गाझावरील इस्रायलच्या सुरू असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ संपूर्ण अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये आंदोलने सुरू आहेत. मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून इस्रायल विरोधी घोषणा देत आहेत. बुधवारी (२४ एप्रिल) शेकडो पोलिस अधिकार्‍यांनी ऑस्टिन येथील टेक्सास विद्यापीठातील आंदोलन करणार्‍या तब्बल ५० विद्यार्थ्यांना अटक केली. आंदोलन थांबवण्यासाठी मोठ्या प्रमाणात परिसरात पोलिस तैनात करण्यात आले आणि विद्यापीठ परिसरातील विद्यार्थ्यांचे तंबूही उखडून टाकण्यात आले. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला.

युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया (यूएससी) मध्ये जवळपास १०० विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आणि हार्वर्ड व ब्राउन विद्यापीठांमध्ये पोलिस कारवाईची धमकी देण्यात आली. ‘अल जझीरा’च्या मते, स्टॅनफोर्ड विद्यापीठ, येल विद्यापीठ, प्रिन्स्टन विद्यापीठ आणि एमआयटी यांसह संपूर्ण अमेरिकेतील किमान ३० विद्यापीठांमध्ये सध्या निषेध सुरू आहे. अमेरिकन विद्यापीठं आंदोलनाचे केंद्र म्हणून का ओळखली जातात? यापूर्वी अशा प्रकारची आंदोलने अमेरिकेत झाली आहेत का? अमेरिकेतील विद्यार्थी आंदोलनांचा इतिहास काय? याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या.

Who is George Soros
जॉर्ज सोरोस कोण आहेत? भाजपला त्यांच्याविषयी इतका राग का? ते खरेच ‘काँग्रेसमित्र’ आणि ‘भारतशत्रू’ आहेत का?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Mallikarjun kharge loksatta
धनखड सरकारचे प्रवक्ते! मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल; हा जाट समुदायाचा अपमान भाजपचे प्रत्युत्तर
pralhad iyengar mit suspended
एमआयटीने निबंधावरून भारतीय विद्यार्थ्याला केले निलंबित; नेमकं प्रकरण काय? कोण आहे प्रल्हाद अय्यंगार?
delhi school bomb hoax
४० हून अधिक शाळांना बॉम्बच्या धमक्या, पालकांच्या चिंतेत वाढ; नेमकं प्रकरण काय?
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
Bashar al-Assad And Vladimir Putin.
Syrian Civil War : सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचं विमान खरंच क्रॅश झालं का? असद कुटुंबीयांसाठी पुतीन यांचे मोठे पाऊल
Syrian army withdrew from most of the country south on Saturday
सीरियात बंडखोरांची आगेकूच; देशाच्या दक्षिण भागातून लष्कराची माघार

हेही वाचा : Iran-Israel War: एकेकाळी मित्र असणारे दोन देश एकमेकांचे कट्टर शत्रू कसे झाले?

१९६८ ची आठवण करून देणारे आंदोलन

गेल्या आठवड्यात जेव्हा न्यूयॉर्कच्या पोलिस अधिकाऱ्यांनी कोलंबिया विद्यापीठ परिसरात प्रवेश केला आणि गाझा सॉलिडॅरिटी कॅम्प बांधलेल्या १०८ विद्यार्थी आंदोलकांना अटक केली, तेव्हापासून या आंदोलनांनी हिंसक रूप घेतले. कोलंबियाचे विद्यार्थी आयव्ही लीग स्कूलला इस्रायलशी संबंध असलेल्या कंपन्या आणि संस्थांपासून दूर जाण्याची मागणी करत आहेत. न्यूयॉर्क शहर पोलिस विभागाने (NYPD) स्वतः शांततापूर्ण निषेध म्हणून वर्णन केलेल्या आंदोलकांवर कारवाई केल्याने अनेकांना धक्का बसला. परंतु, खरे सांगायचे झाले तर कोलंबिया विद्यापीठासह अमेरिकेच्या इतिहासतही अगदी या घटनेशी सुसंगत अशी घटना घडली होती.

