Jammu & Kashmir Terrorist Attack जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचार वाढताना दिसत आहे. गेल्या ८० तासांत या भागात तीन वेगवेगळे हल्ले झाले आहेत, ज्यामुळे या प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चिंता निर्माण झाली आहे. दहशतवाद्यांनी जम्मूच्या डोडा भागातील लष्कराच्या तात्पुरत्या परिचालन तळावर (टीओबी) हल्ला केला, ज्यात पाच लष्करी सैनिक आणि एक विशेष पोलिस अधिकारी जखमी झाले. सुरक्षा दलांनी नंतर माहिती दिली की, त्यांना एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात यश आले आहे. हा सर्वात ताजा हल्ला आहे. अजूनही या भागात चकमक सुरू असून तणावाचे वातावरण आहे. केंद्रशासित प्रदेशात नक्की काय घडत आहे? या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या निवडणुकांवर त्याचा परिणाम होऊ शकतो का? या हल्ल्यांमागे नक्की कोणाचा हात आहे? याविषयी सविस्तर जाणून घेऊ या.

जम्मूच्या डोडामधील हल्ला

मंगळवारी (११ जून) रात्री जम्मू आणि काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी पोलिस आणि सुरक्षा दलांच्या चौकीवर हल्ला केला. या हल्ल्याला भारतीय सैन्याकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. या हल्ल्यात लष्कराचे पाच जवान आणि एक पोलिस अधिकारी जखमी झाले. कठुआ जिल्ह्यातील सरथल भागाच्या सीमेला लागून असलेल्या चत्तरगाला भागातील लष्कराच्या तळावर पोलिस आणि राष्ट्रीय रायफल्सच्या संयुक्त चौकीवर हा हल्ला करण्यात आला. ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, दहशतवाद्यांनी चेकपॉईंटवर ग्रेनेडही फेकले, ज्यामुळे सुरक्षा कर्मचारी गंभीर जखमी झाले.

vishal gawali who assaulted girl in Chakki Naka area of ​​Kalyan handed over to Kolsewadi police
कल्याणमधील बालिकेचा मारेकरी विशाल गवळी डोंबिवलीतील पोलीस कोठडीत
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
BMC chief inspects development works in Borivali
विकासकामांच्या गुणवत्तेवर अधिक भर द्यावा; पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे अधिकाऱ्यांना आदेश
rape and murder of 2 minor sisters in Pune
Pune Rape-Murder : पुणे जिल्हा हादरला! दोन अल्पवयीन बहि‍णींवर बलात्कार करून खून; ५४ वर्षीय आरोपीला अटक
Two arrested in conspiracy to murder Ambernath MLA Dr Balaji Kinikar thane news
शिवसेना आमदाराच्या हत्येचा कट ? अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कटात दोघे अटकेत
pune traffic police loksatta news
पुणे: वाहतूक पोलिसांच्या कारवाईत खून प्रकरणातील आरोपीचा शोध
Satish Wagh murder case, Satish Wagh Wife ,
सतीश वाघ खून प्रकरणात पत्नी सामील, मारेकऱ्यांना पाच लाखांची सुपारी; पत्नी गजाआड
mcoca action against Chuha Gang, Pune, Chuha Gang,
पुणे : दहशत माजविणार्‍या ‘चूहा गँग’वर मोक्का कारवाई, आंबेगाव पोलिसांची कारवाई
मंगळवारी (११ जून) रात्री जम्मू आणि काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी पोलिस आणि सुरक्षा दलांच्या चौकीवर हल्ला केला. (छायाचित्र-पीटीआय)

हेही वाचा : जम्मू काश्मीरमध्ये हिंदू भाविकांवर हल्ला करणारी रेझिस्टन्स फ्रंट ही दहशतवादी संघटना नेमकी आहे तरी काय?

हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दल आणि पोलिसांना चत्तरगालाला पाठवण्यात आले. पोलिसांनी भद्रवाहहून चत्तरगालाकडे जाणारी सर्व वाहने थांबवली. अजूनही डोडामध्ये चकमक सुरू असल्याची आणि दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती आहे. काश्मीर टायगर्स या जैश-ए-मोहम्मदशी संबंधित दहशतवादी गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. काश्मीर टायगर्स गटाचे नाव पहिल्यांदा जानेवारी २०२१ मध्ये समोर आले, जेव्हा पोलिसांनी या गटाचा उल्लेख केला आणि या गटाला जैश-ए-मोहम्मदची सावली असे संबोधले होते. डिसेंबर २०२१ मध्ये, श्रीनगरमध्ये पोलिस बसवर झालेल्या हल्ल्यासाठी हा गट जबाबदार असल्याचे मानले जात होते. त्या हल्ल्यात तीन पोलिस ठार झाले होते आणि १४ जण जखमी झाले होते.

