अनेक आठवड्यांपासून विमान कंपन्यांना एकापाठोपाठ एक बॉम्बने उडविण्याच्या धमक्या येत होत्या. नागपूर पोलिसांनी सुमारे दोन आठवडे केलेल्या शोधानंतर १०० हून अधिक विमानांना दिलेल्या फसव्या बॉम्बच्या धमक्यांप्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेतले. जगदीश श्रीराम उईके नावाच्या व्यक्तीवर ३५४ हून अधिक फसवे ईमेल पाठविल्याचा आरोप आहे. या ईमेल्समध्ये केवळ देशभरातील उड्डाणे आणि ट्रेनच नाहीत, तर पंतप्रधान कार्यालय (पीएमओ), उच्च सरकारी अधिकारी आणि विविध आस्थापनांना दिलेल्या गंभीर धमक्यांचाही समावेश आहे. जगदीश उईके कोण आहे आणि त्याने एवढ्या मोठ्या प्रमाणावर विविध आस्थापनांना धमक्या का आणि कशा पाठवल्या? त्याविषयी जाणून घेऊ.

कोण आहे जगदीश उईके?

जगदीश उईके हा पूर्व महाराष्ट्रातील माओवादग्रस्त गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथील ३५ वर्षीय लेखक आहे. नागपूरचे पोलिस उपायुक्त लोहित मतानी यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ (टीओआय)ला सांगितले की, जगदीश उईके इयत्ता ११ वी पर्यंत शिकला आहे. तो ‘आतंकवाद- एक तुफानी राक्षस’ या दहशतवादावरील पुस्तकाचा लेखक आहे. उईकेच्या मते, “अ‍ॅमेझॉनवर ३५० रुपयांना उपलब्ध असलेले त्याचे पुस्तक दहशतवादाची सर्व सत्ये तुमच्यासमोर ठेवते आणि दहशतवादाविषयीची गुप्त माहिती देते, जी यापूर्वी कोणत्याही देशाने किंवा लेखकाने जगासमोर उघड केली नाही.” आपल्या पुस्तकाच्या कमाईतून मिळणारा ५० टक्के वाटा तो देशाच्या हितासाठी दान करणार असल्याचाही दावा करतो.

saudi arabia snowfall
सौदी अरेबियाच्या रखरखीत वाळवंटात झाली चक्क बर्फवृष्टी; कारण काय?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
donald trump latest marathi news
विश्लेषण: अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांची अनपेक्षित मुसंडी कशी?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Jagannath temple
Jagannath temple: जगन्नाथ मंदिरात कोणतेही ‘गुप्त तळघर’ सापडले नाही; पुरातत्त्व खात्याने केलेल्या सर्वेक्षणात नेमकं काय आढळलं?
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: दुसऱ्या टर्मसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा अजेंडा ठरला; पहिल्याच भाषणात केला उल्लेख, म्हणाले…
Indian culture Cambodia: ९०० वर्षे जुनी द्वारपालांची शिल्पं सापडली; कंबोडियात उलगडला भारतीय शिल्पकलेचा वारसा!

हेही वाचा : फसवे फोन कॉल ते ऑनलाइन हस्टलिंग; आजी-आजोबांच्या ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण वाढले; कारण काय? संरक्षणात्मक उपाय काय?

पोलिस आयुक्त रविंदर सिंगल यांनी ‘टीओआय’ला सांगितले की, उईकेच्या प्रेरणा वास्तविक दहशतवादाशी जोडलेल्या नसून, लोकांचे लक्ष वेधून घेण्याच्या उद्देशाने केलेला तो एक प्रसिद्धी स्टंट होता. “तो वारंवार ईमेलद्वारे त्याचे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी पंतप्रधान कार्यालय आणि इतरांकडे पाठपुरावा करीत असल्याचे दिसत होते; परंतु नंतर निराश होऊन, त्याने फसवे मेल्स पाठविण्यास सुरुवात केली,” असे त्यांनी सांगितले.

नागपूर पोलिसांनी सुमारे दोन आठवडे केलेल्या शोधानंतर १०० हून अधिक विमानांना दिलेल्या फसव्या बॉम्बच्या धमक्यांप्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेतले. (छायाचित्र-लोकसत्ता संग्रहीत)

त्याने पाठविलेल्या धमक्यांच्या ईमेलमध्ये काय?

