ITR दाखल करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२२ होती, ही मुदत आता संपली आहे. ३१ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत सुमारे साडेपाच कोटी लोकांनी आयटीआर भरले, परंतु बहुसंख्य लोकांनी अद्याप आयटीआर भरलेला नाही. त्यामुळे ज्यांनी आतापर्यंत आयटीआर भरले नाहीत, त्यांना आता आयकर रिटर्न भरण्यापूर्वी दंड भरावा लागेल, त्यानंतरच ते आयटीआर दाखल करू शकतील.

सरकार शेवटच्या क्षणी आयटीआर दाखल करण्याची अंतिम मुदत वाढवेल, अशी शक्यता होती. परंतु सरकारने आधीच सूचित केल्याप्रमाणे, रिटर्न भरण्याची अंतिम तारीख वाढवली नाही. बहुसंख्य लोकांनी आणि वित्तीय संस्थांनी कर विवरणपत्र भरण्याची मुदत वाढवावी, अशी मागणी सरकारकडे केली होती. परंतु सरकारने मुदत वाढवली नाही. ऑनलाइन पद्धतीने आयटीआर दाखल करताना वेबसाइटमधील त्रुटींबद्दल अनेकांनी तक्रारी केल्या होत्या. तरीही सरकारने आयटीआर भरण्याची अंतिम मुदत वाढवून देण्यास स्पष्टपणे नकार दिला.

Action will be taken against employees who refuse election work
निवडणूकीचे काम नाकारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
Loksatta explained What is the reason for the dissatisfaction of gig workers
‘गिग’ कामगारांनी साजरी केली ‘काळी दिवाळी’! त्यांच्या असंतोषाचे कारण काय? सामाजिक सुरक्षेचा लाभ किती?
devendra fadnavis assured to farmers if rate is less than guaranteed price government will pay difference
“हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्यास फरकाची रक्कम सरकार देणार,” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्‍वासन
election day fun facts election day activities voting activities on Election Day
मतदान दिनाच्या गमतीजमती!
Maharashtra government financial burden
महायुतीच्या लोकप्रिय आश्वासनांमुळे तिजोरीवर दीड ते दोन लाख कोटींचा अधिक आर्थिक भार ?

३१ जुलै २०२२ पर्यंत ज्यांनी आयटीआर दाखल केला नाही, त्यांनी आता काय करावं?
सरकारकडून मुदत वाढवली जाईल, या अपेक्षेनं ज्यांनी अद्याप आयटीआर दाखल केला नाही, त्यांना आता विलंब शुल्कासह आयटीआर दाखल करावा लागणार आहे. ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत लोकं दंडाच्या रकमेसह त्यांचं विवरणपत्र भरू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात, आयटीआर भरण्यासाठी आता कोण-कोणते पर्याय उपलब्ध आहेत? आणि दंड किती भरावा लागेल?

आयकर कायद्याच्या कलम १३९ (४) अंतर्गत विलंब शुल्कासह ITR दाखल करावा लागणार
जर तुम्हाला ३१ जुलै २०२२ पर्यंत आयटीआर दाखल करता आला नसेल, तर तुम्ही ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत आयकर कायद्याच्या कलम १३९ (४) नुसार विलंब शुल्कासह तुमचं विवरणपत्र भरू शकता. यासाठी तुम्हाला १००० ते ५००० रुपये दंड भरावा लागेल.

१००० रुपये दंड कोणाला भरावा लागणार?
तुमचं वार्षिक उत्पन्न जर पाच लाख रुपयांपेक्षा कमी असेल आणि तुम्ही अद्याप आयटीआर भरला नसेल, तर तुम्ही आजपासून ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत कधीही १ हजार रुपये दंड भरून तुमचा ITR दाखल करू शकता. तथापि, तुमचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्यास, तुम्हाला दंड म्हणून एक रुपयाही भरण्याची आवश्यकता नाही.

पाहा व्हिडीओ –

पाच हजार रुपये दंड कोणाला भरावा लागणार?
जर एखाद्या व्यक्तीचं वार्षिक उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा जास्त असेल आणि त्याने अद्याप आयटीआर दाखल केला नसेल, तर त्यांना आयटीआर दाखल करण्यासाठी पाच हजार रुपयांपर्यंत विलंब शुल्क भरावा लागणार आहे. याशिवाय थकित करावर व्याजदेखील द्यावं लागणार आहे. थकित करावरील व्याज आजपासून (१ ऑगस्ट) सुरू होईल. आयकर विभागाच्या कलम १३९ (१) नुसार आयटीआर वेळेवर भरला नाही, तर त्यांना आयटीआर भरताना थकित कर देयकावर दरमहा १ टक्के दराने व्याज द्यावं लागतं.

३१ डिसेंबर २०२२ पर्यंत आयटीआर भरला नाही तर परतावा कसा मिळेल?
तुम्ही ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत विलंब शुल्कासह आयटीआर भरला नाही, तरीही तुम्हाला रिफंड मिळू शकतो. पण त्यासाठी तुम्हाला खूप किचकट प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. परतावा मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या क्षेत्राच्या आयकर आयुक्तांकडे अपील करावं लागेल. तुमचं आयटीआर न भरण्याचं कारण योग्य असल्यास आयकर आयुक्त तुम्हाला आयटीआर भरण्याची परवानगी देऊ शकतात. त्यानंतर तुम्हाला परतावा मिळू शकतो.