जपानच्या पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थानाला सामान्यतः सोरी डायजिन कांतेई, असे संबोधले जाते. हे निवासस्थान फार पूर्वीपासून आकर्षणाचा विषय राहिले आहे. स्थापत्यशास्त्रीय भव्यता आणि ऐतिहासिक महत्त्वासाठी ओळखली जाणारी ही वास्तू त्याच्याशी जोडल्या गेलेल्या भुतांच्या कथेमुळेही ओळखली जाते. जपानच्या लष्करी आणि राजकीय इतिहासाच्या गडद अध्यायांशी जोडलेल्या कांतेईच्या झपाटलेल्या कथांमुळे ही वास्तू चर्चेचा विषय राहिली आहे. आता कांतेई म्हणून संबोधले जाणारे नायकाकू सोरी डाईजिन कांतेई हे निवासस्थान जपानच्या पंतप्रधानांचे कार्यस्थळ आहे. काय आहे या वास्तूचा रक्तरंजित इतिहास? खरंच या वास्तूत भुतांचा वावर आहे का? त्याविषयी जाणून घेऊ…

या वास्तूचा इतिहास काय?

१८ मार्च १९२९ रोजी जपानच्या पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान असलेले कांतेईचे काम पूर्ण झाले. त्याच्या प्राथमिक संरचनेत दोन मजली प्रबलित काँक्रीट विभागाचा समावेश होता, ज्यामध्ये सुमारे ५,२०० चौरस मीटर क्षेत्रफळ होते. १ सप्टेंबर १९२३ रोजी झालेल्या महाकांटो भूकंपात केंद्र सरकारच्या मंत्रालयाच्या इमारतींचे लक्षणीय नुकसान झाल्यानंतर सरकारने केंद्र सरकारची मंत्रालय बांधकाम योजना सुरू केली. या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा केंद्रबिंदू म्हणून ‘कांतेई’ची निर्मिती करण्यात आली. पूर्वीच्या इम्पिरियल हॉटेलच्या मागे (जुलै १९२४ मध्ये पूर्ण झालेले) प्रसिद्ध अमेरिकन वास्तुविशारद फ्रँक लॉयड राईट यांची निर्मिती केल्याचे सांगण्यात येते. परंतु, प्रत्यक्षात कांतेईची रचना मुराजी शिमोमोटो यांनी केली होती. वित्त मंत्रालयाच्या सुविधा व्यवस्थापन विभागाच्या बिल्डिंग विभागातील वास्तुविशारद शिमोमोटो यांनी त्या काळात जपानी वास्तुकलेवर आधारित या इमारतीची निर्मिती केली होती. त्याच्या सौंदर्यात्मक आकर्षणाच्या पलीकडे कांतेई हे जपानच्या राजकीय नेतृत्वासाठी प्रशासकीय आणि निवासी केंद्र होते. परंतु, त्याचा इतिहास देशाच्या सर्वांत अशांत आणि दुःखद घटनांमध्ये गुंफला गेला.

urmila kothare car accident video
अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारने दोन मजुरांना चिरडलं, एकाचा मृत्यू; घटनास्थळावरील व्हिडीओ आला समोर
IND vs AUS Usman Khawaja Reveals How He Stop Virat Kohli Sam Konstas Fight on Field Melbourne
IND vs AUS: “मी विराटला ओळखतो…,” कॉन्स्टास-कोहलीमध्ये मैदानात…
suresh dhas prajakta mali on santosh deshmukh murder
Prajakta Mali: प्राजक्ता माळीचं नाव का घेतलं? सुरेश धस यांनी मांडली भूमिका; तक्रारीच्या मुद्द्यावर म्हणाले…
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली नाही’, डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मृतीस्थळाच्या मागणीवर प्रणव मुखर्जींच्या लेकीचा संताप
How many properties does Dawood Ibrahim own in Mumbai and Konkan
दाऊद इब्राहिमच्या मुंबई आणि कोकण परिसरात किती मालमत्ता… जप्तीनंतर त्यांचे काय होते?
Former Prime Minister of India Manmohan Singh
अग्रलेख: मार्दवी मार्तंड!
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Sandeep Kshirsagar on Viral Photo
Sandeep Kshirsagar: तरुणीबरोबरच्या त्या व्हायरल फोटोवर आमदार संदीप क्षीरसागर यांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “तो फोटो…”

हेही वाचा : ‘Suicide Disease’ काय आहे? असह्य वेदना निर्माण करणाऱ्या या गंभीर आजाराची लक्षणे आणि उपाय काय?

आता कांतेई म्हणून संबोधले जाणारे नायकाकू सोरी डाईजिन कांतेई हे निवासस्थान जपानच्या पंतप्रधानांचे कार्यस्थळ आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

‘कांतेई’ला पछाडलेली वास्तू का म्हटले जाते?

‘कांतेई’ची प्रतिष्ठा मुख्यत्वे जपानच्या इतिहासातील दोन महत्त्वपूर्ण घटनांमुळे मिळाली आहे.

१५ मे १९३२ : १५ मे १९३२ मध्ये ११ तरुण नौदल अधिकाऱ्यांनी तत्कालीन पंतप्रधान सुयोशी इनुकाई यांची ‘कांतेई’च्या भिंतीमध्ये हत्या केली. इनुकाईच्या लष्करी विरोधामुळे निराश झालेल्या अधिकाऱ्यांनी त्यांची हत्या केली.

