इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवाद्यांत युद्ध पेटले आहे. शनिवारी (७ ऑक्टोबर) पॅलेस्टाईनमधील हमास या संघटनेने इस्रायलवर क्षेपणास्त्र डागल्यानंतर या युद्धाला सुरुवात झाली आहे. प्रत्युत्तरादाखल इस्रायलनेही पॅलेस्टाईनवर हल्ले केले आहेत. या युद्धात आतापर्यंत ११०० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले असून शेकडो नागरिक जखमी झाले आहेत. दोन्ही बाजूने मोठी जीवित तसेच वित्तहानी झालेली पाहायला मिळत आहे. असे असतानाच हमास या अतिरेकी संघटनेच्या लष्करी शाखेचा नेता मोहम्मद देईफ याची सगळीकडे चर्चा होत आहे. हा देईफ नेमका कोण आहे? हमास आणि देईफचा काय संबंध आहे? अमेरिकेने त्याला दहशतवादी म्हणून का घोषित केलेले आहे? तसेच इस्रायलने त्याला अनेकवेळा मारण्याचा प्रयत्न का केलेला आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या…

हल्ल्यानंतर देईफने दिली प्रतिक्रिया

इस्रायलवर हल्ला केल्यानंतर हमास आणि इस्लामिक जिहाद नावाच्या एका गटाने इस्रायलच्या १३० पेक्षा अधिक नागरिकांना कैद करून गाझामध्ये नेले आहे. ओलीस ठेवलेल्या या नागरिकांच्या बदल्यात कैद केलेल्या हजारो पॅलेस्टिनींना सोडून देण्याची मागणी हमासकडून केली जाण्याची शक्यता आहे. असोशिएटेड प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार या हल्ल्यानंतर मोहम्मद देईफ याने एक संदेश दिला आहे. “गेल्या १६ वर्षांपासून गाझा या प्रदेशाची नाकेबंदी करण्यात आलेली आहे. या नाकेबंदीच्या निषेधार्थ तसेच नुकत्याच इस्रायली आणि पॅलेस्टिनींमध्ये घडलेल्या घटनांमुळे निर्माण झालेल्या तणावाला प्रत्युत्तर म्हणून ‘अल अक्सा स्टोर्म’ ही मोहीम राबवण्यात आली,” असे देईफ म्हणाला.

two militants killed in a joint operation by army and police in jammu and kashmir
दोन दहशतवादी ठार ; काश्मीरमध्ये निवडणुकीच्या रणधुमाळीत घातपाताचा कट उधळला
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Pakistani Arrested IN US
Pakistani Arrested : २० वर्षीय पाकिस्तानी तरुणाला अटक, अमेरिकेत ९/११ सारखा मोठा हल्ला घडवण्याचा कट रचल्याच्या आरोपानंतर कारवाई
women raped in indore
Raped In Indore: महिलेला विवस्त्र करत मारहाण आणि बलात्कार, नृत्य करण्यास भाग पाडले; आरोपी भाजपाशी संबंधित असल्याची काँग्रेसची टीका
russia missile strike on ukraine
Russia Attack On Ukraine : रशियाचा युक्रेनवर पुन्हा क्षेपणास्र हल्ला, पोल्टावामधील लष्करी शिक्षण संस्थेला केलं लक्ष्य; ५० जणांचा मृत्यू, २७१ जखमी
protest against netyanahu in israel
ओलिसांच्या हत्येमुळे इस्रायलमध्ये आंदोलन पेटले; कारण काय? मारले गेलेले सहा ओलिस कोण होते? त्यांची हत्या का करण्यात आली?
Outrage in Israel over hostage killing
ओलिसांच्या हत्येमुळे इस्रायलमध्ये संताप,नेतान्याहू जबाबदार असल्याचा आरोप; युद्ध थांबवण्याची मागणी
Vadodara Politics Gujarat Floods
Vadodara Politics : भाजपाला वडोदरामध्ये लोकांच्या रोषाचा सामना का करावा लागतोय? जनतेच्या संतापाचं कारण काय?

मोहम्मद देईफ कोण आहे?

मोहम्मद देईफ हा हमास या अतिरेकी संघटनेच्या लष्करी शाखेचा प्रमुख आहे. २००२ सालापासून तो ही जबाबदारी सांभाळतो आहे. फायनान्शिअल टाईम्समध्ये देईफबाबतची अधिक माहिती देण्यात आलेली आहे. या वृत्तानुसार मोहम्मद देईफ याचे पूर्ण नाव मोहम्मद दियाब इब्राहीम अल-मास्री असे आहे. त्याचा जन्म १९६० च्या दशकात गाझा येथील एका निर्वासितांच्या शिबिरात झाला. त्या काळात सध्या पॅलेस्टाईनमध्ये असलेल्या गाझा या प्रदेशावर इजिप्तची सत्ता (१९४८ ते १९६७) होती. पुढे १९६७ ते २००५ या काळात हा भाग इस्रायलच्या ताब्यात होता. २००५ ते २००७ या काळात या भागावर पॅलेस्टाईनची सत्ता होती. २००७ नंतर आता हा भाग हमास संघटनेच्या नियंत्रणात आहे. १९५० च्या दशकात सशस्त्र पॅलेस्टिनींनी इस्रायलवर हल्ला केला होता. देईफ याचे वडील किंवा काकादेखील या हल्ल्यात सहभागी होते, असे म्हटले जाते. देईफने इस्लामिक युनिव्हर्सिटी ऑफ गाझा येथून शिक्षण घेतलेले आहे.

देईफने हमासमध्ये काय भूमिका पार पाडली?

