इस्रायलच्या हवाई हल्ल्यात शुक्रवारी (२७ सप्टेंबर) हिजबुल या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हसन नसरल्लाहचा मृत्यू झाला. हसन नसरल्लाह इस्रायलच्या सर्वांत मोठ्या शत्रूंपैकी एक होता. तो बऱ्याच काळापासून आपली ठिकाणे बदलत राहून स्वतःला सुरक्षित ठेवत होता. या हल्ल्यापूर्वीही त्याला लक्ष्य करून अनेक हल्ले करण्यात आले होते; मात्र त्या सर्व हल्ल्यांतून तो वाचत आला होता. अखेर, त्याची हत्या करण्यात इस्रायलला यश आले आहे. इस्रायलने दक्षिण बेरूतमधील या गटाच्या कमांड मुख्यालयावर हल्ला करून, हसन नसरल्लाहला ठार केले. इस्रायलने पेजर्स आणि वॉकी-टॉकी हल्ले घडवून आणल्यानंतर हिजबुलला लक्ष्य केल्यानंतर ही घटना घडली आहे. इस्रायलच्या हेरगिरीने दहशतवादी गट हादरला आहे. इस्रायली सैन्याने त्यांना कसे ठार केले? इस्रायलने हसन नसरल्लाहच्या ठिकाणाचा शोध कसा घेतला? त्याविषयी जाणून घेऊ.

इस्रायलने हसन नसरल्लाहचा कसा घेतला शोध?

इस्रायल आणि हिजबुलमध्ये जवळपास एक वर्षापासून हिंसक संघर्ष सुरू आहे. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर या संघर्षाला सुरुवात झाली. परंतु, इस्रायलने या वर्षी १७ सप्टेंबर रोजी हिजबुलच्या पेजचा स्फोट करून आक्रमक कारवाई केली. त्यानंतर वॉकी-टॉकीचाही स्फोट घडवून आणला. या स्फोटक उपकरणांची जबाबदारी इस्रायलने स्वीकारली नसली तरी त्यांनी या हल्ल्यांद्वारे हिजबुलचे संप्रेषण कमकुवत केले. शुक्रवारी बेरूतमध्ये इस्रायलने हवाई हल्ला केला, ज्यात नसरल्लाह मारला गेला. इस्रायल हिजबुल प्रमुख नसरल्लाह बर्‍याच काळापासून लक्ष ठेवून होता. अनेक महिन्यांपासून त्याचा ठावठिकाणा त्यांना माहीत होता.

Air Strike in hijbullah
Israeli Air Strike : इस्रायलचा हेजबोलाच्या मुख्यालयावर हवाई हल्ला, दहशतवादी हसन नसराल्लाह ठार?
Amitabh Bachchan And Rajesh Khanna
“आम्ही अमिताभ बच्चन यांना आणून राजेश खन्नाचे करिअर…
Israel war attack against Hezbollah continues
इस्रायलचा युद्धविरामास नकार,अमेरिकेसह मित्रदेशांचा प्रस्ताव धुडकावला; हेजबोलाविरोधात संघर्ष सुरूच
Israel-Lebanon conflict,
लेबनॉनशी युद्धविरामाची अमेरिकेची सूचना इस्रायलनं फेटाळली; सर्वशक्तिनिशी हेजबोलाशी लढण्याचे लष्कराला आदेश!
Israel army chief has signaled preparations for a military incursion into Lebanon
लेबनॉनमध्ये सैन्य घुसवण्याची तयारी,इस्रायल लष्करप्रमुखांचे संकेत; हेजबोलाचा क्षेपणास्त्राने हल्ला
thackeray group criticized pm narendra modi
“पंतप्रधान मोदींना मणिपूरपेक्षा रशिया-युक्रेन युद्धाची काळजी” ठाकरे गटाचं मोदी सरकारवर टीकास्र; म्हणाले…
loksatta analysis osama bin laden s son hamza is alive preparing to attack
ओसामा बिन लादेनचा मुलगा जिवंत? अल कायदाचा म्होरक्या बनून ९/११ सारख्या हल्ल्याची तयारी करतोय? नवीन माहितीमुळे खळबळ!
russian spy whale death
नॉर्वेमध्ये मृतावस्थेत आढळलेल्या रशियन गुप्तहेर व्हेलची कहाणी; हेरगिरीसाठी कसा केला जातो प्राण्यांचा वापर?
इस्रायलने दक्षिण बेरूतमधील या गटाच्या कमांड मुख्यालयावर हल्ला करून, हसन नसरल्लाहला ठार केले. (छायाचित्र-एपी)

