७ ऑक्टोबर २०२३च्या सकाळी ‘हमास’ने इस्रायलमध्ये अतिरेकी हल्ला केल्यानंतर त्याला उत्तर म्हणून इस्रायली पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी गाझा पट्टीत सैन्य घुसविले. वर्षभरात युद्धाची व्याप्ती वाढली असून इस्रायलची उत्तर सीमाही धुमसत आहे. मात्र या काळात इस्रायलने गाझामधील हमास आणि लेबनॉनमधील हेझबोला या अतिरेकी संघटनांच्या म्होरक्यांसह तब्बल १६ बडे नेते, अधिकारी टिपले. हमासचा सर्वोच्च नेता याह्या सिनवार हे या यादीतील सर्वात अलिकडचे आणि सर्वांत मोठे नाव… यानिमित्ताने वर्षभरात इस्रायलने ठार केलेल्या अतिरेकी नेत्यांचे हे थोडक्यात विश्लेषण…

याह्या सिनवार

७ ऑक्टोबरच्या हल्ल्याचा ‘मास्टरमाइंड’ असल्याचे जाहीर करून इस्रायलने सिनवारच्या हत्येचा विडा उचलला आणि युद्ध छेडले. तब्बल ४४ हजार पॅलेस्टिनींना ठार केल्यानंतर आणि जवळजवळ संपूर्ण गाझा पट्टी उद्ध्वस्त केल्यानंतर, १७ ऑक्टोबर रोजी याह्या लष्करी कारवाईत मारला गेल्याचे इस्रायलने जाहीर केले. सिनवार हा हमासच्या लष्करी आघाडीचा सर्वोच्च नेता होता. पॅलेस्टिनींच्या प्रदेशात इस्रायलच्या राजवटीला विरोध, हे त्याच्या राजकारणाचे मध्यवर्ती धोरण. गाझा पट्टी आणि पश्चिम किनारपट्टी येथील राजवटींमध्ये हमासला स्थान असावे, हा त्याचा प्रयत्न होता.

Crime NEws
कुवैतहून थेट मध्य प्रदेश गाठलं अन् मुलीवर लैंगिक शोषण करणाऱ्याचा घेतला जीव; मृत्यूचं गुढ उकलायला वडिलांनीच केली मदत!
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
syria civil war marathi news
सीरियातील अचानक सत्ताबदलाने कुणाला काय मिळणार? रशिया-इराणचे नुकसान कसे? तुर्कीये-इस्रायलचा फायदा कसा?
challenges in front of Syria
सीरियातील आव्हाने संपणार कशी?
Bashar al-Assad
Bashar al-Assad: सीरियाचा नेता की क्रूर राजवटीचा चेहरा? बशर अल-असद कोण आहे?
Aba Bagul, Parvati Assembly Constituency,
‘बंडखोर’ आबांचे घरवापसीसाठी ‘आर्जव’
Syria, Abu Mohammad Al Jolani, dictatorship Syria,
विश्लेषण : जिहादीचा बनला प्रशासक… कोण आहे सीरियाचा नवा शासक अबू मोहम्मद अल जोलानी?
Bashar al-Assad And Vladimir Putin.
Syrian Civil War : सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचं विमान खरंच क्रॅश झालं का? असद कुटुंबीयांसाठी पुतीन यांचे मोठे पाऊल

हेही वाचा >>> Diabetes ‘Smart’ Insulin:मधुमेहाच्या रुग्णांसाठी आता ‘स्मार्ट’ इन्सुलिन; काय सांगते नवीन संशोधन?

हसन नसरल्ला

गाझावर हल्ला केलेल्या लेबनॉनमध्ये प्रचंड दबदबा असलेल्या हेझबोला या संघटनेने उत्तर दिशेने इस्रायलवर हल्ले वाढविले. इस्रायलचे लक्ष विचलित करण्यासाठी आणि कुमक विभागण्यासाठी हेझबोलाचा नेता सय्यद हसन नरसल्ला याने ही खेळी खेळली खरी, मात्र अमेरिकेच्या भक्कम पाठिंब्यामुळे ‘बलाढ्य’ असलेल्या इस्रायलने २८ सप्टेंबर रोजी लेबनॉनची राजधानी बैरूतमध्ये हेझबोलाच्या मुख्यालयावर हल्ला करून नरसल्ला याला ठार केले. इराणच्या ‘ॲक्सिस ऑफ रेझिस्टन्स’मधील सर्वांत मोठी संघटना असलेल्या हेझबोलाने नरसल्लाच्या नेतृत्वाखाली अनेक दशके इस्रायलला झुंजवत ठेवले होते.

इस्मायल हनिये

सिनवार आणि नरसल्ला यांचा खात्मा होण्याआधी हनिये हा इस्रायलचे युद्धकाळात टिपलेला सर्वांत मोठा नेता होता. २०१७ पासून तो हमासच्या राजकीय आघाडीचा नेता होता. विशेष म्हणजे सिनवार दडून बसला असताना हनिये हा इस्रायलबरोबर वाटाघाटींसाठी पुढाकार घेत होता. असे असताना ३१ जुलै रोजी इराणची राजधानी तेहरानमध्ये कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्राचा हल्ला करून हनियेची हत्या करण्यात आली. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने यासाठी इस्रायलच जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.