३० एप्रिल १९६८ रोजी कोलंबिया विद्यापीठाचे अध्यक्ष जी. एल. कर्क यांनी सुमारे एक हजार पोलिस अधिकाऱ्यांना बोलावले होते. जसे या वेळी, कोलंबियाचे अध्यक्ष मिनोचे शफीक यांनी पोलिसांना बोलावले होते, अगदी तसेच. त्यावेळी विद्यार्थी अमेरिकेच्या व्हिएतनाममधील युद्धाचा, पेंटागॉनशी संबंधित थिंक टँकचा विद्यापीठाशी असणारा संबंध आणि वर्णद्वेषी विद्यापीठ धोरणांचा निषेध करत होते. एका आठवड्यापेक्षा जास्त काळ हा निषेध सुरू होता आणि विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या पाच इमारतींवर ताबा मिळवला होता. ३० एप्रिल रोजी पोलिसांच्या हिंसक कारवाईनंतर १०० हून अधिक आंदोलक जखमी झाले आणि तब्बल ७०० जणांना अटक झाली. यापूर्वीही अमेरिकेत अशी अनेक आंदोलने झाली.

ग्रीन्सबोरो सिट-इन्स

ग्रीन्सबोरो आंदोलन अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात प्रभावशाली विद्यार्थी आंदोलनांपैकी एक होते. १ फेब्रुवारी १९६० रोजी ग्रीन्सबोरो येथील नॉर्थ कॅरोलिना येथे चार कृष्णवर्णीय किशोरांनी एका कॅफेमध्ये प्रवेश केला आणि गौरवर्णीयांच्या लंच टेबलवर बसले. त्यांना त्या जागेवरून उठण्यास सांगितल्यावर त्यांनी नकार दिला. त्यानंतरच या आंदोलनाला सुरुवात झाली.

ग्रीन्सबोरो आंदोलन अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात प्रभावशाली विद्यार्थी आंदोलनांपैकी एक होते. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

ग्रीन्सबोरोच्या वर्णद्वेषी धोरणांमुळे कृष्णवर्णीयांच्या सतत होत असलेल्या अपमानामुळे कृष्णवर्णीयांनी याच्या निषेधार्थ आंदोलन सुरू केले. तरुण कृष्णवर्णीयांनी आपला राग व्यक्त केला. त्यांना मोठे होत असताना भोगाव्या लागलेल्या अपमानाबद्दल आणि गुलामगिरीतून मुक्त झाल्याच्या एक शतकानंतरही त्यांना सतत भेदभावाचा सामना करावा लागला असल्याचे त्यांनी सांगितले. या आंदोलनामुळे १९६४ मध्ये नागरी हक्क कायदा मंजूर झाला, ज्याने प्रथमच सर्व सार्वजनिक जागांवर होत असलेला वांशिक भेदभाव बेकायदेशीर असल्याचे सांगितले.

“या आंदोलनापूर्वीही कृष्णवर्णीयांबरोबर सुरू असलेल्या भेदभावामुळे अनेक आंदोलने करण्यात आली, मात्र सरकारने प्रतिसाद दिला नाही”, असे इतिहासकार विल्यम सी. चाफे यांनी ‘सिव्हिलिटीज अँड सिव्हिल राइट्स: ग्रीन्सबोरो, नॉर्थ कॅरोलिना आणि ब्लॅक स्ट्रगल फॉर फ्रीडम (१९८०) मध्ये लिहिले. “इतिहासात हा कायदा मंजूर झाल्याने तेव्हाच्या बोस्टन टी पार्टीला सामाजिक व्यवस्थेतील क्रांतिकारक बदलांचे आश्रयदाता म्हणून स्थान मिळाले”, असेही त्यांनी या पुस्तकात लिहिले.

केंट स्टेट गोळीबार

अमेरिकेच्या इतिहासातील हे आंदोलन कधीही विसरले जाऊ शकत नाही, कारण यात निःशस्त्रांचा बळी गेला. ४ मे १९७० रोजी केंट स्टेट विद्यापीठात ओहायो नॅशनल गार्डने चार जणांची हत्या केली आणि इतर नऊ निःशस्त्र केंट स्टेट विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना जखमी केले. अमेरिकेच्या लष्करी दलांनी व्हिएतनाम युद्धाच्या कंबोडियामध्ये वाढवलेल्या सहभागाचा आणि विद्यापीठ परिसरात नॅशनल गार्डच्या उपस्थितीचा निषेध करत शांतता रॅली काढली. त्याच दरम्यान हा हल्ला झाला. अमेरिकेच्या इतिहासात युद्धविरोधी आंदोलनात विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना होती. गोळीबारामुळे देशभरातील विद्यापीठांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात आला. शेकडो विद्यापीठे, महाविद्यालये आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये आयोजित वॉक-आउटमध्ये चार दशलक्षाहून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला. वादग्रस्त व्हिएतनाम युद्धामुळे अमेरिकेच्या जनमतावरही प्रभाव पडला होता, त्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण होती.

