पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनाऱ्यावर एक मोठी गोलाकार वस्तू काही आठवड्यांपूर्वी आढळून आली होती. एखाद्या यानाचा किंवा उपग्रहाचा सदर अवशेष (स्पेस डेब्रिज) असल्याचे सांगण्यात येत होते. अखेर हे अवशेष भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) रॉकेटचे असल्याचे ऑस्ट्रेलियन स्पेस एजन्सीने सोमवारी (दि. ३१ जुलै) जाहीर केले. इस्रोनेही सदर अवशेष आपल्या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाचे (पोलर सॅटेलाईट लाँच व्हेईकल- PSLV) असल्याचे म्हटले.

“समुद्रावर आढळून आलेला अवशेष हा पीएसएलव्ही प्रक्षेपकाचा असावा. दोन महिन्यांपूर्वी दक्षिण दिशेला भारतीय प्रादेशिक नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम (IRNSS) अंतर्गत कृत्रिम उपहग्रह पीएसएलव्ही प्रक्षेपकाद्वारे प्रक्षेपित करण्यात आला होता. कदाचित प्रक्षेपकाचा काही भाग खाली येत असताना पृथ्वीच्या वातावरणात पूर्णपणे नष्ट झाला नाही आणि तो समुद्रात येऊन पडला. त्यानंतर तो ऑस्ट्रेलियन किनाऱ्याकडे वाहून आला असावा”, अशी प्रतिक्रिया इस्रोकडून देण्यात आली.

Navi Mumbai Municipal Corporation Encroachment Department takes action against illegal constructions in Nerul and Ghansoli
नेरुळ, घणसोलीतील बेकायदा बांधकामांवर कारवाई; महापालिकेच्या नोटिशीकडे दुर्लक्ष करून बांधकामे
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Thane , government projects, dust, health,
सरकारी प्रकल्पांमुळेच धुळधाण, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता
kdmc steps to cut off water connection and electricity supply to 58 illegal buildings in dombivli
डोंबिवलीतील ५८ बेकायदा इमारतींमधील पाणी, वीजपुरवठा खंडित करण्याच्या हालचाली, उच्च न्यायालयाच्या आदेशावरून कारवाईचे नियोजन
3 percent errors possible in ladki bahin yojana application scrutiny
लाडकी बहीण योजनेच्या अर्ज छाननीत तीन टक्के त्रुटींचा संभव;  नाशिक विभागातील स्थिती
house damaged by falling tree branch in goregaon
गोरेगावमधील झाडाची फांदी पडून घराचे नुकसान
Rock dove bird pune, Rock dove, Municipal Corporation pune, pune,
पुणे : पारव्यांना खाद्य टाकताय सावधान…! महापालिका वसूल करणार ‘एवढा’ दंड
Cotton is a key kharif crop in India, with Maharashtra producing 90 lakh bales
बांगलादेशातील अराजकता अन् कापूस उत्पादकांना लाभ

दरम्यान, ऑस्ट्रेलियन स्पेस एजन्सीने पुढे म्हटले की, सदर अवशेष सांभाळून ठेवले असून इस्रोशी याबाबत संवाद सुरू आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अंतराळ करारांतर्गत दायित्व विचारात घेण्यासंदर्भात पुढे काय पाऊल टाकायचे, याबाबतची चर्चा दोन्ही देशांच्या अंतराळ संस्था करत आहेत. दुसरीकडे इस्रोने सांगितले की, पुढे काय करायचे याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. ऑस्ट्रेलियात जाऊन सदर अवशेषाची इस्रोच्या पथकाकडून पाहणी करावी की नाही, हे आताच सांगणे उचित ठरणार नाही.

हे वाचा >> Chandrayaan 3 चंद्राकडे निघाले, मात्र चंद्राजवळ जाणारे पहिले यान कोणत्या देशाचे होते? कधी गेले होते?

असे प्रकार सामान्य आहेत का?

अवकाशातून उपग्रह किंवा प्रक्षेपकाचे अवशेष पृथ्वीवर पडण्याच्या घटना क्वचितच घडलेल्या आहेत. अनेकदा प्रक्षेपकाच्या तुकड्यांचे पृथ्वीच्या वातावरणात घर्षण होऊन ते नष्ट होतात. जे तुकडे किंवा वस्तू पृथ्वीपर्यंत पोहोचतात, त्याचा आकार फार लहान असतो. त्यामुळे त्याची फारशी चर्चा होत नाही. तसेच या वस्तू समुद्रात कोसळत असल्यामुळे मानवी वस्तीला त्याचा शक्यतो धोका नसतो. पण, काही प्रसंगी अतिशय अवजड अवशेष कोसळल्याची उदाहरणेही आहेत. काही काळापूर्वी २५ टन चिनी प्रक्षेपकाचा मोठा भाग हिंदी महासागरात मे २०२१ रोजी कोसळला होता. पृथ्वीवर अवकाशातून वस्तू कोसळण्याचे सर्वात प्रसिद्ध प्रकरण म्हणून स्कायलॅब स्पेस स्टेशनचा उल्लेख होतो. १९७९ साली विघटन होऊन ७७ टन वजनाची अमेरिकन स्कायलॅब पृथ्वीवर कोसळली होती, तेव्हा तिचे काही तुकडे हिंदी महासागर आणि ऑस्ट्रेलियाच्या निर्जन भागात पडले होते.