फताह शरीफ

लेबनॉनमधील हमास संघटनेचा नेता असलेला शरीफी ३० सप्टेंबर रोजी इस्रायलच्या हल्ल्यात मारला गेला. तो लेबनॉनमध्ये राहून इस्रायलच्या भोवताली असलेल्या अन्य अरब देशांमधील दहशतवादी संघटनांना मदत करीत असल्याचा आरोप इस्रायलने केला आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : रायगड जिल्हा बनलाय बेवारस मृतदेहांचे ‘डम्पिंग ग्राउंड’? कारणे काय? पोलिसांसमोर कोणती आव्हाने?

अली कराकी

नरसल्ला ठार झाला त्याच हवाई हल्ल्यात हेझबोलाच्या सर्वोच्च कमांडरांपैकी एक, अली कराकी मारला गेला. एका भूमिगत बंकरला लक्ष्य करून लहानमोठे २० पेक्षा जास्त दहशतवादी मारल्याचा इस्रायली लष्कराचा दावा आहे.

नबिल कौक

हेझबोलाच्या केंद्रीय परिषदेचा उपप्रमुख असलेला कौक २८ सप्टेंबर रोजी केलेल्या हवाई हल्ल्यात मारला गेला.

मोहम्मद श्रुर

हेझबोलाने यावेळी प्रथमच इस्रायलविरोधात ड्रोनचा वापर केला आहे. श्रुर हा या ड्रोन तुकडीचा प्रमुख होता. त्याच्याच नेतृत्वाखाली युद्धाच्या सुरुवातीच्या काळात इस्रायलच्या उत्तर भागातील गावांवर हल्ले करण्यात आले होते.

इब्राहिम कुबेसी

हेझबोलाच्या क्षेपणास्त्र तुकडीचे नेतृत्व कुबेसी याच्याकडे होते. इस्रायली सैन्याच्या म्हणण्यानुसार त्यानेच २००० साली उत्तर सीमेवर तीन इस्रायली सैनिकांचे अपहरण करून त्यांच्या हत्येचा कट आखला आणि अमलात आणला. चार वर्षांनंतर कैद्यांच्या अदलाबदलीत या चौघांचे मृतदेह इस्रायलकडे सोपविण्यात आले.

इब्राहिम अकील

हेझबोलाचा ऑपरेशन कमांडर असलेला अकील हा २० सप्टेंबरच्या हल्ल्यात मारला गेला. १९८३मधील बैरूतमध्ये अमेरिकेचा दूतावास आणि बराकीवर केलेल्या दुहेरी ट्रक बॉम्बहल्ल्याचा तो मास्टरमाइंड होता. या हल्ल्यात तब्बल ३०० अमेरिकन नागरिक मारले गेले होते. अकीलच्या नावापुढे ७० लाख डॉलरचे इनाम होते.

अहमद महमूद वहाबी

वहाबीदेखील बैरूतच्या एका उपनगरात २० सप्टेंबर रोजी इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात मारला गेला. तो हेझबोलाच्या वरिष्ठ कमांडरपैकी एक होता. ‘रडवान स्पेशल फोर्स’च्या लष्करी कामगिरीवर देखरेख करण्याचे काम त्याच्यावर सोपविण्यात आले होते.

फौद शुक्र

हेझबोलाच्या सर्वोच्च कमांडरपैकी एक असलेला शुक्र ३० जुलैच्या हल्ल्यात ठार झाला. १९८२मध्ये इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने हेझबोलाची स्थापना केल्यापासून तो संघटनेच्या प्रमुख लष्करी नेत्यांपैकी एक होता.

मोहम्मद नासेर

नासेर ३ जुलै रोजी इस्रायली हवाई हल्ल्यात ठार झाला. नैर्ऋत्य लेबनॉनमधून गोळीबार करण्याची जबाबदारी त्याच्यावर असल्याचा इस्रायली लष्कराचा दावा आहे. लेबनॉनमधील सूत्रांच्या माहितीनुसार नासेर हा हेझबोलाचा वरिष्ठ कमांडर होता आणि प्रामुख्याने सीमावर्ती भागांतील कारवाईचे काम त्याच्याकडे देण्यात आले होते.

तालेब अब्दल्ला

हेझबोलाच्या लष्करी शाखेत नासेरइतकाच हुद्दा असलेला अब्दल्लाकडे मध्य लेबनॉनमधील कारवायांची सूत्रे असल्याचे सांगितले जाते. १२ जून रोजी दक्षिण लेबनॉनमधील एका नियंत्रण कक्षावर केलेल्या हल्ल्यात अब्दल्ला मारला गेल्याचा दावा इस्रायली लष्कराने केला आहे.

मोहम्मद दैफ

२००० सालापासून इस्रायलच्या ‘हिट लिस्ट’वर असलेला हमासचा अतिरेकी दैफ १ ऑगस्ट रोजी गाझामधील कारवाईदरम्यान ठार झाला.

सालेह अल अरोरी

लेबनॉनवरील हल्ल्यांची तीव्रता वाढविण्याच्या कितीतरी आधी, २ जानेवारी रोजी इस्रायली ड्रोन हल्ल्यात अरोरी मारला गेला. दक्षिण बैरूतच्या दहियाह या उपनगरात हा हल्ला झाला होता. हमासची लष्करी शाखा, कासम ब्रिगेडचा संस्थापक असलेल्या अरोरीची हत्या हा हमास-हेझबोलाला बसलेला पहिला मोठा धक्का होता.

मरवान इसा

गाझामधील कारवाईदरम्यान मार्चमध्ये हमासचाा लष्करी उप कमांडर इसा मारला गेला. दैफ आणि सिनवार यांच्याप्रमाणेच तोदेखील मोस्ट वाँटेड यादीत अग्रस्थानी असल्याचे इस्रायली लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले.

Story img Loader