हेही वाचा : मंगळावरील मातीच ठरली विनाशकारी? मंगळावरील जीवन कसे संपले? नवीन अभ्यासातून गूढ उलगडलं

हिजबुलच्या मुख्यालयावर हल्ला करण्याचा निर्णय घेण्यात आला. कारण- इस्रायली नेत्यांना असा विश्वास होता की, नसरल्लाह याच ठिकाणी आहे आणि तो हे ठिकाण सोडण्यापूर्वी हल्ला होणे आवश्यक आहे, असे तीन वरिष्ठ इस्रायली संरक्षण अधिकाऱ्यांनी ‘न्यूयॉर्क टाइम्स’ला सांगितले. लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल नदव शोशानी यांनी पत्रकारांना सांगितले, “आम्ही अनेक वर्षांपासून काम करीत असलेल्या गुप्तचर यंत्रणेची माहिती वापरली. आमच्याकडे रीअल-टाइम माहितीही होती. त्यामुळेच वेळेत आम्ही हा हल्ला केला.” इस्रायलच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर काउंटर-टेररिझम येथील रिचमन युनिव्हर्सिटीचे वरिष्ठ सहकारी रिटायर्ड कर्नल मिरी आयसेन यांनी सांगितले की, हा आमच्या दीर्घकाळ मेहनतीचा परिणाम आहे. अलीकडील काही वर्षांमध्ये इस्रायली अधिकाऱ्यांनी नसरल्लाहला संपवण्याचा पर्याय गांभीर्याने घेण्यास सुरुवात केली. मुख्य म्हणजे या हल्ल्यात मारले गेलेले नसरल्लाह आणि कमांडर दोन दिवसांपूर्वी इराणचा गुप्त दौरा करून परतले होते.

नसरल्लाहची खबर देणारा गुप्तहेर

इराण हिजबुलचा मुख्य समर्थक आहे. इराणमधीलच इस्रायलच्या गुप्तहेराने इस्रायली अधिकाऱ्यांना शुक्रवारच्या हल्ल्याच्या काही तास आधी नसरल्लाहच्या अचूक स्थानाबद्दल माहिती दिली होती. फ्रेंच वृत्तपत्र ‘ले पॅरिसियन’च्या म्हणण्यानुसार, गुप्तहेराने इस्रायली अधिकाऱ्यांना कळवले की, हिजबुल प्रमुख बेरूतच्या दक्षिणेकडील उपनगरातील दहीह येथील भूमिगत मुख्यालयात होता. इस्रायलवरील पुढील हल्ल्यांची योजना आखण्यासाठी तो संघटनेच्या प्रमुख सदस्यांना भेटत होता. लेबनीज सुरक्षा स्रोताने अशी माहिती दिली की, इराणमध्ये असलेल्या गुप्तहेराने इस्त्रायली अधिकाऱ्यांना शुक्रवारी दुपारी दहीहच्या मध्यभागी असलेल्या हिजबुलच्या मुख्यालयात नसरल्लाह असल्याची माहिती दिली.