१९८० दशकाच्या उत्तरार्धात हमास या संघटनेची स्थापना झाली. १९६७ साली इजिप्त आणि सीरियाशी सहा दिवसांच्या युद्धात विजय मिळवून इस्रायलने वेस्ट बँक, गाझापट्टी आणि पूर्व जेरुसलेमवर ताबा मिळवला होता. याच काळात पॅलेस्टाईनमधील आर्थिक अडचणी आणि सततच्या हिंसाचारामुळे पॅलेस्टिनींमध्ये इस्रायलविरोधातला राग धुमसत होता. परिणामी आगामी काळात पहिल्या पॅलेस्टिनींचा पहिला इंतिफादा (बंड, उठाव) झाला. त्यानंतर हमास या संघटनेची स्थापना झाली होती. फायनान्शियल टाईम्सच्या वृत्तानुसार पहिल्या इंतिफादादरम्यान देईफ हा साधारण २० वर्षांचा होता. इस्रायलने देईफला तुरुंगात टाकले होते. आत्मघाती बॉम्बहल्ल्यासाठी लोकांना उद्युक्त केल्याचा त्याचावर आरोप करण्यात आला होता.

ओस्ले कराराला हमासने केला होता विरोध

या आत्मघाती बॉम्बहल्ल्यांना ओस्ले कराराची पार्श्वभूमी होती. इस्रायल आणि पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन (पीएलओ) यांच्यात १९९० मध्ये ओस्ले करार झाला होता. पॅलेस्टाईनला देशाचा दर्जा मिळावा हा उद्देश ठेवून हा करार करण्यात आला होता. मात्र या कराराला हमासने विरोध केला होता. १९४८ सालच्या अरब राष्ट्र आणि इस्रायलच्या युद्धात इस्रायलने पॅलेस्टाईन प्रदेशावर ताबा मिळवला होता. याच कारणामुळे हमासने या कराराला विरोध केला होता. हा करार म्हणजे पॅलेस्टाईनने आपला प्रदेश गमावण्यासारखे आहे, अशी भूमिका हमासने घेतली होती. पुढे याच कराराला विरोध म्हणून हमासने आत्मघाती बॉम्बस्फोट घडवून आणले होते. हेच आत्मघाती बॉम्बस्फोट घडवून आणण्यात देईफने भूमिका बजावली होती, असा दावा इस्रायलकडून केला जातो.

बॉम्ब तयार करण्याचे घेतले प्रशिक्षण

देईफने बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण घेतलेले आहे, असे फायनान्शियल टाईम्सने आपल्या वृत्तात म्हटले आहे. या वृत्तानुसार “याह्या अय्यश या व्यक्तीने देईफला बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण दिले होते. अय्यश याला इंजिनिअर या टोपण नावाने ओळखले जाते. याच अय्यशला पुढे १९९६ साली इस्रायलने फोनच्या माध्यमातून स्फोट घडवून ठार केले होते.”

देईफला संपवण्याचे अनेक प्रयत्न

देईफ याला अनेकवेळा मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याबाबत बीबीसीने एक वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार जुलै २००२ मध्ये देईफने हमासच्या लष्करी शाखेच्या प्रमुखपदाची जबाबादारी स्वीकारली होती. इस्रायलमध्ये देईफ हा मोस्ट वॉन्टेंड दहशतवाद्यांच्या यादीत होता. इस्रायली लष्कराने त्याला मारण्याचा अनेकवेळा प्रयत्न केलेला आहे. मात्र प्रत्येकवेळी तो निसटण्यात यशस्वी ठरलेला आहे. ज्या वर्षी त्याने हमासच्या लष्करी शाखेचे प्रमुखपद स्वीकारले होते, तेव्हा इस्रायलने गाझा शहराच्या जवळ त्याच्या कारवर हेलिकॉप्टरच्या माध्यमातून क्षेपणास्त्र डागले होते. या हल्ल्यात हमासच्या दोन सदस्यांचा मृत्यू झाला होता. तसेच अन्य ४० लोक जखमी झाले होते. यामध्ये १५ मुलांचा समावेश होता.

देईफच्या घरावर डागली होती क्षेपणास्त्रे

अमेरिकनेही त्याला दहशतवादी म्हणून घोषित केलेले आहे. “२०१४ सालच्या इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षाचा मास्टरमाईंड हा हमासचा लष्करी शाखेचा प्रमुख देईफ हाच होता,” असे अमेरिकेने म्हटलेले आहे. इस्रायलने देईफच्या घरावर क्षेपणास्त्रे डागून त्याला ठार करण्याचा प्रयत्न केला होता. या हल्ल्यात देईफची पत्नी आणि सात महिन्यांचे मूल यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जाते. याबाबतची माहिती इस्रायलने २०१४ साली दिली होती.

देईफला हात, पाय आणि एक डोळा नाही?

इस्रायलच्या या हल्ल्यानंतर न्यूयॉर्क टाईम्सने सुरक्षा क्षेत्रातील तज्ज्ञ इस्रायली पत्रकार रोनेन बर्गमन यांचा हवाला देत देईफवरील हल्ल्यांची माहिती देणारे एक वृत्त प्रकाशित केले होते. “हमास संघटनेतील देईफ ही एकमेव अशी व्यक्ती आहे, जी अनेक हल्ल्यांतून वाचलेली आहे. या हल्ल्यांतून अनेकवेळा वाचल्यामुळे पॅलेस्टिनींमध्ये त्याची प्रतिष्ठ वाढली,” असे न्यूयॉर्क टाईम्समध्ये सांगण्यात आले होते. त्याला अनेकवेळा मारण्याचा प्रयत्न झाल्यामुळे त्याच्या शरीरावर अनेक जखमा असल्याचे म्हटले जाते. त्याला पाय आणि हात नसल्याचाही अनेकजण दावा करतात. त्याचा एक डोळा निकामी असल्याचाही दावा अनेकजण करतात.