२६ फेब्रुवारीची १९३६ : चार वर्षांनंतर इम्पिरियल लष्करी अधिकाऱ्यांनी केलेल्या उठावाच्या प्रयत्नात कांतेई पुन्हा एकदा अराजकतेचे केंद्र ठरले. दोन माजी पंतप्रधानांसह अनेक सरकारी अधिकारी मारले गेले. परंतु, पंतप्रधान केसुके ओकाडा एका कपाटात लपले; ज्यामुळे ते थोडक्यात मृत्यूला दूर ठेवू शकले. त्यांच्या जागी त्यांच्या मेहुण्याला गोळी लागली आणि त्याचा मृत्यू झाला. या हिंसक उठावांनी पंतप्रधान निवासस्थानावर कायमची छाप सोडली. १९३६ च्या सत्तापालटाच्या वेळी झाडल्या गेलेल्या प्रवेशद्वारावरील गोळ्यांच्या खुणा नरसंहाराची आठवण करून देतात. या घटनांनंतर झपाटलेल्या कथांना जन्म घेतला. वर्षानुवर्षे रात्रीच्या वेळी निवासस्थान आणि त्याच्या बागांमध्ये अनेकदा भटकणारे लष्करी गणवेशातील पुरुष, अशा वर्णनात्मक भुताखेतांच्या अफवा कायम आहेत. जपानचे माजी पंतप्रधान योशिरो मोरी यांनी एकदा दिवंगत शिन्झो आबे यांना ‘कांतेई’मध्ये भूत पहिल्याबद्दल सांगितले होते, असे जपानी दैनिक ‘सांकेई शिंबून’ने दिलेल्या वृत्तात आहे.

त्याचप्रमाणे माजी पंतप्रधान त्सुतोमू हाता यांच्या पत्नी यासुको हाता यांनी त्यांच्या आठवणीविषयी सांगताना निवासस्थानी असताना भूत असल्याचे जाणवल्याबद्दल लिहिले. “लष्करी अधिकारी मध्यरात्री बागेत उभे असायचे,” असे तिने नमूद केले. इमारतीच्या अंधकारमय इतिहासासह या कथांनी असा अंदाज लावला आहे की, उठावादरम्यान मृत्यू झालेल्यांचे आत्मे अजूनही ‘कांतेई’च्या परिसरात भटकतात.

पंतप्रधानांना वास्तूची भीती

जपानच्या पंतप्रधानांनी वर्षानुवर्षे ‘कांतेई’चा निवासस्थान म्हणून वापर केलेला नाही. ऐतिहासिक महत्त्व असूनही अनेक नेत्यांनी विविध कारणे सांगून इतरत्र राहणे पसंत केले. जपानचे सर्वाधिक काळ सेवा देणारे पंतप्रधान म्हणून त्यांच्या विक्रमी कारकि‍र्दीत शिंजो आबे यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात (२००६-२००७) अल्प मुक्कामानंतर कांतेई येथे राहणे टाळले. त्याऐवजी ते टोकिओच्या शिबुया जिल्ह्यातील त्यांच्या खासगी निवासस्थानात वास्तव्यास गेले. आबेचे उत्तराधिकारी योशिहिदे सुगा यांनीदेखील संसदीय गृहनिर्माण निवडून ‘कांतेई’मध्ये राहणे टाळले. त्यामुळे व्यावहारिक असताना न वापरलेल्या निवासस्थानाची देखभाल करण्यासाठीचा खर्च वाढला, जो अंदाजे वार्षिक १६० दशलक्ष येन (अंदाजे १.४ दशलक्ष डॉलर्स) इतका आहे.

व्यावहारिक आणि प्रतीकात्मक अशा दोन्ही समस्यांचे निराकरण करण्यासाठी ‘कांतेई’चे २००२ आणि २००५ दरम्यान मोठ्या प्रमाणात नूतनीकरण करण्यात आले. ८.६ अब्ज येन (७५.८ दशलक्ष डॉलर्स) प्रकल्पामध्ये इमारतीच्या अद्वितीय वास्तुशिल्प वैशिष्ट्यांचे जतन करून सुविधेचे आधुनिकीकरण केले गेले. अहवाल असेही सूचित करतात की, या काळात शिंतो यांनी ‘एक्सॉसिझम’ केले. ही दुष्ट आत्म्यांना बाहेर काढण्याची एक क्रिया आहे. जवळजवळ दशकभर कायमस्वरूपी रहिवासी नसल्यामुळे ‘कांतेई’ पछाडलेली किंवा अशुभ वास्तू आहे, या समजुतीला आणखी उत्तेजन मिळाले.

हेही वाचा : २६/११ दहशवादी हल्ल्याचा कट रचणाऱ्या दहशतवाद्याचा पाकिस्तानात मृत्यू; कोण होता अब्दुल रहमान मक्की?

तत्कालीन पंतप्रधान फुमियो किशिदा डिसेंबर २०२१ मध्ये ‘कांतेई’मध्ये गेल्या आणि साधारण १० वर्षांत या इमारतीत जाणाऱ्या त्या पहिल्या नेत्या ठरल्या. अफवांवर प्रतिक्रिया देत, त्यांनी भुतांबद्दलची चिंता फेटाळून लावली. त्यावेळी किशिदा यांनी सांगितले होते की, त्यांनी कोणतेही भूत पाहिलेले नाही आणि रात्रभर त्या चांगल्या झोपल्या. आता किशिदा यांचे उत्तराधिकारी शिगेरू इशिबा यांनी ‘कांतेई’चा इतिहास स्वीकार करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. “मला विशेष भीती वाटत नाही,” असे त्यांनी सांगितले आहे.

Story img Loader