इराणमधीलच इस्रायलच्या गुप्तहेराने इस्रायली अधिकाऱ्यांना शुक्रवारच्या हल्ल्याच्या काही तास आधी नसरल्लाहच्या अचूक स्थानाबद्दल माहिती दिली होती. (छायाचित्र-एपी)

नसरल्लाहच्या हत्येसाठी अमेरिकन बॉम्बचा वापर

इस्रायली लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल नदव शोशानी यांनी माध्यमांना सांगितले, “आमच्याकडे रिअल-टाइम इंटेलिजन्स असल्यामुळे एक संधी होती. त्यामुळे आम्हाला हा हल्ला करता आला.” सैन्याने या ऑपरेशनला ‘न्यू ऑर्डर’ म्हटले. हिजबुलचे भूमिगत मुख्यालय अत्यंत सुरक्षित होते आणि सहा निवासी इमारतींच्या संकुलाखाली ते बांधले गेले होते. एका लष्करी व्हिडीओमध्ये F15 विमाने शुक्रवारी दक्षिण इस्रायलमधील हॅटझेरिम एअरबेसवरून ऑपरेशन करण्यासाठी उड्डाण करीत असल्याचे दिसून आले. हा हल्ला करणाऱ्या इस्रायली हवाई दलाच्या पथकाच्या प्रमुखाने इस्रायलच्या आर्मी रेडिओला सांगितले की, वैमानिकांना उड्डाण भरण्याच्या काही वेळापूर्वीच लक्ष्याचा तपशील देण्यात आला होता. लेफ्टनंट कर्नल एम. म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अधिकाऱ्याने सांगितले, “ज्या दिवशी नियोजित हल्ले केले जायचे, त्या दिवसांत वैमानिकांना लक्ष्य काय होते हे माहीत नसायचे. आम्ही त्यांना काही तासांपूर्वी लक्षाविषयी माहिती देत होतो.”

आयडीएफने टेलिग्रामवर प्रकाशित केलेल्या व्हिडीओमध्ये आठ विमाने दाखवण्यात आली आहेत, जी हल्ल्यात वापरण्यात आली होती. त्यात दोन हजार पाऊंड (९०० किलो) बॉम्ब बसवण्यात आले होते; ज्यामध्ये अमेरिकेतील ‘BLU-109’ या बॉम्बचाही समावेश होता, असे ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या वृत्तात म्हटले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, नसरल्लाहला मारण्यासाठी काही मिनिटांच्या कालावधीत ८० हून अधिक बॉम्ब टाकण्यात आले. ही स्फोटके बंकर बस्टर म्हणून ओळखली जातात, जी स्फोट होण्यापूर्वी भूगर्भात प्रवेश करतात. नसरल्लाह ज्या बंकरमध्ये होता, तो बंकरही जमिनीच्या कितीतरी फूट खाली होता. विशेष म्हणजे बायडेन प्रशासनाने २०००-पाऊंड बॉम्बच्या शिपमेंटला या वर्षी मे महिन्यात गाझामध्ये त्यांच्या वापराबाबत वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर विराम दिला होता.

हेही वाचा : ‘डिझायनर पार्टी ड्रग’ म्हणून ओळखले जाणारे पिंक कोकेन काय आहे? जगभरातील तरुण त्याच्या आहारी का जात आहेत?

हल्ल्यानंतर केशरी धुराच्या ढगांनी बेरूतला वेढले. नसरल्लाहचा अखेर शेवट झाला. हवाई हल्ल्यांमुळे १६ फुटांपर्यंत खड्डे पडले, असे ‘एएफपी’ छायाचित्रकारांनी सांगितले. हल्ल्याच्या वेळी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेसाठी न्यूयॉर्कमध्ये होते. लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने या हल्ल्यात सहा मृत आणि ९१ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती दिली आहे. नसरल्लाहव्यतिरिक्त इतर प्रमुख कमांडरचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. शनिवारी हिजबुलच्या सैनिकांना नसरल्लाहचा मृतदेह आणि हिजबुलचा सर्वोच्च लष्करी कमांडर अली करकी याचा मृतदेह सापडला. नसरल्लाहचा मृत्यू हा इस्रायलसाठी मोठा विजय आहे. इस्रायली सैन्याने लेबनॉनवर हल्ला करणे सुरू ठेवले आहे. मात्र, उत्तर सीमेवर हिजबुलच्या धोक्याचा सामना करण्यासाठी ते ग्राउंड ऑपरेशन्स करतील की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.