सैदा सुखलमधील दहशतवादी हल्ला

डोडा येथील दहशतवादी हल्ल्याने जम्मू हादरले असताना, कठुआ जिल्ह्यातील सैदा या गावात आणखी एक घटना घडली. दहशतवादी हल्ल्यानंतर पोलिस आणि दहशतवाद्यांमधील चकमकीत केंद्रीय राखीव पोलिस दलाचा एक जवान शहीद झाला. एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दोन दहशतवादी सैदा या गावात घुसले. गावकर्‍यांनी दहशतवाद्यांची माहिती पोलिसांना देताच त्यांनी गावात गोळीबार सुरू केला. जम्मू झोनचे अतिरिक्त पोलिस महासंचालक आनंद जैन यांनी माध्यमांना सांगितले की, दहशतवादी घरोघरी जाऊन पाणी मागत होते; परंतु गावकऱ्यांनी त्यांच्या तोंडावर दारे बंद केली.

त्यांच्या उपस्थितीबद्दल कळताच हिरानगरचे स्टेशन हाऊस ऑफिसर आणि उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी दहशतवाद्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान पोलीस दलावर ग्रेनेड फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका दहशतवाद्याचा मृत्यू झाला. दुसऱ्या दहशतवाद्याचा शोध अजूनही सुरू आहे. या हल्ल्यात सीआरपीएफ अधिकारी कबीर दास शहीद झाले, तर स्थानिक ओंकार नाथ जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

रियासीमध्ये यात्रेकरूंच्या बसवर दहशतवादी हल्ला

या हल्ल्यांपूर्वी रविवारी (९ जून) राष्ट्रपती भवनात नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी सुरू असताना, जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात यात्रेकरूंना घेऊन जाणारी ५३ आसनी बस दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर दरीत कोसळली. या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. मुख्यतः उत्तर प्रदेश आणि दिल्ली येथील यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस खोल दरीत कोसळली, त्यात तीन महिलांसह नऊ जण ठार झाले आणि अन्य ३३ जण गंभीर जखमी झाले. हल्ल्यातून वाचलेल्या एका व्यक्तीने सांगितले, “माता वैष्णोदेवीचे दर्शन घेतल्यानंतर परत येताना शिव खोरीपासून चार-पाच किलोमीटरवर आमच्या बसवर गोळीबार झाला. आमची बस दरीत पडल्यानंतरही गोळीबार सुरूच होता. या हल्ल्यात चालकाला गोळी लागली आणि अनेक प्रवासी जखमी झाले.

जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात यात्रेकरूंना घेऊन जाणारी ५३ आसनी बस दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर दरीत कोसळली. (छायाचित्र-पीटीआय)

दुसऱ्या वाचलेल्या व्यक्तीने दहशतवाद्यांच्या क्रूरतेविषयी सांगितले, “मी शिव खोरीच्या दर्शनासाठी गेलो होतो. परतत असताना काही लोकांनी आमच्या बसवर गोळीबार केला. त्यानंतर बस दरीत पडली. या घटनेत अनेक जण जखमी झाले. बस पडल्यानंतरही दहशतवाद्यांनी गोळीबार सुरूच ठेवला होता. मला वाटते तिथे दोन-तीन दहशतवादी होते. माझ्या मुलाने एका व्यक्तीला आमच्या बसवर मागून गोळीबार करताना पाहिले.” पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी त्वरित या घटनेचा आढावा घेतला आणि सर्व प्रकारची मदत देऊ केली.

हल्ल्याचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी आता हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन दहशतवाद्यांपैकी एकाचे रेखाचित्र जारी केले आहे. त्याच्याबद्दल माहिती देणाऱ्याला २० लाख रुपयांचे बक्षीसही पोलिसांनी जाहीर केले आहे. “पोनीच्या परिसरात यात्री बसवर नुकत्याच झालेल्या हल्ल्यात सामील असलेल्या दहशतवाद्याच्या ठावठिकाणाविषयी कोणतीही माहिती दिल्यास रियासी पोलिसांनी २० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे,” असे पोलिस प्रवक्त्याने ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेला सांगितले.

हेही वाचा : विमान प्रवासादरम्यान मद्यसेवन का टाळावं?

दहशतवादी हल्ले आणि राजकारण

बस दुर्घटनेनंतर काँग्रेसने म्हटले आहे की, जम्मू आणि काश्मीरमध्ये शांतता आणि सामान्य स्थिती परत आल्याच्या भाजपाच्या दाव्याचे वास्तव उघड झाले आहे. काँग्रेसचे पवन खेरा म्हणाले, “आम्ही शांतता परत आणली असा दावा करून शांतता आणि सुरक्षितता सुनिश्चित होत नाही. केवळ भाषणे करून तुम्ही शांतता आणू शकत नाही, देशाला याचे उत्तर हवे आहे.”

निवडणुकीच्या तोंडावर शांतता भंग करण्याचा प्रयत्न?

जम्मू आणि काश्मीरमध्ये ७० ते ८० दहशतवादी सध्या सक्रिय असल्याची माहिती आहे. निवृत्त मेजर जनरल ए. के. सिवाच यांच्या मते, हे हल्ले स्पष्टपणे या प्रदेशातील सामान्य स्थिती बिघडवण्यासाठी दहशतवाद्यांकडून केलेला प्रयत्न होता. ‘झी न्यूज’शी बोलताना ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीपूर्वी जम्मू आणि काश्मीरमध्ये अधिकाधिक दहशतवादी हल्ले भडकावण्याचा आणि हा परिसर शांत नसल्याचे जगाला दाखवण्याचा हा पाकिस्तानचा डाव आहे.

Story img Loader