केंट स्टेट विद्यापीठात ओहायो नॅशनल गार्डने चार जणांची हत्या केली होती. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

विद्यार्थ्यांच्या निषेधाचा इतिहास

इतिहासकार जेरार्ड डी. ग्रूट यांनी लिहिले, “विद्यार्थी अनेकदा सामाजिक कट्टरतावादाने प्रभावित असतात. “तरुणांची समजून घेण्याची क्षमता, भोळसटपणा, अधिकाराचा अनादर, साहसाकडे असणारे आकर्षण या गोष्टी अशा परिस्थितीस कारणीभूत असतात”, असे त्यांनी ‘द कल्चर ऑफ प्रोटेस्ट’ इन स्टुडंट प्रोटेस्ट्स: द सिक्सटिझ अँड आफ्टर, १९९८ या पुस्तकात लिहिले आहे.

अमेरिकेतील सर्वात जुने विद्यार्थी आंदोलन अमेरिकन क्रांतीपूर्वीचे होते. १७६६ मध्ये हार्वर्डच्या विद्यार्थ्यांनी ‘बटर रिबेलियन’ आंदोलन केले. डायनिंग हॉलमध्ये भेसळयुक्त लोणी दिल्यामुळे हे आंदोलन करण्यात आले. इतिहासकार जे. एंगस जॉनस्टोन यांनी लिहिले, “अमेरिकन विद्यार्थ्यांनी १७६० च्या दशकात क्राउन आणि १८३० मध्ये गुलामगिरीच्या विरोधात आंदोलन केले. काही जणांनी व्हिएतनाम युद्धाच्या एक शतक आधी, म्हणजे १८६० मध्ये आंदोलन केले. ”

हेही वाचा : पुरामुळे अस्ताव्यस्त झालेल्या युएईला पूर्वपदावर आणायला किती खर्च येणार?

१९६०-७० नंतरची आंदोलने वर्णभेदाविरोधात

१९६० नंतर, अमेरिकेतील विद्यापीठात झालेली प्रमुख आंदोलने दक्षिण आफ्रिकेच्या वर्णभेदाविरोधात होती. वर्णद्वेषाविरोधातील ही आंदोलने दक्षिण आफ्रिकेतील शाळांपासून ते अमेरिकेतील विद्यापीठांपर्यंत सुरू होती. या आंदोलनांमध्ये विद्यार्थ्यांनी विद्यापीठांवर ताबा मिळवला आणि दक्षिण आफ्रिकेतील गरीब कृष्णवर्णीय लोक राहत असलेल्या ठिकाणांप्रमाणेच विद्यापीठ परिसराच्या मध्यभागी शॅन्टीटाउन बांधले. २०१० दरम्यानदेखील ‘ब्लॅक लाईव्ज मॅटर’ चळवळीदरम्यान अमेरिकेच्या विद्यापीठांमध्ये तीव्र निषेध दिसून आला. अनेक विद्यापीठातील विद्यार्थ्यांना या चळवळीमुळे नकारात्मक परिणामांचा सामना करावा लागला. २०१४ नंतर ‘ब्लॅक लाईव्ज मॅटर’ च्या घोषणा पुन्हा सुरू झाल्या. एका गौरवर्णीय पोलिस अधिकार्‍याने कृष्णवर्णीय व्यक्तिला अटक करताना त्याच्या मानेवर गुडघा ठेवल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर संपूर्ण सामाजिक माध्यमांवर ‘ब्लॅक लाईव्ज मॅटर’ हा हॅशटॅग व्हायरल झाला. वर्णभेदाविरोधात मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरले, आणि एका मोठ्या आंदोलनाला सुरूवात झाली.

Story img Loader