्सचे वरिष्ठ कमांडर होते. ३ जानेवारी २०२० रोजी ते इराकमधील बगदाद येथे आले असताना अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. इराणचे ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. फखरीजादेह यांचीही त्याचवर्षी २७ नोव्हेंबरला इराणमध्ये हत्या झाली. इस्रायलची राष्ट्रीय गुप्तचर संस्था मोसादच्या नियंत्रणाखाली असलेल्या एआय-मशीन गनचा वापर करून त्यांची हत्या करण्यात आली.

न्यायवैद्यक तपासणीतील निष्कर्ष काय?

न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) तज्ज्ञांच्या तपासणीत आढळलेल्या माहितीनुसार, त्या स्फोटात वापरलेले स्फोटके पेंटाएरिथ्रिटॉल टेट्रानिट्रेट किंवा पीईटीएन प्रकारचे होते. ते लष्करी दर्जाचे स्फोटक होते आणि सहज उपलब्ध होत नाही. इम्प्रोव्हायझ्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (IED) बॉल बेअरिंगसह एका कॅनमध्ये भरलेले होते. तसेच तो बॉम्ब इस्त्रायली दूतावासाच्या रस्त्यावरील फ्लॉवरपॉटमध्ये टाकण्यात आला होता.

हेही वाचा : दिल्लीत इस्रायली दूतावासाजवळ स्फोट, घटनास्थळी राजदूतांच्या नावाने पत्र अन्…, स्पेशल सेलकडून तपास सुरू

अटक केलेल्या ४ कारगिल विद्यार्थ्यांचे काय झाले?

२०२१ च्या बॉम्बस्फोट प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने गुन्हेगारी कटाचा गुन्हा नोंदवला. नवी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने एनआयएबरोबर संयुक्त कारवाई करत कारगिलमधील ४ विद्यार्थ्यांना अटक केली. त्यांच्यावर स्फोटात हात असल्याचा आरोप होता. अटक करण्यात आलेले चौघेही सोशल मीडियावर अनेक पोस्ट करत होते आणि बॉम्बस्फोटाच्या दिवशी चौघांचे फोन बंद होते, असं तपास पथकाचं म्हणणं होतं. मात्र, पोलिसांना त्यांच्याविरुद्ध कोणताही ठोस पुरावा सादर करता आला नाही. विशेष म्हणजे एनआयएनेही या चार विद्यार्थ्यांची तपासणी केली, पण त्यांनाही काही संशयास्पद गोष्टी आढळल्या नाहीत. त्यामुळे दिल्ली न्यायालयाने चारही विद्यार्थ्यांना सोडून दिले.

Story img Loader