हे धोकादायक आहे का?

अवकाशातून पडणाऱ्या स्पेस डेब्रिजचा धोका मानवी जीवन आणि मालमत्तेला होणार नाही, हे सांगणे कठीण आहे. अवकाशातून पृथ्वीकडे येणारे उपग्रह, प्रक्षेपकाचे अवशेष हे अधिकतर समुद्रात कोसळतात. पृथ्वीच्या ७० टक्के भागावर समुद्र असल्यामुळे बहुतेककरून असे अवशेष समुद्रात पडतात. पण, तरीही मोठ्या अवशेषामुळे सागरी जीवनाला धोका निर्माण होऊ शकतो, तसेच या वस्तू प्रदूषणास कारणीभूत ठरू शकतात.

तथापि, अवकाशातून खाली येणारे स्पेस डेब्रिज हे आतापर्यंत जमिनीवर पडून नुकसान झाल्याची नोंद नाही. जेव्हा असे अवशेष जमिनीवर पडले, तेव्हा ते निर्जन क्षेत्रावर आदळले आहेत.

हे ही वाचा >> चांद्रयान-३ : चंद्रावर संशोधन करण्यासाठी इस्रोने दक्षिण ध्रुवाची निवड का केली? इतर देश इथे का गेले नाहीत?

जर स्पेस डेब्रिजमुळे नुकसान झाले तर काय होईल?

अवकाशातील स्पेस डेब्रिजचे नियमन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नियमावली तयार करण्यात आली आहे. ज्यामध्ये क्षेपणास्त्र, प्रक्षेपक, उपग्रहाच्या निरुपयोगी वस्तूंचाही समावेश होतो. अंतराळातून स्पेस डेब्रिज पडून होणाऱ्या नुकसानाची जबाबदारी निश्चित करण्यासाठी सर्वाधिक अवकाश प्रवास करणाऱ्या देशांनी आंतरराष्ट्रीय करारावर (The Liability Convention) स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या कराराच्या माध्यमातून जगभरातील अंतराळ संस्थांनी पृथ्वीच्या बाह्य कक्षेत कशाप्रकारे समन्वय साधून काम करावे, याबाबतची नियमावली ठरविण्यात आली आहे. त्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा असा आंतरराष्ट्रीय करार मानला जातो. अवकाशातील एखाद्या वस्तूमुळे इतर देशाच्या अवकाशातील मालमत्तेला नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी निश्चित करणे हा ‘द लायबिलिटी कनव्हेन्शन’चा मुख्य उद्देश असला तरी अवकाशातील वस्तू पृथ्वीवर कोसळून नुकसान झाल्यास त्याचीही जबाबदारी या कराराने निश्चित करण्यात आली आहे.

ज्या देशाच्या प्रक्षेपणामुळे पृथ्वीवरील किंवा अवकाशातील इतर कोणत्याही वस्तूचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई देण्याचे संपूर्ण उत्तरदायित्व प्रक्षेपण करणाऱ्या देशाचे असेल, असे या करारातून स्पष्ट केले आहे. ज्या देशात अवकाशातील निरुपयोगी वस्तू किंवा स्पेस डेब्रिज कोसळेल, तो देश नुकसान झाल्यास नुकसान भरपाईचा दावा करू शकतो.

सध्याच्या प्रकरणात पीएसएलव्हीचे अवशेष कोसळून ऑस्ट्रेलियाचे काही नुकसान झाले असेल तर भारताला त्याची भरपाई करून द्यावी लागेल. जरी हे अवशेष समुद्रात कोसळून नंतर किनाऱ्यावर वाहून गेले असले तरीही नुकसान भरपाई द्यावी लागते. आंतरराष्ट्रीय कायदा, न्याय आणि समानतेच्या तत्त्वांनुसार नुकसान भरपाईची रक्कम ठरविण्यात येते.

आणखी वाचा >> इस्रोकडून आतापर्यंत ८९ वेळा प्रक्षेपण; पंतप्रधान मोदींच्या काळात किती मोहिमा झाल्या?

‘द लायबिलिटी कनव्हेन्शन’च्या तरतुदीमुळे आतापर्यंत इतिहासात एकदाच नुकसान भरपाई मिळू शकली आहे. १९७८ साली कॅनडाच्या उत्तरेकडील निर्जन प्रदेशात तत्कालीन सोव्हिएत युनियनचे किरणोत्सर्गी पदार्थ असलेले उपग्रह कोसळले होते. यासाठी कॅनडाने नुकसान भरपाईचा दावा केला होता. सोव्हिएत युनियनने तेव्हा तीन दशलक्ष कॅनेडेयिन डॉलर्सची भरपाई दिली होती.

Story img Loader