जानेवारीपासून उईकेने कथितपणे अनेक ईमेल पाठवले; ज्यामध्ये विविध ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचा इशारा देण्यात आला होता आणि स्फोटाच्या धमक्या होत्या. २५ ते ३० ऑक्टोबरदरम्यान भारतातील ३० ठिकाणांना धोका असल्याचा दावा त्याने केला होता. त्याच्या ईमेलमध्ये केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रमुख राजकीय व्यक्ती आणि सरकारी अधिकाऱ्यांना धमक्या देण्यात आल्या होत्या. ‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार, सुरक्षा धोक्यांविषयी महत्त्वपूर्ण माहिती देण्याकरिता उईकेने अधिकाऱ्यांबरोबर बैठकीची विनंती केली होती. अधिकार्‍यांना उईकेच्या ईमेल खात्यात ३५४ ईमेल मिळाले आहेत.

ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या ईमेल ॲक्टिव्हिटीमधून एक वेगळा नमुना समोर आला; ज्यामध्ये त्याने ‘गुप्त दहशतवादी कोड : 25-MBA-5-MTR’ची माहिती असल्याचा खोटा दावा केला होता. त्याच्या एका ईमेलमध्ये इंडिगो, विस्तारा, स्पाईसजेट व एअर इंडिया यांसारख्या प्रमुख एअरलाइन्सच्या ३१ उड्डाणांना हायजॅक करण्याची धमकी देण्यात आली होती. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी गटाने भारतातील सहा विमानतळांना लक्ष्य केल्याचा आरोपही त्याने केला होता; ज्यामुळे अधिकाऱ्यांनी सुरक्षा उपाययोजना वाढवण्यास आणि सीआयएसएफला हाय अलर्टवर ठेवणे सुरू केले होते.

उईकेने त्याच्या नवीनतम ईमेलमधून भारतातील स्लीपर सेल क्रियाकलापांविषयी इशारा दिला होता. पोलिसांनी खुलासा केला की, २०२१ मध्ये त्याची दोनदा चौकशी करण्यात आली होती. एकदा अयोग्य ईमेल पाठविल्याबद्दल त्याची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर तो महाराष्ट्र सोडून दिल्लीला गेला आणि तिथूनच त्याने या नव्या धमक्या दिल्या, असे ‘इंडिया टाइम्स’ने आपल्या वृत्तात सांगितले.

अधिकाऱ्यांनी उईकेचा शोध कसा लावला?

पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर यांच्या नेतृत्वाखालील अन्वेषकांनी जगदीश उईके याने विविध आस्थापनांना पाठविलेल्या ईमेलद्वारे त्याचा शोध घेतला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, गूगलने शेअर केल्याप्रमाणे केंद्रीय मंत्र्याला पाठविलेल्या ईमेलशी जोडलेला इंटरनेट प्रोटोकॉल (आयपी) पत्ता प्रेषक असल्याचे उईकेने सांगितले. त्याच्या मोबाईलमधील सिमकार्ड त्याच्या नावाने नोंदणीकृत असून, अर्जुनी मोरगावच्या पत्त्यावर असल्याचे तपासातून पुढे आले.

हेही वाचा : शास्त्रज्ञांनी लावला पहिल्या ‘ब्लॅक होल ट्रिपल’चा शोध; यातून नेमकं काय उलगडणार?

दिल्लीहून परतल्यानंतर उईकेला नागपूर पोलिसांनी अटक केली. त्याच्या डिजिटल ॲक्टिव्हिटीज आणि कम्युनिकेशन पॅटर्नची चौकशी सुरू आहे. अधिकारी त्याच्या डिव्हायसेस आणि सायबर कॅफेची तपासणी करीत आहेत. त्यांचा वापर त्याने धमकीचे ईमेल पाठविण्यासाठी केला असण्याची शक्यता आहे. “आम्ही त्याचे कॉल डिटेल रेकॉर्ड आणि लॅपटॉप स्कॅन करीत आहोत. त्याची बँक खाती आणि आर्थिक ट्रेलदेखील तपासले जात आहेत,” असे पोलीस आयुक्त रविंदर सिंगल यांनी ‘टीओआय’ला सांगितले. सध्या पोलिस कोठडीत असल्याने उईकेच्या कोठडीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Story img Loader